साहित्य :
एक कप
एक बशी
एक चमचा
चांगली गाळणी
एक छोटेसे पातेले
गॅस शेगडी (शिलींडरसह)
लायटर
अर्धा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे साखर
एक चमचा चहापावडर
चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर
कृती :
प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे.
पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे.
लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी.
अधुन मधून चमच्याने ढवळावे.
उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी.
आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा. कपाच्या खाली बशी ठेवावी.
आणिक काय ? प्यावा सुर्र करुन :)
हवे असल्यास बरोबर बिस्कीट, वगैरे खावे आवडीनिवडीनुसार !!
विशेष सुचना :
१) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे.
चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे.
आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे.
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये.
मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये.
त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे.
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
२) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.
प्रतिक्रिया
11 May 2012 - 3:13 pm | प्रीत-मोहर
=)) =)) =))
आणी माझ्यासारख्या कन्येच्या भावी नवर्याने काय करावे?
11 May 2012 - 3:18 pm | गवि
म्हणजे कशा?
-(शंकित) गवि.
11 May 2012 - 3:23 pm | प्रीत-मोहर
म्हंजे कश्या ते आमचे सगळे मित्र जाणतातच !!!!
आम्ही स्वस्तुती करत नाही. ;)
11 May 2012 - 4:13 pm | मृत्युन्जय
मी मगाचपासुन "माझ्यासारख्या; कन्येच्या भावी नवर्याने" असे वाचतो आहे. चुक माझीच आहे पण त्यामुळे प्रीमो चा आयडी हॅक झाल्याचा संशय आला ना :)
11 May 2012 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते
आणी माझ्यासारख्या कन्येच्या भावी नवर्याने काय करावे?
.... Punarvichaar! ;)
11 May 2012 - 5:20 pm | कुंदन
झालं, टाकलीत ना काडी. ;-)
11 May 2012 - 5:23 pm | प्रीत-मोहर
कसला?
(निरागस, भोळी) प्रीमो
12 May 2012 - 1:41 am | सोत्रि
बिपीन्दा, जहबर्या! ;)
- (पुनर्विचार न करावा लागलेली बायको असलेला नशिबवान*) सोकाजी
* मला त्या भावी नवर्याच्या नशिबाची दया येतेय, काय होणार बिच्चार्याचे ;)
11 May 2012 - 3:14 pm | प्यारे१
काही शंका आहेत पण सध्या इतर पालथ्या धंद्यांमध्ये वेळ जात असल्यानं सविस्तर शंका नंतर विचारेन.
ही फक्त पोच. ;)
11 May 2012 - 3:16 pm | गवि
चहाप्रमाणे उकळणार्या कडवट पुरुषप्रधान प्रवृत्तीचा धागा असं म्हणून पाहतो.
आजच्या बदललेल्या काळात पुरुषांनीही इ इ इ.
निषेध. इ. इ.
11 May 2012 - 3:23 pm | प्यारे१
आँ.....?????
ह्यात तुम्हाला 'रेसिस्ट' काय दिसलं???
बायको घरी असताना इतकी कॅलरीयुक्त पाकृ (एक कप चहाला एक कप दूध, दोन चमचे साखर) करुन स्वतःचं आणि द्विगुणित बायकोचं आपलं बायको असल्यामुळं द्विगुणित कॅलरींमुळं वजन वाढणार हे साधं समीकरण समोर असताना आपल्याला कडवट पुरुषप्रधान वृत्ती दिसली कुठं? :)
निव्वळ आरोग्याचा विचार करुन नानांनी ही सूचना दिलेली स्पष्ट दिसत आहे.
आपला मुद्दा खारिज करा. (ख गळ्यातून) ;)
तुमचाच निषेध इ.इ.
11 May 2012 - 3:31 pm | गवि
या तुमच्या विधानाची गंमत वाटली.
प्रतिसाद देण्यापूर्वी माझी वाक्यं नीट वाचली असतीत तर अशी उथळ विधानं केली नसतीत.
