एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
5 Nov 2009 - 8:24 am

हा लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवा़ळी अंकात आधीच प्रसिद्ध झाला आहे. तो अंक प्रकशित होऊन ३ आठवदे झाले म्हणून इथे अपलोड केला आहे. लिपी दुसरीच (लोकसत्ता फ्रीडम) आहे, गमभन नव्हे. त्यामुळे शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती!

एका आधुनिक हरिश्चंद्राची करुण कहाणी
सुधीर काळे, जकार्ता

एक प्रामणिक तरुण आपल्या ध्येयवादी व देशभक्तीपूर्ण भूमिकेमुळे व कायदापालनाबाबतच्या ध्यासापायी कसा दारुण अवस्थेला पोचला आणि सरकार एकदा का आपल्या मागे लागले कीं काय अवस्था होते याची ही दर्दभरी कहाणी आहे. कायद्याचे काटेकोर पालन करू पहाणार्याा या तरुणाला नोकरीवरून डच्चू मिळाला, पैशाचे पाठबळही नाहींसे झाले, त्याच्या खासगी आयुष्यालाही सुरुंग लागला व त्याचे लग्नही मोडले.

तसेच ही कहाणी अमेरिकेच्या दुटप्पी धोरणाची व आपल्या "भोळासांब" छाप परराष्ट्रीय धोरणावरही प्रकाश टाकते. एका बाजूला अमेरिकेची पाकिस्तानला दिली जाणारी मदत भारताविरुद्ध वापरली जाणार नाहीं असा जप करता-करता अमेरिकेने १९८५-१९९० दरम्यान पाकिस्तानला कसे अण्वस्त्रसज्ज बनविले व आपल्याला व आपल्या "भोळासांब" सरकारला कसा दगा दिला हे दारुण सत्याचीही ही कहाणी आहे.

याउलट पाकिस्तानी परराष्ट्रीय धोरण कसे "विन-विन" आहे (आजही) व पाकिस्तानी नेते कसे धूर्त आहेत याचेही भयप्रद दर्शन आपल्याला होते. अलिप्ततावादाच्या चळवळीचा अध्वर्यू असलेला आपला देश आज इतका अलिप्त, एकाकी कां झालाय् व पाकिस्तान धूर्तपणे अमेरिका आणि चीन अशा दोघांच्या गोटात शिरून दोन्ही हातांनी मलिदा ओरपतोय्! कुठे वाट चुकलो आपण?

बहुतेक भारतीयांची अशीही चुकीची समजूत आहे कीं पाकिस्तानला या कामात चीनची मुख्य मदत होती व हे बॉंब चीनकडून मिळालेल्या भाडोत्री विद्येचे होते. पाश्चात्य राष्ट्रांकडून अण्वस्त्रांसाठी लागणर्या मालावर व तंत्रज्ञानावर निर्बंध आल्यावर चीनने पाकिस्तानला असे सामान व तंत्रज्ञान दिले होते असे उल्लेख आहेत, पण सत्य परिस्थिती अगदीच वेगळी व धक्कादायक आहे.

कुणाला स्वप्नातही कधी वाटले नसेल कीं ही अणूबॉंब बनविण्याची विद्या व बहुतांशी सर्व सामुग्री अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सच्या दक्षिणेसह १९९८च्या खूप आधी १९८५-१९९०च्या दरम्यान ’दान’ केली होती. रेगन व बुश-४१* (लेखाच्या शेवटी दिलेली टीप पहा) या दोन राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत त्यांच्या चांडाळचौकडीने म्हणजेच डिक चेनी (जो पुढे उपराष्ट्राध्यक्ष झाला), वुल्फोवित्झ, "स्कूटर" लिबी व डोनाल्ड रम्सफेल्ड (जो पुढे संरक्षणमंत्री झाला व ज्याला अतीशय अपमानास्पद परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला) या "जहाल" गटातील लोकांनी हे कुकर्म केले! जगाचे लक्ष विनाकारण कुवैतकडे व सद्दामकडे वेधून त्यांनी पाकिस्तानच्या बॉंब बनविण्याच्या कामाकडे काणाडोळा केला व त्याचा फायदा घेऊन व अमेरिकी संपत्तीचा प्रचंड ओघ स्वत:कडे ओढून घेऊन पाकिस्तानने १९९०च्या आधीच अणूबॉंब बनविण्याची विद्या हस्तगत केली होती व ही बाब अतीशय गुप्त ठेवण्यात अमेरिका-पाकिस्तानला यशही मिळाले.
पण प्रथम या कहाणीचा नायक "रिच (रिचर्ड) बार्लो" कडे आपण वळू या. CIA व Pentagon साठी माहिती गोळा करण्यात व तिचे पृथ:करण करण्यात वाकबगार असलेल्या एका निष्णात तज्ञाची ही दर्दनाक कहाणी आहे.

१९५५ च्या आसपास एका भूदलातील शल्यविशारदाच्या (Army surgeon) पोटी जन्मलेल्या रिच बार्लोने १९८१ मध्ये अण्वस्त्रप्रसारविरोधी (intelligence) विषयावरची उच्च पदवी प्राप्त करून देशसेवेने प्रेरित होऊन सरकारी नोकरीत प्रवेश केला. आधी State Departmentच्या शस्त्रास्त्र नियोजन न नि:शस्त्रीकरण विभागात (Arms Control and Disarmament Agency-ACDA) कामाला सुरुवात करून पुढे १९८५ साली CIA मध्ये त्याची नेमणूक झाली व तेथे त्याला १९८८ साली Exceptional Accomplishment Award मिळाले. १९८९ साली त्याची बदली पेंटॅगॉनच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी धोरणाच्या विभागात झाली जेथे त्याने आपल्याच खात्यात असलेली साधने व मनुष्यबळ वापरून गुप्त माहितीचे पृथ:करण करण्याचा कार्यक्रम सुरू केला. तो संरक्षणमंत्री डिक चेनी व उपसंरक्षणमंत्री हॅड्ली यांच्या हाताखाली काम करत होता. सुरुवातीला ए. क्यू. खान या बदनाम पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून योग्य वेळी वरिष्ठांना सावध करणे हे त्याचे मुख्य काम होते. त्याने पाहिले कीं पाकिस्तानचा अण्वस्त्रे बनवायचा कार्यक्रम ’मागच्या दारातून’ अवैध मार्गाने निर्यातीला बंदी असलेल्या अमेरिकन माल खरेदी करण्यावर अवलंबून होता व अशी खरेदी चाललीही होती व याचे पुरावे बार्लोंच्याकडे होते. अमेरिकन सरकारलाही असे चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. बार्लोंना माहीत होते कीं ही खरेदी निष्पाप दिसावी म्हणून अण्वस्त्रांसाठी लागणारी साधनसामुग्री एकाद्या सर्वसाधारण प्रकल्पाच्या यादीत असायची (जिला अमेरिकन सरकारने होकार दिला होता.) उदा. high-speed cathode-ray oscilloscopes and special कॅमेरे. हा माल अमेरिकेतून हॉंगकॉंगला पाठविला जायचा व तिथे पाकिस्तानी हस्तक तो उचलायचे व Pakistan Atomic Energy Commission ला व खान रीसर्च प्रयोगशाळांना पाठवायचे. या प्रयोगशाळांत अण्वस्त्रांना लागणारे युरेनियम "गाळले" (enrich) जायचे. या अणुविषयक हालचालींचा पुरावा म्हणजे ट्रकमधून उडणारी धूळ. खास सेन्सर्सद्वारे ती किरणोत्सर्गी असल्याचे उघडकीस येत असे.

अफगाणिस्तानशी पाकिस्तानच्या मदतीने चाललेले युद्ध कसेही करून अखंड चालू ठेवणे हा जणू दक्षिण आशियाबद्दलच्या अमेरिकन परराष्ट्रीय धोरणाचा केंद्रबिंदू झाला होता. त्यामुळे बार्लोने आपल्या ’उत्खनना"ला सुरुवात केली तेंव्हा परराष्ट्रखात्यातील कांहीं अधिकार्यां ना काळजी वाटू लागली कारण जास्त सखोल अभ्यासातून "नको त्या" गोष्टी उघडकीस आल्यास पाकिस्तानला अडचणीत टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकली असती व सोलार्झ दुरुस्ती (amendment) लागू पडून पाकिस्तानला पाठविली जाणारी मदत (शस्त्रास्ते व पैसा) बेकायदा ठरून तिचा ओघ थांबवावा लागला असता.

