बेणारे

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
19 May 2009 - 1:36 am

बेणारे

युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या
शोकसंघर्षातून गर्वल्यालेला
बधिराsकांत

तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित
सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक
बाजारगप्पा

चिअर्स चिअर्स

आणि विद्धनजरेने पहायची
पैलतीरावरच्या
बेणारेची सुटकाधडपड

किंवा वितळून राहायचे
ऐलतीरी झारीतल्या
शुक्राचार्यासारखे

आळोखे पिळोखे देऊन
कंटाळा आल्यावरती
मात्र टाळ्या पिटून
निघून जायचे

उगाच तो आकांत
मनाला चिकटला तर काय घ्या

म्हणत म्हणत की
"अशी धडपड अनुभवायची
म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?

१८ मे २००९, पुणे

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

19 May 2009 - 1:40 am | सुवर्णमयी

म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?
जोरदार.
कविता आवडली.

अनंता's picture

20 May 2009 - 2:50 pm | अनंता

लौकिकार्थाने कवयित्रीने स्वत:ला कोणत्याही चौकटीत बंद केलेले नाही, नेमके हेच मला खटकते आहे; आणि हेच कवितेचं यशही आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते. दुर्दैवाने कवयित्रीच्या मनाचा म्हणा वा कवितेचा म्हणा ठाव लागला नाही, असेच खेदाने म्हणावेसे वाटते. त्यांनीच या विषयावर अधिक प्रकाश टाकल्यास उत्तम!!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

धनंजय's picture

19 May 2009 - 2:30 am | धनंजय

जोरदार.

**(पण काही समास पटलेले नाहीत. "गर्व ल्यालेल्या" चालेल का? किंवा "गर्वल्यालेल्या" असे का? "विद्ध नजरेने" चालेल का? किंवा "विद्धनजरेने" असे कशाला? मला वाटते मराठी कर्मधारय समासांची जवळजवळ कधीच गरज नसते, अडगळ मात्र होते.)**

"वितळून झारीतला शुक्रचार्य होणे" ही कल्पना अत्यंत आश्चर्यकारक आहे.

एक अस्वस्थ करणारी कविता - वा!

बेणारेच्या संदर्भातून फक्त 'शांतता कोर्टचा' किंचित धागा गवसल्यासारखे झाले पण तेही निसटतेच. एकूण सगळ्या ओळींचा मिळून काही अर्थबोध मला झाला नाही.

चतुरंग

जृंभणश्वान's picture

19 May 2009 - 6:58 am | जृंभणश्वान

कविता आवडली.
पेज ३ पिक्चरचा सारांश आहे असे वाटते.

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 8:54 am | भडकमकर मास्तर

२६/११ चा आतिरेकी हल्ला दूरचित्रवाणीवरती चवीचवीने पाहणार्‍या मुर्दाड लोकांविषयी हे मुक्तक आहे असे वाटले...
पण मग ते शुक्राचार्याचे काय ते कळाले नाही... म्हणजे त्या लोकांच्या सुटकेमध्ये अनाहूतपणे गोंधळ निर्माण करून अडथळा आणणारे लोक,( म्हणून वितळणारे शुक्राचार्य).????..
लै भारी अर्थ काढला आहे मी.. चिअर्स चिअर्स. <:P

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2009 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

भडकमकर मास्तरांशी असहमत (आता पुढच्या पार्टीचे बील माझे मला भरावे लागणार)
ह्या कवितेतुन प्रत्येक ठिकाणी दोन अर्थ निघु शकतात. अतिशय मार्मीक आणी चपलख कविता असे म्हणावे लागेल.

युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या
शोकसंघर्षातून गर्वल्यालेला
बधिराsकांत
(येथे मला बुश विषयीचा कवयत्रीचा विखार जाणवला / हा विखार मिपावरील कंपुबाजांविषयी सुद्धा असु शकतो)

तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित
सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक
बाजारगप्पा
(येथे कवयत्रीने मिडीयावाल्यांना चांगलेच फटकारले आहे/टुकार लेखांना तेव्हडेच टुकार प्रतिसाद देउन लेख सतत वर ठेवणार्‍यांना हा टोला असु शकेल)
चिअर्स चिअर्स

आणि विद्धनजरेने पहायची
पैलतीरावरच्या
बेणारेची सुटकाधडपड
(येथे कवयत्री पत्रकार मधुमीताची घडलेली हत्या आणी जनतेचे असह्हाय पण मार्मीकपणे दाखवते/ कंपुबाजांच्या तावडीत सापडलेल्या नवलेखक / कवयत्रीचे हाल उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या जेष्ठ मिपाकर्मींना टोला ??)

