शाहीन..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Sep 2010 - 10:23 pm

"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.

दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता. मला म्हणाला, " तात्यासाब बैठो व्हीआयपी रूम मे. क्वार्टरवार्टर पियो.. बाद मे बात करेंगे.."

'चला, फुकट क्वार्टर तर मिळाली!' असं म्हणून मी व्ही आय पी रूममध्ये बसलो आणि ब्लॅकलेबलची ऑर्डर दिली. 'चमचम करता..' हे गाणं मोठ्यानं सुरू होतं. माझ्या आजुबाजूला मुलुंड आणि आसपासच्या परिसरातले अमिरजादे गुज्जूभाई बसले होते.. समोर तरण्याताठ्या खुबसुरत पोरी थिरकत होत्या..

माझ्या शेजारीच एक गुज्जू आपल्या पुढ्यात साधारण ५० ते ६० हजार रुपये घेऊन बसला होता. २० च्या, ५० च्या, १०० च्या को-या करकरीत नोटा. उडवत होता भोसडीचा बेभान होऊन समोर नाचत असलेल्या एका पोरीवर. माझा जीव जळत होता.. साला, आयुर्विमा दलालीच्या आशेनं तिथं मी गेलेला.. मुलखाचा गरीब..!

त्याच्यासमोर नाचणारी मुलगी मात्र खरंच कुणीही पागल व्हावं अशी होती.. झक्कास ठुमकत होती..

जरा वेळानं मला शेट्टीनं बोलावणं पाठवलं व मी उठून त्याच्या कॅबिन मध्ये गेलो. आम्ही कामाचं बोललो. शेट्टीनं आता खायला मागवलं आणि एका वेटरला म्हणाला, "शाहीन को अंदर भेजो..":

ती मगासची त्या आमिरजाद्या म्होरं नाचणारी छोकरी आत आली. क्लासच दिसत होती.

" तात्यासाब, ये शाहीन है"

"हम्म. तुम्हारा नंबर दो एकदुसरे को. तात्यासाब, ये लडकी का इन्शुरस्न वगैरा करवा दो. मुझे पुछ रही थी. तुम जब टाईम मिले तो तात्यासाबको फोन करना. चलो भागो.." शेट्टीनं तिला पिटाळली..

'चला, बरं झालं. अजून काही विम्याचा धंदा मिळाला तर बरंच..' असं म्हणून मीही तेथून सटकलो.

दोनचार दिवसातच माझा फोन वाजला. शाहीनचा फोन होता. ती ठाण्याच्या घोडबंदर रोडला राहते. जवळच्याच एका हाटेलात चा पिण्याकरता आणि विम्याचं बोलण्याकरता मी शाहीनला भेटायला गेलो..

आम्ही भेटलो. चा सँडविच वगैरे मागवलं. साला बया दिसायला लै भारी होती, आव्हानात्मक होती.

चा पिता पिता मी तिला विम्याबद्दल माहिती दिली. सारा तपशील सांगितला. ती तिचा आणि तिच्या बहिणींचा विमा घ्यायला तैय्यार झाली. मी पुढच्या फॉर्म वगैरे भरण्याच्या कारवाईला लागलो..लौकरच ती माझी अशील बनली..

त्यानंतर थोडाबहुत टाईम गेला असेल.. माझा फोन वाजला. शाहीनचा होता..पुढे पिक्चरमध्ये वगैरे घडतं तसं घडणार होतं याची मला कल्पना नव्हती..

"तात्यासेठ, एल आय सी के बारेमे कुछ बात करनी है.. शाम को मिलोगे? आज मेरी छुट्टी है..फलाना जगह रुकना.. मै मिलने आउंगी.."

मी ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी तिची वाट पाहात उभा राहिलो.. थोड्याच वेळात एक होन्डा सिटी गाडी माझ्या पुढ्यात थांबली.. मागचं दार उघडलं गेलं.. आत श्वेतवस्त्र परिधान केलेली, केवळ सुरेख दिसणारी शाहीन बसली होती. मी गाडीत दाखल झालो.. "ड्रायवर, चलो, वरली..!" शाहीननं हुकूम सोडला..

साला डान्सबार मध्ये नाचणारी शाहीन ब-यापैकी मालदार होती..

"वरली सीफेस चलेंगे. खानावाना खाएंगे..!" शाहीनंच ठरवलं सगळं..

साला, मी मुलखाचा भिकारचोट.. मुंबैचा बाजार फिरलेला. माझी कशाला ना असणारे? :)

हायवेवरून मुलुंड गेलं असेल नसेल, शाहीन मला खेटली. मी समजलो, पोरगी डेंजर वाटते..!

थोड्याच वेळात शाहीन साता जन्माची ओळख असल्यासारखी गप्पा मारू लागली. ती चालू वगैरे आहे हा माझा गैरसमज हळूहळू दूर होत होता.. हां, पण चालू नसली तरी बिनधास्त मात्र होती.. फ्री होती. आता चालू आणि बिन्धास्त या शब्दातली सीमारेषा संपादकांनी शोधावी! ;)

ती मूळची दिल्लीची.. कनाट प्लेसमधल्या शाळेत काही बुकं शिकलेली. उफराटं रूप.. आली पैका कमवायला मुंबैला.. त्या सुमारास मुंबैत डान्सबार जोरात सुरू होते. शाहीन लौकरच मुंबैचे तोरतरीके शिकली. आयटम बनली.. साला, मोप पैका उडू लागला तिच्यावर.. पोरीचे पाय मुंबैच्या चारआठ बार मध्ये थिरकले आणि पैका जमला. घोडबंदर रोडला तिनं फ्लॅट घेतला, आणि आपल्या आजारी व बेकार असलेल्या वडिलांना, आईला व दोन धाकट्या बहिणींना मुंबैला घेऊन आली.. चार जणांची पोशिंदी बनली..!

पुढे ती व मी खूप वेळा भेटलो.. मस्त आहे ती.. अगदी बोलघेवडी.. पण मनानं खूप चांगली..

असाच एकदा तिच्यासोबत वरळी सीफेसवर बसलो होतो. शाहीन तेवढी मूडात नव्हती..

'उस की मा का..!"

शाहीनच्या तोंडात शिवी उमटली.. अहमदाबादचा एक कुणी गुज्जू.. गेले काही दिस मोप पैका उडवत होता तिच्यावर.. आणि दोनच दिसांपूर्वी त्यानं साहजिकच तिला 'बाहर आती है क्या रुममे?" असं विचारलं होतं..

"मग काय चुकलं त्याचं? तुझ्यावर साला तो पैसे उडवतो.. तुला भोगायला मिळावं म्हणूनच ना?" मी.