असे कांहीं "नको ते" बार्लोंच्या संशोधनात येतेय् अशी शंका आल्यास अमेरिकन परराष्ट्रखाते पाकिस्तान सरकारला एक निषेधखलिता (demarché) पाठवायचे. बार्लोंना वाटायचे कीं हे निषध खलिते अमेरिकन पोलीस त्यांच्या मागावर आहेत असे पाकिस्तानी लोकांना गुप्तपणे सांगणारे सांकेतिक निरोपच होते. या निषेध खलित्यांतील मजकुराकडे पाकिस्तान सहाजीकच दुर्लक्ष करी पण आपल्या बेकायदा हालचाली कांहीं काळ झाकल्या जातील अशी काळजी घेत असे. या वरवर निष्पाप दिसणार्या पण वारंवार होणार्याा घटनांमुळे CIA चे डिक केर्र नावाचे अधिकारी इतके काळजीत पडले कीं त्यांनी तडक परराष्ट्रखात्यातील अधिकार्यांनची एक बैठक बोलवून सतत जाणारे निषेधखलिते व वॉशिंग्टन व इस्लामाबाद दरम्यान घडणार्यां अत्यंत गोपनीय अशा अमेरिकन हेरखात्याच्या अंतस्थ निरोपांचे जाणे-येणे या विषयांवर लक्ष केंद्रित करणारी बैठक आयोजित केली. पण परराष्ट्रखात्यातील अधिकार्यां नी गुळमुळीत उत्तरे देऊन ही बैठक निरुपयोगी ठरविली.

परराष्ट्रांना मदत देण्यासंबंधी अमेरिकन कायद्यात पाकिस्तान जर अण्वस्त्रे बनविण्याचा किंवा मिळविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची मदत ताबडतोब थांबवावी अशी तरतूद आहे. असे केले असता अफगाणिस्तानमधील युद्धावर त्याचा परिणाम झाला असता. म्हणजेच परस्परविरोधी शक्ती इथे काम करत होत्या. एकदा अशी बातमी आली कीं अर्शद परवेझ नावाच्य़ा एका कॅनडास्थित पाकिस्तानी उद्योगपतीने कार्पेंटर स्टील (Carpenter Steel) या कंपनीकडे एका खास प्रतीच्या पोलादाची चौकशी केली होती जे युरेनियमच्या enrichment च्या यंत्रसामुग्रीतच वापरले जाते. या गुपचुप खरेदीव्यवहारातील त्याचा नियंत्रक ("handler") पाकिस्तानी सैन्यातला एक सेवानिवृत्त ब्रिगेडियर इनामुल हक हा होता. या दोघांच्या बेकायदा हालचालींची अमेरिकन हेरखात्याला बर्याेच वर्षांपासून माहिती होती. बार्लो व त्याच्या सहकार्यां नी या दोघांच्या अटकेसाठी "सापळा" तर लावला, पण एकच सावज (परवेझ) त्या सापळ्यात प्रवेश करते झाले व त्याला अटक झाली, पण "देवमासा" इनामुल हक मात्र गळाला लागला नाहीं. बहुधा त्याला ’टिप’ मिळाली असावी व तो सटकला! परवेझच्या कैदेबद्दलच्या यशाबद्दल बार्लोला शाबासकी मिळाली.

या सनसनाटीखेज अटकेनंतर अण्वस्त्रांच्या प्रसाराविरुद्ध बांधिलकी असलेल्या प्रतिनिधीसभेच्या सभासदांमध्ये एकच गदारोळ माजला. त्यात सिनेटर ग्लेन व प्रतिनिधी सोलार्झही होते. पण प्रतिनिधीसभेला दक्षिण आशियात फैलावणार्यात अण्वास्त्रांपेक्षा अफगाणिस्तानला जाणार्याा युद्धसामुग्रीची व पैशाच्या मदतीची जास्त फिकीर होती. म्हणून केवळ अफगाणिस्तानमधील युद्ध कसेही करून अखंड चालू रहावे म्हणून अण्वस्त्रांच्या या बेकायदा प्रसाराकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानला वर आणखी ४८ कोटी डॉलर्सची मदत देण्यात आली. वैतागलेला सिनेटर ग्लेन "टाईम" या नियतकालिकाबरोबर बोलताना म्हणाले कीं अफगाणिस्तानला युद्धसामग्री पुरविण्यापेक्षा अण्वस्त्रप्रसाराचा धोका कितीतरी पटीने मोठा आहे. म्हणजे हा अल्प मुदतीच्या लाभाचा दीर्घ मुदतीच्या हानीवर झालेला विजयच म्हणावा लागेल.

१९८७च्या मध्यावर बार्लो पाकिस्तानच्या बेकायदा खरेद्यांबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला. पण अमेरिकन परराष्ट्रखात्याची अशी दुटप्पी वागणूक देशाच्या सुरक्षिततेसंबंधीची एक नवी डोकेदुखीच झाली.

प्रेसलरची दुरुस्ती अमलात येऊन पाकिस्तानला व अन्वयाने अफगाणिस्तानमधील युद्धाला मिळणारी मदतीत खंड पडू नये म्हणून अमेरिकन अधिकारी पाकिस्तान अण्वस्त्रे बनवीत नाहीं अशी खोटी माहिती प्रतिनिधीसभेला बिनदिक्कतपणे देत राहिले. इतकेच काय पण बार्लोच्या अहवालात परराष्ट्रखात्याने व स्वत: राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी किती वेळा सीलबंद वॉरंट जारी केलेले असूनही अशी चोरून खरेदी करणार्याद एजंटसना टिप देऊन त्यांच्यासाठी लावलेल्या सांपळ्यातून पळून जाऊ दिले होते याचा तपशील होता.

पाकिस्तानला अमेरिकेने असे झुकते माप देऊ केले कारण पाकिस्तानने अमेरिकेला रशियाबरोबरच्या अफगाणिस्तानातील युद्धात सक्रीय मदत केली. त्याशिवाय पाकिस्तानच्या उत्तर विभागातून अमेरिका रशियाच्या कझाकस्तान येथील अण्वस्त्र-केंद्रांवर गुप्त नजर ठेवू शकत होता, त्यांच्या गुप्त सैनिकी तळांवरून अमेरिकेची "यू-२" जातीची गुप्तहेर विमाने उड्डाण भरत होती. गुप्त माहिती गोळा करताना व CIA ला रशियाविरुद्धच्या कारवाया करताना पाकिस्तानमधील तळच मदतीला येत होते. म्हणूनच एकेकाळी पूर्णपणे वाळीत टाकल्या गेलेल्या पाकिस्तानला रशियाविरुद्धच्या लढाईतील एक व्युहात्मक साथीदार बनवून अमेरिकेने त्याला पुन्हा "माणसा"त आणले. झुल्फिकार अली भुत्तोंच्या कारकीर्दीपासून पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्रे बनविण्याच्या मागे लागला आहे. भारताने १९७४ साली पोखरण-१ च्या अंतर्गत एक चांचणी-स्फोट केल्यापासून तर त्या प्रयत्नांना खूपच जोर आला. पण पाकिस्तान हा राजकीय दृष्ट्या अतीशय अस्थिर देश, तिथे एका पाठोपाठ एक लष्करी क्रांत्या (coup d’états) व्हायच्या, वारंवार जातीय दंगली व्हायच्या अशा देशाला अण्वस्त्रसज्ज बनविणे एक भयप्रद जोखीम आहे व ही शस्त्रे चुकीच्या हातात पडली तर ही सर्वसंहारक अण्वस्त्रे सर्वांनाच धोकादायक होतील याची भीती बार्लोला होती. पण तरी पैसा व साधनसामुग्री देऊन अमेरिकेने पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज बनविले व F-16 जातीची ६० फायटर जेट विमाने अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेची बनवून त्याला पुरवली व या फेरबदालांबाबतही अमेरिकन प्रतिनिधीगृहाला "ही विमाने अण्वस्त्रे वाहून नेऊ शकत नाहींत" अशी खोटी माहिती दिली.

ACDA असताना व त्यानंतरही पाकिस्तानच्या सर्वसंहारक शस्त्रांच्या जुळवाजुळवीबद्दलची गोपनीय माहिती व पुरावे सततपणे रिच बार्लोच्या हातात येत होते. याबद्दल तो आपल्या वरिष्ठांना वारंवार माहिती देत होता, पण वरिष्ठाची प्रतिक्रिया मात्र त्याला अनाकलनीय वाटत असे. लवकरच त्याच्या लक्षात आले कीं नुसते वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर खुद्द राष्ट्रपतींनाही त्याने दिलेली माहिती रुचत नव्हती. ते अगदी त्याविरुद्धची भूमिका घेत होते. ते अण्वस्त्रप्रसाराविरुद्धचे अमेरिकेचे व आंतरराष्ट्रीय कायदे पाकिस्तानी महत्वाकांक्षांना उचलून धरण्यासाठी तोडत होते. पाकिस्तानला सर्वसंहारक शस्त्रांबद्दलची निषिद्ध माहिती ते विकत होते कारण एक मदत करणारा देश व अमेरिकी शस्त्रास्त्रें व नगद पैसा मुजाहिदीनना पुरवण्याचा प्रमुख मार्ग म्हणुनचे पाकिस्तानचे व्यूहात्मक महत्व असाधारण होते. पण रिच बार्लोला मात्र हे पटत नव्हते कारण पाकिस्तानला एक मित्रराष्ट्र म्हणून वागविणे ही एक गोष्ट होती, पण त्याला एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविणे ही एक वेगळीच गोष्ट होती. एक कमी कमी कालावधीच्या अल्प फायद्यासाठी दीर्घ मुदतीच्या फायद्याकडे पाहून सार्या जगाची सुरक्षितता पणाला लावायला नको होती यात शंकाच नाहीं.

