काव्यफुफाटा

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
4 Nov 2010 - 5:43 pm

शरदिनी ताईंच्या राज्यात घुसखोरीबद्दल क्षमा मागुन माझी ही कविता दिवाळीभेट म्हणून जालिंदरबाबाच्या चरणी अर्पण.

काव्यफुफाटा

दुर्धरकविता कंपितचंचल आबालभासी काव्यफुफाटा

स्थळसंकेती विद्रुपझेले बधीरकर्णी तव तीव्रफटाका

आंतरदैत्य भेसुरनृत्य अन भाळोभाळी अधीरकंटकी

गदरपुष्टी हुकुमीकुस्ती शब्दास्त्रांची प्या वृशालवृष्टी

झाळीतबुद्धी मार्मिकवृद्धी टपटप भरले डोहउसासे

चरितसाधन घायाळचुंबन अर्धकारी ती ललाटभासे

उथळनौका खवसागरी केसदुधारी कापुन झाले

अशी ही कविता करुन वाचक बिचारे वाचुन मेले.

आपलाच,
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हास्यकवितामौजमजा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

4 Nov 2010 - 5:52 pm | धमाल मुलगा

श्री. मराठमोळासाहेबताई,'
तुम्ही कधीपासून मानसशास्त्राच्या प्राध्यापिका झालात? :P

पण काही म्हणा, एकदम खंग्री जमलीये....
आता त्या शरदिनीताई तर काही कविता लिहित नाहीत हल्ली, तर मग तूच का नाही त्यांचा वसा पुढे चालवत?

बापरे ममो! काय लिहिलयस रे हे! =)))

परिकथेतील राजकुमार's picture

4 Nov 2010 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार

जियो !!

खासच एकदम.

मितान's picture

4 Nov 2010 - 6:41 pm | मितान

फुफाटा कसला ! खडी-गारगोट्या-बारके दगडधोंडे फेकून मारलेत इथे :D

पण अगदीच काही दुर्बोध नाही हं कविता. शेवटची ओळ कळली की मला =))

यशोधरा's picture

4 Nov 2010 - 6:49 pm | यशोधरा

मितान गं! =))

प्रीत-मोहर's picture

4 Nov 2010 - 7:22 pm | प्रीत-मोहर

ए मला पण !!! :D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Nov 2010 - 7:06 am | विश्वनाथ मेहेंदळे

अहो नाही, ती शेवटची ओळ कळल्यासारखी वाटते पण नीट वाचली तर लक्षात येते की कळली नाही.
"अशी ही कविता करुन वाचक बिचारे वाचुन मेले" या वाक्यात दोन क्रियापदे पण कर्ता एकच अशी चमत्कृतीपूर्ण रचना कवीने मुद्दाम केलेली आहे.

अवांतर :- मराठमोळा हेच शरदिनी आहेत काय?

स्पंदना's picture

7 Nov 2010 - 2:52 pm | स्पंदना

मला पण शेवटची ओळ कळली, कस लेवल वाढल्या सारख वाटल.

वरच वाचताना जिभहोतसेलोळागोळाउठेउरातकातरकाळा अस झाल राव.

या शरदिनी ताइ लागत असाव्यात का?

मेघवेडा's picture

4 Nov 2010 - 6:55 pm | मेघवेडा

फक्त वृत्तात थोडी मार खाते आहे, बाकी मस्त! ;)

असुर's picture

5 Nov 2010 - 5:20 pm | असुर

तरीच म्हटलं अजून कोणी आलं कसं नाही मीटराची पट्टी घेऊन.. ;-)

ममोशेठ, असल्या ऐन दिवाळीतल्या शिमग्याच्या शुभेच्छांकडे लक्षच देऊ नका. :D

जमलंय हो फक्क्ड! धमालराव म्हणतायेत तसे अजून येऊ द्या की!

--असुर

पैसा's picture

4 Nov 2010 - 9:58 pm | पैसा

डांबरी फटाक्यांची माळ...
फुटली तडतडतड....

अवलिया's picture

5 Nov 2010 - 2:42 pm | अवलिया

हा हा हा

लै भारी रे !!