पापलेटचे कालवण व ग्रील्ड पापलेट

सानिकास्वप्निल पाककृती
साहित्य पापलेटचे कालवण: पापलेट साफ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावे. तुकड्यांना किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे. १ छोटी वाटी ओले खोबरे + मुठभर कोथिंबीर + ३-४ लसुण पाकळ्या + ३-४ हिरव्या मिरच्या + १/२ टीस्पून हळद सर्व एकत्र वाटून घेणे. . १ छोटा कांदा बारीक चिरून चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त घालणे) २-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून धणेपूड मीठ चवीनुसार . पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. . त्यात खोबर्‍याचे वाटण घालून चांगले परतावे. . वाटणात लाल -तिखट, हळद, धणेपूड व चवीनुसार मीठ घालावे व चांगले एकत्र करावे. . त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व उकळी आणावी. . उकळी आली की गॅस मंद करून त्यात आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा. . पुन्हा उकळी आली की त्यात पापलेटचे तुकडे सोडावे व शिजवावे. मासे लवकर शिजतात. . तयार कालवण वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करणे :) . साहित्य ग्रील्ड पापलेट: पापलेट साफ करावे, त्यावर चिरा पाडून घ्याव्या दोन्ही बाजूने व किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे. थोडी कोथिंबीर + थोडी पुदीन्याची पाने + १-२ हिरव्या मिरच्या + २-३ लसुण पाकळ्या + १ इंच आल्याचे तुकडे + लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्यावे. . . पाकृ: पापलेटला तयार केलेली चटणी दोन्ही भाजूने नीट लावून घ्यावी. चिरांमधे ही नीट चटणी चोळावी. . मॅरीनेट केलेल्या पापलेटवर १ चमचा तेल/बटर सोडावे व ग्रील रॅकवर ठेवून प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये २०० डीग्री वर ८ मिनिटे ठेवावे. मग बाजु उलटवून पुन्हा ८ मिनिटे ठेवावे. . तयार ग्रील्ड पापलेट सॅलॅड व कांद्याबरोबर सर्व्ह करा :) .

47 टिप्पण्या 15,130 दृश्ये

Comments

गणपा नवीन

खपल्या गेले आहे. शेवटच्या फोटुतल्या पापलेटाला सानिकातैंच्या हातुन मोक्ष मिळाल्याने हर्षवायु झाल्याचे जाणवते. ;)

बिपिन कार्यकर्ते नवीन

In reply to by मेघवेडा

+२

पर्नल नेने मराठे नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+३ :( त्यात आता सावंत वैगरे मैत्रिणी झाल्यापासुन जास्तच ;) खावेसे वाटेल.

चिंतामणी नवीन

In reply to by गणपा

मिपाच्या "स़ंजीव कपुरने" जी प्रतिक्रीया दिली आहे, तीच्या मी पामर काय बोलणार. (भगवंताच्या पहील्या अवतारावर प्रेम करणारा) चिंतामणी

मालोजीराव नवीन

In reply to by गणपा

अगदी अगदी...फ्राय झाल्यावर मासा एवढा हसताना पहिल्यांदाच पाहिला...बाकी साक्षात अन्नपुर्णेने बनवल्यावर हर्षवायू होणारच ! -मालोजीराव

बॅटमॅन नवीन

In reply to by मालोजीराव

तंतोतंत!!!!! काय ते सादरीकरण आणि काय त्या डिशेस......सानिकातैंची होते पाकृ, आमची होते निस्ती जळ्जळ!!!!

Maharani नवीन

सानिका मी मीपा वर नवीन आहे पण तुमच्या बाकिच्या पण काही पाकॄ वाचल्या..उत्तम presentation!! अप्रतिम छायाचित्रे...

कौशी नवीन

खरच खुपच अप्रतिम.. प्रेसेन्टेशन तर प्रश्नच नाही..आवडली.

कॉमन मॅन नवीन

In reply to by प्राजु

तुझ्या पाकृ नेहमीच इन्सिरेशन देतात....
इन्सिरेशन म्हणजे काय..? कृपया मराठीतून अर्थ सांगितल्यास बरे होईल.

सुनील नवीन

In reply to by प्राजु

अमेरिकेत पाप्लेटला काय म्हणतात कोणी सांगेल काय?? एखाद्या एशियन (चिनी/विएतनामी) दुकानात गेल्यास दिसेल आणि दिसल्यावर ओळखता येईलच!

स्वाती२ नवीन

In reply to by प्राजु

प्राजु, पाँफ्रेट असे लिहिलेले असते. http://cool007moss.blogspot.com/2008/02/fish-names-english-marathi-hindi.html या ब्लॉग वरची लिस्ट उपयोगी आहे.

बबलु नवीन

._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.._/\_.. अशक्य.

दीपा माने नवीन

सानिका तुमच्या पाकृ नेहेमीच छान असतात. मी नेहेमीच वाचते. प्राजु ,अमेरिकेत चायनीज फिश मार्केटमध्ये पापलेटाला पांपानो म्हणतात.

sneharani नवीन

मस्त पाकृ! फोटो ही जबरदस्त!! :)

सुमो नवीन

पाककृती आणि त्यांचं सादरीकरण ह्यात हातखंडा आहे आपला... घरी अवन नसल्याने ह्याला केळीच्या पानात बांधून स्टीम करुन उकड्या तांदळाच्या भातासोबत हादडावे म्हणतो.....

प्रभाकर पेठकर नवीन

गरम गरम वाफाळणारा पांढरा शुभ्र बासमती (किंवा आंबेमोहोर) तांदूळाचा भात आणि पापलेट कालवणासोबत ओव्हन-फ्रेश किंवा चरचरीत तळलेला मासा. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.

मृदुला सूर्यवंशी नवीन

फोटो आणि रेसिपी दोन्ही दिसत नाही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by मृदुला सूर्यवंशी

फोटो आणि रेसिपी आता दिसतील. -दिलीप बिरुटे

चिंतामणी नवीन

कोण आहे रे ते हा धागा आत्ता वर काढणारा???? दिवाळीत फराळाचे खायचे आहे की नाही.

मृदुला सूर्यवंशी नवीन

हो! आता दिसत आहेत फोटो. जबरदस्तं सादरीकरण...मगाशी फोटो दिसत नव्ह्ते तेच चांगलं होतं ;)

अनिल हटेला नवीन

जीव खल्लास जाहला!!! :-)

संदीप चित्रे नवीन

पाकृ जरी आधीच दिलेली असली तरी मी आत्ता ऐन दिवाळीत ती पाहिली आणि दिल खूष हो गया :) पापलेट.. खरंतर 'मासे' हा आपला एक वीक प्वाईंट हाये! त्यात अशी सचित्र पाकृ म्हणजे खपलोच :)