मी पुरुषप्रधान असं म्हटलं आहे. रेसिस्ट हा शब्द माझ्या तोंडी घालून मला पुडीच्या बिनदुधाच्या चहासारखा काळा रंग फासू पाहताय. त्यामुळे तुमचाच निषेध.. खारिजचा वगैरे प्रश्नच येत नाही.. त्यामुळे गळ्यातून किंवा कशातूनही ख काढण्याचे कष्ट आम्ही घेणार नाही असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
11 May 2012 - 3:47 pm | प्यारे१
ब्रूट्स यू टु ?
रेसिस्ट म्हणजे फक्त काळे गोरे माननार्या/म्हणणार्या गविंचा जाहिर निषेध!
तुम्हाला 'वाढ' दिवसाच्या 'शुभेचचहा' देत नाही! ;) (ह घ्या)
आम्ही जगातल्या सर्व स्तरातल्या, सर्व वर्गामध्ये केल्या गेलेल्या भेदांचा समावेश रेसिस्ट या शब्दात करतो हे समजून घ्यायला हवे गवि तुम्ही!
साहजिकच पुरुषप्रधान म्हणजे एक वर्ग येतो आणि तुम्ही वर्गभेद दाखवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात!
11 May 2012 - 3:54 pm | गवि
काहीतरी हीन प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी उपमा शोधताना तुम्हाला "पोळी भाजून घेणे" या परंपरागत स्त्रैण कामाचीच आठवण झाली. त्या ऐवजी आपली सिगरेट पेटवून घेता आहात अशी पुरुषकार्यवाचक शब्दयोजना का नाही सुचली?
क्षुद्रत्व दर्शवण्यासाठी स्त्रैण प्रतीके वापरण्याच्या या वृत्तीवरुन पुरुषप्रधान संस्कृती तुमच्यात आणि एकूण समाजात किती भिनली आहे हेच पुन्हा एकदा दाखवल्याबद्दल धन्यवाद.
11 May 2012 - 4:04 pm | प्यारे१
>>>काहीतरी हीन प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी उपमा शोधताना तुम्हाला "पोळी भाजून घेणे" या परंपरागत स्त्रैण कामाचीच आठवण झाली. त्या ऐवजी आपली सिगरेट पेटवून घेता आहात अशी पुरुषकार्यवाचक शब्दयोजना का नाही सुचली?
क्षुद्रत्व दर्शवण्यासाठी स्त्रैण प्रतीके वापरण्याच्या या वृत्तीवरुन पुरुषप्रधान संस्कृती तुमच्यात आणि एकूण समाजात किती भिनली आहे हेच पुन्हा एकदा दाखवल्याबद्दल धन्यवाद. <<<<
पोळी भाजणे हे काम हीन दर्जाचे नाही. तसेच या वाक्प्रचाराचा अर्थ स्त्रैण काम असा नसून इथं एखाद्यानं उपलब्ध आणि सहजसाध्य साधनांचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेणं असा आहे. आम्ही वर्गविरहीत समाजव् य वस्थेचा पुरस्कार करत असताना आपण मात्र वारंवार क्षुद्रत्ब, स्रैण इ.इ. शब्दांचा वापर करुन एका विशिष्ट वर्गाची मतं आपल्या बाजूनं खेचण्याचा जो क्षीण प्रयत्न चालवला आहे त्याबद्दल पुन्हा पुन्हा निषेध.
<घनाची आई मोड> बरं चहा कसा झालाय नानानं केलेला? बिचारा अजून बिनलग्नाचा आहे हो! काही स्थळ वगैरे असलं तर सांगा हो <घनाची आई मोड>
;)
11 May 2012 - 3:31 pm | नाना चेंगट
अरे देवा ! तुम्हाला चहा चालत नाही हे माहित नव्हतं ! सॉरी हं !!
