पापलेटचे कालवण व ग्रील्ड पापलेट

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Jan 2012 - 5:48 pm

साहित्य पापलेटचे कालवण:

पापलेट साफ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावे. तुकड्यांना किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे.
१ छोटी वाटी ओले खोबरे + मुठभर कोथिंबीर + ३-४ लसुण पाकळ्या + ३-४ हिरव्या मिरच्या + १/२ टीस्पून हळद सर्व एकत्र वाटून घेणे.

.

१ छोटा कांदा बारीक चिरून
चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त घालणे)
२-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

एका भांड्यात तेल गरम करुन त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

.

त्यात खोबर्‍याचे वाटण घालून चांगले परतावे.

.

वाटणात लाल -तिखट, हळद, धणेपूड व चवीनुसार मीठ घालावे व चांगले एकत्र करावे.

.

त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व उकळी आणावी.

.

उकळी आली की गॅस मंद करून त्यात आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा.

.

पुन्हा उकळी आली की त्यात पापलेटचे तुकडे सोडावे व शिजवावे. मासे लवकर शिजतात.

.

तयार कालवण वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करणे :)

.

साहित्य ग्रील्ड पापलेट:

पापलेट साफ करावे, त्यावर चिरा पाडून घ्याव्या दोन्ही बाजूने व किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे.
थोडी कोथिंबीर + थोडी पुदीन्याची पाने + १-२ हिरव्या मिरच्या + २-३ लसुण पाकळ्या + १ इंच आल्याचे तुकडे + लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्यावे.

.

.

पाकृ:

पापलेटला तयार केलेली चटणी दोन्ही भाजूने नीट लावून घ्यावी. चिरांमधे ही नीट चटणी चोळावी.

.

मॅरीनेट केलेल्या पापलेटवर १ चमचा तेल/बटर सोडावे व ग्रील रॅकवर ठेवून प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये २०० डीग्री वर ८ मिनिटे ठेवावे. मग बाजु उलटवून पुन्हा ८ मिनिटे ठेवावे.

.

तयार ग्रील्ड पापलेट सॅलॅड व कांद्याबरोबर सर्व्ह करा :)

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

18 Jan 2012 - 5:59 pm | सुहास झेले

अफलातून... !!

दोन्ही पाककृती नेहमीप्रमाणे बेष्ट आणि सादरीकरणामुळे पदार्थाची लज्जत अजुन वाढलीय.. :) :)

गणपा's picture

18 Jan 2012 - 6:36 pm | गणपा

खपल्या गेले आहे.

शेवटच्या फोटुतल्या पापलेटाला सानिकातैंच्या हातुन मोक्ष मिळाल्याने हर्षवायु झाल्याचे जाणवते. ;)

मेघवेडा's picture

18 Jan 2012 - 10:50 pm | मेघवेडा

आपुनला मासे खायला उद्यक्त करनार तुमी!

मस्त फोटू हायेत!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2012 - 4:00 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

पर्नल नेने मराठे's picture

22 Jan 2012 - 1:53 pm | पर्नल नेने मराठे

+३ :(

त्यात आता सावंत वैगरे मैत्रिणी झाल्यापासुन जास्तच ;) खावेसे वाटेल.

चिंतामणी's picture

19 Jan 2012 - 9:24 am | चिंतामणी

मिपाच्या "स़ंजीव कपुरने" जी प्रतिक्रीया दिली आहे, तीच्या मी पामर काय बोलणार.

(भगवंताच्या पहील्या अवतारावर प्रेम करणारा) चिंतामणी

मालोजीराव's picture

19 Jan 2012 - 3:13 pm | मालोजीराव

अगदी अगदी...फ्राय झाल्यावर मासा एवढा हसताना पहिल्यांदाच पाहिला...बाकी साक्षात अन्नपुर्णेने बनवल्यावर हर्षवायू होणारच !

-मालोजीराव

बॅटमॅन's picture

15 Nov 2012 - 12:06 pm | बॅटमॅन

तंतोतंत!!!!!

काय ते सादरीकरण आणि काय त्या डिशेस......सानिकातैंची होते पाकृ, आमची होते निस्ती जळ्जळ!!!!

गणेशा's picture

18 Jan 2012 - 6:45 pm | गणेशा

अप्रतिम ..

खुप छान !

पाकृ. विभागात पण आता लक्ष घालावेच म्हणतोय..

Mrunalini's picture

18 Jan 2012 - 6:52 pm | Mrunalini

अप्रतिम.... तोंपासु.... :)

Maharani's picture

18 Jan 2012 - 7:10 pm | Maharani

सानिका मी मीपा वर नवीन आहे पण तुमच्या बाकिच्या पण काही पाकॄ वाचल्या..उत्तम presentation!!
अप्रतिम छायाचित्रे...

कौशी's picture

18 Jan 2012 - 8:48 pm | कौशी

खरच खुपच अप्रतिम..
प्रेसेन्टेशन तर प्रश्नच नाही..आवडली.

फोटू पाहिले नाहीत, कृती वाचली नाही, जळजळ अजिबात झाली नाही, व्यवस्थित मांडलेले साहित्य तर दृष्टीलाही पडले नाही.:)

स्मिता.'s picture

18 Jan 2012 - 11:09 pm | स्मिता.

पापी लोकांना फोटू दिसत नाहीत हे ह. भ. प. पराण्णा महाराजांनी म्हटलंय ते उगाच नाही! ;)

हळू बोला हो तै.
आजकाल 'पापी' या शब्दाचे मतलब अनेक आहेत.
वाचणार्‍याची 'गोची' होते आणि लेख येतात.;)

कॉमन मॅन's picture

18 Jan 2012 - 9:24 pm | कॉमन मॅन

नि:शब्द..!