१९८९ मध्ये त्याला असे आढळले कीं पाकिस्तानने अवैध मालाची खरेदी तर चालू ठेवली होतीच पण त्याला मिळालेले अण्वस्त्र बनविण्याचे ज्ञान "गुंड (rogue)" देशांना विकायला सुरुवात केलेली होती. स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासातून संरक्षणखात्याची हेर संघटनाही याच निष्कर्षाला पोचली होती. संरक्षणखात्याच्या अधिकार्यां कडून बार्लोवर अहवाल बदलण्यासाठी दबाव येऊ लागला. त्याने जेंव्हा असे करण्याला नकार दिला तेंव्हा त्याच्या ऑफीसमधून फायली गायब होऊ लागल्या व त्याच्या सेक्रेटरीने सांगितले कीं एक वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडे येणार्याह फायली मधेच अडवत होत. त्याच सुमाराला १९८९ मध्ये ६० F-16 विमानांच्या विक्रीमध्ये अडकाठी केल्याचा आरोपासारखे खोटेनाटे आरोपही ठोकण्यात आले, त्याने लिहिलेल्या अहवालात दडपून बदलाबदलही करण्यात आले व त्याला नोकरीवरून कमी तर करण्यात आले.

इतकी महत्वाची बातमी कशी काय गुप्त राहू शकली? खरे तर वॉशिंग्टन डीसीची गुप्तता राखण्याबाबतची ख्याती फारच क्षुद्र आहे. "चाळणीसारखी गळणारी" अशी हिची "कीर्ती". तरी ही बातमी कित्येक वर्षें गुप्त कशी राहिली हे एक आश्चर्यच आहे. त्यातल्या त्यात १९९०पासून चार वर्षें अमेरिकेचे परराष्ट्र खाते, सीआयए व संरक्षणखाते यांची बार्लोने जाहीर केलेल्या बेकायदेशीर पाकिस्तानी खरेद्यांबाबत अंतर्गत चौकशी चालू असताना सुद्धा! यावरून आपल्या ’रॉ’सारख्या गुप्तचरखात्याचे वाभाडेच निघाले आहेत. या सार्याष भारतीय संघटनांना या बेकायदेशीर हालचालींचा जरासाही वास कसा आला नाहीं?

भारतातल्या फारच थोड्या लोकांना हे माहीत असेल कीं १९९० साली भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटणार होते. दोघांच्या सेना तर भिडल्या होत्याच, पण पाकिस्तानला चांगले माहीत होते कीं पारंपरिक शस्त्रात्रे वापरून ते दिल्ली कधीच काबीज करू शकत नाहींत, मग उरला अणूयुद्धाचा पर्याय. पाकिस्तानचा तसा मनसुबाही होता पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा खात्याचा तत्कालीन सभासद व आजचा संरक्षाणमंत्री रॉबर्ट गेट्स् यांच्या मुत्सद्दीपणाने हे अणुयुद्ध टाळले गेले. त्यांनी दोन्ही सेनांना तर दूर खेचले व आपत्ती टाळली. कांहीं वृत्तपत्रांनी याबद्दल अर्धवट माहिती दिली पण त्या बातम्यांचा उगम कुठे झाला हे कळले नाहीं अशी मखलाशी करून बुश-४१ च्या संरक्षणखात्याने त्या माहितीला ’अतिशयोक्ती’ ठरवून व दुर्लक्ष करून ’मारून टाकले’.

जर या "आधुनिक हरिश्चंद्रा"ने-रिच बार्लोने-एक सच्चा देशभक्त, कायद्याचे पालन करणारा व सदसद्विवेकबुद्धीची टोचणी असलेला नागरिक या नात्याने "शिट्टी वाजविली" नसती तर अमेरिकेच्या या दुटप्पी धोरणाबद्दलची व अमेरिकेने पाकिस्तानला गुपचुपपणे अण्वस्त्रसज्ज करून भारताचा कसा विश्वासघात केला याची माहिती जगाला कधीच कळली नसती. १९९८ साली पाकिस्तानने केलेले चांचणीस्फोट केवळ "देखाव्या"पोटी केले होते, कारण अमेरिकेने पाकिस्तानला १९९० च्या आधीच अण्वस्त्रसज्ज केलेले होते.

शालेय शिक्षण पूर्वेकडील राज्यांत झाल्यानंतर रिच बार्लोचे उच्च शिक्षण पश्चिम किनार्यापवरील वॉशिंग्टन राज्याच्या Western Washington University मध्ये झाले. १९८० साली अण्वस्त्रप्रसाराविरुद्ध त्यांनी लिहिलेला प्रबंध (thesis) पाकिस्तानबद्दलची गोळा केलेली प्रचंड गुप्त माहिती एका बाजूस व पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज बनण्यापासून रोखण्यात आलेले अपयश दुसर्याण बाजूस याच्या पृथ:करणावर होता. बार्लोंनी निष्कर्ष काढला कीं हे अपयशाचे कारण पाकिस्तानच्या इराद्याबद्दलच्य माहितीमधील तृटी नसून ही माहिती वापरणार्याढत असलेला धोरणविषयक दिशाच आहे.आणि हे अपयश धुवून काढणे हे बार्लोंनी त्यांच्या सरकारी नोकरीच अंतिम ध्येय बनविले.

म्हणून अण्वस्त्रांच्या फैलावाविरुद्ध त्यांनी अगदी ध्यासच घेतला. त्यांनी CIA या संघटनेला "संशोधनावर आधारित पृथ:करण" (invstigative analysis) या एक नव्या प्रावीण्याची ओळख करून एक क्रांतीच घडवून आणली. हे प्राविण्य आम्ही तोपर्यंत वापरलेल्या पारंपारिक प्राविण्याहून खूप वेगळे होते. तेंव्हापासून आमचे खाते या प्राविण्याचा जास्त-जास्त वापर करत आहे.

त्यांना अण्वस्त्रांच्या काळ्या बाजारातील व्यवहारांबद्दल अतोनात काळजी होती कारण ही अण्वस्त्रे चुकीच्या हातात पडली तर पाश्चात्य राष्ट्रांना तो एक मोठाच धोका होता व अमेरिकन भूमीवर असे अस्त्र डागले जायची ही भीती आजही खरीच आहे. शिकत असतांना बहुतेक सर्व माहिती त्याने वृत्तपत्रे, पुस्तके, प्रतिनिधीसभेतील सुनावण्या वगैरेमधून मिळविलेली होती व त्यात त्याला पाकिस्तानसारखे देश कसे अण्वस्त्रे बनविण्यासाठी लागणारी साधन-सामुग्री मिळविण्याच्या मागे लागले आहेत याची त्याला खूप काळजी होती.

जेंव्हा रेगनने अमेरिकेला "स्टारवॉर" सारखे कार्यक्रम राबवून पुन्हा शस्त्रसज्ज करण्याचा निर्धार करून ACDA विभाग बंद केला व तिथल्या नोकर्यां्मध्ये ३३ टक्के कपात केली त्यात रिच बार्लोला डच्चू मिळाला. तो वॉशिंग्टन सोडून कनेक्टिकट राज्यातल्या एका किराणामालाच्या गोदामात शेल्फांवर सामान ठेवायचे किरकोळ काम करत असताना त्याची प्रेयसी सिंडीबरोबर (Cindy) विवाहबद्ध झाला.

पण लगेचच त्याला सीआयएच्या शास्त्रीय व शस्त्रात्रसंशोधन खात्यात (CIA’s Office of Scientific and Weapons Research-OSWR) पाकिस्तानबद्दलचा संशोधक म्हणून पुन्हा नोकरी मिळाली. उत्कृष्ठ प्रतीचे काम करून बार्लोंनी सर्वसंहारक शस्त्रांमधला एक तज्ञ म्हणून ख्याती मिळविली व तो सीआयएमधला एक गुप्तहेर बनला.

शेवटी परिणाम हाच झाला कीं रिच बार्लोने अथकपणे व सदसद्विवेकबुद्धीने अमेरिकेच्या अमेरिकन व आंतरराष्ट्रीय कायदे मोडण्याविरुद्धची व सार्याव जगाला एका भावी अण्वस्त्रयुद्धाच्या खाईत ढकलण्याविरुद्धची मोहीम जरी जारी ठेवली तरी त्याचा परिणाम म्हणून त्याला नोकरीवरून पुन्हा काढण्यात आले व बेइमान, विश्वासघातकी, वेडा, दारुड्या व स्त्रीलंपट अशी त्याची नाचक्कीही करण्यात आली.