"तो मत उडाए पैसा.. ! मुझे नही जाना है उसके साथ..! साला टिचकी वाजवून मला म्हणतो..'चल किसी होटल के रूम मे.. २५००० फेकुंगा..! भिकारी साला, २५००० मे मुझे खरीदने चला..!"

"मग काय तुला २५ लाख हवेत?"

आणि एकदम शाहीनच्या चेह-यावर खुलं हसू उमटलं.. "जानू, तू चल ना मेरे साथ.. चल, तेरेको फोकोटमे..!" सुरेखसा डोळा मारला तिनं...! :)

आपण साला क्लीन बोल्ड..! मी तिचा 'जानू..' केव्हा झालो?! ;)

मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!

एके दिवशी शाहीनच्या घरी एक विमापावती देण्याकरता गेलो होतो.. पत्ता होता माझ्याकडे. प्रथमच तिच्या घरी जात होतो..

स्वच्छ, टापटीप आवरलेलं घर.. शाहीनच्या आईनं कोण कुठले विचारलं.. आतल्या खोलीतून शाहीन बाहेर आले.. माझं मनमोकळं स्वागत केलं.. बसा म्हटलं..

"तात्यासाब, अंदर आईये..इधरही बात करते है.."

मी आत गेलो आणि जे दृष्य पाहिलं ते पाहून मला भरून आलं खूप..

आपल्या पक्षाघाती अपंग बापाला शाहीन कसलंसं खिमट भरवत होती.. ते भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होती. मध्येच त्याच्या तोंडातून खिमट बाहेर येत होतं ते पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होती..म्हात-याच्या चेह-यावर फक्त कृतज्ञता होती पोरीबद्दल..!

मी ते दृष्य पाहात होतो.. भारावला गेलो होतो.. भक्तिमार्गाचा एक नमुना पाहात होतो..!

आणि शाहीनच्या एका अवखळ प्रश्नाने माझी समाधी भंग पावली..

"क्यो तात्यासाब, जमाईराजा बनोगे इस बुढ्ढेके?!" :)

शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

2 Sep 2010 - 10:53 pm | शिल्पा ब

आवडलं लेखन...काहीतरी करून आपली अन कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावे लागते लोकांना.

प्रीत-मोहर's picture

2 Sep 2010 - 11:00 pm | प्रीत-मोहर

असेच म्हण्ते.............

इंटरनेटस्नेही's picture

3 Sep 2010 - 2:41 am | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो. बिच्चारी शाहिन. :(

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 2:12 am | आमोद शिंदे

पोटाची खळगी भरणे म्हणजे एयर कंडीशन्ड होंडा सिटी गाडीतून फिरणे काय हो शिल्पा ताई?

तुम्हाला फक्त गाडीच दिसली का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Sep 2010 - 7:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

(ही गाडी तिच्या मालकीची होती, बारच्या नाही असे गृहीत धरून) काय चुकले त्यांचे? गाडी दिसणारच हो. होंडा सिटी (ती ही चालकासकट) ही माझ्यालेखी तरी चैनीची वस्तू आहे. जीवनावश्यक नाही.

नाईलाज म्हणून हा धंदा करावा लागला तर एका मर्यादेपर्यंत पैसे कमावून झाले की बाहेर पडावे. पूर्वेतिहास सांगितला तर बाहेर काम सहज नाही मिळणार कदाचित, पण मिळणारच नाही असे नाही. खोटा अनुभव पण दाखवता येतो. Contacts असतील तर references पण दाखवता येतात खोटे. होंडा सिटी ची मुंबईतील किंमत साधारण ९ लाखाच्या घरात जात असेल (चुभूद्याघ्या). जिला हे परवडू शकते ती त्या पैशात एखादा व्यवसाय पण करू शकते, करायचा असेल तर.

पैसा's picture

4 Sep 2010 - 9:07 am | पैसा

माझंही असंच मत आहे. बाकी काय लिहावे याबद्दल प्रत्येकाला (लेखकालासुद्धा)स्वातंत्र्य आहेच.

शिल्पा ब's picture

4 Sep 2010 - 4:33 am | शिल्पा ब

द्विरुक्ती झाल्यामुळे स्वसंपादित.

गोगोल's picture

2 Sep 2010 - 10:55 pm | गोगोल

>> तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली

मानल तुमच्या ऑनेस्टीला. इतक खुलेआम बिनधास्त सांगणे!!
शाहीन बाकी सुरेखच

घरी घरवाली नसल्याने जामतीये एवढी ओनेष्टी..
;)

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 2:15 am | आमोद शिंदे

>>शाहीन बाकी सुरेखच

होहो..थोडी लठ्ठ वाटत आहे पण चलता है!

मृत्युन्जय's picture

2 Sep 2010 - 11:03 pm | मृत्युन्जय

तात्या लेखन चांगले करता तुम्ही. नेहेमीच. पण या लेखातला शाहीनचा फोटो खटकला. गोड आजे पोरगी. हा लेख तिच्या चेहेर्‍यामुळे लक्षात राहील. तुमच्या लेखणीमुळे नाही. मग काय उपयोग?

बाकी लोकांनी फोटोवरुन काही अचकट विचकट प्रतिसाद नाही दिले म्हणजे झाले

बेसनलाडू's picture

2 Sep 2010 - 11:09 pm | बेसनलाडू

व्यक्तीचित्र नेहमीसारखेच ओघवते आहे. विशेषतः रंगरूप आणि स्वभावाबद्दलचा explicit फाफटपसारा न लावता संभाषणातूनच व्यक्ती जमेल तितकी ओळखता यावी, यामागचा लेखनप्रयत्न स्तुत्य आहे.
(चिकित्सक)बेसनलाडू
मात्र डान्सबार किंवा लेखात म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या बाजारातील बव्हंशी मुलीबाळींचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असावेत, असे वाटते. त्यामुळे असे एखादे व्यक्तीचित्र वाचायला मिळाल्यावर, त्यात वेगळे ते काय हे हुडकायचे प्रयत्न करावे लागतात.
(शोधक)बेसनलाडू

सुनील's picture

2 Sep 2010 - 11:11 pm | सुनील

हम्म!

