उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

विवेक वि's picture
विवेक वि in जनातलं, मनातलं
18 Oct 2011 - 4:30 pm

उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळ
३) मामलेदार, ठाणे

४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड

६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड

७) श्री- शनिपारा जवळ

८) नेवाळे- चिंचवड

९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.

१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.

११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन

१२) जुन्नर बस स्थानक.

१३) फडतरे, कलानगरी.

१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर

१५) गोखले उपहार गृह, ठाणे

१६) भगवानदास, नाशिक

१७) फडतरे मिसळ कोल्हापुर

१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे

१९) प्रकाश, दादर

२०) दत्तात्रय, दादर

२१) वृंदावन, दादर

२२) आस्वाद, दादर

२३) आनंदाश्रम, दादर

२४) मामा काणे, दादर

२५) आदर्श, दादर

२६) समर्थ दादर(पूर्व)

२७) माधवराव, सातारा

२८) विनय (गिरगाव)

२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड

३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक

३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक

३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक

३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक

३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक

३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक

३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक

३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक

३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे

३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे

४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर

४१) चोरगे मिसळ कोल्हापुर

४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर

४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर

४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,

४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.

४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर

४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)

४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम

४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल

५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल

मांडणीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

ह्या धाग्याचे प्रयोजन काय आहे
कळ्ले नाही ;)

चिंतामणी's picture

18 Oct 2011 - 4:37 pm | चिंतामणी

http://www.misalpav.com/node/9386#

नउ ठिकाणे जास्त आहेत यात.8) 8-) :cool:

साहेब थोडा शोध घेतला असतात तर या इ-मेलचा उगम आपल्या या मिपावरच झालाय हे आपल्याला कळल असत. :)

उत्तम मिसळी मिळणारी ५६ ठिकाणे

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

बाकी तुमची घटलेली यादी पाहुन काही ठिकाणांनी आपली क्रेडेबीलीटी घालवली की काय अशी शंका आली. ;)

जाता जाता : ते शिर्षकातल ५1 म्ह्णजे A1 सारख काही असेल अश्या आशेने धागा उघडला होता.

किसन शिंदे's picture

18 Oct 2011 - 4:43 pm | किसन शिंदे

:)

पण त्यांना शोध न घेता त्यांचा स्वतःचा धागा काढायचा असेल तर. :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2011 - 7:04 pm | परिकथेतील राजकुमार

राम राम, काही सन्माननीय सदस्यांच्या का पाठीमागे लागला आहेस बाबा.
लिहू द्या ना रे लिहिणार्‍याला.

गणपा's picture

18 Oct 2011 - 9:13 pm | गणपा

चल... आच्रत.

यापैकी अनेक ठिकाणी खाल्ली आहे. पण मनशक्ती के॑द्र, लोणावळा. या ठिकाणी खाल्ली तो एक वेगळाच अनुभव. साधी मिसळ खायची तर त्यापूर्वी मला एक फॉर्म दिला गेला (मी कोणत्याही शिबिराला गेलेलो नव्हतो. फक्त एक खाण्याचे ठिकाण म्हणून रस्त्यात थांबलो होतो). त्या फॉर्मवर आपल्याला खाताना येणार्‍या अनुभवांचे आणि भावभावनांचे तपशील भरुन द्यायचे होते. हे पाहून मी भारावलो, अशा अर्थाने की काहीतरी खास अनुभव देणारे अन्न / नाश्ता असणार. मग मिसळ मागवली. हे राम.. असली तिखटजाळ की अनुभव लिहिण्याच्या फॉर्मने नाक पुसायची वेळ आली.

तिखटातही प्रकार असतात. झणझणीत हवासा स्वाद
आणि नुसताच तोंडाची आग आग करणारा आणि पाण्याने पोट भरणारा एक प्रकार.

बाकी मामलेदार तर आमच्या गावातच.. गोखलेही.

स्पावड्या, ब्लू कोरल नक्कीच या यादीत येऊ शकेल नाही का?

बर्याच ठिकाणी मिसळ खाल्ली आहे या यादीमधील.
मागे अशीच ठिकआणे ताकली होती त्याची यादी करायची राहुन गेली आहे.. या निमित्ताने आठवण झाली...

या यादीत नसणारे पण जेव्हडे अनुभव आहेत त्यावरुन ..
सिन्नर (नाशिक जवळ) मधील मिसळ ला तोड अजुन तरी मला मिळालेली नाही..

आणि पिंपरी वाघेरीतील जनता,निसर्ग अथीती मिसळ ही खुप छान आहेत.

मराठी_माणूस's picture

18 Oct 2011 - 5:20 pm | मराठी_माणूस

सिन्नर मधे कुठे ?