सुरक्षेबद्दलची सरकारी परवानगी काढून घेतल्यावर बार्लोला पुन्हा नोकरी मिळालीच नाहीं व त्याचे लग्नही मोडले. बार्लो एके ठिकाणी म्हणतो कीं सरकारने निर्दयपणे त्याच्या वैयक्तिक व व्यवसायिक आयुष्याचा सत्यानाश केला. केवळ माझी कारकीर्दच नव्हे, पण त्यानी माझ्या विवाहावरही हल्ला केला, माझे चरितार्थाचे सधन नष्ट केले, माझ्या नावाला काळिमा फासला, तोही इतक्या निर्दयतेने कीं अशी शिक्षा याआधी वा नंतर कुणाला झाली नसेल. बार्लोच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावरचे आरोप धादांत खोटे, भारुड होते व त्याला अमेरिकेच्याच प्रतिनिधीगृहाचा गुप्तहेर (पित्त्या) ठरविण्यात आले, त्याला मद्यपी, दारुड्या ठरविण्यात आले, त्याच्यावर करबुडवेपणाचा व बाहेरख्यालीपणाचाही आरोप ठेवण्यात आला. त्याला मनोरुग्ण ठरवून त्यांनी त्याच्या लग्नासंबंधीच्या खास वैयक्तिक माहितीतही आक्रमण केले, CIA साठी काम करणार्याय त्याच्या घटस्फोटित पत्नीच्या वैयक्तिक गोष्टींचाही सन्मान ठेवला नाहीं व मला शिक्षा म्हणून माझ्या लग्नाचा विनाश करण्याचा प्रयत्न केला.

१९९० मध्ये आठ महिन्यांच्या चौकशीनंतर ते सर्व आरोप खोटे होते असे सिद्ध झाले. १९९०च्या ऑगस्टमध्ये बार्लोला केवळ २६,००० डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याची तयारी संरक्षण मंत्रालयाने दाखविली. पण बार्लोला याविरुद्ध वरिष्ठांच्याकडे अपील करायचे होते म्हणून त्याने ही रक्कम नाकारली.
जरी त्याला नंतर निर्दोष ठरविण्यात आले तरी त्याला सरकारकडून पेन्शन मिळाली नाहीं व त्याला नोकरीही मिळत नाहींय्. जेंव्हा २००५ साली प्रकशित झालेल्या एका पुस्तकात बार्लो एका ट्रेलरघरात त्याच्या दोन कुत्र्यांबरोबर रहातो असे प्रसिद्ध झाले, तेंव्हा एकच खळबळ उडाली होती.
पुढे त्याने सरकारवर उलट खटला केला त्यात त्याचा वकील म्हणून "जहाल चांडाळचौकडीतला"तला वुल्फोवित्झ उभा राहिला व त्याने अमेरिकन प्रतिनिधीगृहापासून अशी बातमी लपविणे अयोग्य होते असे सांगून बार्लोवरील कारवाई अयोग्य आहे असे प्रतिपादन केले. बार्लोच्या सर्व आरोपांचे पूर्णपणे खंडन झाले असले व तो दोषमुक्त म्हणून बाहेर पडला असला तरी दोषी असलेल्या चांडाळचौकडीवर (चेनी, विल्फोवित्झ, लिबी व हॅड्ली यांच्यावर) कांहींच कारवाई झाली नाहीं.

या उच्चपदस्थलोकांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन योग्यशी कारवाई केली असती तर पाकिस्तान आज अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले नसते आणि दक्षिण आशियाला असे अणुयुद्धाच्या खाईतही लोटले गेले नसते. याशिवाय पाकिस्तानने बेजबाबदारपणे लिबिया, इराण, उत्तर कोरियाला अण्वस्त्रे बनविण्याचे तंत्र विकले नसते (ज्याबद्दल सर्वात जास्त कोल्हेकुई हीच मंडळी करताहेत) व ही गुंड राष्ट्रे आज अमेरिकेवरच गुगुरताना दिसली नसती.

१९८७साली रशियन सेना पराभव मान्य करून अफगाणिस्तानातून बाहेर पडली व "गरज सरो, वैद्य मरो" या नात्याने अमेरिकेनेही पाकिस्तानला एकाद्या पोतेर्याोसारखे कोपर्या त फेकून दिले. त्यामुळे फुकटच्या पैशावर अय्याशी करणार्याा राष्ट्राला व त्याच्या नेत्यांना पैशाची चणचण भासू लागली. मग त्यांनी काय उपाय शोधला? लिबिया, इराण व उत्तर कोरियासारख्या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना त्यांनी अण्वस्त्रे बनविण्याची यंत्रसामुग्री, तंत्रविद्या व लागणारे सामान नगद पैशाला विकले. पण अमेरिकेचे लक्ष कुठे होते? बुश-४१ व त्याचे वरिष्ठ अधिकारी/सल्लागार सद्दाम हुसेनला भिडायला सज्ज होत होते व पाकिस्तानच्या या माकडचेष्टांकडे त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले.

कुवेतचे युद्ध संपले पण सद्दाम गादीवरच तसाच राहिला. त्याचे बुश-४१ च्या चेनी, वुल्फोवित्झ, रम्सफ़ेल्ड व लिबी या बहिरीससाण्यांच्या चांडाळचौकडीला फार वैषम्य वाटले व त्यांनी सद्दामला उडवायचे कट आखायला सुरुवात केली. पाकिस्तानच खरा शत्रू आहे असे पुरावे असूनही या चौकडीने इराकला मुख्य लक्ष्य बनविले व बुश-४३ राष्ट्रपती झाल्यावर व ९/११ नंतरच्या खास वातावरणात त्यानी पुन्हा एकदा पाकिस्तानला दोषमुक्त ठरवून "अतिरेक्यांविरुद्धच्या युद्धा"तला सहकारी राष्ट्र बनविले. ९/११ नंतरच्या विषण्ण व दुःखदायक वातावरणात पाकिस्तानला पुन्हा एकदा अमेरिकन सैनिकी व आर्थिक मदतीचा फुकटचा मलिदा पुन्हा खायला मिळाला.

काय विरोधाभास पहा! आज पाकिस्तानचे राष्ट्रपती सगळ्या जगाला उघडपणे (आणि निर्लज्जपणे) सांगत आहेत कीं पाकिस्ताननेच तालीबान व अल् कायदासारख्या अतिरेकी संघटना उभ्या केल्या व वाढविल्या. म्हणजे अमेरिकेने दिलेले पैसे त्यांनी अगदी चुकीच्या कामासाठी वापरले व अतिरेकी संघटनांचा खातमा करण्याऐवजी त्यांना पोसले. याच संघटनेने त्यांच्या पत्नीचा बळी घेतला व आता उलटे वळून जन्मदात्यावरच वार करीत आहेत व पाकिस्तानच्या कायदेशीर पद्धतीने राज्यावर आलेल्या सरकारला शरण आणायला पहात आहेत! २२ जूनला अल जझीरा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुस्ताफा अबुल याझीद या अल कायदाच्या तीन नंबर्च्या नेत्याने धमकी दिलीच आहे कीं जर पाकिस्तानला नमवून त्यांनी त्याची अण्वस्त्रे हस्तगत केली तर ते सर्वप्रथम अमेरिकेवरच डागतील. म्हणजे उद्या जर अमेरिकेवर अणूबॉंब पडला, तर त्यात पाकिस्तानचाच हात असणार.

वारंवार नोकरीवरून विविध आरोपांवर काढून टाकल्या गेलेल्या रिच बार्लोला नोकरी मिळेना व तो कफल्लक झाला. पण सरकारशी लढण्याच्या त्याच्या प्रयत्नांत एक शुभ गोष्ट घडली. जॉन्सनच्या कारकीर्दीत उपसंरक्षणमंत्री असलेल्या व कार्टरच्या कारकीर्दीत ACDA चे संचालक असलेल्या पॉल वॉर्न्क यांनी त्याची केस आभ्यासली व त्यांचे वकीलपत्र प्रो-बोनो (जनतेच्या भल्यासाठी) तत्वावर घेतले. बुश-४१ यांनी १९९० साली जरी पाकिस्तानला अण्वस्त्रहीन राष्ट्र म्हटले असले तरी ९१ व ९२ साली ते तसे दाखलापत्र द्यायला तयार नव्हते. त्यामुळे प्रेसलर कायद्यानुसार पाकिस्तानची मदत थांबली, पण अमेरिकेत बनलेली शस्त्रे खासगी कंपन्यांकडून घ्यायला बंदी नसल्यामुळे ही बंदी परिणामकारक होत नव्हती.