11 May 2012 - 7:14 pm | शुचि
देवाला यात ओढून आस्तिक-नास्तिक कुस्ती लावून आपला धागा त्रिशतकी करण्याचा क्षीण प्रयत्न करणार्या नानांचा सौम्य निषेध. =)) =)) =))
11 May 2012 - 3:21 pm | परिकथेतील राजकुमार
गेल्या १०,००० वर्षात अशी पाककृती झाली नाही आणि पुढे होणार नाही.
ही पाककृती अंडे घालून कशी करता येईल ?
चहापावडर ऐवजी कॉफीपावडर वापरल्यास तो पदार्थ कॉफी बनेल काय ?
काही ठिकाणी ह्यात वेलची / वेलची पूड घातलेली बघितली आहे. पण मसाला काय असतो ? तो कसा करतात ?
गवती चहा हा ह्याचाच एक भाग आहे का ? त्याची पाकृ काही वेगळी आहे का ?
चहात काही घातक द्रव्ये असतात हे खरे आहे का ?
हा पदार्थ किती दिवस टिकतो ?
हा चहा लहान मुलांना द्यावा का ?
आणि हो, चित्र आंतरजालावरून घेतले असल्यास तसा उल्लेख का नाही ? तुमच्या अशा चुकांनी काही ज्ञानी आणि अधिकारी व्यक्तींच्या मनाला किती यातना होतात ह्याची तुम्हाला काय कल्पना.
11 May 2012 - 3:25 pm | गवि
शिवाय..
-लहानपणची आठवण ताजी झाली.
-कोतवडे बुद्रुकच्या अण्णाचा चहा.. आहाहा.. अजूनही चव जिभेवर रेंगाळते आहे.
-चहा म्हटला की पाऊस.. मातीचा वास..
-दोन दोस्तांत मिळून एक कटिंग मारण्याची मजा काही औरच..गेले ते दिवस. आज माझा नोकर माझ्या बंगल्याच्या प्रशस्त लॉनवर टी कोझीसहित चहाची किटली आणून मला उंची ग्रीन लीफ टी सर्व्ह करतो त्यात ती कटिंगची मजा नाही. गेले ते दिवस.
11 May 2012 - 5:18 pm | विजुभाऊ
आज माझा नोकर माझ्या बंगल्याच्या प्रशस्त लॉनवर टी कोझीसहित चहाची किटली आणून मला उंची ग्रीन लीफ टी सर्व्ह करतो त्यात ती कटिंगची मजा नाही.
अर्र..तुमचा नोकर चहाने तुमची कटिंग करत नाही?
तुमचा बंगला असल्याची झैरात
तुमच्याकडे टीकोझी असल्याची झैरात
तुमच्या कडे लॉन असल्याची झैरात ( आमचे लॉनमोव्हर उसने नेले आहे ते परत कर अगोदर)
ग्रीन लीफ चहा काय आजकाल कोणीही पितात.
अवांतरः कटींग करायला इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले...........
11 May 2012 - 5:25 pm | गवि
तुमचा लॉनमोवर चुकून आमच्या पूलमधे पडला. आता सगळा पूल ड्रेन करुन रिकामा केल्यावर करतो परत तुमचा मोवर.
एकदा या आमच्याकडे. पूलसाईडला बसून एकेक कटिंग घेऊ.. माझ्या शेफला कटिंग बनवायला सांगून ठेवतो.
11 May 2012 - 5:29 pm | यकु
आणि तुमचा भिंतीत लपवता येणार बार नाय का दाखवणार त्यांना?
छे! इजाभौ हे लक्षात राहू द्या यांच्याकडं गेल्यावर ;-)
11 May 2012 - 9:24 pm | ५० फक्त
माझे डोळे बिघड्ले बहुधा,
आणि तुमचा भिंतीत लपवता येणार बाय नाय का दाखवणार त्यांना?
छे! इजाभौ हे लक्षात राहू द्या यांच्याकडं गेल्यावर - हे असं वाचलं एकदम.
असो, आज काल कुणाकडं काय असेल काही सांगता येत नाही.
11 May 2012 - 3:30 pm | नाना चेंगट
आपल्या सर्व प्रश्नांची एक एक करुन उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे.
