विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
9 Jun 2012 - 1:14 am

विज्ञान आणि बुद्धिवाद प्रकरण 2
विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे

प्रकरणाचे शीर्षक वाचून कोणाला ही असे वाटण्याची शक्यता आहे की, विज्ञानातही चमत्कार आहेत आणि चमत्काराचे ही विज्ञान आहे असे असेल तर ज्या विज्ञानात चमत्कर आहेत त्याला विज्ञान कसे म्हणावे व ज्या चमत्कारांचे विज्ञान आहे त्याला चमत्कार कसे म्हणावे असा साहजिकच प्रश्न उपस्थित होईल. कारण आपण विज्ञान व चमत्कार एकत्र नांदू शकत नाहीत, त्या परस्पर विरुद्ध संकल्पना आहेत असे समजतो. मग या शीर्षकाचा अर्थ काय?

विज्ञानावर विश्वास ठेवणारे लोक चमत्काराला नाकारतात. या उलट चमत्कारांवर विश्वास ठेवणारे लोक, विज्ञानाला चमत्कारांची उपपत्ती लावता येणे शक्य नाही असे समजतात. वस्तुतः चमत्कार नाकारणारे व चमत्कारावर विश्वास ठेवून चमत्काराच्या उपपत्तीची शक्यता नाकारणारे हे दोघे ही चमत्कारांचा अर्थ मर्यादित करतात. पण चमत्कारांविषयीची ही मर्यादित किंवा रुढ कल्पना कितपत बरोबर आहे? आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने या रुढ कल्पनेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे चमत्कारांवर विश्वास ठेवणाऱ्यांप्रमाणेच चमत्कार नाकारणारे लोक सुद्धा एक प्रकारे अंधश्रद्ध ठरले आहेत.

चमत्कार हा रूढ कल्पनांवर आधारित आहे असे म्हणता येईल ही जी कल्पना रूढ झाली आहे ती एरव्ही चमत्कारयुक्त असली तरी केवळ सवयीमुळे तिच्यातील चमत्कार नाहीसा झालेला असतो. उदा. ज्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा (पाण्यावर वा हवेतून चालल्यामुळे ) भंग झाला तर चमत्कार घडला असे म्हणता येईल असे जे वर म्हटले ती गुरुत्वाकर्षण शक्ती हाच मुळी एक मोठा चमत्कार आहे. हे तिच्या विषयी शास्त्रीय सिद्धांत मांडण्यापुर्वी शास्त्रज्ञांनी सुद्धा त्या शक्तीला चमत्काराच्या सदरात ढकलले होते हा इतिहास आहे. न्यूटनच्या पुर्वी केप्लरने पृथ्वीवरील समुद्रातील भरती ओहोटी सुर्याच्या व चंद्राच्या आकर्षणशक्तीमुळे घडून येतात, असे जेंव्हा प्रतिपादन केले तेंव्हा गॅलिलिओने त्याला गूढ कल्पनाविलास (Occult Fancy) म्हटले होते. हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्याबद्दल गॅलिलिओला दोष देता येत नाही.

चमत्कार अशक्य म्हणणाऱ्यांचे विज्ञान

चमत्कार अशक्य आहेत म्हणणारे चमत्काराचा अर्थ ‘भौतिक शास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियमांचा भंग’ असा करतात. आपण एखादा विशिष्ट दृष्टीकोण स्वीकारून त्यालाच चिकटून बसल्यामुळे हे सर्व वाद निर्माण होतात. वास्तविक निसर्गात चमत्कार नावाची गोष्ट नसते, सर्व घटना नैसर्गिकच असतात (नाही तर त्या घडल्याच नसत्या) ज्या घटना आपल्याला समजत नाहीत त्यांना आपण चमत्कार हे नाव देतो इतकेच. म्हणजे नैसर्गित घटना समजून घेण्याच्या आपल्या असमर्थतेतून चमत्कार निर्माण होतात. जितकी आपली असमर्थता अधिक तितके चमत्कार ही अधिक. सेंट किल्डा बेटीतील लोकांना त्या बेटाला एखादे जहाज येऊन पोहोचल्यानंतर प़डसे होत असे. हे ऐकून डॉ. जॉन्सनने म्हटले होते की असा चमत्कार घ़डणे अशक्य आहे. पण तसे खरोखरच घडत होते, कारण तो चमत्कार नव्हता. जंतुनिर्मित रोगांचा सिद्धांत प्रस्थापित झाल्यावर - व्हायरसमुळे पडसे होते हे कळल्यावर त्यातील चमत्कार नष्ट झाला.