परवेझच्या अटकेची चौकशी चालूच राहिली. सोलर्झने त्याबाबत एक खास गुप्त बैठक बोलावून प्रतिनिधीसभेत सुनावणी सुरू केली. या चौकशीच्या सत्रात जायच्य़ा आधी चार्ल्स् बुर्क या बार्लोंच्या बॉसने त्याला प्रश्न विचारल्यास खरे उत्तर द्यायला सांगितले होते. परवेझ व इनामुल हक हे पाकिस्तानचे एजंट होते काय? या प्रश्नाला जन. आईनसेल यांनी ’नरो वा कुंजरो वा’ थाटात दिलेले उत्तर न रुचल्यामुळे सोलार्झ यांनी सर्वात मागच्या ओळीत बसलेल्या बार्लोला तोच प्रश्न विचारला. बार्लोने खरे उत्तर देताना सांगितले कीं परवेझ नक्कीच पाकिस्तानचा अण्वस्त्रनिर्मितीसाठीच्या टोळीतला एजंट होता. मग बैठकीच एकच कोलाहल माजला. "बार्लोला काय कळतंय्?" असे जन. आईनसेल गरजले. पण सोलर्झ यांनी पुन्हा बार्लोला विचारले कीं या एका केस व्यतिरिक्त आणखी कांहीं केसेस आहेत कां? जन. आईनसेल गरजले "नाहींत", पण बार्लो म्हणाले कीं अशा अनेक केसेस आहेत. "बार्लो मूर्ख आहे" असा शेरा मारत जन. आईनसेल बाहेर पडले, पण सरकारच्या अखत्यारीतील योजना (Projects on Government Oversight) या खात्याची संचालिका असलेल्या श्रीमती डॅनियेल ब्रायन यांनी बार्लोच्या म्हणण्याला पुष्टी दिली. त्या म्हणाल्या कीं केवळ ’पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती अमेरिकन प्रतिनिधीसभेला दिली पाहिजे’ या एका सूचनेवरून बार्लोला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

आज हा आधुनिक हरिश्चंद्र एका झोपडपट्टीसारख्या एका "ट्रेलर" मध्ये रहातो. पैशाची वानवा आहे. संगणकही उधारीवरचा आहे, पण "बचेंगे तो और लडेंगे"च्या आवेशात त्याची आजही सरकारशी न्यायासाठी झुंज चालूच आहे. आता डेमोक्रॅटिक सरकार, ओबामासारखा समंजस नेता व अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांत (प्रतिनिधीसभा व सेनेट) डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत अशा सोयीच्या वातावरणात त्याला न्याय मिळेल व त्याची सांपत्तिक स्थिती सुधारेल अशी आशा करू या.

खरे तर बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी १० लाख डॉलरची नुकसान भरपाई देऊ केली होती, पण ती सरकारी लाल फितीत अडकली व नंतर क्लिंटन यांची कारकीर्द संपल्यावर राष्ट्राध्यक्ष झालेल्या बुश-४३ यांनी व त्यांच्या टेनेट व हेडेन या अनुक्रमे CIA व NSA च्या संचालकांनी बार्लोंचा संपूर्ण दावा फोल ठरविला. म्हणजे भारताप्रमाणे अमेरिकेतही देशभक्तीचे मूल्यमापन पक्षनिहाय होऊ लागले काय?

ही केस एक अन्याय दूर करण्यासाठी प्रतिनिधीसभेसमोर ठेवण्यात आली होती पण तो दूर करण्यात प्रतिनिधीसभेला अपयश आले या शब्दात जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या डीननी (रॉबर्ट गालुच्ची) या केसबद्दल जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली.

आता पन्नाशीला पोचलेला बार्लो व त्याचे समर्थक बिलात सुधारण व्हायला हवी असे प्रयत्न करत आहेत पण त्यातही अडचणी आहेत.
एक जिप्सीसारखे जीवन जगणारा बार्लो पदरचे १०० डॉलर्स खर्च करून १०० किलो वजनाचे जमा केलेले कागदपत्र लॉकरमध्ये ठेवून कधी मोंटाना तर कधी अरीझोना/कॅलीफोर्निया येथे ट्रेलर घेऊन हिंडतो.

सोमवार ते शुक्रवार तो चिकाटीने आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जिन करून घेण्यासाठी ई-मेल व सेल फोनवरून वॉशिंग्टनला फोन करत बसतो. ही एक असाधारण केस आहे असे श्रीमती ब्रायन म्हणतात ते खोटे नाहीं. केवळ कॉंग्रेसला सत्य सांगा अशी सूचना करणार्या ला असा त्रास भोगावा लागतो हे किती चुकीचे आहे!

थोडक्यात सांगायचे तर अमेरिकन सरकारने इथे स्वत:च्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे! कीं "करावे तसे भरावे" या म्हणीचा पुन:प्रत्यय येतोय्?
पाकिस्तानी नेते तर पैसे खाऊन-खाऊन गब्बर झाले, पण पाकिस्तानच्या गरीब जनतेने काय पाप केले आहे? त्यांना कां अशी शिक्षा व्हावी?
*In this article, Bush-41 stands for George H W Bush, 41st President of USA and Bush-43 stands for George W Bush (Dubya), 43rd President of USA.
The article is based on information gathered from many websites on the internet.
चित्रे नंतर अपलोड करेन.

राजकारणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

5 Nov 2009 - 9:06 am | सहज

लेख आवडला.

बिचारा बार्लो! त्याला अजुन बुकडील, मुव्ही डील, सेमिनार्स मिळाले नाहीत याबद्दल वाईट वाटते. लवकर त्याचे दिवस पालटतील अशी आशा करु या.

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:27 pm | मिसळभोक्ता

बिचार्‍या बार्लोचे चांगले दिवस येतील, आणि त्याची मैत्रिण रोजमेरी मार्लो त्याच्याकडे परत येईल, अशी आपण प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करू या.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मदनबाण's picture

5 Nov 2009 - 9:42 am | मदनबाण

फारच सुरेख लेख... :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

मॅन्ड्रेक's picture

5 Nov 2009 - 3:32 pm | मॅन्ड्रेक

at and post : Xanadu.

तेन्नालीराम's picture

6 Nov 2009 - 7:57 am | तेन्नालीराम

सुधीरभाऊ,
लेख आवडला पण मधे-मधे डोक्यावरून गेल!
ते. रा.

सुधीर काळे's picture

6 Nov 2009 - 11:15 am | सुधीर काळे

आधी म्हटल्याप्रमाणे मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy/Catherine Scott-Clarke या द्वयीने लिहिलेले पुस्तक वाचत आहे.

मी जेंव्हां "उत्तम कथा"त प्रकाशित झालेला बार्लोवरचा लेख लिहिला तेंव्हां मी हें पुस्तक वाचले नव्हते. या ६०० पानी पुस्तकात बार्लोची माहिती फक्त दहा पानं आहे. बाकीची पानें झिया-उल-हक-बेनझीर-१-नवाज़ शरीफ-१-बेनझीर-२-नवाज़ शरीफ-२-मुशर्रफ या पाकिस्तानी मुखियांवर व कार्टर-रेगन-बुश-४१-क्लिंटन-बुश-४३ या पाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर आहेत! अमेरिकन अध्यक्षांनी आधी अफगानिस्तानच्या निमित्ताने व नंतर War-on-terror च्या निमित्ताने पाकिस्तानचे अतोनात लाड केले व त्या 'pariah' राष्ट्राच्या "वाह्यात चाळ्यां"कडे जाणून-बुजून साफ दुर्लक्ष केले.

आता जेंव्हा पाकिस्तान "तालीबान/अल-कायदा"च्या हातात पडू घातला आहे तेंव्हा कुठे अमेरिकेला या धोक्याची झळ लागू लागली आहे. पण पाकिस्तान तालीबान/अल-कायदाच्या हाती पडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे! आज ना उद्या हे होणारच आहे!

"अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेवर २१ जून ०९ला प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर त्यांच्या संघटनेच्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरतील!

अमेरिकेत रहाणारे असंख्य भारतीय व आपणा सर्वांचे असंख्य नातेवाईक यांच्यासाठी तरी देव करो व असे कधीही न होवो, पण असे कधी झालेच तर तो एक "कवीय न्यायच (poetic justice)" ठरावा इतकी पापें अमेरिकेच्या सरकारने केली आहेत असे या पुस्तकावरून वाटते. त्याआधी वाचलेल्या "How the neoconservatives took hold of White House and destroyed the Bush Presidency असा विषय असलेले व "The fall of House of Bush" या नावाच्या पुस्तकातही इराकवर वटारलेल्या डोळ्यात पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सौम्यता येऊ नये म्हणून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले होते. इराकमध्ये तर हाती धुपाटणे च आले, पण पाकिस्तानशी वेळेवरच दोन हात केले असते तर आज उत्तर कोरिया व इराणसारखे भावी व पाकिस्तानच्या ताब्यातील अण्वस्त्रे हाती घेतलेली अल-कायदा संघटनेसारखे उद्याच छातीवर बसणारे शत्रू निर्माण झाले नसते!

मी या विषयावर लिखाण करणार आहे. वॉकर बुक्स कंपनीकडे कॉपीराईटची परवानगी मागितली आहे, बघू देते का!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

योगी९००'s picture

6 Nov 2009 - 7:16 pm | योगी९००

मस्त माहिती कळाली... ही बार्लोची कथा (की व्यथा ??) माहीत नव्हती..!!!!

पकिस्तानी अण्वस्त्रे जर त्यांच्या संघटनेच्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरतील!

आणि आधी प्रायोगिक तत्वावर भारताविरूद्ध वापरतील..!!!!