मस्त कलंदर's picture

2 Sep 2010 - 11:12 pm | मस्त कलंदर

तात्या बाकी व्यक्तिचित्रे सुरेखच लिहितात.
मृत्यूंजयच्या मुद्याशी सहमत. यापूर्वी रोशनीच्या मुलीच्या धाग्यात फोटोवरून हीच चर्चा झाल्याचे आठवतेय.
http://www.misalpav.com/node/8411#comment-129862
तिथल्या एका प्रतिसादातली श्रामोंची काही वाक्ये मलाही पटली म्हणून जशीच्या तशी इथे देतेयः

माझा मुद्दा वेगळा आहे - अशी छायाचित्रे टाकावीत का? या मंडळींच्या या ओळखी अशा व्यक्त कराव्यात का? तुमच्या याच लेखात मिपाच्या एका सदस्याचा उल्लेख आहे. त्याची प्रायव्हसी आपण जपतो, त्याचा तो अधिकार आहे. तसाच अधिकार याही मुलीचा आहे असे माझे मत आहे. मुलीचाच नव्हे केवळ, तिची आई, आजी, मावशी, आत्या... कोणीही असो, त्यांचाही आहे. त्या दृष्टीने मला ते छायाचित्र केवळ अवांतर वाटते. मी म्हटले तसे, त्याने लेखनात ना भर पडते, ना ते नसल्याने खोट येते. त्यांची एक विशिष्ट परिस्थिती आहे. आणि म्हणून तर त्यांची प्रायव्हसी अधिक महत्त्वाची मानली पाहिजे आपण. लेखनाची संवेदनशीलताच हरपते असे छायाचित्र आल्यानं.

श्रावण मोडक's picture

3 Sep 2010 - 12:15 am | श्रावण मोडक

लेख वाचला. त्यात,

शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!

हे वाचलं. त्यावर प्रामाणिकपणाचे प्रशस्तीपत्र लेखकाला मिळाल्याचे पाहून ऊर भरून आला.

काहीतरी करून आपली अन कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावे लागते लोकांना.

हेही वाचलं. किती समर्पक प्रतिक्रिया असं वाटलंच. यापुढे 'असेही' लेखक मराठीत येणार आहेत हे समजलं. त्याच क्षणी लेखाच्या शेवटाला असलेल्या,

शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!

या ओळींनं एक चिमटा काढला.
यापुढे हृदयद्रावकता वगैरे इथं उतू जाऊ लागेल हे कळून चुकलं. "वा, वा" - "छान, छान" !!!
पूर्वीच्या एका धाग्याची, त्यावर झालेल्या दंग्याची (जो आता तिथं नाही) आठवण झाली.

अनामिक's picture

2 Sep 2010 - 11:36 pm | अनामिक

लागा चुनरी मे दाग?

भीडस्त's picture

2 Sep 2010 - 11:39 pm | भीडस्त

तात्या,
हे ही नेहमीप्रमाणेच
शुभ्र काही जीवघेणे
असा सल काळजात मागे ठेवून जाणारे.

हर्षद आनंदी's picture

2 Sep 2010 - 11:42 pm | हर्षद आनंदी

तात्या,
अजुन एक षटकार, अप्रतिम व्यक्तिचित्रण!

एकदम भरात येऊन लेखन चालु आहे.
लवकर बॅकलॉग बभरुन काढा.

Pain's picture

3 Sep 2010 - 1:46 am | Pain

disgusting, cheap but honest.

१) हिच्या कथेत आणि आधी वाचलेल्या ( तुमच्या किंवा इतरत्र) कथांमधे काहीच फरक नाही. तेच ते. मग पुन्हा नवीन लेख कशाला? लेख म्हणजे आय-कार्ड नव्हे की प्रत्येकाला एक-एक दिले.

२) तुम्ही या लोकांच्या भागातील हॉटेलमधे काम करत किंवा पॉलिसी वगैरे व्यवसाय होता/ आहात/ कराल याला आक्षेप नाही. पण अशा स्त्रियांची कुठलीही सेवा विकत/ फुकट आपल्या सारखे सभ्य घरातले लोक घेत नाहीत. तुम्ही हे करायला नको होते.

३) तिच्या आसपास वावरणार्‍या लोकांमधे तुम्ही केव्हाही वरचढ ठरणार. त्यामुळे ती तुमच्यावर फिदा झाली तर त्यात नवल काय? पण तुम्ही संयम बाळगायला हवा होता.
जर तिची जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही आणि तुमच्याच एका गोष्टीतील त्या "ठोक्या"मधे फक्त quantity चा फरक पडतो, quality (वृत्तीचा) नाही - त्याने तिचा खूप गैरफायदा घेतला आणि तुम्ही थोडासा.
मग तो पैसे देउन बोलावणारा शेठ काय वाईट आहे?

४) तुम्ही जर या पातळीवर किंवा पुढे गेलेले असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मग विसोबा खेचरांसारख्या संतांच्या आयडीने लिहू नका. ऐतिहासिक थोर व्यक्तींच्या नावाचे आयडी घेउ नयेत आणि घेतलेच तर किमान त्यांचा मान तरी राखावा.

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 10:42 am | विसोबा खेचर

मग पुन्हा नवीन लेख कशाला?

मला वाटतं तो माझा प्रश्न आहे.

पण अशा स्त्रियांची कुठलीही सेवा विकत/ फुकट आपल्या सारखे सभ्य घरातले लोक घेत नाहीत.

मी त्या स्त्रियांच्या वतीने त्यांची कुठलीही सेवा कुणाला ऑफर केली आहे असं मला लेखावरून वाटत नाही.. :)

पण तुम्ही संयम बाळगायला हवा होता.

बंद काळ्या काचा असलेल्या वातानुकुल गाडीत मला नाही बाळगता आला संयम..!

जर तिची जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही आणि तुमच्याच एका गोष्टीतील त्या "ठोक्या"मधे फक्त quantity चा फरक पडतो, quality (वृत्तीचा) नाही - त्याने तिचा खूप गैरफायदा घेतला आणि तुम्ही थोडासा.

मे बी..!

मग तो पैसे देउन बोलावणारा शेठ काय वाईट आहे?

मी त्या शेठला वाईट म्हटलेलंच नाही.. शाहीनच्या मते तो वाईट आहे!

पण मग विसोबा खेचरांसारख्या संतांच्या आयडीने लिहू नका. ऐतिहासिक थोर व्यक्तींच्या नावाचे आयडी घेउ नयेत आणि घेतलेच तर किमान त्यांचा मान तरी राखावा.

या सूचनेबद्दल आणि प्रतिसादाबदल आभार..

तात्या.

मी त्या स्त्रियांच्या वतीने त्यांची कुठलीही सेवा कुणाला ऑफर केली आहे असं मला लेखावरून वाटत नाही..

कुणाला ऑफर केलीत असे मी म्हटले नाही, तुम्ही घेतलीत असे म्हणालो आणि त्याला माझा आक्षेप आहे.
तुम्ही तुमच्या प्रेयसी अथवा बायकोसोबत काहीही करा, पण या स्त्रियांच्या संदर्भात ही गोष्ट पैशाच्या मोबदल्यात पुरवली जाणारी सेवा आहे. सभ्य लोकांनी ती विकत (इतर ग्राहकांसारखी) किंवा फुकट (vulnerabilty चा गैरफायदा घेउन किंवा इतर काही मार्गाने) घेणे अयोग्य आहे.