तोवर चहा प्या
11 May 2012 - 3:38 pm | रमताराम
हा चहा टाकून ..... 'टाकून' म्हणजे तसा नव्हे 'मिसळून' .. कोणकोणती कॉकटेल्स बनवता येतील (कॉलिंग सोत्रि) आणि ता प्याल्यानंतर घडलेल्या 'टेल्स' वर कुणी लिहिल का इथे (कॉलिंग परा).
12 May 2012 - 2:04 am | सोत्रि
ह्म्म्म, आजोबांनी लगेच नातवाला लावले कामाला ;)
- (पुढच्या धाग्याला विषय दिल्याबद्दल ररांचे आभार मानणारा) सोकाजी
12 May 2012 - 6:01 am | अस्वस्थामा
आता काय मग चहाचे पण कॉकटेल ..! धन्य आहे ..!!
अजून काय काय बघावे (आणि प्यावे ) लागणार आहे या जगात कोण जाणे..
11 May 2012 - 3:39 pm | सूड
>>ही पाककृती अंडे घालून कशी करता येईल ?
हरकत नसावी, पण अंडे घातले की तुम्हाला साधारण किती वेळाने चहा लागतो यावर अवलंबून असावं. अंडे घालण्याच्या क्रियेत अंमळ दमणूक होत असावी असा अंदाज आहे, त्याबाबतीत अनुभवशून्य असल्याने ज्यांनी अंडी घालून मग ही पाकृ केली आहे त्यांनी कृपया मा. परा यांना मार्गदर्शन करावे.
11 May 2012 - 3:42 pm | सुहास..
हरकत नसावी, पण अंडे घातले की तुम्हाला साधारण किती वेळाने चहा लागतो यावर अवलंबून असावं. अंडे घालण्याच्या क्रियेत अंमळ दमणूक होत असावी असा अंदाज आहे, त्याबाबतीत अनुभवशून्य असल्याने ज्यांनी अंडी घालून मग ही पाकृ केली आहे त्यांनी कृपया मा. परा यांना मार्गदर्शन करावे. >>>
=)) =)) =)) =))
11 May 2012 - 3:45 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. सूड ह्यांनी माझी शंका विस्तृतपणे मांडल्याबद्दल त्यांचे आभार.
मुळात मी आजकाल फार कमी पियाला लागलो आहे ह्याची नोंद घ्यावी. तसेच 'टेल्स' लिहिण्या इतपत, माणूस ही कॉकटेल्स प्यायल्यावरती तग धरेल काय ?
11 May 2012 - 4:16 pm | स्पा
हरकत नसावी, पण अंडे घातले की तुम्हाला साधारण किती वेळाने चहा लागतो यावर अवलंबून असावं. अंडे घालण्याच्या क्रियेत अंमळ दमणूक होत असावी असा अंदाज आहे, त्याबाबतीत अनुभवशून्य असल्याने ज्यांनी अंडी घालून मग ही पाकृ केली आहे त्यांनी कृपया मा. परा यांना मार्गदर्शन करावे.
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
ंअॅळॉ ंअॅळॉ
11 May 2012 - 6:58 pm | शुचि
=)) =)) =)) खपले, वारले, निवर्तले, चचले.......
11 May 2012 - 4:07 pm | नेहरिन
सारखी सगळ्या पाककृती मधे कसलिरे अंडी घलतोस ??? तुझी कामवाली कुठे गेली तीला सांग करायला ती देईल तुला करुन.
11 May 2012 - 4:15 pm | मृत्युन्जय
परा तुझी कामवाली अंडे (पण) घालते?
11 May 2012 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार
आमची कामवाली काय घालते आणि काय नाही हा आमचा खाजगी प्रश्न आहे.
खाजगी प्रश्न विचारु नये आणि आमच्या कामवालीत विनाकारण विंट्रेष्ट घेऊ नये. अन्यथा तक्रार केल्या जाईल.
जय हिंद जय महाराष्ट्र !