अमेरिकेत रहाणारे असंख्य भारतीय व आपणा सर्वांचे असंख्य नातेवाईक यांच्यासाठी तरी देव करो व असे कधीही न होवो,
हे मला आवडले नाही. फक्त भारतीय लोकांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा सर्व जणांसाठी प्रार्थना करावी. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो.

खादाडमाऊ

सुधीर काळे's picture

6 Nov 2009 - 8:22 pm | सुधीर काळे

खादाडमाऊ-जी,
माझी सख्खी धाकटी बहीण, दोन्ही मुले व एकुलती एक नात तिथं रहात असल्यामुळं मी असा जरासा स्वार्थी वागलो तर रागवू नये! तशी काळजी प्रत्येक व्यक्तीची आहेच, पण "अपना वो फिरभी अपना!"
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

आधी एकदा म्हटल्याप्रमाणे "नेमबाजीचा सराव (target practice)" आपल्यावर नक्कीच होईल असे वाटते. पण त्यांचे नेम चुकोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

सुवर्णा's picture

6 Nov 2009 - 12:13 pm | सुवर्णा

बरीच महिती मिळाली.. अजुन असे लेख वाचायला आवडतील..

सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/

सुधीर काळे's picture

6 Nov 2009 - 2:11 pm | सुधीर काळे

खरं तर मलाही असे लेख लिहायला आवडतं, पण मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं.
कदाचित अतिरेकी, पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या विषायात मिपा वाचकांना रस नसेल किंवा त्यांना माझ्या लिखाणाची शैली आवडत नसेल किंवा आणखीही कांहीं अज्ञात कारण असेल. पण ६०० वेळा वाचूनही कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या वाचनावरून, अनुभवावरून माझ्या लेखात कांही भर घालावी, विरोध करावा किंवा मी लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या वाचनाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विवेचन करावे असे वाटत नाहीं असे दिसते.
असो.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

गणपा's picture

6 Nov 2009 - 5:23 pm | गणपा

नाही हो काळे काका तुम्ही लिहाच या विषयावर.
आम्ही वाचतो आहोत, आपल वाचन अफाट आहे.
या विषयांवर माझ्या सारख्या अडाण्याच ज्ञान तोकड असल्याने टिप्पणी करु शकत नाही पण आम्ही आवर्जुन आपले लेख वाचतो.

अडाणि's picture

6 Nov 2009 - 10:05 pm | अडाणि

माझ्या सारख्या अडाण्याच ज्ञान तोकड असल्याने टिप्पणी करु शकत नाही

बाकी लेख जरूर वाचतो....
-
अफाट जगातील एक अडाणि.

आनंद घारे's picture

6 Nov 2009 - 5:58 pm | आनंद घारे

पण ६०० वेळा वाचूनही

फक्त दोन दिवसात इतकी वाचने झाली यावरून लोकांना असे लेख वाचायला आवडतात हे स्पष्ट आहे.
कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या वाचनावरून, अनुभवावरून माझ्या लेखात कांही भर घालावी, विरोध करावा किंवा मी लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या वाचनाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विवेचन करावे असे वाटत नाहीं असे दिसते.
ते वाचकांच्या कुवतीवर अवलंबून आहे. या विशिष्ट विषयासंबंधी अवांतर वाचन केले असलेले आणि अशा चर्चेत भाग घेण्याएवढी क्षमता असलेले लोक दुर्मिळच असणार.
मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं.
मिसळपाव या नावाप्रमाणेच इथला वाचकवर्ग एकसंध नाही. भिन्न लोकांच्या आवडी भिन्न असणार. तिकडे लक्ष न देता स्वांतसुखाय लिहीत रहा. वाचणारे वाचतील.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

स्वाती२'s picture

6 Nov 2009 - 7:48 pm | स्वाती२

लेख वाचला. परंतु या विषयावर काही अधिकाराने बोलावे एवढा माझा अभ्यास नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण, पेंटॅगॉन वगैरे गोष्टी हिमनगासारख्या. जे 'बातमी' म्हणून दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पडद्यामागचे नाटक चालते. एवढ्या गुंतागुंतीच्या विषयावरच्या लेखाला 'छान! माहितीपूर्ण ' वगैरे एक दोन शब्दांचा प्रतिसाद देण्यापेक्षा रोमात राहाणे मी तरी पसंत करते.
प्रतिसादांची संख्या कमी म्हणून लिहायचे थांबवू नका.

अवलिया's picture

6 Nov 2009 - 6:11 pm | अवलिया

वाचने आणि प्रतिसादाची सांगड घालुन लिहाल तर तुमचा विनायक पाचलग होईल.

लिहायचे वाटते ते लिहा, प्रतिसाद येवो न येवो !

काही विषयांवर लोकांना वाचायला आवडते, लिहायला नाही (मीही त्यातलाच एक)

लिहा ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

आपले म्हणणे पटते व ते कांहीं अंशी खरेही असेल. पण कधी-कधी आपण भिंतीशी तर बोलत नाहीय ना असं मनात येतं हे मात्र खरं! यायला नाहीं पाहिजे हे पटत असूनही.....!
पण सल्ल्याबद्दल मनापासून धन्यू! आणि मी हा प्रतिसाद यॉर्कर मानत नाहीं व माझी दांडीही तुम्ही शाबूत ठेवली आहे.
पुनश्च धन्यवाद.
(धन्यवाद या शब्दाची व्युत्पत्ती कुणी सांगू शकेल कां? धन्यवादात "धन्य"ही कांहीं नाहीं व "वाद"ही! हाहाहा!!)
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

हरकाम्या's picture

6 Nov 2009 - 8:33 pm | हरकाम्या

काळे तुम्ही जरुर लिहा कोणी वाचो अथवा न वाचो मी मात्र तुमच्या लेखांची आतुरतेने वाट पहात असतो.

सुधीर काळे's picture

6 Nov 2009 - 8:40 pm | सुधीर काळे

माझा "हौसला" वाढविल्याबद्दल सर्वांचे आभार!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

यशोधरा's picture

6 Nov 2009 - 8:48 pm | यशोधरा

अतिशय सुरेख लेख!

हे असले काही जनतेसमोर फारसे येतच नसावे, कोणता का देश असेना... असे किती तरी लोक पडद्याआड असतील..

बार्लोविषयी वाईट वाटले पण त्याच्या हिमतीची दादही द्यावीशी वाटते! काय अफाट मानसिक ताकद, स्वतःच्या कामावर श्रद्धा, विश्वास आणि आत्मविश्वास असेल ह्या माणसाकडे!

सुधीर काळे's picture

6 Nov 2009 - 9:06 pm | सुधीर काळे

अगदी खरं आहे! You said it, Ma'am!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

आशिष सुर्वे's picture

6 Nov 2009 - 9:20 pm | आशिष सुर्वे

लेख खरेच वाचनीय आहे..
पण हा लेख वाचल्यावर जेव्हा 'प्रस्तावना' वाचली, तेव्हा प्रतिसाद द्यायला अंमळ घाबरलो..

का?

वाचा.. >>

शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती!
>>

-
कोकणी फणस

अक्षय पुर्णपात्रे's picture

6 Nov 2009 - 9:29 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री काळे, लेखातून चांगली माहिती मिळाली. 'मिळणार्‍या'तील 'र' 'मिळणार्या' असा दिसतो. जमल्यास त्यात सुधारणा करावी. आंतरजालावरील माहिती असल्यास जमल्यास दुवे द्यावे. उदाहरणार्थ, रिचर्ड बार्लो (विकिदुवा).

'भार्‍या'ची 'भार्या' अज्ञानापोटी नव्हे तर नजरचुकीने झाली. क्षमस्व.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

अक्षय पुर्णपात्रे's picture

6 Nov 2009 - 9:47 pm | अक्षय पुर्णपात्रे

'भार्‍या'ची 'भार्या' अज्ञानापोटी नव्हे तर नजरचुकीने झाली.

नीट पाहीले असते तर असे झाले नसते. असो. संसार सुखाचा होवो.:)

नीट पाहिलेल्या लिखाणात "नजरचूक" कशी होईल पूर्णपात्रेसाहेब! वाईच इच्चार करा की राव!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

अक्षय पुर्णपात्रे's picture

6 Nov 2009 - 9:59 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री काळे, बरोबर आहे. हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर काळे's picture

7 Nov 2009 - 3:42 pm | सुधीर काळे

पूर्णपात्रे-जी,
खरं सांगायचं तर हा लेख मी मुळात लोकसत्ता-फ्रीडम हे सॉफ्टवेअर वापरून लिहिला होता. साधारणपणे या सॉफ्टवेअरने लिहिलेले लेख कॉपी-पेस्ट केल्यास फक्त चौकोन-चौकोन दिसतात. अपलोडिंग करेपर्यंत काय दिसेल याची खात्री नव्हती! (पहा ९६-मराठा यांचा या संदर्भात तात्यासाहेबांना लिहिलेल्या 'उडविण्याच्या' बाबतीतला प्रतिसाद).
मला वाटते कीं लिप्यंतर झाल्यामुळे 'र्‍या' व 'र्या' यांची अदलाबदल झाली असावी. पण सॉफ्टवेअर या प्रांतात आपल्याला गती शून्य असल्यामुळे नक्की हा चमत्कार का झाला हे माहीत नाहीं.
मी जेंव्हा बरहा किंवा गमभन वापरतो तेंव्हा अशी चूक सहसा होत नाहीं.
असो. इतक्या बारकाईने लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यू!
सुधीर
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

परिकथेतील राजकुमार's picture

7 Nov 2009 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार

अपलोडिंग करेपर्यंत काय दिसेल याची खात्री नव्हती!