विज्ञानाबाबत संकुचित दृष्टीकोन असलेले लोक समजतात की, विज्ञानाने भौतिक विश्वासंबंधी शोधून काढलेले नियम अबाधित व स्वयंपुर्ण असून या विश्वासंबंधी विज्ञानाला सर्व ज्ञात झालेले आहे. असा दृष्टीकोन स्वीकारणाऱ्यांच्या विज्ञानाला 'यंत्रवादी विज्ञान' म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील या दृटीकोनाचा प्रवक्ता म्हणून लाप्लास याचा उल्लेख करता येईल. त्याने य़ांत्रिक विश्व (Mecanique Celeste) हा पाच खंडांचा ग्रंथ नेपोलियन बादशहाला भेट देण्यासाठी त्याच्याकडे गेला असता नेपोलियन बादशाहाने विचारले , 'महाशय लाप्लास!, आपण आपल्या ग्रंथात ईश्वराचा एकदाही उल्लेख केलेला नाहीत असे ऐकतो. एवढ्या प्रचंड ग्रंथात हा उल्लेख आपण कसा व का टाळला? यावर लाप्लास म्हणाला, 'मला ईश्वराच्या गृहित कृत्याची गरज नाही ('Je nai pas besoin de cette hypothese') ईश्वराच्या गृहित कृत्याची गरज मानवाला विश्वातील न समजणाऱ्या गोष्टींची कारणमिमांसा देण्यासाठी असल्याने लाप्लासला सुचवायचे होते की विश्वात मानवाला न समजण्यासारखे (चमत्कार वगैरे ) काही नाही. पण या शंभर वर्षात इतके परिवर्तन घडून आले. की सर जेम्स जीन्स या प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाना असे म्हणाले लागले की आज बहुतेक सर्व भौतिक शास्त्रज्ञात विश्व हे यंत्र नाही याबद्दल एकमत झाले आहे. असे म्हणावयास हरकत नाही...

...स्थूल जगत समजण्यासाठी सूक्ष्म जगताचा अभ्यास नसून सूक्ष्म जग समजण्यासाठी स्थूल जगताचा हा अभ्यास आहे, अशी शाब्दिक मखलाशी य़ेथे कोणी करील, तरी त्याने प्रश्न डावलता येत नाही. स्थूलजगताततील नियमांनी तिची उपपत्ती लावण्याची जबाबदारी शास्त्रज्ञ टाळू शकत नाहीत. त्यासाठी स्थूल व सूक्ष्म असा फरक करायचा असेल तर असा फरककरून उपपत्ती तरी लावता आली पाहिजे. अन्यथा असा फरक करण्याची काहीच गरज नाही (मग ही उणीव सूक्ष्म जगताच्या अभ्यासाची उणीव न ठरता सर्वच विज्ञानाची उणीव ठरते) आणि प्रत्यक्षात काही शास्त्रज्ञ ही उणीव आहे हे मान्य करतात. दुसऱ्या शब्दात, ज्याला सामान्य लोक चमत्कार म्हणतात, पण जे वास्तवात चमत्कार नाहीत ते वैज्ञानिक दृष्ट्या समजाऊन घेण्याच्या प्रयत्नाला ते लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून एक नवेच शास्त्र उदयाला आले आहे . त्या पुढील प्रकरणात विचार करू.

या बद्दल इथे वाचा.

मांडणीविज्ञानविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

9 Jun 2012 - 3:44 am | अर्धवटराव

हा लेख थोडा माणसातला वाटतोय..
हे ही नसे थोडके.

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

9 Jun 2012 - 11:54 am | नाना चेंगट

ओक साहेब हळू हळू माणसाळत चालले आहेत असे म्हणायचे आहे का ? ;)

अर्धवटराव's picture

9 Jun 2012 - 10:50 pm | अर्धवटराव

अमर - मेरे दो ही शौक है... शिकार करना और फुटबॉल खेलना
प्रेम - उनका एक सवाल, मेरे दो जवाब.. सवाल एक जवाब दो, सवाल एक जवाब दो.

अर्धवटराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jun 2012 - 5:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"विश्वासंबंधी विज्ञानाला सर्व ज्ञात झालेले आहे." असं कोणीही शहाणा आणि/किंवा पोटार्थी वैज्ञानिक म्हणणार नाही. 'यंत्रवादी विज्ञाना'बद्दल आधी ऐकलं नव्हतं, पण ते असो. स्थूल जगत, सूक्ष्म जगत वगैरे परिच्छेद डोक्यावरून गेला किंवा संदर्भरहित वाटला.

लाप्लास आणि नेपोलियनची गोष्टही आधी ऐकली नव्हती, पण ती विशेषतः आवडली. युरोपातल्या अंधारयुगानंतर एका बाजूने गॅलिलेओ, न्यूटन, लाप्लास, कोपर्निकस, दे कार्ते, डार्विन असे (वेगवेगळ्या देशांतले आणि काळातले) शास्त्रज्ञ आणि दुसरीकडून गोया, व्होल्तेअर इत्यादी अनेक लेखक, कलाकारांनी (या बाबतीत फार अभ्यास नाही त्यामुळे दा विन्ची, मायकेलएंजेलो वगैरे नावं ठोकून देत नाही) समाजमान्यता, नैतिकता, चर्च आणि राजा ही सत्तास्थानं, अशा सर्व प्रस्थापितांच्या सत्तांना प्रचंड हादरा दिला.