11 May 2012 - 4:26 pm | मृत्युन्जय
आमची कामवाली काय घालते आणि काय नाही हा आमचा खाजगी प्रश्न आहे.
अंडं घालणारी असेल तर तो राष्ट्रीय मालमत्तेचा प्रश्न होउ शकतो म्हटल मिष्टर
कामवालीत विनाकारण विंट्रेष्ट घेऊ नये
छे हो, "विनाकारण" तर आमी श्वास पण घेत नाही.
11 May 2012 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार
धागा हायजॅक झाल्याने आमची निवृत्ती ह्या धाग्यावरुन.
11 May 2012 - 5:06 pm | निवेदिता-ताई
;)
11 May 2012 - 4:37 pm | ५० फक्त
मला वाटलं कामवाली घालणार अंडी, पाक्रुमध्ये.
11 May 2012 - 3:23 pm | यकु
चहा कृती व कपबशी सुंदर आहे, पण फोटोतल्या चहातले दुध अंमळ फुटल्यासारखे वाटते. ;-)
11 May 2012 - 3:25 pm | प्यारे१
खराब रिझोल्युशन रे पप्या खराब रिझोल्युशन....!
म्हणून तर फोटो कुठला याबद्दल पाकृ कर्ता मौन बाळगून आहे! ;)
11 May 2012 - 3:29 pm | नाना चेंगट
चश्मा पुसा हो मालक !!
11 May 2012 - 3:32 pm | यकु
चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे धुवून किंवा दुसर्या मशीनवर पहातो :)
11 May 2012 - 3:33 pm | नाना चेंगट
संपून जाईल तोपर्यंत. आहे तसा प्या मुकाट्याने... :)
11 May 2012 - 3:39 pm | यकु
कुठल्यातरी मराठी सिनेमात महमूद साईबाबा स्टाइल मांडी घालून बुटावर कपबशी ठेऊन चहा ढवळतो त्या स्टाइलने ढवळून पिण्यात आला आहे ;-)
11 May 2012 - 3:38 pm | सुहास..
ण तरी डोळे धुवून किंवा दुसर्या मशीनवर पहातो >>
त्यापेक्षा आपण फोटो धुवु यात का ? ते ३डी वाल्या, स्पावडुची मदत घेवुन ;)
11 May 2012 - 3:35 pm | सूड
>>चहातले दुध अंमळ फुटल्यासारखे वाटते
तुम्हाला 'फाटल्यासारखे' म्हणायचे आहे काय ?
11 May 2012 - 3:42 pm | यकु
>>तुम्हाला 'फाटल्यासारखे' म्हणायचे आहे काय ?
--- नाही.
आमच्याकडे 'दुध फुटलं' अस्संच म्हणतात हो सूडाकर शास्त्री!
11 May 2012 - 4:17 pm | मृत्युन्जय
आयला मग तुमच्याकडे बनियान फुटले म्हणत असावेत बहुधा.
फाटलो आहे हे वाचुन ;)
11 May 2012 - 4:21 pm | यकु
>>आयला मग तुमच्याकडे बनियान फुटले म्हणत असावेत बहुधा.
--- नै कै :p
>>फाटलो आहे हे वाचुन
किती हो विरविरीत तुम्ही, जरा कुठं घसाटा लागला की लगेच फाटता ;-)
11 May 2012 - 4:21 pm | प्यारे१
पुण्याबाहेर जग आहे हो मालक....!
दुध फुटणे हा शब्द्प्रयोग सर्रास आणि बर्याच ठि़काणी वापरला जातो.
बनियन फाटतेच, विवक्षित अवयवासाठी देखील 'फाटते' हा शब्दप्रयोगच वापरला जातो.
11 May 2012 - 4:28 pm | मृत्युन्जय
अहो पुण्याबाहेर काहीही म्हणोत. उद्या विवक्षित अवयव फुटला म्हणुन म्हणतील पुण्याबाहेर. आम्हाला काय त्याचे ?