सुनील's picture

18 Jan 2012 - 9:28 pm | सुनील

झक्कास!

जाई.'s picture

18 Jan 2012 - 9:30 pm | जाई.

मस्तच
तोँपासू

तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन देतात....
अमेरिकेत पाप्लेटला काय म्हणतात कोणी सांगेल काय??

तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन देतात....

इन्सिरेशन म्हणजे काय..? कृपया मराठीतून अर्थ सांगितल्यास बरे होईल.

प्राजु's picture

18 Jan 2012 - 10:37 pm | प्राजु

म्हणजे प्रेरणा.. स्फूर्ती!!

नेत्रेश's picture

19 Jan 2012 - 8:15 am | नेत्रेश

प्रेरणा आणी स्फूर्ती? आता या दोघीजणी कोण?

सुनील's picture

18 Jan 2012 - 9:48 pm | सुनील

अमेरिकेत पाप्लेटला काय म्हणतात कोणी सांगेल काय??
एखाद्या एशियन (चिनी/विएतनामी) दुकानात गेल्यास दिसेल आणि दिसल्यावर ओळखता येईलच!

प्राजु's picture

18 Jan 2012 - 10:38 pm | प्राजु

मला मासे ओळखता येत नाहीत.
त्यावर लिहिलेले असते का पाप्लेट/ किंवा पाँफ्रेट असं?

प्राजु, पाँफ्रेट असे लिहिलेले असते.
http://cool007moss.blogspot.com/2008/02/fish-names-english-marathi-hindi...
या ब्लॉग वरची लिस्ट उपयोगी आहे.

विशाखा राऊत's picture

18 Jan 2012 - 9:51 pm | विशाखा राऊत

उगाच उघडला हा धागा

बबलु's picture

19 Jan 2012 - 4:17 am | बबलु

._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_..

अशक्य.

मराठमोळा's picture

19 Jan 2012 - 4:22 am | मराठमोळा

+१२३४५६७८९
सहमत..
खल्लास...

स्वाती२'s picture

19 Jan 2012 - 7:24 am | स्वाती२

छान!

दीपा माने's picture

19 Jan 2012 - 10:20 am | दीपा माने

सानिका तुमच्या पाकृ नेहेमीच छान असतात. मी नेहेमीच वाचते.
प्राजु ,अमेरिकेत चायनीज फिश मार्केटमध्ये पापलेटाला पांपानो म्हणतात.

sneharani's picture

19 Jan 2012 - 10:48 am | sneharani

मस्त पाकृ! फोटो ही जबरदस्त!!
:)

पियुशा's picture

19 Jan 2012 - 10:50 am | पियुशा

जबरदस्त !

गवि's picture

19 Jan 2012 - 11:00 am | गवि

छळवाद.

सुमो's picture

19 Jan 2012 - 12:46 pm | सुमो

पाककृती आणि त्यांचं सादरीकरण ह्यात हातखंडा आहे आपला...

घरी अवन नसल्याने ह्याला

केळीच्या पानात बांधून स्टीम करुन उकड्या तांदळाच्या भातासोबत हादडावे म्हणतो.....

चिंतामणी's picture

12 Nov 2012 - 10:32 am | चिंतामणी

"पात्रानी मच्छी" अशीच करतात.
केळीच्या पानात बांधून स्टीम करुन

मिपाच्या "स़ंजीव कपुरने" जी प्रतिक्रीया दिली आहे, तीच्या मी पामर काय बोलणार.

सहमत.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2012 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

गरम गरम वाफाळणारा पांढरा शुभ्र बासमती (किंवा आंबेमोहोर) तांदूळाचा भात आणि पापलेट कालवणासोबत ओव्हन-फ्रेश किंवा चरचरीत तळलेला मासा. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.

एस's picture

13 Nov 2012 - 12:55 am | एस

सोबत एक Sauvignon Blanc...

संदीप चित्रे's picture

13 Nov 2012 - 12:55 am | संदीप चित्रे

पेठकरकाकांशी एकदम सहमत :)

रुप्स's picture

12 Nov 2012 - 9:43 am | रुप्स

मला हि रेसिपी दिसत नाही :(

मृदुला सूर्यवंशी's picture

12 Nov 2012 - 9:53 am | मृदुला सूर्यवंशी

फोटो आणि रेसिपी दोन्ही दिसत नाही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2012 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आणि रेसिपी आता दिसतील.

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

12 Nov 2012 - 10:27 am | चिंतामणी

कोण आहे रे ते हा धागा आत्ता वर काढणारा????

दिवाळीत फराळाचे खायचे आहे की नाही.

मृदुला सूर्यवंशी's picture

12 Nov 2012 - 11:10 am | मृदुला सूर्यवंशी

हो! आता दिसत आहेत फोटो. जबरदस्तं सादरीकरण...मगाशी फोटो दिसत नव्ह्ते तेच चांगलं होतं ;)

अनिल हटेला's picture

12 Nov 2012 - 11:10 am | अनिल हटेला

जीव खल्लास जाहला!!!
:-)

ज्ञानराम's picture

12 Nov 2012 - 12:19 pm | ज्ञानराम

जीव .......... घेतला .....

संदीप चित्रे's picture

13 Nov 2012 - 12:54 am | संदीप चित्रे

पाकृ जरी आधीच दिलेली असली तरी मी आत्ता ऐन दिवाळीत ती पाहिली आणि दिल खूष हो गया :)
पापलेट.. खरंतर 'मासे' हा आपला एक वीक प्वाईंट हाये!
त्यात अशी सचित्र पाकृ म्हणजे खपलोच :)