साहित्य :
एक कप
एक बशी
एक चमचा
चांगली गाळणी
एक छोटेसे पातेले
गॅस शेगडी (शिलींडरसह)
लायटर
अर्धा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे साखर
एक चमचा चहापावडर
चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर
कृती :
प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे.
पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे.
लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी.
अधुन मधून चमच्याने ढवळावे.
उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी.
आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा. कपाच्या खाली बशी ठेवावी.
आणिक काय ? प्यावा सुर्र करुन :)
हवे असल्यास बरोबर बिस्कीट, वगैरे खावे आवडीनिवडीनुसार !!
विशेष सुचना :
१) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे.
चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे.
आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे.
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये.
मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये.
त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे.
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
२) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.
प्रतिक्रिया
11 May 2012 - 5:11 pm | सस्नेह
नानाजी,
नको असलेल्या पाहुण्यांना पळविण्यासाठी यात कशाची अॅडिशन करावी हे कृपया सांगावे.
12 May 2012 - 4:39 pm | जेनी...
आल्या अॅवजी सुन्ठ घालायचि आनि साखर घालायचीच नाय ,
पावने परत येत नायत आलेच तरि चहा पिन्यासाठी थांबत नायत :P
11 May 2012 - 5:40 pm | संजय क्षीरसागर
मग प्यायचा का नाही ते ठरवणार! नुसत्या शीर्षकावर ते विश्वास ठेवणार नाहीत
11 May 2012 - 7:08 pm | शुचि
खी: खी:
11 May 2012 - 5:38 pm | हारुन शेख
नुकताच इथे ( नाशिक ) तुफान पाउस पडल्यामुळे पाकृ समयोचित वाटली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
11 May 2012 - 5:57 pm | इरसाल
इकडे पण पडला. गुडगांवला.
11 May 2012 - 5:54 pm | नरेश_
आता इथं (फुकट) चा पाजणारा मित्र शोधणं आलं ;)
11 May 2012 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना चेंगट यांच्याकडून दुसर्या इनिंगमधे खूप अपेक्षा होत्या.
असो....चालायचेच.
-दिलीप बिरुटे
11 May 2012 - 6:27 pm | शुचि
=)) =)) =))
नीळा गुलाब छान आहे बरका कपावरचा.
सुंदर कपबशी दाखवून - समस्त स्त्रीवर्गाला भुरळ (धाग्याची ;) ) पाडण्याचा क्षीण प्रयत्न.
11 May 2012 - 9:00 pm | कुंदन
जातियवादी प्रतिसादाबद्दल समस्त पॅथर्स तर्फे निषेध. ;-)
12 May 2012 - 2:03 am | शुचि
स्त्रीवर्ग म्हणून जातीयवादी? म्हणजे नाना पुरुषवर्गालादेखील भुरळ पाडू पहातात असं म्हणायचय का तुम्हाला कुंदन ;)
11 May 2012 - 10:20 pm | अमृत
पाकृ आवडलेली आहे आज घरी जाऊन केली जाईल...
आणखी काही पाकृ सुचवितो
१. पाणी गरम करणे
२. हॉटेलातून आणलेले जेवण भांड्यात काढून खाणे
३. लिंबू पाणी
४. फ्रीजमधे पाणी थंड करणे
५. पोळ्यांची पाकृ (झालेली आहे वाटतं आधीच)
६. ......... इत्यादी, इत्यादी....यांचापण मिपावरील बल्लवाचार्यांनी विचार करावा...
या सगळ्या नाविन्यपूर्ण पाकृपण येऊ द्या.... :-)
बाकी, यक्कुरावांशी फाटलेल्या चहाविषयी सहमत.
अमृत
12 May 2012 - 1:40 pm | तिमा
सर्वप्रथम शंभरी गाठल्याबद्दल अभिनंदन!
१. एक कप चहाला पाऊणकप पाणी पुरते.
२. चहा फक्त पाण्याबरोबर गरम करावा व उकळी येताच लगेच गॅस बंद करुन वर झाकण ठेवावे.
३. चहा मोजून ३ मिनिटे मुरवावा.
४. लगेच कपात गाळून रंग येण्यापुरते दूध घालावे.
५. नंतर लागेल तशी (१ चमचाच) साखर घालावी.
मग बघा कसा चहा लागतो ते.
वि.सू. - साखर पाण्यात उकळली तर तिचे सक्रोज(जास्त गोड) मधून ग्लुकोज व फ्रक्टोज या घटकांमधे विघटन होते. हे दोन्ही घटक कमी गोड असतात. तसेच थोडी साखर ही चोथ्यावर अॅडसॉर्ब होते. परिणामी एकूण साखर जास्त लागते.
वरील कृतीमधे साखरेची बचत होऊन सुद्धा तेवढाच गोडवा मिळतो.
-- (मूळचा पुणेरी) तिरशिंगराव काटकसरे
12 May 2012 - 4:43 pm | रमताराम
चहात वरून साखर घातली की चहाचा सत्यानाश होतो. असला चहा आमच्या पुण्यात कधीच करत नाहीत. उगाच कैच्याकै पुड्या सोडू नका. साखर थोडी जास्त लागली तरी चालेल पण चहा साखर कसे एकजीव होऊन चहा नावाचे रसायन तयार व्हायला हवे राव, मग मस्त मझा येतो.
(जन्मजात, अस्सल पेठेतला नि अजूनही पुणेकर) रमताराम
12 May 2012 - 4:54 pm | sneharani
ररा आजोबांशी सहमत ;)
शिवाय साखर वरून घातली की विरघळेपर्यंत चहा थंड होतो, तेव्हा चहा करतानाच साखर घातलेली केव्हाही बेश्टच!!
13 May 2012 - 6:19 pm | तिमा
इराणमधे साखरेचा क्युब तोंडात धरुन बिनसाखरेचा चहा सिप सिप करुन पितात.
संदर्भः इराणीगाथा - मीना प्रभु