11 May 2012 - 4:32 pm | यकु
प्यारे आणि मृत्यूंजय तुम्ही दोघांनीही विवक्षित, विवक्षित असा शब्द वापरल्यानं चाचपून पाहिलं (कुणाला म्हणजे काय? स्वत:लाच)
विवक्षित अवयव कुठे असतो हो? :p
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
11 May 2012 - 4:42 pm | प्यारे१
'तशरिफ' रक्खो मियाँ, तबियत से बताते है | ;)
11 May 2012 - 4:45 pm | मृत्युन्जय
नशीब पालथा हो सांगतो नाही म्हणालास. ;)
11 May 2012 - 4:50 pm | यकु
मायचे पुणेकर ! :P :P :P
जरा म्हणून टाळकी निर्विषपणे वापरतील तर शपथ - सदा लोकांच्या ## मध्ये काड्या सारण्यात पटाइत ;-)
11 May 2012 - 4:53 pm | प्यारे१
ओ बा माझे.....!
मृत्याँ तुका पन आस्ली सवै लागली कें????
(पैसातै/प्रीमो चुकभूल देघे)
11 May 2012 - 4:33 pm | सूड
आम्ही दूध 'फाटलं' फार फार तर 'गेलं' असं म्हणतो. तुमच्याकडे ते फुटतं हे माहित नव्हतं. क्षमस्व. ;)
11 May 2012 - 4:37 pm | यकु
भाड्या तु भेटच आता मुंबईत कधी, दाखवतो तुला आमच्याकडचं फुटणं कसं असतं ते ;-)
12 May 2012 - 12:30 am | मोदक
ऑ..?
तुझं कधी फुटलं..? आणि कशामुळे रे..??? :-D
11 May 2012 - 5:37 pm | निवेदिता-ताई
मला पण असेच वाटले.....बाकी कपबशी छान आहे..चमचा पण..
11 May 2012 - 3:25 pm | विवेक मोडक
पण सिलिंडर शेगडीला जोडला आहे की नाही हे तपासण्याची स्टेप चुकुन राहुन गेली काय??
11 May 2012 - 3:28 pm | नाना चेंगट
क्या बात है ! क्या बात है !!
मोडक आडनाव स्साला बुद्धीमत्तेची देणगी सुचित करते असे म्हणतात ते चूकीचे नाहीच !! ;)
11 May 2012 - 3:25 pm | सुहास..
फोटो मधील चमच्याचे (असल्यास) फायदे/ तोटे सविस्तर सांगु शकाल काय ?
11 May 2012 - 3:27 pm | नाना चेंगट
नक्कीच. आपण एकदा निवांत चर्चा करुच चमच्यावर ;)
11 May 2012 - 3:26 pm | sneharani
कपबशी अन् चहाचा रंग चांगला दिसतोय! गवती चहा घालून केलेली रेसिपी दिली असतीत तर...!!
कॉफीची पण येऊ दे पाकृ. = ))
11 May 2012 - 3:30 pm | रमताराम
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे)
हल्ली मैत्रिणींना चहाला वगैरे बोलवत नाहीत (अगदीच डाउनमार्केट की हो) असे या आजोबाला नव्या जगाच्या रीतीभाती शिकवणार्या आमच्या एका नातवाने नुकतेच सांगितले.
11 May 2012 - 3:33 pm | सुहास..
हल्ली मैत्रिणींना चहाला वगैरे बोलवत नाहीत (अगदीच डाउनमार्केट की हो) असे या आजोबाला नव्या जगाच्या रीतीभाती शिकवणार्या आमच्या एका नातवाने नुकतेच सांगितले. >>>
आपणांस शेवटचे ओबामाने बोलावल्याचे एकले होते खरे आहे काय ?
11 May 2012 - 3:42 pm | रमताराम
तूच सांगत होतास ना रे चोरा. एकतर माझ्यापेक्षा अंमळ चार महिन्यांनी लहान असल्याचा फायदा घेऊन सतत 'तुमच्यासारखी मागच्या पिढीतली माणसं' म्हणून हिणवत असतोस ना. मग तुला नातू बनवून आणखी तरुण करून टाकला, खूष?