इथे काहींचा फोटो डकवण्यास आक्षेप आहे पण तिनेच परवानगी दिल्यावर प्रश्न मिटतो.
चुम्माचाटी हा शब्दही काहींना खटकला. शब्दप्रयोग किंवा दृष्टीकोन बदलून वस्तुस्थिती बदलत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Sep 2010 - 4:11 am | विश्वनाथ मेहेंदळे

पेन साहेब, एक शंका आहे. प्रेयसीचे (किंवा मैत्रिणीचे म्हणू) चुंबन घेतलेले चालते तर या प्रसंगात केवळ ती मैत्रीण बारबाला आहे म्हणून ते अनैतिक कसे ठरते? खालील काल्पनिक प्रसंग बघूया. (आमच्या आयुष्यात असले प्रसंग काल्पनिकच असायचे)

"माझी एक मैत्रीण आहे, शिक्षणाने MBA, एका बहुराष्ट्रीय कंपनीत HR आहे. तिच्या गाडीत बसून मी आणि तिने कित्येकदा चुम्माचाटी केली आहे. आमचे एकमेकांशी लग्न होणार नव्हते पण शारीरिक आकर्षण होते म्हणून"

आता हे योग्य कि अयोग्य? ह्याला अयोग्य म्हणतीलही कुणी. पण असे प्रकार हल्ली सर्रास होतात. शहरातच नव्हेत तर गावातही. खरे सांगायचे तर गाववाले शहरापेक्षा खूप पुढे आहेत काहीकाही बाबतीत. यावर वेगळा धागा होईल, त्यामुळे पुढे चर्चा करायची झाली तर वेगळ्या ठिकाणी करू, इथे नको.

कवितानागेश's picture

4 Sep 2010 - 12:03 am | कवितानागेश

'पेन' यंच्याशी १००% सहमत.
तो शेवटचा प्रश्न मला 'अवखळ' वाटला नाही!
त्याचे उत्तर लिहिले नाहिये..............

सुरुवात तुमच्या टिपिकल स्टाईलने झाली आहे ती पकड घेणारी आहे, नंतर एकेक पायरी चढत जाईल असे वाटतानाच एकदम पायरी सटकली! अनुभवांचे प्रामाणिक वर्णन आणि बटबटीत वर्णन ह्यातली सीमारेषा सांभाळता आली नाही असे जाणवले.
(बाकी फोटो नसावा ह्या श्रामो आणि मस्तकलंदर ह्यांच्या मताशी सहमत आहे.)
पुलेशु.

चतुरंग

माझीही शॅम्पेन's picture

2 Sep 2010 - 11:58 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह सुभां अल्ला !

एकदम जबरा तात्या (तेंडुलकर) अजुन एक षटकार :)

फिर भी ऐसा लगा के शाहीन इस नाम को चेहरा देनेकी जरूरत नही थी !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Sep 2010 - 1:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली

हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले. कृती (किंवा Object ) तीच असली तरी शब्द बदलले तर वाचून येणारी अनुभूती बदलू शकते. इथे एकाहून एक दिग्गज असल्याने उदाहरण द्यायच्या भानगडीत न पडता इतकेच म्हणेन की या वाक्यामुळे जेवताना अन्नात खडा आल्यासारखे वाटले.

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 10:45 am | विसोबा खेचर

हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले.

मला ऐनवेळेला अन्य शब्द सुचला नाही.. प्रतिसादाबद्दल आभार..

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले. कृती (किंवा Object ) तीच असली तरी शब्द बदलले तर वाचून येणारी अनुभूती बदलू शकते. इथे एकाहून एक दिग्गज असल्याने उदाहरण द्यायच्या भानगडीत न पडता इतकेच म्हणेन की या वाक्यामुळे जेवताना अन्नात खडा आल्यासारखे वाटले.

लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्‍यात फरक काय उरला ?

तात्या हे व्यक्ती चित्र देखील सुंदर उतरले आहे. मुख्य म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा जुन्या ढंगात मिपावर वावरायला लागल आहात हे बघुन आनंद झाला.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 11:46 am | अवलिया

खरे आहे.

छोटा डॉन's picture

3 Sep 2010 - 11:54 am | छोटा डॉन

लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्‍यात फरक काय उरला ?

+१, हेच म्हणतो.
कुठल्याही प्रकारचे लेखन हे केवळ स्वतःच्या नजरेतुन केलेले असावे, वाचकांना काय आवडेल किंवा काय नाही आवडेल ह्याचा विचार करुन येणार्‍या प्रतिक्रियांची चिंता करत बसल्यास लेखन करणे अशक्य होईल व तसे लेखन हे 'प्रामाणिकपणा'शी प्रतारणा होईल.
तात्यांनी जे काही लिहले आहे ते त्यांच्या फ्रेममध्ये आहे व त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहले आहे.

वाचकांचे काम एवढेच आहे की वाचणे आणि आवडले / न आवडले ते कळवणे, अर्थात तशी इच्छा असेल तर.
बाकी अनुभूती वगैरे बाबी लेखकाकडेच सोडल्या तर बरे होईल.

बाकी टिपीकल तात्यास्टाईल असलेले हे व्यक्तिचित्र मस्त उतरले आहे असे म्हणतो, आम्ही फक्त व्यक्तिचित्र वाचले व त्यात काय लिहावे हा लेखकाचा अधिकार मान्य करुन जे काही लिहले आहे ते एकंदरीत 'जमले आहे' असे म्हणतो, बाकी इतर बाबींवर नो कमेंट्स ...

- छोटा डॉन

मेघवेडा's picture

3 Sep 2010 - 1:27 pm | मेघवेडा

अगदी बरोबर. मस्त झालाय लेख तात्या!

धनंजय's picture

3 Sep 2010 - 9:05 pm | धनंजय

चाकोरीबाहेरचे व्यक्तिचित्र आणि अनुभव साक्षीत्वाने विना-नाटकीपणाने वाचकापर्यंत पोचवणे म्हणजे महा कठिण काम. (ते श्रामो वगैरे जाणोत.)

(माझ्या ओळखीचे स्ट्रिपर वगैरे आहेत. पण नीरगाठ-उकल करत त्यांचा माणूसपणा दाखवायला जमणार नाही. सुरुवातीपासूनच त्यांच्याशी अनुभव सामान्य माणूसपणाचा येतो. म्हणून अशा रीतीने शेवटी माणूसकी दाखवणारे कथानक थोडेसे कृत्रिम वाटते.)

चाकोरीबाहेरचे आणखी अनुभव आणि व्यक्तिचित्रे येऊ देत.

नेत्रेश's picture

3 Sep 2010 - 4:38 am | नेत्रेश

तात्या,
बरेच दिवसांनी तुमचे लेख मी पा वर दिसु लागले आहेत. अजुन येउद्यात.