यातल्या अनेक लोकांना आपापल्या काळात राजसत्ता आणि धर्मसत्तेने प्रचंड त्रास दिला. त्यांच्या काळाच्या पुढे असण्यामुळे आज पाश्चात्य जग आधुनिक मूल्य, परंपरा, विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्याच बाबतीत पुढे आहे असं म्हणण्यास हरकत नाही.

आपण कुठे आहोत? धर्मसत्ता किंवा राजसत्तेला अगदी माफक प्रमाणात आवाहन देणार्‍यांचं आपल्या समाजात काय होतं? आपण त्यांच्या उदाहरणांतून काही शिकणार आहोत का? का आपण मागचे असूनही ठेचकाळणार?

>>धर्मसत्ता किंवा राजसत्तेला अगदी माफक प्रमाणात आवाहन देणार्‍यांचं आपल्या समाजात काय होतं?
-- प्रचंड कमाईचे ठेके मिळतात. सरकार मान्यता, राजमान्यता, समाजमन्यता मिळते. सगळं काहि या आवाहनावरुनच होतं :)

अर्धवटराव

कवितानागेश's picture

9 Jun 2012 - 11:38 am | कवितानागेश

माफक प्रमाणात आवाहन देणार्‍यांचं >
आव्हान म्हणायचय का?
आवाहन म्हणजे विनंती आणि आव्हान म्हणजे ललकारणे ( चुनौती/ challenge) असे अर्थ आहेत असे मला आपले उगीचच वाटतंय.
बाकी नो कॉमेंट्स.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jun 2012 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काल डोस कमी पडल्यामुळे चूक झाली असावी. ;-)

थँक्स.

नाना चेंगट's picture

9 Jun 2012 - 11:52 am | नाना चेंगट

>>>>>आपण कुठे आहोत? धर्मसत्ता किंवा राजसत्तेला अगदी माफक प्रमाणात आवाहन देणार्‍यांचं आपल्या समाजात काय होतं? आपण त्यांच्या उदाहरणांतून काही शिकणार आहोत का? का आपण मागचे असूनही ठेचकाळणार?

खिक.
आपण टुकारच आहोत हे एकदाचे मान्य करुनच टाकूया म्हणजे जीवाची (आम्ही मानत असलेल्या ;) ) अनावश्यक काहीली कमी होईल. :)

दादा कोंडके's picture

9 Jun 2012 - 12:38 pm | दादा कोंडके

थोड्याश्या वेगळ्या काँटेक्स्ट मधला कोट (बील गेट्स की वॉरेन बफेट चा) आठवला, मनी इज नॉट एवरीथींग बट मेक शुअर यू मेक प्लेंटी ऑफ इट बिफोर सेयींग धिस नॉनसेन्स! :)

काय सुंदर कोट आहे!! वॉरन बफे ना माझा दंडवत!!!!

विक्षिप्तताई,

यंत्रवादी विज्ञाना'बद्दल आधी ऐकलं नव्हतं, पण ते असो. स्थूल जगत, सूक्ष्म जगत वगैरे परिच्छेद डोक्यावरून गेला किंवा संदर्भरहित वाटला... लाप्लास आणि नेपोलियनची गोष्टही आधी ऐकली नव्हती, पण ती विशेषतः आवडली.

आपल्यासारख्या बहुवाचक व्यक्तीने यंत्रवादी विज्ञान व लाप्लासची गोष्ट नविन समजल्याचे प्रांजळपणे नमूद केलेत म्हणून ...
... हा धागा प्रा. गळतगे यांच्या लेखनातील काही मजकूर सादर करून त्यातील अन्य व सविस्तर माहिती इच्छुक वाचकांनी इथे वरून वाचायला उद्युक्त करणे असा आहे. म्हणून कधी कधी काही परिच्छेद आधीच्या मजकुराशी विसंगत वाटतात. शिवाय काही ठिकाणी गचाळ टाईप केले गेले आहे त्या बद्दल क्षमार्थी...

अहो भाग्यम, काय तो सोनियाचा दिस आज, ओककाका आपल्याच धाग्याच्या खाली प्रतिसादात दिसले.

नाना चेंगट's picture

9 Jun 2012 - 7:16 pm | नाना चेंगट

अश्लिल! अश्लिल !!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2012 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा

हे तर भयंकर अश्लिल ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2012 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

राजघराणं's picture

9 Jun 2012 - 4:17 pm | राजघराणं

आवडला

jaypal's picture

9 Jun 2012 - 8:23 pm | jaypal

सोनियचा दिनू कारण राजघराण्यात देखिल असे लेख पसंत केले जात आहेत ;-)
असा वैज्ञानिक चम्त्कार घडेल का हो?
vertual

तिमा's picture

9 Jun 2012 - 7:25 pm | तिमा

आमच्या घरी एक पृथ्वीचा गोळा आहे. तो हवेत तरंगतो व फिरतच रहातो. यामागे विज्ञान आहे की चमत्कार ?