वारीचं पुण्य!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Nov 2009 - 1:27 pm

आजच एका मिपाकराचा फोन आला..

"काय तात्या, कसा आहेस? मीही एक मिपाकर आहे पण फक्त वाचनस्वरुपात."

बर्‍यापैकी वयस्कर माणसाचा आवाज वाटत होता..

"बरं. बोला साहेब.."

"तात्या तुझ्या मिपाची खरी शोभा काय सांग पाहू?"

"मिपावर मनापासून लिहिणारे/वाचणारे मिपाकर!" मी.

"च्च.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!"

हा म्हातारा एकदम शिव्यांवर आलेला पाहून मला बरं वाटलं! :)

"म्हणजे मिपाचं खरं बलस्थान काय? असं विचारतोय मी. छ्या! साल्या तुझं हे संकेतस्थळ आणि तुलाच ह्याचं उत्तर माहीत नाही?"

"हम्म..! येथे लिहिले जाणारे उत्तम लेख, हसीमजाक, कम्पूबाजी वगैरे..!" पुन्हा मी.

"च्च.. ते झालंच रे. अरे पण मी मिपाच्या खर्‍या शोभेबद्दल विचारतोय रे! हां, आता तू त्या खादाडीसोबत रोज नव्या नव्या दाक्षिणात्य नट्यांची चित्रं टाकतोस ती खरी शोभा!' असं उत्तर नको देऊस बॉ!"

असं म्हणून तो मोठ्ठ्यांने हसला.

त्याचं ते च ला च जोडणं आता मला आवडू लागलं होतं!

बाय द वे, दाक्षिणात्य नट्यांच्या बाबतीत बाकी तुझी डॉक्टरेट हो! अरे मला तर कित्येक नट्या तुझ्यामुळे माहीत झाल्या. आजच्या खादाडीतली ही 'ममता मोहनदास कुठे शोधलीस बाबा? काय फक्कड आहे रे!" ;)

म्हातारबुवा आता हळूहळू रंगात येऊ लागले होते! :)

"बरं ते जाऊ दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे..!"

बुढ्ढा पुन्हा पूर्वपदावर. मला वाटलं होतं ममता मोहनदास या विषयावरच आमचं संभाषण संपेल.

"नाय माहीत! आजोबा, आता तुम्हीच उत्तर द्या!"

आणि एकदम म्हातार्‍याचा आवाज सिरीयस झाला..

"तात्या, नो डाऊट, तुझं मिपा छानच आहे. इथे मायमराठी खुलते आहे, फुलते आहे. पण तिचं खरं बलस्थान काय आहे तुला माहित्ये? आज कशामुळे मिपा एवढे बहरतं आहे तुला माहित्ये?"

म्हातारा जास्तच गम्भीर!

"नाही माहीत. तुम्ही बोला आजोबा."

"त्या कोपर्‍यातल्या त्या जोडगोळीचा तो फोटो आहे ना? त्यामुळेच केवळ आज मिपाला यश आहे रे. अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!"

आता म्हातारा एकदम हळवेपणाने बोलत होता, मनापासून बोलत होता.

"तुला खरं सांगू? अरे जितक्या वेळेला तो फोटो पाहावा ना, तितक्या वेळेला तो तेवढाच नवा वाटतो रे! अरे जेव्हा जेव्हा मी 'हजर सभासदांची' यादी पाहतो ना, तेव्हा त्या यादीत मला ती दोन अदृष्य नावं सर्वप्रथम दिसतात!"

"जो पर्यंत ते दोघं मिपावर लॉगईन करताहेत ना तात्या, तोवर तुझ्या मिपाला मरण नाही! बरं चल, ठेवतो फोन. पुन्हा बोलू!"

सुरवतीस केवळ ममता मोहनदास या विषयावरच वाहवत जाईल की काय असं वाटणारा तो म्हातारा, कुठलंही प्रवचन न देता इतक्या साध्या रितीने, साध्या शब्दात मला खूप मोठी गोष्ट सांगून गेला होता, एक वारी केल्याचं पुण्य माझ्या पदरी देऊन गेला होता!

-- तात्या अभ्यंकर.

मांडणीविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

नेहमी आनंदी's picture

14 Nov 2009 - 2:30 pm | नेहमी आनंदी

:)

ऋषिकेश's picture

14 Nov 2009 - 2:44 pm | ऋषिकेश

:)

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

तात्या (अ)भंयकर सुंदर लेख हो.
जय हरी जय हरी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भोचक's picture

14 Nov 2009 - 2:46 pm | भोचक

:)

(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Nov 2009 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रकटन छान, आवडले.

:)

बिपिन कार्यकर्ते

सुधीर काळे's picture

14 Nov 2009 - 2:59 pm | सुधीर काळे

व्वा तात्यासाहेब, व्वा! हे वाक्य तुमचं असेल तर तुम्हाला सलाम! पण जर खरोखार 'त्या' आजोबांचे असेल तर त्यांना मानाचा कुर्निसात!
"अरे जेव्हा जेव्हा मी 'हजर सभासदांची' यादी पाहतो ना, तेव्हा त्या यादीत मला ती दोन अदृष्य नावं सर्वप्रथम दिसतात!"
जय हो!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

मदनबाण's picture

14 Nov 2009 - 3:11 pm | मदनबाण

:)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

अवलिया's picture

14 Nov 2009 - 3:13 pm | अवलिया

:)

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

पर्नल नेने मराठे's picture

14 Nov 2009 - 3:16 pm | पर्नल नेने मराठे

:| दाक्षिणात्य नट्यान्चे का महाराश्ट्रियन नट्यान्चे टाकत चला. स्वतला मनसेकर म्हणवता ना? 8|
चुचु

गणपा's picture

14 Nov 2009 - 3:27 pm | गणपा

सहमत. अधुन मधुन मराठी नट्यांचे पण फोटु टाकत चला तात्या.

अवलिया's picture

14 Nov 2009 - 3:34 pm | अवलिया

थोड्या पाश्चिमात्य आणि सिंगापुर इंडोनेशिया साईडच्या पण येवुद्या.

तेवढेच आमचे पिडाकाका, काळेकाका खुश !

आणि हो आमच्यावर नाराज असलेले काका पण आहेत त्या ठिकाणी. ते पण खुश !!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

बाकरवडी's picture

14 Nov 2009 - 10:14 pm | बाकरवडी

मी माझ्या खरडवहीत मराठी नटीचा फोटू लावला होता.
आनि लिहिल होतं- हीच्यावर आमचा भारी जीव! ;)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

गणपा's picture

14 Nov 2009 - 3:26 pm | गणपा

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2009 - 3:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी मिपाची रसोई कितीही समृद्ध असली तरीही दाक्षिणात्य नट्या तीमधून कशा बाहेर येतात कोण जाणे!

अदिती

सुनील's picture

14 Nov 2009 - 3:32 pm | सुनील

तात्याचे स्त्री"दाक्षिण्य" अफाट आहे!! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भोचक's picture

14 Nov 2009 - 5:17 pm | भोचक

तुम्ही अफाट आहात! :)

(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव

टारझन's picture

14 Nov 2009 - 9:47 pm | टारझन

हॅहॅहॅ .. अगदी !! तात्या मस्त लिवतो कधीकधी :)
बाकी कॉल केलेला म्हातारा रजनिशांचा शिष्य का हो ? अगदी सम-भोगातून समाधीकडे विषय वळवलान् ? ;)
(टोचक)
बुधवार पेठ आणि कधीही लेट
हे आहे आमचं मन

जिन्क्स's picture

16 Jun 2010 - 12:45 pm | जिन्क्स

मनापासुन हसू आले...

(लोचट)
सदाशिव पेठ..मटन खाउन वढलय वेट

अमोल केळकर's picture

14 Nov 2009 - 3:39 pm | अमोल केळकर

अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!"

म्हातार्‍याशी सहमत

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

sneharani's picture

14 Nov 2009 - 3:40 pm | sneharani

छान प्रकटन..!
:)

पाषाणभेद's picture

14 Nov 2009 - 7:01 pm | पाषाणभेद

नट्या कूठल्याही असल्या तरी त्यांचे मुळ उच्चारांचे वर्णध्वनी मराठीतच असतात. त्यामूळे जगातल्या कूठल्याही नट्या मिपावर आल्यातर ठिकच की तात्या.
(पण भारतीय तोंडवळा ज्या नट्यांचा असतो त्या नट्या जगातल्या कूठल्याही नट्यांच्या तोंडात मारतात, काय खरे की नाही?)