सिन्नर : श्रीराम मिसळ सेंटर ( पप्प्याची मिसळ).

नाशिक च्या मिसळीची उगमदात्री मिसळ आहे ही असा मित्र सांगत होता.
जसे चिंचवड/पिंपरीतील मिसळीवाले कोल्हापुर हुन मसाला आणतात ( आणि सगळ्यांचे फरसान एकाच ठिकानाहुन येते. नाव विसरलो पण भारी आहे एकदम) तसे नाशिक ने हि कॉपी केली आहे.
पण असे मित्र म्हणतो आमचे आपले खा आणि तृप्त व्हा ...

पप्पु अंकल's picture

18 Oct 2011 - 5:39 pm | पप्पु अंकल

सिन्नरच्या ताज्या तळलेल्या फरसाण च्या मिसळीची चवच हट्के आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Oct 2011 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll

गगनबावडा एसटी स्टँडवरची मिसळ. कळकट्ट उपहारगृहातली एकदम टेस्टी मिसळ. कोल्हापूरातील समस्त मिसळींपेक्षा मला ही मिसळ आवडली. कटवडा तर क ह र.

कोल्हापुरात मटणाचा तांबडा रस्सा असलेली मिसळ मिळते. ती कोणी खाल्ली आहे काय?

माझ्यामते चांगल्या मिसळीची लक्षणे:

-जास्त रस्सा, कमी कडधान्य,

-वाटाणे शक्यतो नको. असल्यास जास्त नको.

-रश्श्यावर तर्री असणे मस्ट.

-फरसाण कुरकुरीत हवं. (नंतर भिजत असलं तरी)

-मिसळ "लावलेली" हवी. म्हणजे फरसाण, शंकरपाळी, उरलेल्या ब्.वड्यांचा चुरा वगैरे जिनसा एकावर एक लावून मग वरुन कट / तर्री / सँपल घालणे आवश्यक. कँटीनमधे सोयीसाठी रस्सा भरलेली ताटली आणि त्यात बचकभर फरसाण वरुन टाकतात ती मिसळच नव्हे.

-पावापेक्षा "स्लाईस" जास्त चांगला वाटतो.

-ब. वड्याचा / भज्यांचा चुरा, शंकरपाळी, पोहे, अशा अ‍ॅड ऑन्सनी खुमारी अधिक वाढते.

-कांदा लिंबू नसेल तर मिसळ कॅन्सल करावी.

-दही मिसळ नेहमीच चांगली लागेल असं नाही. काहीवेळा तर दह्याने मिसळीची वाट लागते.

बाकी काही मत असेल तशी भर घालावी.

वपाडाव's picture

18 Oct 2011 - 5:49 pm | वपाडाव

फुल्ल छाप्या माणुस आहे.....
अक्षरशः क्रम सुद्धा नाही बदललेला मिसळींचा......

सं.मं ला विनंती हा धागा तात्काळ काढुन टाकावा...

मोहनराव's picture

18 Oct 2011 - 5:57 pm | मोहनराव

फेसबुकवर ही यादी फिरत आहे!!!
फिरत फिरत इकडे प्रदर्शीत झालेली दिसते... ;)
जरा मिसळपाव संकेतस्थळाचे धोरण वाचावे.

http://www.misalpav.com/node/13199
मुद्दा २

मी-सौरभ's picture

18 Oct 2011 - 9:23 pm | मी-सौरभ

क ड क प्रतिसाद...

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2011 - 7:29 pm | प्रभाकर पेठकर

ह्या ५१ ठिकाणांना धागा कर्त्याने भेट देऊन सर्व ठिकाणांची मिसळ खाल्ली आहे का? तसे पाहिले तर, एकूण किती ठिकाणच्या मिसळींची चव घेऊन ह्या ५१ ठिकाणांना 'उत्तम' हे प्रशस्तीपत्र दिलं आहे? त्या इतर ठिकाणांच्या आणि ह्या ५१ ठिकाणातल्या मिसळीत असा काय फरक जाणवला ह्यावर काही टिपण्णी का नाही?

बेडेकर मिसळ, पुणे आणि काटाकिर्र, ;पुणे ह्या दोन मिसळींच्या चवीतच जमिन-अस्मानाचा फरक आहे. तरीही दोन्ही 'उत्तम' कशा?

'मिसळ मिळण्याची, मला माहित असलेली, ५१ ठिकाणे' असे शीर्षक देता येईल.

फारातफार, '५१ जणांनी नावजलेली उत्तम मिसळ मिळण्याची ५१ वेगवेगळी ठिकाणे' असे म्हणता येईल.

टाईमपास धागा.