ऋषिकेश's picture

3 Sep 2010 - 10:09 am | ऋषिकेश

तुमच्या जुन्या काही व्यक्तीचित्रांसारखेच!
फोटो नको याबाबतीत सहमत

मदनबाण's picture

3 Sep 2010 - 10:58 am | मदनबाण

लाडूरावांशी सहमत...
बाकी चुम्माचाटी वगरै वाचुन णारोबा ने केलेले विसोबा खेचर या आयडीचे विडंबन आठवले. ते होते :--- किसोबा टेकर.

निवेदिता's picture

3 Sep 2010 - 11:12 am | निवेदिता

तात्या शाहीन भावली

पण फोटो टाकायला नको होता

शिल्पा ब's picture

3 Sep 2010 - 11:16 am | शिल्पा ब

काय फोटोच चाललंय?
तिने टाकायला परवानगी दिली यांनी टाकला...तुम्हाला बघायचा तर बघा नाहीतर पुढे चला..(.आणि अश्लिल वगैरे नाही फोटो..)

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 11:22 am | विसोबा खेचर

काय फोटोच चाललंय?
तिने टाकायला परवानगी दिली यांनी टाकला...

धन्यवाद शिल्पाजी..

तिची परवानगी होती म्हणूनच फोटो टाकला. नायतर नक्कीच टाकला नसता..

असो..

तात्या.

मस्त कलंदर's picture

3 Sep 2010 - 12:25 pm | मस्त कलंदर

हे बघ, इथे तिचे नांव, ती जिथे काम करते त्या बारचे नांव, राहत्या जागेचा पत्ता असं सगळं सगळं आलंच. आता जर ही बाई कुठे बाहेर गेली, तर प्रत्येकवेळेस तिला याच ओळखीने ओळखलं जावं असे वाटणार नाहीच. तेव्हा इथल्या वाचकांनी(सदस्य्+पाहुण्या) असेच म्हणून तिला ओळखले तर??

इथे पांढरपेशातले लोक देखील जालावर आपली ओळख कळू नये म्हणून इतका आटापिटा करतात.. अशावेळी तिचा फोटो इथे कशाला?? आणि तो दिला नाही म्हणून व्यक्तिचित्रात काहीच उणीव नाही येत.

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 12:34 pm | विसोबा खेचर

त्यातून जमलंच तर आज दुपारी फोन करून तिला पुन्हा एकदा विचारून तिची पुन:परवानगी घेईन..

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2010 - 2:15 pm | प्रकाश घाटपांडे

तेव्हा इथल्या वाचकांनी(सदस्य्+पाहुण्या) असेच म्हणून तिला ओळखले तर??

आयडेंटीटी च भय तिला नसावं.कारण तस असतं तर आपल आयुष्य ओपन कार्ड आहे असे ती म्हणाली नसती.ते काही असले तरी आपल्या पांढरपेशा मनाला ते खटकतं एवढमात्र खरं!

"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.

म्हणजे परवानगी आहे असे गृहीत धरले आहे. समजा परवानगी नसती आणी तरी तात्याने लिहिल असत तर हा मुद्दा वादग्रस्त झाला असता. ( म्हणजे मतमतांतरे झाली असती)
बाकी चेहरे व बुरखे ( किंवा मुखवटे) या विषयी स्वगत मधे थोडेसे लिहिले आहेच.

वेताळ's picture

3 Sep 2010 - 11:42 am | वेताळ

एकदम झक्कास आणि बिनधास्त.....आपल्याला आवडले.
गाडीत काय केले ते कुणाला अश्लिल वाटले असेल तर ती व्यक्ती खोटे बोलते असे समजावे. अशा परिस्थितीत कोणी भजन किंवा मनाचे श्लोक म्हणणार नाही हे निश्चित आहे. बाकी शाहिन शाहिनच आहे. दिलखल्लास

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2010 - 12:02 pm | प्रकाश घाटपांडे

शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..

!
वाचायला नक्की आवडेल.
बाकी व्यक्तिचित्र अगदी तात्या ष्टाईल!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 12:04 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या स्टाईल मधे नेहेमीप्रमाणे रांडेवरती अजून एक लेख.

समीरसूर's picture

3 Sep 2010 - 1:56 pm | समीरसूर

तात्या,

झकास जमून आलाय लेख. आणि तुमच्या बिनधास्त सगळं कबूल करण्याच्या हिमतीला सलाम!

अशा परिस्थितीत स्वतःला आवरू कसं शकता तुम्ही? मोह भल्या-भल्यांची विकेट उडवतो. आणि 'असा' नशा आणणारा मोह टाळणं सोपं नव्हे. धन्य आहात तुम्ही!

च्यायला, आमच्या व्यवसायात आम्हाला गेटवरचे सिक्युरिटी गार्ड गुरकावून एंट्री करायला लावतात किंवा मॅनेजर संगणकात डो़कं घालून मेंदूचा भुगा करायला लावतात. (मी सॉफ्टवेअर इंजिनीअर नाही; सीनीयर काँटेंट लीड आहे; म्हणजे टेक्निकल रायटर; चांगल्या संधी असतील तर कृपया सांगा. ;-) टेक्नीकल रायटिंग मध्ये बरं का....)

बाकी तुम्ही जे लिहिलं आहे ते सगळ्यांच्याच मनात असतं; ते उघड सांगण्याचं डेअरिंग मात्र खूप थोड्या लोकांमध्ये असतं.

--समीर

यशोधरा's picture

3 Sep 2010 - 2:50 pm | यशोधरा

लेख वाचला.

लेखकाकडे लेखविषयासाठी अनुरुप वाटेल अशी आणि छोट्या छोट्या गोष्टी खुलवून सांगण्याची भाषाशैली आहे, त्यामुळे लेखन चांगले जमते. एक तो 'चुम्माचाटी' शब्द सोडल्यास मला लेखन आवडले. अर्थात, दुदैवाने शाहीनच्या आयुष्याचे तेच वास्तव आहे, आणि घाटपांडे म्हणतात तसे, माझ्या पांढरपेशा मनाला तो शब्द पेलण्याची ताकद नाही.

पुढे जाऊन असेही वाटते, की स्वतः शाहीनला स्वतःचा फोटो मिपावर असण्याची व त्या ओळखीची लाज (तिला स्वतःला) वाटण्यापेक्षा, शाहीन जर कधी समोर आली तर माझ्यासारखी पांढरपेशी व्यक्तीच अधिक गडबडून जाईल की काय? शाहीनला स्वतःची लाज वाटण्यापेक्षा आमच्या मधयमवर्गीय मानसिकतेलाच तिची अधिक लाज वाटते आहे का? उदा: - समजा कोणी विचारले, की "तू त्या शाहीनचा फोटो असलेल्या संसथळावर असतेस का?" आली का पंचाईत! तर हे असेही असू शकते. म्हणजे खरं तर कुठेतरी मला माझीही मानसिकता कदाचित बदलावी लागेल का?

