शाही गुलाबजाम

प्राजक्ता पवार's picture
प्राजक्ता पवार in पाककृती
16 Oct 2010 - 11:17 pm

साहीत्य : खवा २५० ग्रॅम
रवा २ चमचे
दुध
साखर २ वाट्या
पाणी २ १/४ वाट्या
पिस्ता व बदामाचे काप
केशर
वेलची पुड
तेल / तुप

कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा.

नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी पिस्त्याचा काप ठेवा.

मंद आचेवर तेलात अथवा तुपात हे गोळे तळुन घ्या.

साखरेचा पाक करण्यासाठी , साखर व पाणी एकत्र करुन गरम करा. उकळी आल्यावर गॅस मंद करुन ५ - १० मिनिटे
उकळु द्या. त्यात वेलचीची पुड व केशर घाला. गॅस बंद करा व तयार झालेल्या पाकात्तळलेले गुलाबजाम घालुन १० मिनिटे झाकुन ठेवा.

बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवुन खायला द्या.

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Oct 2010 - 11:59 pm | रेवती

अल्लाऽऽऽऽ जीव घेतला!

गणपा's picture

17 Oct 2010 - 2:52 am | गणपा

कातिल आहेत गुलाबजाम..

प्राजु's picture

17 Oct 2010 - 3:18 am | प्राजु

हे राम!!

मराठमोळा's picture

17 Oct 2010 - 4:08 am | मराठमोळा

:)

चतुरंग's picture

17 Oct 2010 - 5:15 am | चतुरंग

गुलाबजाम अगदी नेटके झालेले दिसताहेत!
(मागे एकदा गुलाबजाम करुन पाकात घातले तर सकाळपर्यंत पाक पिऊन पिऊन त्यांचे 'गुलाबलाडू' तयार झाले होते असे आठवते! ;) )

(बन्सीमहाराज गुलाबजाम प्रेमी)गुलाबरंग

प्राजु's picture

17 Oct 2010 - 6:43 am | प्राजु

हम्म्म!!!! तरीच!!! ;)

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2010 - 9:10 am | पिवळा डांबिस

ज्यांना खवा आयता उपलब्ध नसेल त्यांनी काय करावं ह्याबद्दल मार्गदर्शन कराल काय?
नाहीतर हे गुलाबजाम अगदी घसीटारामच्या पॅकबंद गुलाबजामांसारखेच दिसताहेत (गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे काप काय, कुठेही घालता येतात!!)
औधत्याबद्दल क्षमस्व!!!!!

प्राजक्ता पवार's picture

17 Oct 2010 - 11:48 pm | प्राजक्ता पवार

खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार .

समई's picture

17 Oct 2010 - 9:33 am | समई

खवा नसेल तर रिकोटा चिझ वापरले तर?बाकि गुलाबजाम मस्त एकदम्...आम्हि पाकामध्ये रोझ इसेंस घालतो...

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2010 - 9:44 am | पिवळा डांबिस

पण रिकोटा चीझ घालून तशीच चव येत नाही ना!!!
:)

म्हणजे फोडणीच्या भाताला बिर्याणी म्हणण्यासारखे आहे! ;)

(नाचीज)रंगा

समई's picture

17 Oct 2010 - 9:36 am | समई

खवा आणी आरारुट पाउडर वापरुनहि गुलाबजामुन करता येतात असे वाचलेले आठवत आहे...

वेताळ's picture

17 Oct 2010 - 10:03 am | वेताळ

.

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2010 - 10:26 am | पिवळा डांबिस

श्री वेताळजी,
हा असा अभिप्राय आपल्याला का बरे द्यावासा वाटला?
आपले त्यामागील रॅशनाल जाणून घेण्याची उत्कंठा आहे...
कळावे...

वेताळ's picture

17 Oct 2010 - 10:50 am | वेताळ

पिडां साहेब तसे काही नाही हो....
वर चित्रात गुलाबजाम एकदम सुपर्ब झाले आहेत.मला एकदम तो फोटो जालावरुन साभार उचलला कि काय असे वाटले होते.पण फटु व त्यातील गुलाबजाम एकदम वरीजनल आहेत ही खात्री पटल्यावर निशब्द झालो.
गोळे वळताना खुपच नाजुकपणे वळावे लागतात.त्यात फट न ठेवता गोळे करणे खरी कला आहे. वर गुलाबजाम त्या परिक्षेत १००% पास झाले आहेत.

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2010 - 11:00 am | पिवळा डांबिस

खरेच सुरेख गुलाबजाम आहेत!!
पण म्हणतात ना मन वढाय वढाय, म्हणून विचारलं...
:)
राग नसावा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2010 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा.........!