मृत्युन्जय's picture

19 Oct 2011 - 10:52 am | मृत्युन्जय

बेडेकर मिसळ, पुणे आणि काटाकिर्र, ;पुणे

हे होउ शकते हा काका

सचिन आणि सौरव गांगुली दोन्ही आवडु शकतात ना? शंकरपाळे आणि चकली दोन्ही आवडु शकतात ना? डोसा वैशालीचा आणि चटणीजचा दोन्ही आवडु शकतात ना? वांग्याचे भरीत आई करते ते आणि जळगावचे पाहुणे करतात ते असे दोन्ही आवडु शकते ना? असे बरेच पदार्थ बर्‍याच ठिकाणचे वेगवेगळे आवडु शकतात.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2011 - 9:40 pm | प्रभाकर पेठकर

सचिन आणि सौरव गांगुली दोन्ही आवडु शकतात ना?

आवडू शकतात. पण मिसळ आणि क्रिकेट ह्याची तुलना चुकीची आहे. चव ही 'सबजेक्टीव्ह' आहे क्रिकेट मध्ये उत्तम खेळाडू निवडताना आकड्यांचा आधार घेता येतो. सबब तुलना चुकीची.

शंकरपाळे आणि चकली दोन्ही आवडु शकतात ना?
शंकरपाळ्यांतील गोड चव आणि खुसखुशीतपणा तसेच चकलीतील भाजणीची चव आणि खुसखुशीत पणा ५१ ठिकाणी वेगवेगळा असताना दोन्ही पदार्थ ५१ ठिकाणी 'उत्तम' असू शकत नाही.

डोसा वैशालीचा आणि चटणीजचा दोन्ही आवडु शकतात ना?
चवीच्या ५१ व्हेरिएशनस आवडत्या असू शकतात 'उत्तम' असू शकत नाही. एका वर्गात ५१ मुले हुशार असू शकतात पण ५१ मुलांचा 'पहिला' नंबर येऊ शकत नाही.

वांग्याचे भरीत आई करते ते आणि जळगावचे पाहुणे करतात ते असे दोन्ही आवडु शकते ना?

आवडणे आणि 'उत्तम' असणे ह्या दोन वेगळ्यागोष्टी आहेत.माझा प्रतिसाद नीट वाचलात तर तुम्हाला समजेल मी दोन वेगळी शीर्षक सुचवली आहेत. त्या मागे हेच कारण आहे. मला ५१ ठिकाणच्या मिसळी आवडू शकतात पण त्या ५१ मिसळींची तुलना करून कुठली एक उत्तम आहे हे ठरवावे लागेल. बेडेकरांची मिसळ (चिंचगुळाची) आणि काटाकिर्रची
झणझणीत मिसळ ह्या दोन्ही दर्जांना 'उत्तम' असे एकच प्रशस्तीपत्र देणे चुकीचे आहे. तसेच, दोन वेगवेगळ्या चवीच्या माणसांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार दोन्ही मिसळी आवडू शकतात पण एकच माणूस दोन्ही चवींना 'उत्तम' म्हणणे संभवत नाही.

.असे बरेच पदार्थ बर्‍याच ठिकाणचे वेगवेगळे आवडु शकतात.

ह्या बद्दल दुमत नाही पण एकच पदार्थ अनेक ठिकाणी 'उत्तम' मिळणे शक्य नाही.

तुम्ही "आवडणे' आणि 'उत्तम' असणे ह्यात गफलत करता आहात.५१ वेगवेगळ्या मिसळी 'आवडू' शकतात पण त्यातून 'उत्तम मिसळ' शोधताना त्या सर्व ५१ मिसळींच्या चवीची दर्जानुरूप वर्गवारी करून त्यातील सर्वाच चांगली चव कुठली हे ठरवून त्याला 'उत्तम' म्हणावे लागेल.

असो.

आमच्या कुरुंदवाडची एकाटे यांची मिसळ. महावीर मिसळ भुवन, बाजारपेठ कुरुंदवाड

मैत्र's picture

18 Oct 2011 - 10:56 pm | मैत्र

काय चोप्य पस्ते यादी आहे!
तीन वेळा चव बदललेल्या बेडेकरांचं नाव पहिलं आणि काटाकिर्रचं नाव नाही...?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2011 - 7:11 am | अत्रुप्त आत्मा

मंगला टॉकिज बाहेर तेलंग काकाकडची खा तर येक डाव? खरि करंट देणारि तर्री मंजे काय ते कळेल! पार केस उभी रहातात... डोक्याची ;-)
अवांतर:-काटा किर्र भंगार आहे...मिसळही आणी सर्व्हिसही...

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Oct 2011 - 2:13 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. काटाकिर मला तर अगदी बकवास वाटली.