फोटोबाबत घाटपांड्यांशी सहमत.

शेवटचं म्हणजे प्रतिक्रियांमधली "पिंप" ही प्रतिक्रिया अतिशय अस्थानी वाटली व खटकली. संपादक मंडळाने असली प्रतिक्रिया कशी काय तशीच ठेवली? दुसर्‍या कोणी मिपावर इतरत्र अश्या प्रतिक्रिया दिल्य तर त्या तशाच ठेवणार का?

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 3:06 pm | परिकथेतील राजकुमार

पुढे जाऊन असेही वाटते, की स्वतः शाहीनला स्वतःचा फोटो मिपावर असण्याची व त्या ओळखीची लाज (तिला स्वतःला) वाटण्यापेक्षा, शाहीन जर कधी समोर आली तर माझ्यासारखी पांढरपेशी व्यक्तीच अधिक गडबडून जाईल की काय? शाहीनला स्वतःची लाज वाटण्यापेक्षा आमच्या मधयमवर्गीय मानसिकतेलाच तिची अधिक लाज वाटते आहे का? उदा: - समजा कोणी विचारले, की "तू त्या शाहीनचा फोटो असलेल्या संसथळावर असतेस का?" आली का पंचाईत! तर हे असेही असू शकते. म्हणजे खरं तर कुठेतरी मला माझीही मानसिकता कदाचित बदलावी लागेल का?

अतिशय सुंदर प्रतिसाद.

उत्तम प्रतिसाद. परवा दुसर्‍या एका धाग्याबद्दल बोलताना तू मला "नावडतीचे मीठ अळणी" या म्हणीची आठवण करून दिली होतीस. सदर धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया वाचताना तीच म्हण आठवली पुन्हा. शेवटच्या मुद्द्याबाबत सहमत आहे.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 3:08 pm | अवलिया

अतिशय उत्तम प्रतिसाद.
प्रतिक्रियांबाबतचे निरिक्षण मार्मिक. अर्थात आजवरच्या आमच्या अनुमानाला पुष्टी देणारेच !

सुरेख,
छान लिहले आहे, तात्या !

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2010 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्याचे अजून एक व्यक्तिचित्र. तात्याच्या खास स्वतःच्या शैलीतले. मला व्यक्तिशः या लेखातील काहीच खटकले नाही. अगदी फोटो सुद्धा. अर्थात तो फोटो अनाठायी आहेच. गरज नव्हती. पण टाकल्याने काही बिघडले असेही नाही. त्या स्त्रीची त्याला अजिबात हरकत नाही एवढे पुरेसे असावे.

पण मला हा लेख आवडला नाहीये. तात्याची शैली एक वेगळीच आहे आणि ती इथेही जाणवते आहे. पण तरीही हा लेख पुरेशी उंची गाठत नाहीये. नको तेच सांगायच्या भानगडीत मूळ व्यक्तिरेखा वगैरे थोडी हरवते आहे. म्हणूनच लेखाचा नक्कीच उद्देश काय किंवा लेखकाला नक्की सांगायचे काय याबद्दल वाचकाच्या मनात संदेह उत्पन्न झाला तर दोष वाचकाचा नाही.

तात्या कडून अपेक्षाही फार जास्त आहेत.

सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित सांभाळून घ्यायच्या हे बिपिनदांइतकं कोणालाही उत्तम जमत नाही! :)

अवांतरः अस्थानी प्रतिक्रिया उडवल्याबद्दल संपादकांचे आभार.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2010 - 4:06 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित सांभाळून घ्यायच्या हे बिपिनदांइतकं कोणालाही उत्तम जमत नाही!

धन्यवाद, यशोताई. हे कॉम्प्लिमेंट असावे असे मी धरून चालतो.

पण तसे नसल्यासही काही हरकत नाही.

खरं तर हा लेख काल रात्री आल्या आल्या मी बघितला आणि वर वर वाचला. अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. पण रात्री उशिर झाला असल्याने, उद्या परत नीट वाचून प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. त्या प्रमाणे आज वेळ मिळताच तसे केले. जे काही व्यक्त केले आहे ते माझे प्रामाणिक मत आहे याबद्दल शंका नसावी.

मूळात मिपावर आलो तेच तात्याच्या लिखाणाचा शोध घेत (तात्या मायबोलीवरून गायब झाला म्हणून). हे मी आधीही जाहिरपणे आणि खाजगीमधेही बोललो आहेच. त्यामुळे तात्याचे लेखन, शैली वगैरेमुळे आवडते. सालस, रोशनी, संगितविषयक वगैरे लेखन आवडलेलेच आहे. पण हे तितकेसे नाही आवडले, काय करू? एखाद्या माणसाने नेहमीच चांगले वागावे अथवा नेहमीच वाईट वागावे असे नाहीच ना.

बिपिनदा, कॉम्प्लिमेंट्च आहे. मला तिरकस बोलायची सवय नाही. जे काही खरेखुरे आहे,वाटते, मी सांगते. समोर कोण व्यक्ती आहे ते पाहून मी माझे शब्द वा लेखन वा मत बनवत वा बदलत नाही. तेह्वा सरळ मनाने पाहिलेत तर कॉम्प्लिमेंट आहे हे ल़क्षात यावे. एवढा मोठा खुलासा आणि माझे वाक्य कॉम्प्लिमेंट आहे की कसे हा संशय येण्याची शक्यता का?

तरीही सांगते की, माझ्याकडून ही कॉम्प्लिमेंटच आहे. ह्याउप्पर चर्चा करायची असल्यास ख व आहेच. धन्यवाद.

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 2:09 am | आमोद शिंदे

म्हंटलं तर आवडला म्हंटलं तर नाहीही आवडला. सगळ्यांचीच बाजू घेण्याची बिकांची खुबी वखाणण्याजोगी आहे.

समंजस's picture

3 Sep 2010 - 7:36 pm | समंजस

लेख चांगला आहे तात्या. आवडला. अर्थातच रौशनी किंवा तीच्या मुलीवर लिहीलेल्या लेखांएवढा कसदार नाही :) परंतू चालायचंच. सचिन प्रत्येक सामन्यात १०० करत नाही किंवा अब्दुल कादिर ला १९८९ मध्ये जसं तोडलं तसं प्रत्येक सामन्यात परत अब्दुल कादिर ला तोडलं नाही म्हणून काही सचिन ची बॅटींग बघणे मी सोडले नाही :)

[वयाच्या १३ वर्षी 'चक्र' ही दळवींची कादंबरी पचवलेली असल्यामुळे अश्या लेखांची भिती नाही ;) ]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2010 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या व्यक्तीचित्र आवडले...!
अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 8:00 pm | मिसळभोक्ता

चुम्माचाटी ह्याशब्दाच्या अर्थाविषयी साशंक होतो. पण प्राडॉनी तो नीट समजवून दिल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 9:58 pm | विसोबा खेचर

मला एक कळत नाही की काही मंडळींना 'चुम्माचाटी' या शब्दात किंचित आश्चर्य वाटण्याजोगो वा खटकण्याजोगे काय वाटते?