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

विसोबा खेचर's picture

14 Nov 2009 - 7:02 pm | विसोबा खेचर

त्यामूळे जगातल्या कूठल्याही नट्या मिपावर आल्यातर ठिकच की तात्या.

करेक्ट.. :)

आपला,
(ममता मोहनदासवर विलक्षण जीव असणारा) तात्या.

विजुभाऊ's picture

16 Nov 2009 - 3:05 pm | विजुभाऊ

भारतीय तोंडवळा ज्या नट्यांचा असतो त्या नट्या जगातल्या कूठल्याही नट्यांच्या तोंडात मारतात
काय कळ्ळं नाय बॉ....या मारामार्‍या कुठे होतात ;)


जय महाराष्ट्र.....

पाषाणभेद's picture

17 Nov 2009 - 2:38 am | पाषाणभेद

आव विजूभौ, तुमी चेश्टा तर नाय ना करूंन र्‍हायलेय?

म्या काय मारामारीची गोश्ट नाय करूंन र्‍हायलो. तोंडात मारत्यात हा वाकप्रचार हाये. म्हंजी आस की आपल्या नट्यांची तोंडं लई भारी आसत्यात. त्या फारीनच्या नट्यांपेक्शा भारी दिसत्यात आस म्हनायचं हाये माला.

बाकी शि. द. फडणीसांचे कार्टून म्हणजे शब्दांचे कामच नाही.
जुन्या गणिताच्या पुस्तकातही त्यांनी काढलेली चित्रे असत. मला वाटते बालभारतीने ते एक चांगले काम केले असावे.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Nov 2009 - 3:11 am | अक्षय पुर्णपात्रे

प्रभो's picture

14 Nov 2009 - 9:20 pm | प्रभो

:)

(हजर)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

आशिष सुर्वे's picture

14 Nov 2009 - 10:02 pm | आशिष सुर्वे

"त्या कोपर्‍यातल्या त्या जोडगोळीचा तो फोटो आहे ना? त्यामुळेच केवळ आज मिपाला यश आहे रे. अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!"

१००% खरं..

-
कोकणी फणस

लवंगी's picture

15 Nov 2009 - 7:01 am | लवंगी

:)

मिसळभोक्ता's picture

15 Nov 2009 - 12:38 pm | मिसळभोक्ता

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भांचोत", आणि "बाझवला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुनील's picture

16 Nov 2009 - 2:54 pm | सुनील

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भांचोत", आणि "बाझवला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!
डावीकडे पाहिले असता वारीचे तर उजवीकडे पाहिले असता बारीचे पुण्य मिळते!! ;)

किर्तनी बसता
नेत्र लाभविले,
मन माझे गुंतले
विषयसुख.

(तिरळा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बाकरवडी's picture

16 Nov 2009 - 8:04 pm | बाकरवडी

१ नंबर !!

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Nov 2009 - 12:48 pm | प्रशांत उदय मनोहर

:)

हर्षद आनंदी's picture

16 Nov 2009 - 9:31 am | हर्षद आनंदी

ज्ञानोबा-तुकारामांचे अस्तित्व जो वरी आहे तो वरी मायमराठी आणी मिपा असतील..

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस's picture

16 Nov 2009 - 1:39 pm | समंजस

छान... :) काहीच वाद नाही.

विनायक प्रभू's picture

16 Nov 2009 - 3:21 pm | विनायक प्रभू

मिलते सभी वारी-बारी

स्वाती२'s picture

16 Nov 2009 - 8:40 pm | स्वाती२

आवडले.

शुचि's picture

15 Jun 2010 - 11:31 pm | शुचि

सुंदर!!!!
तात्या मला हा लेख खूप आवडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इंटरनेटस्नेही's picture

16 Jun 2010 - 2:11 am | इंटरनेटस्नेही

छान लेख.

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

संकेत's picture

16 Jun 2010 - 5:59 am | संकेत

छान लेख तात्या.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

16 Jun 2010 - 11:00 am | डॉ.श्रीराम दिवटे

वारी चागंलीच दारी आलेली दिसतेय!

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...