ही ठिकाणे वेगवेगळ्या गावी आहेत. पुण्यातच असतानाही मिसळ खायला म्हणून अगदी पिंपरी चिंचवडलाही जाणे जमत नाही. शिवाय एक जण म्हणतो की काटा किर्रची मिसळ बेष्ट तर दुसरा तिकडं फिरकूही नका असे सांगतोय. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आणि मिसळीच्या बाबतीत तर तिखट झेपणे/न झेपणे असा प्रकार असतो.
एके ठिकाणी (म्हणजे एकांच्या घरी) त्यांनी हौसेनं मिसळ हा प्रकार केला होता. त्यात साबुदाण्याची खिचडी, फोडणीचे पोहे, शेव आणि रस्सा हे एकत्र केले होते. पहिल्यांदाच खाल्ला तो प्रकार हा होता. त्यावर दही! अन्नाला नावे ठेवल्याबद्दल नंतर आईची बोलणी खावी लागली ती वेगळीच! तेंव्हापासून मिसळ हा प्रकार मला झेपेल अश्या चवीचा घरी करून खाते, अन्यथा नाही.

चिप्लुन्कर's picture

19 Oct 2011 - 9:30 am | चिप्लुन्कर

कोणी रत्नागिरीला " गांध्यांची मिसळ खाल्ली आहे का? " मस्त असते.

पैसा's picture

20 Oct 2011 - 8:27 am | पैसा

त्यात कांदेपोहे घातलेले असायचे. पण आता चालू आहे का ती?

पाषाणभेद's picture

19 Oct 2011 - 11:12 am | पाषाणभेद

शिळी भाकरी चांगली लागते हे सत्य बर्‍याच जणांना माहीत असेल.
त्याचप्रमाणे हॉटेलातल्या उसळीत (ती असते का हा संशोधनाचा मुद्दा आहे) जेवढे शिळे मटेरिअल जास्त (जेवढे हा शब्द शिळ्या मटेरिअल्स चे नग व क्वांटीटि या दोहोंसाठी लागू आहे.) तेवढी मिसळ चविष्ट.

बाकी प्रत्येकाच्या चवीची आवडनिवड बदलती असते. त्यामुळे हि मिसळ चांगली ती वाईट असा काही प्रकार नसतो. त्याचप्रमाणे तुम्हाला भुक किती लागलेली आहे त्यावरही पदार्थाची चव अवलंबून असते.

मला तर पाव हे वेगळ्या डिश मध्ये आलेली मिसळ आवडते. एकाच डिशमध्ये मिसळ अन पाव एकत्र असतांना निट खातादेखील येत नाही.

जेवढे शिळे मटेरिअल जास्ततेवढी मिसळ चविष्ट.

अगदी हेच मिसळीच्या हाटेलालाही लागू होते असा आमचा अनुभव. मिसळीचे हाटेल अथवा टपरी जेव्हढी कळकट्ट तेव्हढीच तिथली मिसळ स्वादिष्ट आणि तर्रीदार असते

मृत्युन्जय's picture

19 Oct 2011 - 5:17 pm | मृत्युन्जय

या लिष्टेत दिवे आगरच्या आवळस्करांची मिसळ अ‍ॅड करुन टाका बरे.

आणि या मिसळी कश्या नाहीत?

१. आबा पवारः रास्ता पेठ
२. कर्वे रोडवर कासट समोरच्या गल्लीतली टपरी
३. महेश भुवनः मार्केटयार्ड, पुणे
४. दे धक्का: पुणे

बेडेकर आणि आवळस्करांपाठोपाठ मामलेदार आणि गोखले (दोन्ही ठाणे) यांचाच नंबर लागावा. नंतर वरचे चार. हे नंबर खालील लिष्टेतुन. बाकी मी खाल्लेल्या नाहीतः

१) अण्णा बेडेकर, पुणे

२) मामलेदार, ठाणे

३) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड

४) श्री- शनिपारा जवळ

५) नेवाळे- चिंचवड

६) कुंजविहारी, ठाणे स्टेशन

७) गोखले उपहार गृह, ठाणे

८) फडतरे मिसळ कोल्हापुर

९) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे

१०) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे

११) खासबागचीमिसळ कोल्हापुर

१२). बावड्याची मिसळ कोल्हापुर

अविनाशकुलकर्णी's picture

19 Oct 2011 - 6:40 pm | अविनाशकुलकर्णी

सहस्त्र बुद्धेंची र्टिळक रोड.....बादशाही मिसळ..
एकदम मस्त..
मिसळ्+लोणी पाव स्लाईस्+चहा...
दिवस कारणी लागतो..

मिसळ तिखट जाळ व्हावि म्हणुन चुन्याची निवळी घालतात असे ऐकुन्/वाचुन आहे..
दर्दी मार्ग दर्शन करतिल का?