आमच्या मुंबैच्या बोलीभाषेत हा शब्द सर्रास वापरला जातो..

असंख्य मराठी कथा-कादंब-यात तुम्हीआम्ही 'चुंबन' हा शब्द सर्रास वाचला आहे..त्या शब्दाला आता आपण रुळलो आहोत असे समजात सर्वत्र दिसते..

तोच शब्द थोडा फुलवला की चुम्माचाटी हा अंमळ खुमासदार शब्द तयार होतो.. मला व्यक्तिश: त्यात काही गैर वाटत नाही.. अर्थात, ज्यांना हा शब्द खटकला त्यांच्याबदल आदर आहेच..

प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन.. ;)

आपला,
(चुम्माचाटी बहाद्दर) तात्या.

प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन..

"प्रात्यक्षिकाद्वारे" असे श्री. मिसळभोक्ता यांचे अभिप्रेत असावे. चूभूद्याघ्या.

उनके "अभिप्रेत"का ऐसाईच अभी प्रेत हुव्वा देखके श्री. मिभो रोनेको आया होएगा ।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2010 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>"प्रात्यक्षिकाद्वारे" असे श्री. मिसळभोक्ता यांचे अभिप्रेत असावे. चूभूद्याघ्या.

अरे व्वा...! कोणाला कोणता अर्थ कशाद्वारे अभिप्रेत होतो याचा शोध लावतांना पाहून आनंद वाटला.

>>>प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन..

काही बोललोच नाही. काही लिहिलेच नाही, काही समजावलेच नाही, अशा न बोलल्या गेलेल्या वाक्यांबद्दल, शब्दांबद्दलचा अर्थ आपल्या मि. मित्राला न सांगता समजतो हे तुम्हाला माहित आहे ना ! अर्थात मि.ला काय म्हणायचे आहे हे मला समजले आहे. वो बाते फिर कभी....!

-दिलीप बिरुटे

मिसळभोक्ता's picture

4 Sep 2010 - 8:27 pm | मिसळभोक्ता

प्राडॉ अँड तात्या सिटिंग इन अ ट्री...

एवढेच म्हणतो. बाकी याची त्याची समज, जाण वगैरे.

प्रियाली's picture

4 Sep 2010 - 12:46 am | प्रियाली

रोशनी नंतर आलेल्या शाहीनला फारसा उठाव नाही. :) लेख फारसा आवडला नाही कारण तो कसा असणार/ कोणत्या वाटेने जाणार हे अगदी कळून येत आहे. अपंग वडलांना खीमट भरवत होती/ मुलाला पाजायला घेऊन बसली/ की अंथरूणाला खिळलेल्या आईच्या अंगाखालची माखलेली चादर बदलत होती एवढीच वाक्ये बदलायची. बाकी लेख तोच.

मंदाकिनीला भेटलेले दुबईतील आमचे नातेवाईकही ती किती सोज्वळ आणि सात्विक आहे ते खुलवून सांगत असत. बारबाला, नट्या, वेश्या, कॉलगर्ल्स वगैरेंबद्दल असेच सांगण्याची पद्धत असावी का काय असे वाटू लागले आहे. असो.

चुम्माचाटी हा शब्द मुंबईला प्रचलित आहे. शाहीनच्या परवानगीने फोटो लावला असेल तर ठीक वाटते.

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 2:07 am | आमोद शिंदे

काय तात्या (विम्याची) दलाली किती घेतली शाहीन बाईंकडून? :)
अश्या बिनधास्त प्रसंगासाठी चुम्माचाटी हा शब्द तर खासच.
ते खिमट बिमट वगैरेचा शेवट सोडला तर झकास जमलाय लेख. फोटो तर क्लासच!!

मुक्तसुनीत's picture

4 Sep 2010 - 7:41 am | मुक्तसुनीत

लेख वाचून पडलेले काही प्रश्न :

१. या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ? बळजबरीने उतरल्या असल्यास , अशी नेमकी काय समस्या असेल की निव्वळ शरीरविक्रय करूनच - आणि होंडा सिटी गाडी खरेदी करून - सोडवता येईल ? आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?

२. चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ? पडले नसल्यास का पडले नसावेत ?

३. वेश्याव्यवसायामागची मजबूरी किंवा स्वयंनिर्णयाची कारणीमीमांसा सोडा. निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही, आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्‍याना पडलेले दिसत नाहीत. पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

4 Sep 2010 - 8:59 am | अप्पा जोगळेकर

मुक्तसुनीत,
मुद्दा १ विचारात घेण्याजोगा आहे. बार्बालांबाबत फार सहानुभूती बाळगण्याची गरज नाही हे माझे वैयक्तिक मत. बर्‍याचशा बांग्लादेशी असतात.
मुद्दा ३ मात्र गैरलागू वाटला. तात्यांनी योग्य ती काळजी घेतली असेलच. बाकी त्यांच्या प्रांजळपणाबाबत शंभर पैकी शंभर गुण दिले पाहिजेत. लिखाण नेहमीप्रमाणेच ओघवतं आहे.

आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्‍याना पडलेले दिसत नाहीत.
-प्रश्न पडले नाहीत हे बरंच आहे. असल्या मूलभूत प्रश्नांचा नको इतका विचार केल्याने वयाची २५ वर्षं उल्टून गेली तरी अजून पर्यंत आम्ही सैपाक करु शकलो नाही आणि पूजाही केली नाही.
- सैपाक,पूजा ई. करण्यास उत्सुक

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 9:28 am | आमोद शिंदे

>>बार्बालांबाबत फार सहानुभूती बाळगण्याची गरज नाही हे माझे वैयक्तिक मत.

सहमत आहे. म्हणूनच तो खिमट वगैरे प्रकार काही आवडला नाही. तो तात्यांनी अ‍ॅड केलेला मसालाही असू शकतो. ललित लेखनात काही प्रमाणात साहित्यिक लिबर्टी घेता येते.

सदर स्त्री शरीरविक्रय करतेय असे कुठे लिहिलंय लिखणात ?
अर्थात तात्याच खुलासा करतील.

बाय द वे, आबांनी लेडीज डान्स बार बंद केले होते ना ?

