क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला. त्यावर अनुकूल-प्रतिकूल मतांचा पाऊस पडला. आज अनेक वर्षांनीसुद्धा परिस्थिती निराशाजनकच आहे असे पाहून लेख येथे टंकित केला आहे. सूज्ञांच्या अभिप्रायांचे स्वागतच आहे.
आजकाल पाहतो तर क्रिकेटचा प्रचार वाढतोच आहे. अशा बश्या खेळावरील लोकांचे वाढते प्रेम हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या दिवाळखोरीचेच लक्षण आहे असे आता आमचे पक्के मत बनले आहे.
अनेक दिवस मी या खेळाचे अवलोकन करितो आहे. एक लहानसे उदाहरण म्हणून कालचाच प्रसंग पाहा. काल मी एका मैदानाजवळून चाललो होतो. मैदानावर लहान पोरांचा एक जथ्था जात होता. आता पोरे जमून मस्त दंगा घालतील या अपेक्षेने मी थोडा काळ माझ्या फिरण्याच्या व्यायामातून सवड घेऊन उभा राहिलो. पण पाहतो तर काय ! सर्व
जण जमले, कवायतसवयीने जागोजागी विखुरले आणि खेळ चालू झाला. बारा पंधरा पोरांतील फक्त चार पोरे एका कोठल्याही वेळेस धावपळीत होती. बाकी निरिक्षकाप्रमाणे जागच्या जागीच.
हा काय खेळ झाला? या खेळामध्ये श्रम होतात हे मान्य केले तरी लहान वयाच्या, तरूण वयाच्या सर्व मुलांनी वाढीच्या वयात व्यायामासाठी खेळावा असा हा खेळ नाही असे आमचे दिवसेंदिवस मत बनत चालले आहे. मैदानी सांघिक खेळामध्ये जो दंगा, धिंगामस्ती असते, मातीने अंग माखून जाते तो प्रकार या खेळात खचितच नाही. साहेबाने पोषाखी खेळ निर्माण केला आणि आम्ही तो डोक्यावर घेतला.
मुलांनी मैदानावर हुतुतु खेळावे, लगोरी, फुटबॉल असे दमसासाचे धिंगामस्तीचे खेळ खेळावेत तरच पुढल्या पिढीचे तेज टिकून राहील. हिंदच्या पुढल्या पिढीचे तेज कमी असावे, बुळी पोषाखी पिढी निपजावी म्हणूनच की काय साहेबाने हे वेड इकडे आणले आणि रुजवले असा आम्हांस दाट संशय येऊ लागला आहे.
सर्व पालकांनी आता आपल्या मुलांना मैदानी दमसासाचे खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे असे मी या निमित्ताने आवाहन करतो. समाजधुरीणांनो आता रणमैदानातून मुक्त झाला आहा तर खेळाच्या मैदानाकडे या, आणि आपल्या नव्या पिढीला पोषाखी-बुळे होण्यापासून वाचवा!
आपला
-- लिखाळ.
प्रतिक्रिया
25 Apr 2011 - 8:47 pm | रेवती
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व
आँ? बरं बरं.....;)
खेळाच्या मैदानाकडे या, आणि आपल्या नव्या पिढीला पोषाखी-बुळे होण्यापासून वाचवा!
छान संदेश हो आजोबा!:)
तुमचे इतके कमी लिखाण आम्हाला मान्य नाही.
25 Apr 2011 - 8:56 pm | प्रियाली
मस्त!
लिखाळआजोबांनी पुनरागमन केलेले दिसते.
उरलेसुरले भेळेचे कागद आहेत का रे कुणाकडे? ;)
25 Apr 2011 - 11:26 pm | पिवळा डांबिस
हा लेखनशार्दूल लिखाळ पुन्हा विक्रिडित झाला याचा आनंद वाटला!!!
:)
("आरे किरकेट किरकेट क्या लगा रख्खा है, जरा हाकी खेलो, हाकी!!!!" - आमचे पीटीटीचर रणबीरसिंग बलवा, रिटायर्ड हवलदार, इंडियन आर्मी)
25 Apr 2011 - 11:58 pm | पाषाणभेद
लोकशाहीचा जमाना असल्यामुळे क्रिकेटविरोधी या धाग्याला फाट्यावर मारले जाईलच पण सत्या परिस्थीती लिखाळ म्हणतात तशीच आहे.
क्रिकेट हा दमछाक न होणारा खेळ असल्याने अन आपण ऐदी स्वभावाचे असल्याने हा खेळ आपल्याकडे जास्त फोफावला आहे हे सत्य आहे. त्यात आताशा पैसा हा पाण्यासारखा मिळतो असल्याने अन राजकारणी व बॉलीवूडी थोबडेही त्यात आल्याने तो अधिकच चमकू झाला आहे.
हा सांघीक खेळ निश्चितच आहे का यावर चर्चा व्हावी.
अवांतर: सैन्यात ह्या खेळाला स्थान नाही.
26 Apr 2011 - 12:59 am | गणपा
कै च्या कैच तुझं पाषाण्या.
यात थोडा बदल करुन म्हणतो की यात मिळणार्या झटपट प्रसिद्धीच्या मोहा पायी, राजकारणी व बॉलीवूडी थोबडेही त्यात आपापले हात धुवुन घेत आहेत.
