आज हापिसातुन घरी आलो, लॅपटॉप सुरु केला तोच त्यातुन अलादीनच्या दिव्याप्रमणे धुर निघाला आणी त्यातुइन एक आकृती तयार झाली. आकृती म्हणाली कसं काय?
मी विचारलं कोण तु? आकृती म्हणाली अरे मी तुझा आयडी, आंतरजालावरचा.
मी : - अरे मग असा कंप्युटर मधुन बाहेर का आलास?
आयडी: - आलो तुझ्याशी गप्पा मारायला.
मी: - काय बोलायचय बोल.
आयडी :- काही नाही यार. आजकाल आंतरजालाचा कंटाळा येतो. रोज उठुन तेच काम, इथे तिथे लोळ, तिथे प्रतिसाद दे, काहीतरी लिही, काहीतरी वाच, कधी उगाच फार विचार कर, धाग्यांचा गुंता सोडवत बस, विषय आणी प्रतिसाद नीट समजुन घ्यायला ईतिहासाचा अभ्यास कर.
मी:- मला एक गोष्ट सांग, कितीही झालं तरी तु आंतरजाल सोडु शकतोस का? एखाद्या नशेसारखं आहे ते, एकदा चटक लागली की बास, शरीरातलं निकोटीन कमी झालम की जशी सिगारेटची तलफ लागते तसं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी लिहायला, प्रतिसाद द्यायला हात सळसळतात.
आयडी :- खरयं तु म्हणतोयस ते. धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय असं झालयं.
मी :-बर ते जाऊ दे. मला एक सांग तु जे काही लिहितो, वाचतो, गहन चर्चा करतो, टवाळक्या करतो त्यात कितपत फायदा होतो तुझा?
आयडी :- मग. फायदा तर नक्कीच होतो. मला नविन गोष्टी कळतात, कधी दोन घटका मनमोकळं हसायला मिळतं, कधी भांडायला मिळतं, तर कधी स्वतःचे अडकलेले प्रश्न सोडवायला मदत होते.
मी :- आणी सामाजिक किंवा राज्याचे/देशाचे प्रश्न किती सुटतात.
आयडी :- हे बघ. इथे काही सर्वज्ञान असलेले खुप मोठे आणी विचारवंत लोकंही येतात. खुपशा गहन चर्चा करतात. आता त्यातले कितीजण कृती करतात मला माहित नाही ब्वॉ. मी वाचतो, लिहितो आणी पुढे चालतो, प्रत्यक्षात मी किती कृती करतो ते मलाही माहित नाही. आणी इथे प्रत्येक मुखवट्याची एकदा एक ओळख झाली की ती कधी बदलत नाही, काहीही झालं तरी. त्यामुळे काही लोक सारखे मुखवटे बदलतात. काही मुखवटे आपल्यासारखे मुखवटे असलेल्यांनाच भेटायला येतात तर काही एकमेकांचे मुखवटे खेचायला बघतात.
मी :- असो, तु कधी कधी टवाळक्या करतोस, मुद्दाम तिरकस प्रतिसाद देतोस, भांडतोस, त्यातुन कुणी चांगला किंवा मोठा व्यक्ती दुखावला गेला तर?
आयडी :-अरे? इथे सर्वच सारखे असतात, कोण त्याच्या आयुष्यात किती मोठा आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी जमेल तेवढं पाय खेचणार, मुद्दाम भांडणार. त्याला जमत असेल तर थांबाव नाहीतर जावं फाट्यावर. आणी मी म्हणजे कोण रे, तुझ्याच मनाचा एक कप्पा, जो प्रत्यक्षात कुणी पाहु शकत नाही किंवा तु प्रत्यक्षात उघडतच नाहीस. इथे तु मला मुखवटा म्हणुन वापरतोस, तोतया राहतोस म्हणुन मी काहीही लिहायला कसाही वागायला तयार होतो. जेव्हा तु अशाच मुखवटे काढलेल्या लोकांना भेटायला जातोस तेव्हा मला कधी नेतोस का? मला त्या कप्प्यात पुन्हा कोंडुन ठेवतोस ना.
मी: - पण तु तरी मला कुठे सुखाने लोकांना भेटु देतोस? त्यांना भेटताना आतुन डिवचतोसच ना - हाच तो त्या मुखवट्यामागचा माणुस. परसेप्शन आणतोच ना.
आयडी :- कधी कधी असं होणारच ना. तिथे तुझी ओळख ही माझ्यामुळे आहे. कितीही प्रयत्न केलास तरी माझा उल्लेख तिथे येणारच.
मी :- सोड ते सगळं, मला सर्व गुण्यागोविंदाने रहावे आणी कटुता कधी येऊ नये असेच वाटते. सगळे आपलेच लोकं आहेत.
आयडी :- पण मी असं होऊच देणार नाही मुळी. हा हा हा. माझ्या मुडनुसार मी कधी मत्त, कधी टीकाकार, कधी कंपुबाज, कधी टवाळखोर, कधी भांडकुदळ तर कधी वैचारीक हा वागणारच. तु कसं वागायचं हे तु ठरव. तुम्हा माणसांची जातच अशी आहे मी तरी काय करु.
