Skip to main content

शाही गुलाबजाम

लेखक प्राजक्ता पवार यांनी शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : खवा २५० ग्रॅम रवा २ चमचे दुध साखर २ वाट्या पाणी २ १/४ वाट्या पिस्ता व बदामाचे काप केशर वेलची पुड तेल / तुप कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा. नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी पिस्त्याचा काप ठेवा. मंद आचेवर तेलात अथवा तुपात हे गोळे तळुन घ्या. साखरेचा पाक करण्यासाठी , साखर व पाणी एकत्र करुन गरम करा. उकळी आल्यावर गॅस मंद करुन ५ - १० मिनिटे उकळु द्या. त्यात वेलचीची पुड व केशर घाला. गॅस बंद करा व तयार झालेल्या पाकात्तळलेले गुलाबजाम घालुन १० मिनिटे झाकुन ठेवा. बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवुन खायला द्या.

वाचने 14798
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

गुलाबजाम अगदी नेटके झालेले दिसताहेत! (मागे एकदा गुलाबजाम करुन पाकात घातले तर सकाळपर्यंत पाक पिऊन पिऊन त्यांचे 'गुलाबलाडू' तयार झाले होते असे आठवते! ;) ) (बन्सीमहाराज गुलाबजाम प्रेमी)गुलाबरंग

ज्यांना खवा आयता उपलब्ध नसेल त्यांनी काय करावं ह्याबद्दल मार्गदर्शन कराल काय? नाहीतर हे गुलाबजाम अगदी घसीटारामच्या पॅकबंद गुलाबजामांसारखेच दिसताहेत (गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे काप काय, कुठेही घालता येतात!!) औधत्याबद्दल क्षमस्व!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार .

खवा नसेल तर रिकोटा चिझ वापरले तर?बाकि गुलाबजाम मस्त एकदम्...आम्हि पाकामध्ये रोझ इसेंस घालतो...

In reply to by समई

पण रिकोटा चीझ घालून तशीच चव येत नाही ना!!! :)

खवा आणी आरारुट पाउडर वापरुनहि गुलाबजामुन करता येतात असे वाचलेले आठवत आहे...

.

In reply to by वेताळ

श्री वेताळजी, हा असा अभिप्राय आपल्याला का बरे द्यावासा वाटला? आपले त्यामागील रॅशनाल जाणून घेण्याची उत्कंठा आहे... कळावे...

पिडां साहेब तसे काही नाही हो.... वर चित्रात गुलाबजाम एकदम सुपर्ब झाले आहेत.मला एकदम तो फोटो जालावरुन साभार उचलला कि काय असे वाटले होते.पण फटु व त्यातील गुलाबजाम एकदम वरीजनल आहेत ही खात्री पटल्यावर निशब्द झालो. गोळे वळताना खुपच नाजुकपणे वळावे लागतात.त्यात फट न ठेवता गोळे करणे खरी कला आहे. वर गुलाबजाम त्या परिक्षेत १००% पास झाले आहेत.

In reply to by वेताळ

खरेच सुरेख गुलाबजाम आहेत!! पण म्हणतात ना मन वढाय वढाय, म्हणून विचारलं... :) राग नसावा...

जबरा.........! -दिलीप बिरुटे

ऐया...मी काल गुजाच विकत आणलेत दसर्यासाठी. मी नाहि करत उगाच फेकुन मारला तर टेंगुळ यायचा.

झालाच पायजे! बरं ते विरघळलेही नाहीत आणि फेकून मारायसारखेही झाले नाहीत म्हणजे खरंच ग्रेट!

तोंडाला पाणी सुटले. माझे गुलाबजाम नेहमी फसतात. :( माझ्या नवर्‍याने माझ्या प्रयोगांची एवढी धास्ती घेतलेय की आता नुसते 'गुलाबजाम करते' म्हटले की नवरा शिरा करायला घेतो.

In reply to by स्वाती२

काय सॉल्लिड आयडिया आहे ना? "करु, गुलाबजाम करु?" असं नुसतं विचारलं रे विचारलं की अर्ध्या तासात गरमागरम शिरा तय्यार!! ;) (खुद के साथ बातां : आमच्या सौंनी अजून ही ट्रिक वाचलेली दिसत नाही! ;) बिका, लगेच जाऊन काड्या लावू नका! ) (शिराप्रेमी)रंगा

गुलाबजाम उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय!

मला आताच्या आत्ता गुलाबजी! कणाकणानी वजन कमी करते आहे आणि ही असा सूड उगवते आहे?..... प्राजु???????? तुप मेतकूट भात का बदला गुलाबजी से? आम्ही रुशलोच मुली!

In reply to by स्पंदना

भेग नसलेल्या गुलाबजामबद्दल बरेच लोक बोलत आहेत. मी भेगा पडलेले गुलाबजाम आजतागायत बघितले नाहीत. :O पिडाकाका. ५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे आणि नंतर पाणी आटवून खवा भाजून घ्यावा. (हे खमंगपणा आणि रंगासाठी). :) भाजला नाही तर गुलाबजाम गिट्ससारखेच लागतील. दूध आटवून अर्थातच करता येईल. पण या पद्धतीने वेळ वराच वाचेल. वरील आयड्या स्वतःच्या जवाबदारीवर करून पहाणे. नंतर तक्रार चालणार नाही. :D जमले तर मग इथे कळवा. सगळ्या हिरव्यांना उपयोगी पडेल.

In reply to by नितिन थत्ते

५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे
कोणतं क्रीम, सनस्क्रीन का नाईट क्रीम? अवांतरः गुलाबजाम खल्लास झाले आहेत.

In reply to by गणपा

कधी बोलावतो आहेस तुझ्याकडे गुलाबजाम खायला? मी आणि गुलाबजाम बनवणार?? अ श क्य! हल्दीराम वगैरे लोकांचा व्यवसाय बसवण्यात मला काहीही विंट्रेश्ट नाही!!

प्राजक्ता मस्त रेसिपी दिलीस. मला हविच होती खव्याच्या गुलाबजामची रेसिपी. माझी आई आधी बनवायची. तिला विचारणारच होते. खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार . फक्त ४५ मिनीटांत होउ शकेल खवा तयार ? त्यात काही टाकायच नाही का ?

मला फोटो दिसत नाहीयेत. वर सगळ्यांनी इतकी स्तुती केली आहे की फोटो तरी पहायला मिळायला हवे होते.. :( प्राजक्ता, तुम्ही कुठे असता हो? पुण्यात असला तर मी गुलाबजाम खायलाच येईन तेह्वाच पाहीन कसे दिसतात ते. :)

In reply to by गणपा

नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च वाचला म्हणायचा.
इनोचं सगळं बिल तुझ्याकडे आणि स्वातीतैकडे पाठवून देणारच आहे गणपाभौ. तुमच्यामुळेच तर इनोचा साठा बाळगावा लागतो :P

हे असले प्रकार आम्हाला कधी जमणारे नाहीत त्यामुळे अशा पाकृ टाकून जळफळाट पसरवू नये अशी समस्त ब्याचलर मंडळातर्फे विनंती!

फोटो पाहूनच इन्सुलिनचा डोस वाढवावा लागला.

फोटो कसला खतरनाक (मस्त) आलाय. तोंडाला पाणी सुटलेय. - सूर्य

सर्व प्रतिक्रीया देणार्‍यांना धन्यावाद :)

मस्त म्हणजे अगदि मस्तच झालेत. खल्लास