मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाही गुलाबजाम

प्राजक्ता पवार · · पाककृती
साहीत्य : खवा २५० ग्रॅम रवा २ चमचे दुध साखर २ वाट्या पाणी २ १/४ वाट्या पिस्ता व बदामाचे काप केशर वेलची पुड तेल / तुप कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा. नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी पिस्त्याचा काप ठेवा. मंद आचेवर तेलात अथवा तुपात हे गोळे तळुन घ्या. साखरेचा पाक करण्यासाठी , साखर व पाणी एकत्र करुन गरम करा. उकळी आल्यावर गॅस मंद करुन ५ - १० मिनिटे उकळु द्या. त्यात वेलचीची पुड व केशर घाला. गॅस बंद करा व तयार झालेल्या पाकात्तळलेले गुलाबजाम घालुन १० मिनिटे झाकुन ठेवा. बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवुन खायला द्या. Image removed.

वाचन 14793 प्रतिक्रिया 0