आपल्याला लेख लिहुन / डकवुन झाला की 'पुर्वदृश्य' ह्या सेवेचा लाभ मिळत नाही का ? ती सेवा वापरल्यानंतर लेख जसा दिसतो तसाच्या तसाच मिपावर उमटतो.

(माझी हि प्रतिक्रीया आधी कुठेतरी प्रसिद्ध झाली होती, कुठे ते आठवत नाही पण आता) असो....

लेख वाचला, खुप माहिती मिळाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Nov 2009 - 4:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याला स्वत: चढवलेला लेख उडवण्याची सेवा मिळत नाही काय?

(ही प्रतिक्रिया आधी एका टॅब्लॉईडमधे प्रसिद्ध झाली होती, नस्त्या आरोपांना वैतागून आता नाव सांगत नाही.)

अदिती
(अधिक माहितीसाठी इजाभुंना भेटा)

सुधीर काळे's picture

7 Nov 2009 - 11:18 pm | सुधीर काळे

अदिती,श्रीती,श्रदिती,शदिती,सराजे व अदिती,
मागे एकदा श्री बिपिन कार्यकर्ते यांना मी फोनवर विचारले असता त्यांनी सांगितले होते कीं एकदा पोस्ट केलेला लेख वा प्रतिक्रिया फक्त संपादक मंडळच उडवू शकते. लिहिणारा त्यात बदल करू शकतो, पण erase करू शकत नाहीं. माझा एक छोटासा piece उडवण्यासाठी मला त्यांना विनंती करायला लागली होती.
कशामुळे कुणास ठाऊक पण कधी-कधी एकदा अपलोड केलेली पोस्ट किंवा प्रतिक्रिया दोनदा पोस्ट होतात. श्री आनंद घारे यांची एक प्रतिक्रिया तर ७ वेळा चढली होती. का ते त्यानाही कळलं नाहीं व मलाही कधी कळलं नाहीं.
गमभन वापरताना तर काय-काय व का distortions होतात ते मला अजून कळले नाहींय. उदाहरणार्थ या लेखाची सुरुवात पहा. आधी "राजे व आदिती" असे लिहिले होते. राजे यांचे आडनाव वापरल्यामुळे त्यामागे श्री लिहायला गेलो तर काय झाले ते तसेच ठेवले आहे व मुद्दाम बोल्ड केले आहे. असे फक्त गमभनवरच होते. लोकसत्ता फ्रीडम व बरहात होत नाहीं. गमभनवाल्यांना मी याबद्दल लिहिले पण त्यांचे अद्याप उत्तर आलेले नाहीं)
मिपावरचे असे अनेक Dark corners मला भेडसावतात, पण मी ते माझ्या stride मध्ये घेतो.
माझ्यासारख्या "non-IT"वाल्याला समजेल अशा भाषेत (in layman's language) जर कुणी सांगितले तर मी ऋणी होईन.
धन्यवाद
सुधीर
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 12:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद माझ्यासाठी नसून कुणा दितीसाठी असावा, तरीही उत्तर देत आहे.

माझ्यासारख्या "non-IT"वाल्याला समजेल अशा भाषेत (in layman's language) जर कुणी सांगितले तर मी ऋणी होईन.

माझ्यासारखे "non-IT"वाले प्रयोगातून विज्ञान शिकतात.

असो. प्रश्न माझ्या पेशाबद्दलचा नसावा. मी नेहेमीच गमभन वापरते, अगदी मिपाबाहेरही मराठी लिहायचं असेल तर गमभनवर लिहून दुसरीकडे चिकटवते आणि ते व्यवस्थित चालतं. आत्ताच 'श्री.राजे आणि अदिती' लिहिलं आणि आहे तसंच दिसत आहे, किमान मलातरी. ज्यांना वेगळं काही दिसत असेल त्यांनी श्री. येडा खवीस यांच्याशी संपर्क साधावा; विण्डोज वापरत असाल तर गमभनऐवजी मायक्रोसॉफ्टच येडं झालं असण्याची शक्यता आहे.

अनेकदा माझ्याही प्रतिक्रीया एकापेक्षा जास्त वेळा प्रकाशित होतात. याचं कारण प्रतिक्रीया प्रकाशित होण्याआधीच 'प्रकाशित करा' या बटणावर टिचकी मारणे. मिपाचा सर्व्हर जेव्हा प्रचंड बिझी होतो तेव्हा बर्‍याचदा अशा अनेक प्रतिक्रिया दिसतात.

कोणत्याही सदस्याला स्वतःचाच धागा काढता / उडवता येतो. त्यासाठी धागा उघडा, 'संपादन' या टॅबवर क्लिक करा आणि पानाच्या खालपर्यंत जाऊन 'काढून टाका' या बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे स्वतःचेच प्रतिसाद मात्र उडवता येत नाहीत.

अदिती

सुधीर काळे's picture

8 Nov 2009 - 12:11 am | सुधीर काळे

त्यासाठी धागा उघडा, 'संपादन' या टॅबवर क्लिक करा आणि पानाच्या खालपर्यंत जाऊन 'काढून टाका' या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे स्वतःचेच प्रतिसाद मात्र उडवता येत नाहीत. (मी फक्त स्वतःच्या लेखांबद्दल बोलत होतो! मला तरी 'काढून टाका' हे बटणच दिसत नाहीं.)
श्री.राजे आणि अदिती' लिहिलं आणि आहे तसंच दिसत आहे. (आधी नुसतं 'राजे व अदिती' लिही व मग कर्सर 'रा'च्या डावीकडे नेऊन श्री टाईप करून पहा. कदाचित तुलाही असा प्रत्यय येईल. मला नेहमीच distortion मिळतं. कसं टाळायचं तेही तुझ्यासारखे प्रयोगातून शिकलो आहे. पण ते करायला विसरलो कीं distortion होतेच व पुनर्टंकन करावे लागते. आता हा मायक्रोसॉफ्टचा की 'गमभन'चा प्रॉब्लेम आहे हे कळण्याइतके माझे यातले ज्ञान प्रगल्भ नाहीं.)
तू जे सांगितलेस ते करून पाहिले आहे. यापुढे कांहीं सांगण्यासारखं असेल तर स्वागत आहे.
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

याला उत्तर म्हणून तुलाच मी संबोधित कले होते!
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

सुधीर काळे's picture

8 Nov 2009 - 12:17 am | सुधीर काळे

प.रा.साहेब,
मी खरंच फार अनभिज्ञ आहे या बाबतहोईलमिपावर कधी काय होईल हे सांगता येत नाहीं.
पहा पुन्हा झाले distortion. होईल हा शब्द तिथे कसा आला ते कळत नाहीं. मुद्दाम करेक्ट केलेले नाहीं.
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

Nuclear Deception या पुस्तकात एक उल्लेख आहे की बुश-४३ यांच्या कारकीर्दीत अमेरिकेने "War on terror" लढण्यासाठी पाकिस्तानला ११ बिलियन डॉलर्स मदत दिली, त्यातले ३० टक्के पैसे लष्करी अधिकार्‍यांनी खाल्ले.
माझ्या मनात आले: पैसे खाताहेत वरिष्ठ अधिकारी व वजीरिस्तानमध्ये मरताहेत मात्र शिपुरडे! असं किती दिवस चालणार?
पाकिस्तान "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत" जगत आहे, अमेरिका पहात आहे पण मूग गिळून गप्प का बसते व मलिदा देतच का रहाते हे अजून कळत नाहीं.
"आपल्याला काय घेणं आहे?" अशा तर्‍हेची उदासीनता ठेवणेही बरोबर नाहीं. कारण आपण आज उदासीन राहिलो तर उद्या पाणी डोक्यावरून जाईल.
अमेरिकन नागरिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी तर अजीबात उदासीन राहू नये. ते मतदाते आहेत व ते आपल्या सेनेटर्सना व काँग्रेसमेनना जाब विचारू शकतात. वेळात वेळ काढून असली पुस्तके त्यांनी वाचावीत अशी माझी त्यांना विनंती आहे.
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!

अजय भागवत's picture

8 Nov 2009 - 11:31 am | अजय भागवत

काळेसर, तुमचे अमेरीकेच्या परराष्ट्र धोरणावरील अभ्यासाच्या सखोलतेचे प्रभुत्व वादातीत आहे. तुमचे आधीचेही लेख वाचले आहेत; वरील लेखही खूप मोलाची माहिती देतो.

