मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पापलेटचे कालवण व ग्रील्ड पापलेट

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य पापलेटचे कालवण: पापलेट साफ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावे. तुकड्यांना किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे. १ छोटी वाटी ओले खोबरे + मुठभर कोथिंबीर + ३-४ लसुण पाकळ्या + ३-४ हिरव्या मिरच्या + १/२ टीस्पून हळद सर्व एकत्र वाटून घेणे. . १ छोटा कांदा बारीक चिरून चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त घालणे) २-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून धणेपूड मीठ चवीनुसार . पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. . त्यात खोबर्‍याचे वाटण घालून चांगले परतावे. . वाटणात लाल -तिखट, हळद, धणेपूड व चवीनुसार मीठ घालावे व चांगले एकत्र करावे. . त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व उकळी आणावी. . उकळी आली की गॅस मंद करून त्यात आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा. . पुन्हा उकळी आली की त्यात पापलेटचे तुकडे सोडावे व शिजवावे. मासे लवकर शिजतात. . तयार कालवण वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करणे :) . साहित्य ग्रील्ड पापलेट: पापलेट साफ करावे, त्यावर चिरा पाडून घ्याव्या दोन्ही बाजूने व किंचित हळद, मीठ व लिंबाचा रस लावून ठेवावे. थोडी कोथिंबीर + थोडी पुदीन्याची पाने + १-२ हिरव्या मिरच्या + २-३ लसुण पाकळ्या + १ इंच आल्याचे तुकडे + लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्यावे. . . पाकृ: पापलेटला तयार केलेली चटणी दोन्ही भाजूने नीट लावून घ्यावी. चिरांमधे ही नीट चटणी चोळावी. . मॅरीनेट केलेल्या पापलेटवर १ चमचा तेल/बटर सोडावे व ग्रील रॅकवर ठेवून प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये २०० डीग्री वर ८ मिनिटे ठेवावे. मग बाजु उलटवून पुन्हा ८ मिनिटे ठेवावे. . तयार ग्रील्ड पापलेट सॅलॅड व कांद्याबरोबर सर्व्ह करा :) .

वाचन 15127 प्रतिक्रिया 0