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 9:31 am | आमोद शिंदे

"जानू, तू चल ना मेरे साथ.. चल, तेरेको फोकोटमे..!"

ह्यातून तात्यांना फुकट असले तरी बाकिच्यांकडून पैसे आकारले जात होते असे दिसून येते.

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 9:26 am | आमोद शिंदे

चुम्माचाटीमुळे ओरल हर्पीज सोडता फारसा धोका नसावा. तेवढी रिस्क घेण्यास तात्यांना जड नसावे. त्यांचा गुंतवणुकीचा व्यवसाय त्यापेक्षा कितीतरी जास्त रिस्की आहे, त्यापुढे ही रिस्क काहीच नाही.

मिसळभोक्ता's picture

4 Sep 2010 - 8:25 pm | मिसळभोक्ता

घाबरू नका. "फू.." हा आवाज शिवास रीगल (वय १८) कीबोर्डावर शिंतडण्याचा आहे.

शिंदे साहेब, मान गये बॉस. अपना तो पुराना याराना होना चाहिये.

त्यांनी देखिल आपले खुमारदार अनुभव मिपावर सगळ्याशी शेअर केले तर खुप आनंद वाटेल.

बारबाला व्यवसाय हा अनैतिकच आहे.पण त्याच्यावर ५०/६० हजार उधळणारे ते पैशे काय नैतिक मार्गाने कमवुन आले होते का?माझी जर एपत नसेल तर मी कशाला डान्सबारची पायरी चढु? तात्या डान्सबार मध्ये दारु पियायला गेला होता का बार बालेशी चुम्माचाटी करायला गेला होता.तात्याला त्या बारबालेची जाहिरात करायची होती तर मिपावर तिचा फोटो डकवण्याची जरुरत नव्हती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती जर जाहिरात असेल तर बहुसंख्य मिपाकर डान्सबार मध्ये जाणारे असतील नाही?त्याच्या माहितीकरिता तात्याने हा उद्योग केला आहे काय?
चुम्माचाटी शब्द अश्लिल वाटतो तर मागे एका सदस्याने चुंबनावर कविता केली होती त्याचे प्रतिसाद तपासुन पहा.

विसोबा खेचर's picture

4 Sep 2010 - 11:32 am | विसोबा खेचर

छान सुरू आहे चर्चा.. :)

मुक्तराव,

या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ?

कल्पना नाही..निदान शाहीनशी तरी माझं त्या बाबतीत काही बोलणं झालं नाही..

आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?

आपखुशीने उतरतात की बळजबरीने याबद्दल वर म्हटल्याप्रमाणे कल्पना नाही..

श्रेयाचं म्हणाल तर तसा काही खुलासा मला करता येणार नाही..शाहीन नावाची एक व्यक्ति माझ्या आयुष्यात आली आणि मी तिच्यावर चार ओळी लिहिल्या इतकंच. याचं मला कुणी श्रेय दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक. लिहायचं काम केलं आहे!

चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ?

नाही पडले..

पडले नसल्यास का पडले नसावेत

माहीत नाही..

निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही,

माहीत नाही..

आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्‍याना पडलेले दिसत नाहीत.

नाही पडले.. स्पष्टच शब्दात सांगायचं तर शाहीनसोबत मी असुरक्षित तर सोडाच, परंतु सुरक्षित संभोगही केलेला नाही.. वरवरचे शरीरसुख घेताना मला स्वत:ला सांभाळायची गरज वाटली नाही आणि जेव्हा आवेग अनावार होऊन असुरक्षित किंवा सुरक्षित संभोग करण्याशिवाय पर्याय उरत नाही अश्या क्षणी मी स्वत:ला सांभाळू शकतो, आजवर सांभाळले आहे!

(वरील प्रश्नाचं खरं तर मी उत्तर देणार नहतो परंतु माझे हितचिंतक असलेल्या मुक्तरावांनी इतकं स्पष्ट विचारल्यामुळे उतर देणे भाग पडले.. असो.)

पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.

खरं आहे.. लेख लिहिताना तशी गरज वाटली नाही..

(निरोगी) तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

4 Sep 2010 - 1:52 pm | अप्पा जोगळेकर

वा! तात्या! आवडलं. सगळे चेंडू सीमेपार धाडलेत.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2010 - 11:04 am | विसोबा खेचर

प्रशंसा करणार्‍या, टीकाटिपण्णी करणार्‍या सर्व प्रतिसादींचे आभार..सर्व वाचनमात्रांचेही आभार..

तात्या.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2010 - 11:04 am | विसोबा खेचर

प्रशंसा करणार्‍या, टीकाटिपण्णी करणार्‍या सर्व प्रतिसादींचे आभार..सर्व वाचनमात्रांचेही आभार..

तात्या.

साती's picture

6 Sep 2010 - 11:46 am | साती

तात्या, छान लेख.इतके दिवस मी मि पा वाचनमात्र मोड मध्ये वाचत होते पण खूप दिवसांनी तुझे लिखाण आले
प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहावले नाही .
''फोटो लावणे" याव्यतिरिक्त पूर्ण लेख उत्तम.
एखाद्याने असेच लिहावे तसेच लिहावे हे इतरांनी सुचवणे गैरच.

(त्यापेक्षा सगळे खरे लिहून नंतर दांभिकतेचा आव आणून 'सदर लेखातील व्यक्ती आणि स्थळे यांची नांवे बदलली आहेत' असे लिहिण काहिंना अपेक्षित होतेसे दिसले
.बहुदा "होंडा सिटीत ती इतक्या जवळ असुनही कधी आमच्या मनात कुठला वावगा विचार आला नाही" असे लिहिले असते तर "तात्या किती थोर" असे त्यांना वाटले असते. पण तू ह्या फुकटच्या थोरपणाला फाट्यावर मारणारा आहेस हे तुझ्या फॅन्सना माहिती आहे.)

बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 11:06 pm | मिसळभोक्ता

बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल.

येस्स, बाय पॉप्युलर डिमांड, येऊ दे एक फर्मास लेख.

जो माणूस हिजड्यांसाठी दशग्रंथी ब्राह्मण होऊ शकतो, तो त्याच्या सो-कॉल्ड मित्रांसाठी इन्वेस्टमेंट कन्सल्टंट, किंवा कॅन्सरमुक्ती एनजीओचा प्रमुख कसा झाला, हे तुझ्या फर्मास शैलीत वाचायला आवडेल.

विसोबा खेचर's picture

7 Sep 2010 - 1:26 pm | विसोबा खेचर

थोडा अवधी लागू शकेल, पण नक्की लिहिन या ही विषयावर..!

तात्या.

समंजस's picture

6 Sep 2010 - 1:52 pm | समंजस

प्रकाटाआ