11 May 2012 - 3:48 pm | नाना चेंगट
अच्छा ! हा होय तुमचा नातु ? मग बरोबर आहे. त्याला फक्त पाकिटात* विंटरेस्ट! त्यामुळे घरी न बोलावता बाहेरच पळण्याचा प्लॅन असतो.
* पाकिट सिगारेटचे, जाणकारांनी भलते तारे तोडू नये
11 May 2012 - 4:23 pm | सुहास..
तुमच्यासारखी मागच्या पिढीतली माणसं हेच म्हणणार ;)
11 May 2012 - 3:43 pm | पैसा
आणि फोटोतला चहा वेगवेगळा असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. अर्धा कप पाणी आणि एक कप दूध, एक चमचा चहा पावडर या प्रमाणात चहा इतका लाल कसा काय झाला?
आणखी काही शंका आहेत. उदा.
१) चहा प्यायल्यानंतर सगळी ओटाभर पसरलेली भांडी साफ कोणी करायची आहेत?
२) २ चमचे साखर कशासाठी?
३) ही पाकृ सांगणारा मनुष्य बायको बिनसाखरेचा चहा देते म्हणून त्रासलेला असावा आणि नान्याने फक्त पाकृ इथे चिकटवण्याचे काम केले असावे.
@प्रीतमोहर, तुझ्यासारख्या कन्येच्या भावी नवर्याने पाकृचा क्लास लावावा.
@गवि, तुमच्याकडे लॉन असलेला बंगला आणि नोकर, तसेच टी कोझीसहित चहाची किटली, आणि उंची ग्रीन लीफ टी आहे याचं ज्ञान झालं. चहा प्यायला कधी बोलवताय?
11 May 2012 - 3:47 pm | नाना चेंगट
१) चहा प्यायल्यानंतर सगळी ओटाभर पसरलेली भांडी साफ कोणी करायची आहेत?
सर्व भांडी सिंकमधे ठेवून वरुन पाणी सोडून द्यायचे. दुसर्या दिवशी त्यातले पाणी काढून पुन्हा भांडी वापरायची
२) २ चमचे साखर कशासाठी?
चहात घालण्यासाठी
३) ही पाकृ सांगणारा मनुष्य बायको बिनसाखरेचा चहा देते म्हणून त्रासलेला असावा आणि नान्याने फक्त पाकृ इथे चिकटवण्याचे काम केले असावे.
हे आपले विधान आहे की ठाम निष्कर्ष? विधान असल्यास बिनबुडाचे आहे. निष्कर्ष असल्यास चुकलेला आहे.
11 May 2012 - 4:12 pm | पैसा
पोकळ विधाने आम्ही कधीच करत नाही. बर्याच ब्याचलरांचा आणि त्रासलेल्या विवाहित पुरुषांचा विदा गोळा करून काढलेला अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे तो! एकवेळ चुकेल पण बिनबुडाचा नक्कीच नाही!
12 May 2012 - 2:20 am | योगप्रभू
काही दिवसांपूर्वी 'कट्टा करु..कट्टा करु' म्हणून १४-१५ जणांनी ठाण्यात नेऊन भोळ्या गविला कुठल्याशा हॉटेलाचं बिल द्यायला लावलं. बिचार्याचं फार नुकसान झालं.
आता बंगला मंगलानं घेतलाय, लॉन डॉननं घेतलं, नोकर जोकर म्हणून सर्कशीत लागलाय, टी कोझी सारकोझीनं घेतली, किटली इटलीला गेली. राह्यलं काय, तर उंची ग्रीन लीफ टी (तो गवती चहा असल्याचे मागाहून समजले.)
तू सांगू नकोस हे कुण्णाला.. :)
12 May 2012 - 4:16 pm | पैसा
झैरात जोरदार आहे!
12 May 2012 - 4:34 pm | रमताराम
एखाद्या नवकवीचा गंडा बांधलात की काय? काय यमकांच्या जोड्या दिल्यात आहेत हो. हे वाचून कुठे कुठे काव्यकळ लागते ते बघू या. कि तुम्हीच घेताय सुपारी यातून एखादी गजल पाडण्याची?