-दिलीप बिरुटे

पर्नल नेने मराठे's picture

17 Oct 2010 - 11:57 am | पर्नल नेने मराठे

ऐया...मी काल गुजाच विकत आणलेत दसर्यासाठी.
मी नाहि करत उगाच फेकुन मारला तर टेंगुळ यायचा.

पैसा's picture

17 Oct 2010 - 12:47 pm | पैसा

झालाच पायजे! बरं ते विरघळलेही नाहीत आणि फेकून मारायसारखेही झाले नाहीत म्हणजे खरंच ग्रेट!

पर्नल नेने मराठे's picture

17 Oct 2010 - 7:22 pm | पर्नल नेने मराठे

अरे पैस्या...:( मला नाहि जमत पण असे गुजा.

पैसा's picture

17 Oct 2010 - 9:45 pm | पैसा

नाही जमत ग. मी गिट्स नायतर चितळ्यांचं पाकिट आणते आणि करते.

स्वाती२'s picture

17 Oct 2010 - 4:25 pm | स्वाती२

तोंडाला पाणी सुटले.
माझे गुलाबजाम नेहमी फसतात. :(
माझ्या नवर्‍याने माझ्या प्रयोगांची एवढी धास्ती घेतलेय की आता नुसते 'गुलाबजाम करते' म्हटले की नवरा शिरा करायला घेतो.

चतुरंग's picture

18 Oct 2010 - 7:06 am | चतुरंग

काय सॉल्लिड आयडिया आहे ना?
"करु, गुलाबजाम करु?" असं नुसतं विचारलं रे विचारलं की अर्ध्या तासात गरमागरम शिरा तय्यार!! ;)
(खुद के साथ बातां : आमच्या सौंनी अजून ही ट्रिक वाचलेली दिसत नाही! ;) बिका, लगेच जाऊन काड्या लावू नका! )
(शिराप्रेमी)रंगा

रेवती's picture

18 Oct 2010 - 10:46 pm | रेवती

वाचलिये कि!;)

पैसा's picture

18 Oct 2010 - 10:57 pm | पैसा

प्रयोग कधी करतेयस?

रेवती's picture

18 Oct 2010 - 10:59 pm | रेवती

तू येतेस का पैसाताई?
मी प्रयोग करताना कोणीतरी साक्षीदार हवं!

पैसा's picture

18 Oct 2010 - 11:37 pm | पैसा

त्यापेक्षा एक धागाच काढ नंतर!

मदनबाण's picture

17 Oct 2010 - 4:38 pm | मदनबाण

लयं भारी... :)
मला गुलाबजाम फार फार आवडतात... हवे तेव्हढे हदडु शकतो मी. :)

(खादाड)

विसोबा खेचर's picture

17 Oct 2010 - 7:32 pm | विसोबा खेचर

जबरा..!

तात्या.

कुसुमिता१२३'s picture

17 Oct 2010 - 8:03 pm | कुसुमिता१२३

गुलाबजाम उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

17 Oct 2010 - 11:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मला आताच्या आत्ता गुलाबजी!
कणाकणानी वजन कमी करते आहे आणि ही असा सूड उगवते आहे?.....
प्राजु????????
तुप मेतकूट भात का बदला गुलाबजी से?
आम्ही रुशलोच मुली!

स्पंदना's picture

18 Oct 2010 - 7:38 am | स्पंदना

काय फोटो आहे, अन एक सुद्धा भेग नसलेला गुलाबजामुन?

गोडागोड वाटल.

नितिन थत्ते's picture

18 Oct 2010 - 3:59 pm | नितिन थत्ते

भेग नसलेल्या गुलाबजामबद्दल बरेच लोक बोलत आहेत. मी भेगा पडलेले गुलाबजाम आजतागायत बघितले नाहीत. :O

पिडाकाका. ५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे आणि नंतर पाणी आटवून खवा भाजून घ्यावा. (हे खमंगपणा आणि रंगासाठी). :) भाजला नाही तर गुलाबजाम गिट्ससारखेच लागतील.

दूध आटवून अर्थातच करता येईल. पण या पद्धतीने वेळ वराच वाचेल.

वरील आयड्या स्वतःच्या जवाबदारीवर करून पहाणे. नंतर तक्रार चालणार नाही. :D

जमले तर मग इथे कळवा. सगळ्या हिरव्यांना उपयोगी पडेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे

कोणतं क्रीम, सनस्क्रीन का नाईट क्रीम?

अवांतरः गुलाबजाम खल्लास झाले आहेत.

सनस्क्रीन का नाईट क्रीम कुठलही वापर पण मग ते खातानाचा तुझा फोटो टाकायला विसरु नकोस ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 7:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कधी बोलावतो आहेस तुझ्याकडे गुलाबजाम खायला? मी आणि गुलाबजाम बनवणार?? अ श क्य! हल्दीराम वगैरे लोकांचा व्यवसाय बसवण्यात मला काहीही विंट्रेश्ट नाही!!