26 Apr 2011 - 12:45 am | ज्ञानेश...
चौसष्ट सालानंतर किमान सहा-सात पिढ्या लिखाळ आजोबांच्या डोळ्यासमोरून गेल्या असतीलच. त्यापैकी किती पिढ्या 'बुळ्या' निपजल्या याचा काही विदा आजोबांकडे आहे काय?
चौसष्ट साली हा लेख जितका टाकाऊ होता तितकाच आजही वाटला. ४७ वर्षे आपला टाकाऊपणा टिकवून राहणे ही साधी गोष्ट नाही.
अभिनंदन करितो !
26 Apr 2011 - 2:14 am | श्रावण मोडक
मालक, दंडवत. भेटा एकदा. प्रत्यक्ष दंडवत घालतो.
बादवे, 'सप्तरंग' सिरियसली वाचताय? त्यातल्या एका लेखात अशीच सुरवात होती काही दिवसांपूर्वी हे आठवतं. तसेच असेल तर, त्याची खिल्लीही उडवावीशी वाटल्याबद्दल आणखी एक दंडवत.
26 Apr 2011 - 2:29 am | धनंजय
मस्त
26 Apr 2011 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते
दंडवत हो आजोबा!
26 Apr 2011 - 2:59 pm | सहज
हा हा हा!
26 Apr 2011 - 6:51 pm | चतुरंग
लै भारी हो लिखाळाजोबा! ;)
अग्रलेखी शैली मस्त जमली आहे.
(मैदानावर जाऊनही एका जागी स्वस्थ उभे राहण्याचा अपरवाद पदरी येऊ नये म्हणून मी मैदानावर जातच नाही! ;) )
-(बैठा)रंगा
26 Apr 2011 - 7:11 pm | छोटा डॉन
>>मुलांनी मैदानावर हुतुतु खेळावे, लगोरी, फुटबॉल असे दमसासाचे धिंगामस्तीचे खेळ खेळावेत तरच पुढल्या पिढीचे तेज टिकून राहील.
हांग्गाश्शी !!!
कसे एकदम सोळा आणे चोख बोललात लिखाळआजोबा, एकदम सहमत आहे बघा.
ह्या भिकारड्या क्रिकेटने देशाचे आणि देशातल्या युवकांच्या युवाशक्तीचे पार वाट्टोळे केले आहे असे आमचे अगदी लहानपणापासुन मत आहे ;)
- (क्रिकेटद्वेष्टा)छोटा डॉन
26 Apr 2011 - 8:27 pm | गणपा
तरी म्हटल अजुन हा क्रिकेटद्वेष्टा बोलला कसा नाही. ;)
26 Apr 2011 - 8:19 pm | मुक्तसुनीत
लेखाचे बेअरिंग "जमले" आहे. मात्र हे फारच त्रोटक झाले. अजून जरा मज्जा येऊ द्या की.
26 Apr 2011 - 9:25 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो...
26 Apr 2011 - 11:05 pm | लिखाळ
अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादांचे स्वागत आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार. :)
(काल लेख टाकल्यापासून 'मिपा ऑफ लाईन' आहे असे दिसत असल्याने प्रतिसाद देण्यास विलंब लागला.)
26 Apr 2011 - 11:10 pm | मुक्तसुनीत
मिपाबी ऑफलाईन था , अपन बी ऑफलाईन था. इस्सलिये लिखाईच नईं ;-)
30 Apr 2011 - 5:01 pm | मन१
--मनोबा.
30 Apr 2011 - 9:35 pm | भडकमकर मास्तर
सनातन प्रभात वाचला की काय नुकताच?
30 Apr 2011 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हो लिखाळाजोबा*, तुम्ही नक्की काय व्यायाम करता? तुमच्या आरोग्याचं रहस्य काय? या वयातही एवढं (कमीतकमी) टंकलेखन करण्याची शक्ती तुम्ही कुठून आणता?
* हे नामकरण केल्याबद्दल चतुरंगकाकांचे खास आभार.
30 Apr 2011 - 10:08 pm | लिखाळ
मागे चतुरंगांनी तब्येतीविषयी जे संपादकीय लिहिले होते, त्याला प्रतिसाद देताना मी माझ्या आवडत्या व्यायाम प्रकारांचा उल्लेख केला होता. जिज्ञासूंनी शोध घ्यावा. बाकी सर्व क्षेम कुशल !!
व्यायामाचा विषय निघाला म्हणजे हा प्रकृतीविषयी काही संकेत असावा का?
30 Apr 2011 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उजव्या बाजूची का डाव्या बाजूची प्रकृती?
हे विश्व डावखुरं आहे असा काही सिद्धांत असल्याचं अंधुकसं आठवतं.
1 May 2011 - 12:19 am | अविनाशकुलकर्णी
६४ साली मुलेच क्रिकेट खेळत होति..आता मुलिंची पण भर पडली आहे.....
आता पुढे मिस्क्स एलेव्हन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने भरु शकतात
2 May 2011 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार
६४ साली देखील डान्या सारखी क्रिकेट कंटक जळजळी माणसे अस्तित्वात होती हे पाहून शरम वाटली.
2 May 2011 - 6:21 pm | प्राजक्ता पवार
मस्तं
3 May 2011 - 11:53 am | प्यारे१
बरेच मासे गळाला लागले की !
सुंदर!