साहित्य पापलेटचे कालवण:
पापलेट साफ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावे. तुकड्यांना किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे.
१ छोटी वाटी ओले खोबरे + मुठभर कोथिंबीर + ३-४ लसुण पाकळ्या + ३-४ हिरव्या मिरच्या + १/२ टीस्पून हळद सर्व एकत्र वाटून घेणे.
१ छोटा कांदा बारीक चिरून
चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त घालणे)
२-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
पाकृ:
एका भांड्यात तेल गरम करुन त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
त्यात खोबर्याचे वाटण घालून चांगले परतावे.
वाटणात लाल -तिखट, हळद, धणेपूड व चवीनुसार मीठ घालावे व चांगले एकत्र करावे.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व उकळी आणावी.
उकळी आली की गॅस मंद करून त्यात आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा.
पुन्हा उकळी आली की त्यात पापलेटचे तुकडे सोडावे व शिजवावे. मासे लवकर शिजतात.
तयार कालवण वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करणे :)
साहित्य ग्रील्ड पापलेट:
पापलेट साफ करावे, त्यावर चिरा पाडून घ्याव्या दोन्ही बाजूने व किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे.
थोडी कोथिंबीर + थोडी पुदीन्याची पाने + १-२ हिरव्या मिरच्या + २-३ लसुण पाकळ्या + १ इंच आल्याचे तुकडे + लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्यावे.
पाकृ:
पापलेटला तयार केलेली चटणी दोन्ही भाजूने नीट लावून घ्यावी. चिरांमधे ही नीट चटणी चोळावी.
मॅरीनेट केलेल्या पापलेटवर १ चमचा तेल/बटर सोडावे व ग्रील रॅकवर ठेवून प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये २०० डीग्री वर ८ मिनिटे ठेवावे. मग बाजु उलटवून पुन्हा ८ मिनिटे ठेवावे.
तयार ग्रील्ड पापलेट सॅलॅड व कांद्याबरोबर सर्व्ह करा :)
वाचने
15133
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफलातून... !!दोन्ही पाककृती
खपल्या गेले आहे.
+ १
In reply to खपल्या गेले आहे. by गणपा
+२
In reply to + १ by मेघवेडा
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
गणपाशी १०० % सहमत.
In reply to खपल्या गेले आहे. by गणपा
+१
In reply to खपल्या गेले आहे. by गणपा
तंतोतंत!!!!!
In reply to +१ by मालोजीराव
अप्रतिम ..खुप छान ! पाकृ.
अप्रतिम.... तोंपासु....
खुप छान !
अप्रतिम...
फोटू पाहिले नाहीत, कृती वाचली
पापी लोक
In reply to फोटू पाहिले नाहीत, कृती वाचली by रेवती
हळू बोला हो तै.आजकाल 'पापी'
In reply to पापी लोक by स्मिता.
नि:शब्द..!
झक्का॑स!
मस्तचतोँपासू
तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन
तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन
In reply to तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन by प्राजु
इन्स्पिरेशन!!
In reply to तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन by कॉमन मॅन
प्रेरणा.. स्फूर्ती
In reply to इन्स्पिरेशन!! by प्राजु
पॉम्फ्रेट
In reply to तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन by प्राजु
मला मासे ओळखता येत
In reply to पॉम्फ्रेट by सुनील
प्राजु, पाँफ्रेट असे लिहिलेले
In reply to मला मासे ओळखता येत by प्राजु
कट्टी फु
._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_
+१२३४५६७८९
In reply to ._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_ by बबलु
छान!
सानिका तुमच्या पाकृ नेहेमीच
मस्त
जबरदस्त !
छळवाद.
अशा जीवघेण्या
पारश्यांची खासीयत असलेली
In reply to अशा जीवघेण्या by सुमो
मिपाच्या "स़ंजीव कपुरने" जी
उत्कृष्ट ...
सोमरस???
In reply to उत्कृष्ट ... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to उत्कृष्ट ... by प्रभाकर पेठकर
मला हि रेसिपी दिसत नाही
गायब!
आता दिसतील.
In reply to गायब! by मृदुला सूर्यवंशी
च्या मायला.
यम्मी!
सही!!
जीव .......... घेतला .....
बेष्ट!