मेघवेडा's picture

18 Oct 2010 - 7:58 pm | मेघवेडा

इच गार्ड! लै भारी!! ;)

नितिन थत्ते's picture

18 Oct 2010 - 9:16 pm | नितिन थत्ते

ओडोमॉसपण चालेल. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2010 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

अरे काय त्रास आहे !!

कृपया सदर पाकृ लेखिकेचे सदस्य खाते ताबडतोब बंद करावे.

खरच उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय!

प्राजक्ता मस्त रेसिपी दिलीस. मला हविच होती खव्याच्या गुलाबजामची रेसिपी. माझी आई आधी बनवायची. तिला विचारणारच होते.

खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार .

फक्त ४५ मिनीटांत होउ शकेल खवा तयार ? त्यात काही टाकायच नाही का ?

प्राजक्ता पवार's picture

18 Oct 2010 - 2:41 pm | प्राजक्ता पवार

होईल . फुल क्रीम दुध घे व high flame वर दुध आटव. जास्त दुध घेतले तर त्याप्रमाणात आणखी वेळ लागेल :)

सुहास..'s picture

18 Oct 2010 - 3:17 pm | सुहास..

मिपाच पाकृकती सदर म्हणजे त्रासच आहे राव !!

प्रभो's picture

18 Oct 2010 - 7:10 pm | प्रभो

झ का स!!!

यशोधरा's picture

18 Oct 2010 - 7:31 pm | यशोधरा

मला फोटो दिसत नाहीयेत. वर सगळ्यांनी इतकी स्तुती केली आहे की फोटो तरी पहायला मिळायला हवे होते.. :(
प्राजक्ता, तुम्ही कुठे असता हो? पुण्यात असला तर मी गुलाबजाम खायलाच येईन तेह्वाच पाहीन कसे दिसतात ते. :)

गणपा's picture

18 Oct 2010 - 7:34 pm | गणपा

मला फोटो दिसत नाहीयेत.

नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च वाचला म्हणायचा. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 7:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता कळलं का रे गणपाकाका, तू लोकांना कसा त्रास देतोस ते!

गणपा's picture

18 Oct 2010 - 7:52 pm | गणपा

माफ कर एकडाव पोरी.. आता कानाला खडा म्हटला ना.

नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च वाचला म्हणायचा.

इनोचं सगळं बिल तुझ्याकडे आणि स्वातीतैकडे पाठवून देणारच आहे गणपाभौ. तुमच्यामुळेच तर इनोचा साठा बाळगावा लागतो :P

मेघवेडा's picture

18 Oct 2010 - 8:01 pm | मेघवेडा

हे असले प्रकार आम्हाला कधी जमणारे नाहीत त्यामुळे अशा पाकृ टाकून जळफळाट पसरवू नये अशी समस्त ब्याचलर मंडळातर्फे विनंती!

पैसा's picture

18 Oct 2010 - 8:04 pm | पैसा

तुमच्यासाठीच काय माझ्यासारख्या आळश्यांसाठी पण आहेच आपले "हल्दीराम" नायतर "चितळे"

सद्दाम हुसैन's picture

18 Oct 2010 - 8:11 pm | सद्दाम हुसैन

उई उई उई ... गुलाबजाम आम्हाला आवडत नाही ... तो पाक बघुन घसा जाम होतो उई..

मिसळभोक्ता's picture

18 Oct 2010 - 10:54 pm | मिसळभोक्ता

फोटो पाहूनच इन्सुलिनचा डोस वाढवावा लागला.

फोटो पाहुन डायबेटीस आहे अशी स्वतःची समजुन करुन घेउन गप बसलो आहे.
स्वगत: च्यायला माझं सीरीयल कुठे गेलं?

नितिन थत्ते's picture

19 Oct 2010 - 7:56 am | नितिन थत्ते

सीरियल म्हणजे आम्ही ज्याला पोहे म्हणतो तेच का?
.
.
.
.
.
.
(मठ्ठ)

काय सह्ही दिसतायत गुलाबजामुन ! :)

सूर्य's picture

19 Oct 2010 - 2:07 pm | सूर्य

फोटो कसला खतरनाक (मस्त) आलाय.

तोंडाला पाणी सुटलेय.

- सूर्य

प्राजक्ता पवार's picture

19 Oct 2010 - 2:32 pm | प्राजक्ता पवार

सर्व प्रतिक्रीया देणार्‍यांना धन्यावाद :)

सविता००१'s picture

19 Oct 2010 - 3:19 pm | सविता००१

मस्त म्हणजे अगदि मस्तच झालेत. खल्लास