किंवा वितळून राहायचे
ऐलतीरी झारीतल्या
शुक्राचार्यासारखे
(येथे कवयत्री शांतता मार्गात पाकिस्तान सतत आणत असलेल्या अडथळ्यांवर हल्ला बोल करते/ 'मय्त्री कर्न्र क' अशा खर्डी पाठवणार्‍या, आयपी मिळवण्यासाठी जाळे फेकणार्‍यांना एक शाब्दीक चपराक)

आळोखे पिळोखे देऊन
कंटाळा आल्यावरती
मात्र टाळ्या पिटून
निघून जायचे

उगाच तो आकांत
मनाला चिकटला तर काय घ्या
(येथे ब्रिटननी आपले सैन्य इराक मधुन मागे घ्यायच्या भुमीकेचा संदर्भ असावा / करुन करुन भागले आणी 'वाचनमात्र' झाले त्यांचाही संदर्भ असु शकतो)

म्हणत म्हणत की
"अशी धडपड अनुभवायची
म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?
(ह्या वाक्यांचा मला काही म्हणता काही संदर्भ लागला नाही. माझ्या जाणीवा, नेणीवा येथे तोकड्या पडल्या.)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मनीषा's picture

19 May 2009 - 11:14 am | मनीषा

उगाच तो आकांत
मनाला चिकटला तर काय घ्या

छान आहे - कविता ... आवडली

विजुभाऊ's picture

19 May 2009 - 11:40 am | विजुभाऊ

युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या
शोकसंघर्षातून गर्वल्यालेला
बधिराsकांत

तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित
सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक
बाजारगप्पा

चिअर्स चिअर्स.
ही मला आय पील च्या चीअरगर्लची कैफीयत वाटली
आरोपी "लीला बेणारे" बाई फार दिवसानी चर्चेत का आली ते काही कळाले नाही

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

विसोबा खेचर's picture

19 May 2009 - 12:49 pm | विसोबा खेचर

कविता समजली नाही...

(सुमार बुद्धीचा!) तात्या.

शरदिनी मॅडम,

शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या त्या हिरव्या लाटा
त्या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे
तुझे गीत गाण्यासाठी......

अश्या साध्या परंतु तेवढ्याच गेय आणि सहजसुंदर अश्या कविता तुम्ही केव्हा लिहिणार हो?

तात्या.

नितिन थत्ते's picture

19 May 2009 - 1:22 pm | नितिन थत्ते

पराचे समीक्षण वाचून थोडी कळलेली कविता पण अवघड वाटायला लागली. आणि स्वत:ला कवितेतले काही हणजे काही कळत नाही हे पुन्हा एकदा कळले.

>>(ह्या वाक्यांचा मला काही म्हणता काही संदर्भ लागला नाही. माझ्या जाणीवा, नेणीवा येथे तोकड्या पडल्या.)
हे त्या कडव्यांचे दोन अर्थ आहेत का?

खराटा
(रंग माझा वेगळा)

दत्ता काळे's picture

19 May 2009 - 1:23 pm | दत्ता काळे

विद्धनजरेने पहायची
पैलतीरावरच्या
बेणारेची सुटकाधडपड

. . इथे बेणारेकडे पहाणारी नजर विध्द आहे, हे जरा खटंकतं, कारण शांतता कोर्ट . . . . मध्ये प्रेक्षक असहाय्य बेणारेकडे अतिशय दयाबुध्दीने पहातात. तरीसुध्दा अर्थ बरोबर पोहोचतो. कविता आवडली.

मिसळभोक्ता's picture

19 May 2009 - 1:39 pm | मिसळभोक्ता

बेणारे पैलतीरावरची नाही, तुमच्या आमच्यात, मग अटलांटिक महासागराच्या जवळची असो, किंवा हिंदी महासागराच्या लगतची. ती आपलीच आहे. पैलतीरावर नाही. ही विद्ध नजर, तीही एका स्त्रीची (शरदिनी ह्या टोपणनावावरून एक कयास), हेच खटकले.

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

त्याचा अर्थ लिहावा. ह्या जगात काय चांगले आहे का नाही? का शरदिनी बाई तुम्हाला सगळी कडे फक्त हिंस्त्रच लोक भेटतात का हो?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