द टायटन
लेखनप्रकार
* १. मला फुटबॉलमधलं काही कळत नाही.
* २. त्यावेळी पेप्रात वैग्रे जे वाचलं होतं, त्यावरून आणि आता नेटावरनं थोडंफार माहिती करून घेऊन लिहितोय.
मागील १० वर्षे हा फोटो मनावर कोरला गेलाय...
फुटबॉल वर्ल्डकपः२००२- अंतिम सामना - ३० जून २००२
जर्मनी वि ब्राझील
जर्मनी : जगातील सर्वोत्तम बचाव असलेला संघ (आणि जगातील सर्वोत्तम गोलकीपर व संघाचा कर्णधार-ऑलिवर कान)
ब्राझील : जगातील सर्वोत्तम आक्रमण असलेला संघ (३ R: रोनाल्डो, रिवाल्डो आणि रोनाल्डिनो) (उदा. द्रविड, लक्ष्मण, सचिन आणि गांगुलीची मधली फळी किंवा भागवत-चंद्रशेखर-प्रसन्ना-वेंकटराघवनची फिरकी चौकडी)
खरंतर या ३ रो-रि-रो मुळे ब्राझील हॉट फेवरिट होते. त्यामानाने जर्मनीकडून कुणाला फार अपेक्षा नव्हत्या. पात्रता फेरीत अपयशी ठरून पहिल्यांदाच जर्मनीला वर्ल्डकप प्रवेशासाठी झुंजावं लागलं होतं. अर्जेंटिना, इटली व गतविजेता फ्रान्स यांच्यापैकी एक फायनलचा दुसरा प्रतिस्पर्धी असेल, अशी अटकळ होती. पण, भरभक्कम बचावाच्या जोरावर-अंतिम सामन्यापूर्वी फक्त १ गोल स्वीकारत- जर्मनीने अंतिम सामन्यात धडक मारली.
जर्मनीचा आघाडीचा स्ट्रायकर- बलाक (Michael Ballack) ला उपांत्य सामन्यातील येलो कार्डची शिक्षा म्हणून फायनल खेळता येणार नव्हती. अर्धी लढाई जर्मनीने तिथेच गमावली. शिवाय अभेद्य मानला जाणारा ऑलिवर कानसुद्धा १०० % फिट नव्हता. त्याच्या उजव्या हाताच्या अनामिकेचे स्नायू दुखावले गेले होते.
ग्रुपस्टेज व बादफेर्यांमध्ये कान ने केवळ १ गोल स्वीकारला होता. ६७व्या मिनिटापर्यंत ऑलिवर अभेद्य होता. पण ६७व्या मिनिटाला त्याच्या हातून चूक घडली. रिवाल्डोने गोलच्या दिशेने मारलेला एक फटका ऑलिवरने अडवला, पण त्याला बॉल पकडून ठेवता आला नाही. बॉल त्याच्या हातातून निसटला आणि गेला....रोनाल्डोच्या पायापाशी!!! पहिला गोल.
सामन्याच्या ६७व्या मिनिटाला केवळ ब्राझीलच्या सुदैवाने गोल आणि बाराच मिनिटांनी रोनाल्डोने आणखी एक गोल केला- हा गोल मात्र १००% रोनाल्डोचा होता.
अंतिम सामन्यात ऑलिवर कान वर २ गोल स्वीकारण्याची वेळ आली. जर्मनी हरला होता. शिट्टी वाजताच ब्राझीलच्या खेळाडूंनी जल्लोष चालू केला आणि ऑलिवर जागेवरच मटकन खाली बसला.
सर्वाधिक गोलः गोल्डन बूट - रोनाल्डो
२र्या क्रमांकाचे गोलः सिल्वर बूट -मिरोस्लाव क्लोज-जर्मनी (५गोल-सौदी अरेबिया विरुद्ध हॅटट्रिक- सर्व पाच गोल हेडरने )
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: गोल्डन बॉल - द टायटन-ऑलिवर कान
गोलपोस्टला हताशपणे टेकून बसलेला टायटन आज १० वर्षांनीही लोकांच्या मनातून गेलेला नाही.

वाचने
3823
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
बरोबरे
क्लास!
एक राहिलं...
मस्तच, पण हात फार लवकर आखडता
In reply to मस्तच, पण हात फार लवकर आखडता by गणपा
अहो...
येक नंबर हो... !
If
In reply to If by मन१
कार्लोस हे नाव का येतं त्यासाठी हा व्हिडीओ....
फुटबॉल च्या जगात जर्मनी हा
मस्तच !!
आवडल. पण त्रोटक वाटलं
In reply to आवडल. पण त्रोटक वाटलं by स्पा
त्रोटक
In reply to त्रोटक by तुषार काळभोर
छान ...
In reply to छान ... by छोटा डॉन
हे मात्र खरं. कान भारी पण
लिखाण आवडलं
आठवण छान!