11 May 2012 - 3:45 pm | यकु
नाना, आणखी एक आधण ठेवावं लागणार राव - पपलिक वाल्ढं ना! ;-)
11 May 2012 - 3:46 pm | नितिन थत्ते
>>प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन
आमच्याकडं शिलेंडर नाय.
असो ज्यांच्याकडे ग्यास आहे अशा हुच्चभ्रूंसाठीची पाककृती :(
11 May 2012 - 4:14 pm | पैसा
तुमच्या या पाकृ ची आठवण झाली!
11 May 2012 - 4:01 pm | कवितानागेश
हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा करता येइल, याबद्दल कुणी जाणकार मार्गदर्शन करतील काय?
तसेच चहा झाला की नाही, हे तपासण्यासाठी मधूनमधून सुरी किंवा मोठी सुई इ. वापरुन तपासायचे का?
बाकी @ यकु, सूड, आणि पोरेटोरे कं. : दूध फुटल्यास फेविकॉलने चिकटवावे आणि फाटल्यास स्वच्छ पांढरा दोरा सुईमध्ये ओवून त्यानी शिवून वापरावे.
11 May 2012 - 4:13 pm | कुंदन
>>हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा ....
करु की , त्यात काय...
पण आधी मायक्रोवेव चालवण्यासाठी वीज शोधुन ठेवा , नाय तर आम्ही मार्गदर्शन करायचो आन मग तुम्ही म्हणायच्या "आता इथे वीज शोधणे आले"
11 May 2012 - 4:33 pm | कवितानागेश
आम्ही पुण्यात नाही रहात. वीज असते आमच्याकडे.
तुम्ही बोला हो बिन्धास्त. :)
12 May 2012 - 1:52 am | सोत्रि
'पुणे तिथे काय उणे' ही म्हण आपल्याला माहित नसावी असे म्हणण्याचे धाडस तर मी करू शकत नाही, मग ह्याला पुण्याबद्दलचा दुस्वास म्हणावे काय? ;)
- (सध्या चेन्नैत असलेला पुणेकर) सोकाजी
12 May 2012 - 1:54 am | शुचि
सहानुभूती आहे ग माऊ ;)
अरे! तरीही (पुण्यात न राहूनही) वीज असते तुमच्याकडे? वा वा! अभिनंदन!!! ;)
12 May 2012 - 4:38 pm | रमताराम
जबरा.
(नान्या तुझ्या धाग्याची गाडी आता पुण्याच्या ठेसनात आली. आणखी शंभर म्हणशील तरी सहज होणार बघ.)
11 May 2012 - 4:09 pm | स्मिता.
वा वा! चहा म्हणजे अत्यंत आवडता... त्याचे पाकृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
आमच्याकडे हीच पाकृ जरा वेगळ्या पद्धतीने करतात. दूध वगळता बाकीचे मिश्रण एकत्र करून त्याला आधी उकळी आणली जाते आणि २ -३ मिनीट उकळल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा थोडे उकळले जाते. असो.
ही पाकृ चहा न घेणार्या नवर्याकडून कशी करून घ्यावी?
11 May 2012 - 4:45 pm | रमताराम
चहा न घेणार्या की 'तुमच्या हातचा चहा' न घेणार्या हे स्पष्ट केले तर बरे होईल. (गायबलो आहे)
11 May 2012 - 4:57 pm | स्मिता.
एक वेळ माझ्या हातचा चहा न घेणारा नवरा परवडला असता, पण अजिबातच चहा न घेणारा असल्याने कधी म्हणजे कधी आयता चहा मिळण्याचे सुख नाही हो आमच्या नशिबी ;)
11 May 2012 - 6:00 pm | मेघवेडा
आपण घेत नसलो म्हणून इतरांनाही न पाजणार्याच्या नावे नेहमीच इतर बोटे मोडतात. पेयं/नातं कुठलंही असो.