लेखातून वाक्या-वाक्यातून दिसणारा अमेरीकन परराष्ट्र धोरणातील कावेबाजपणा काही चित्रपट, पुस्तके व काही घटना दखवून देतातच. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर एक पुस्तक मी वाचले होते (नाव आठवत नाही)- त्यात रोश व इतर कार्पोरेटने आपले धोकादायक प्रकल्प तिसऱ्या जगात कसे हलवले व स्थानिक सरकारांनी त्याला कशी व का मदत केली ह्याची नमुनेदार माहिती होती.
ऎव्हढेच म्हणता येईल की टाळी एका हाताने वाजत नाही.

तरीही, असे वागण्याचे अमेरीकेचे जे कारण आहे, त्याबद्दल अनेक वाद-प्रतिवाद असतील (एक ढोबळ कारण मांडले जाते ते म्हणजे, जागतिक वर्चस्व, पण ते मनापासून पटत नाही). तुमचे ह्याबद्दल काय मत आहे?

भागवत-जी,

वाचनाची मला खूप आवड आहे ती एक छंद म्हणून (किंवा व्यसन म्हटले तरी चालेल). "लोहारकी (steelmaking)" हा माझा मुख्य पेशा, पत्रकारिता (journalism) नव्हे.

केवळ सध्या पाकिस्तानमधील खतरनाक घटना व त्यांचा सरतेशेवटी आपल्यावर होणारा भयंकर परिणाम या विषयाने माझे मन व्यापून टाकले आहे (obsession म्हटलं तरी चालेल).

पाकिस्तानबद्दल माहिती व्हावी म्हणून पाकिस्तान डेली टाइम्स, डॉनसारखी वृत्तपत्रे नेटवर वाचू लागलो व ती वाचता-वाचता "House of Bush, House of Saud" ("Fahrenheit 9/11" हा चित्रपट बराचसा या पुस्तकावर आधारित आहे), "The Fall of House of Bush" व Nuclear Deception" ही पुस्तकं हाताला लागली व पाकिस्तानावरच्या वाचनाची गोडी वाढली. पण वाचून मन खरं तर कासावीसच झालं!

पकिस्तानबद्दलचे बोटचेपे धोरण हा अमेरिकन सरकारचा स्वार्थीपणा की भोळेपणा की मूर्खपणा की अदूरदर्शीपणा कीं केवळ स्वतःपुरते राबवायचे "कातडीबचाऊ" धोरण यातलं काय हे ठरविणं फार अवघड आहे.

पाकिस्तानवर कायमच लष्कराने राज्य केले आहे, पण त्यातले अयूब जुन्या पठडीतले व कमी आग्रही हुकुमशहा होते, याह्याखान मूर्ख होते पण झिया व मुशर्रफ हे दोघे मात्र 'कोल्हे' होते. त्यांनी इतके परिणामकारकरीत्या अमेरिकेला बुद्दू बनविले कीं अमेरिकेला आपले वस्त्रहरण कधी झालं हे कळलंच नाहीं.

आधी रशियाचे अफगाणिस्तानवरचे आक्रमण झियाला जीवदान (व नंतर इतिहासात एक स्थान) देऊन गेले. झियाने आपली खुर्ची सलामत ठेवण्यासाठी अतिरेकी बनवण्याची फॅक्टरीच काढली! मुशर्रफ तर संपलाच होता पण दैवी चमत्कार झाला व ९/११ घडले व 'मुश'ला 'बुश'कडून 'जीवदान'च मिळाले.

आजही ओबामासारख्या मुस्लिम राष्ट्रांशी न भांडायचे धोरण ठेऊ पहाणार्‍या राष्ट्रपतीचे हातच बांधले गेले आहेत. आज पाकिस्तानची मदत थांबवावी तर ते राष्ट्र 'उद्या' संपायच्या ऐवजी 'आज'च संपेल. त्यांची अण्वस्त्रे (जी बनवायला अमेरिकेनेच अदूरदृष्टीपणाने मदत केली) जर अल-कायदासारख्या संघटनेच्या हातात पडली तर काय हाहाकार होईल याची कल्पनाच करवत नाहीं.

सध्या वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सेना व तालीबान (पाकिस्तान शाखा) यांच्यात जे युद्ध चालू आहे ते तर मला लुटुपुटीचेच वाटते. ते अमेरिकन सरकारसाठी सादर केले जाणारे एक रंगभूमीवरील नाट्यच (stage show) आहे असे वाटते. थोडे दिवस युद्ध जुंपते, मग एक तह होतो, तो दुसर्‍या दिवशीच कचर्‍याच्या टोपलीत जातो, या तहाच्या निमित्ताने जी तात्पुरती शांतता होते त्यात तालीबानी पुन्हा शक्तिसंचय करतात, नवे व्युह आखतात, 'स्वात' भागात 'शारिया' कायदा लागू करण्यासारख्या नव्या मागण्या सादर करतात, त्या नामंजूर होतात, पुन्हा युद्ध पेटते व कालचक्र असेच सातत्याने चालूच रहाते.

पाकिस्तानी लष्कराचे पैसेखाऊ वरिष्ठ अधिकारी आता खाऊन-खाऊन मुजोर व सुखवस्तू झालेले आहेत. त्यांचे जवान लढतील तेवढे लढतील मग पुन्हा तह! (फक्त भारताबरोबरच्या युद्धात खुन्नस म्हणून मन लावून लढतील!)

या व अशा घटनांमुळे मला फार राग येतो, आपल्या सरकारचे प्रथमदर्शनी "ठेवले अनंते" धोरण पाहून आणखीच राग येतो, पण त्या रागाला तसा कांहींच अर्थ नाहीं.

मग मी मला जे करता येण्यासारखे आहे ते करतो, म्हणजे मला जे समजले आहे असे वाटते ते चार जणात वाटतो. कोण जाणे आपल्या "मिपा" सभासदांतला कोणी सभासद भारताचे धोरण आखू शकणार्‍या व निर्णय घेऊ शकणार्‍या संघटनेच्या उच्च पदापर्यंत पोचेल व त्याला हे सर्व आठवेल.

मला ओबामांनाही लिहावेसे वाटते, पण माझे पत्र त्यांच्या टेबलापर्यंत तरी पोचेल कां? नाहीं!

असो. सध्या मी 'हतबलाचा राग' काय असतो याचा अनुभव घेतोय!

सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

अशी एक म्हण आहे की राजकारणात एकादी घटना अधिकृतपणे नाकारली गेली कीं तिच्यावर जरूर विश्वास ठेवावा.
पाकिस्तानचे अण्वस्त्रसाठे किती सुरक्षित आहेत याबद्दल पाकिस्तानच्या आजच्या "डेली टाइम्स"मधे आलेल्या बातम्या इथे वाचा!
http://tinyurl.com/ylgas9v
http://tinyurl.com/ylmvmtm
http://tinyurl.com/yzkggev
http://tinyurl.com/yzcwfw6
http://tinyurl.com/yj59nde
तसेच डॉनमधेही ती बातमी आली आहे व त्यांचं coverage जास्त चांगलं आहे!
http://tinyurl.com/yzluu4c
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

होबासराव's picture

13 Jan 2016 - 1:19 pm | होबासराव

.

सन्दीप's picture

13 Jan 2016 - 2:52 pm | सन्दीप

1

एस's picture

13 Jan 2016 - 2:59 pm | एस

वाखुसाआ.

भंकस बाबा's picture

13 Jan 2016 - 4:06 pm | भंकस बाबा

वाचनीय

भंकस बाबा's picture

13 Jan 2016 - 4:12 pm | भंकस बाबा

मी नुकताच मिपावर आलेला एक वाचनवेडा आहे. कृपया अशे अप्रतिम लेख जे सामान्य ज्ञानात भर टाकतात, वर आणण्याची कृपा करावी. माझ्यासारख्या असंख्य वाचकाचा दुवा मिळेल. (दुवा उर्दू घ्यावा)

तिमा's picture

13 Jan 2016 - 4:31 pm | तिमा

अमेरिकेला असे भस्मासूर तयार करण्याची संवयच आहे.
खरंच, जुने चांगले लेख वर येऊ द्या.

माहितगार's picture

13 Jan 2016 - 7:33 pm | माहितगार

वाचनाची पोच, सविस्तर प्रतिसादास केव्हा वेळ होईल माहित नाही. विवीध शक्यतांचा आढावा जरुरी असतोच,अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीज अधिकृत थेअरीची जागाही घेऊ शकत नाहीत म्हणून कोणत्याही कॉन्स्पीरसी शक्यता अभ्यासतानाही शक्य तेवढा संदर्भांचा उपयोग करावा असे वाटते.

राही's picture

13 Jan 2016 - 7:51 pm | राही

मौलन मसूद अझरला पाकिस्तानने पकडलंय ही एक अत्यानंदाची आणि क्षणभर अविश्वसनीय अशी बातमी आहे.

अमेरिकन गुप्तहेर खात्याने दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांना ट्रेनिंग पाकिस्तानी लश्करी तळावर मिळाली होती. म्हणजे लश्कराचा खुला पाठिंबा.
शरीफ साहेब धोतर सांभाळा आता, नाहीतर वस्त्रहरण होईल