तुझ्यासाठी ही वर्च्युअल रिअॅलिटी आहे की रिअल वर्चुअॅलिटी आहे तुझं तुच ठरव. मी चाल्लो.
एवढं बोलुन आकृती पुन्हा कंप्युटरात विरघळुन गेली.
प्रतिक्रिया
22 Jul 2010 - 2:58 am | Nile
ममो लोकांचे काही ऐकत जाउ नका. दारु उपवासाला चालते. नेहमी सारखीच घेत चला असले भास होणार नाहीत.
-Nile
22 Jul 2010 - 3:01 am | मराठमोळा
नाईल,
हा मुद्दाम निर्माण केलेला भास आहे. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
22 Jul 2010 - 3:10 am | Nile
बाब्बौ! प्रकरण गंभीर दिसतंय. ;)
-Nile
22 Jul 2010 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे
बियर उपवासाला चालते
बाकी लेख आवडला आहेच. प्रत्येकानी आपापल्या आयडी शी संवाद साधुन पहावा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Jul 2010 - 3:07 am | पुष्करिणी
अरेच्चा, माझा प्रतिसाद उडाला / उडवला वाटतं.....
पुष्करिणी
22 Jul 2010 - 3:09 am | Nile
वेलकम टु द क्लब! ;)
-Nile
22 Jul 2010 - 10:29 am | अवलिया
+१
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
22 Jul 2010 - 3:18 am | आमोद शिंदे
खमंग खुशखुशीत लेख. दिवाळी अंकात फराळासोबत वाचावा असा.
हे बघ. इथे काही सर्वज्ञान असलेले खुप मोठे आणी विचारवंत लोकंही येतात. खुपशा गहन चर्चा करतात. आता त्यातले कितीजण कृती करतात मला माहित नाही ब्वॉ.
म्हणजे काय कृती करणे अपेक्षीत आहे? मी नुकतेच एका चर्चेत राशीभविष्य अंधश्रद्धा आहे असे मत नोंदवले (पिंक टाकली) त्यावर कृती म्हणजे मी स्वत:चे राशी भविष्य कधीच बघत नाही. पण मी काही विचारवंत नाही. त्यामूळे तुम्हाला विचारवंतांकडून कसली कृती अपेक्षीत आहे? हे पुन्हा विचारतो
22 Jul 2010 - 4:17 am | पाषाणभेद
तेच म्हणतो. फक्त ई-दिवाळीअंकात चालेल. छापील अंकात ईतर वाचकांना संदर्भ लागणार नाहीत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
22 Jul 2010 - 10:21 am | विजुभाऊ
आयडी हे सदस्याचे व्यक्तीच्या अंतरंगाचे प्रतीरूप असते हे सत्य असेल तर मग जृंभणश्वान , खचलेला दरबार , अजानुकर्ण , बावळट बंडु , बद्दु ही नावे काय सुचवतात
22 Jul 2010 - 10:28 am | अवलिया
हेच म्हणतो... आधीच भाउ असे सांगुन लोक का बर सोज्वळ असल्याचा भाव आणतात... विजुभाउ???
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
22 Jul 2010 - 11:05 am | विजुभाऊ
मला एका अवलियाने सोज्वळ या शब्दाची फोड सो जवळ अशी करून सांगितली होती.
22 Jul 2010 - 11:07 am | अवलिया
काय सांगता?
सोज्वळ... रोज वळ ==> रोज्वळ ==> सोज्वळ असे असावे का?
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
22 Jul 2010 - 11:10 am | Nile
कुणी असे समजुन सांगावे लागावे इतकी लगट करावीच कशाला माणसाने पण?
-Nile
22 Jul 2010 - 10:50 am | जाई अस्सल कोल्हापुरी
....आयुष्यात कधी तरीच १००% "स्वतः" बनून वागायचा....जस आहे तस्...व्यक्त व्हायची सन्धी मिळते....मग व्हा व्यक्त....
....ममो पणानी....म्हणजे मनमोकळे पणानी ;;)
( एक शन्का....अनुस्वार कसा छापायचा.... नवीन आहे हो मी...जरा कोणीतरी सान्गेल का?)
22 Jul 2010 - 4:24 pm | स्मिता_१३
अवांतर = avaaMtar
स्मिता
22 Jul 2010 - 10:51 am | यशोधरा
ममो, छान लिहिलेस..
22 Jul 2010 - 1:20 pm | गणपा
काय चालाय काय मागे आमचे एक स्नेही आरष्यातल्या प्रतिबिंबासोबत बोलायचे आता हे दुसरे स्वतःच्या आयडी बरोबर वैचारिक ;) गफ्फा हाणतायत.....
छ्या कोण म्हणालं रे ते की बियर आणी सुरा उपासाला चालते.
लोक फायदा घ्यायला लागले पहा लगेच. =))
22 Jul 2010 - 5:52 pm | शुचि
कल्पनाविलासाचा स्तुत्य प्रयत्न
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
22 Jul 2010 - 6:59 pm | क्रेमर
मस्त लिहिले आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.