प्रोपगंडा (Propaganda)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
9 Oct 2021 - 10:10 pm

a {text-decoration:none;}
body {
font-family: 'Noto Sans', sans-serif;
font-size: 16px;
}
.quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)

१.
आपल्यावर लहानपणापासून विविध संकल्पना आदळत असतात. आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजातील मोठय़ा लोकांकडून, पुस्तकांतून, चित्रपटांतून, चित्रांतून, संगीतातून, मित्रांच्या गप्पांतून.. आणि आपण घडत असतो.

दोन व्यक्तींसमोर सारख्याच प्रतिमा वा सारखेच शब्द ठेवले तरी त्याच्या मनात उमटणारे अर्थ वेगळे असू शकतात. याचे कारण ही घडण्याची प्रक्रिया. ती दोघांबाबत वेगळी असेल, तर एकास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील टिप्पणी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरीलच वाटेल, दुसऱ्यास त्यात वेगळाच वास येईल. एकास आकाशीचा चंद्र पाहून प्रेयसीच्या मुखकमलाची याद येईल आणि दुसऱ्यास भाकरीचा चंद्र आठवेल.

यास काही लोक शिक्षणसंस्कार म्हणतात. तसेही शिक्षण हा चांगल्या व जुन्या अर्थाने प्रोपगंडाचाच भाग आहे. परंतु प्रश्न असा आहे की प्रोपगंडा चांगला वा वाईट असू शकतो? यास नेहमीच्या साच्यातील एक उत्तर आहे. ते म्हणजे हेतू हे कृतीच्या योग्यायोग्यतेचे परिमाण असते. परंतु प्रोपगंडा या शब्दाबाबत तसे म्हणता येणार नाही. याचे कारण त्याचा अर्थच बदललेला आहे.

अनेक शब्द अशा प्रकारे आपल्यासमोर अर्थ-विपर्यास होऊन येत असतात. उदाहरणार्थ अचपळ. म्हणजे चपळ नसलेला. पण ‘अचपळ मन माझे..’ या पंक्तीत तो चपळ या अर्थाने आला आहे. ‘प्रपोगंडा’ या शब्दाचेही तसेच. इंग्रजी स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार ‘प्रो-प-गं-डा’ असाच हवा. पण बोलीभाषेत तो म्हटला जातो प्रपोगंडा असा. तो उच्चार सुपरिचित. म्हणून नेणिवेच्या पातळीवरील संकल्पनाबोधात अडथळा न आणणारा.

२.
आपण प्रचाराच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, हे वास्तव अनेकांसाठी सहन करण्यापलीकडचे असते. त्यामुळे ते नाकारण्याकडेच अनेकांचा कल असतो.

किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते आणि त्याहून भयंकर म्हणजे प्रचार नामक काही नसतेच, असे वाटणारीही माणसे असतात.

त्यांचे म्हणणे असे असते, की फालतू बुद्धिजीवी, विचारवंत, माध्यमवीर अशा मंडळींनी तयार केलेली ही हवा असून, प्रचार म्हणजे काय हे न समजण्याएवढे लोक काही दूधखुळे नसतात. लोकांना सारे काही नीट माहीत असते. त्यांना तुम्ही मूर्ख समजू नका, हे विधान त्यातलेच.

परंतु प्रचाराचा इतिहास पाहिला तर एक बाब नीटच लक्षात येते ती म्हणजे असे म्हणणारे लोक प्रत्येक काळात होते आणि ते व्यवस्थित मूर्ख बनले होते. त्यातही मौज अशी की अडाण्यांपेक्षा उच्चशिक्षितच प्रचारास अधिक प्रमाणात बळी पडताना दिसले.

जनसंज्ञापन आणि प्रचार या विषयातील तज्ज्ञ डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांच्या मते, याचे कारण शिक्षण. ‘शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ असे त्यांनी म्हटले आहे.

३.
प्रचाराच्या इतिहासानेही हेच अधोरेखित केले आहे. हा इतिहास साधारणत: तीन टप्प्यांत मांडता येतो.
यातील पहिला टप्पा ख्रिश्चन प्रचाराचा. सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोप ग्रेगरी पंधरावे यांनी ‘प्रोपगंडाकरिताचे काँग्रेगेशन अर्थात धर्मसभा’ स्थापन केली. डॉ. पॅट्रिक यांनी या धर्मसभेचे वर्णन ‘प्रचाराचे पहिले जागतिक अभियान’ असे केले आहे.

ही धर्मसभा एवढी प्रबळ होती की तिच्या प्रमुखपदी असलेल्या काíडनलला रेड पोप असे म्हटले जात असे. रेड – लाल हा रक्ताचा, हिंसेचा, युद्धाचा रंग आहे. ख्रिस्ती धर्माचा हा प्रचार विरोधात होता तो प्रामुख्याने ‘काफिरां’च्या, अधार्मिकांच्या आणि सुधारकांच्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार पाहता हा प्रचार किती प्रभावी होता हे लक्षात येते.

या प्रचाराचे वैशिष्टय़ म्हणजे यातून सर्वानी एकाच तऱ्हेने विचार करावा, विचारांची एकरूपता साधली जावी असा ख्रिस्ती धर्माचा प्रयत्न होता. चर्च सांगेल तेच सत्य हाच ‘सत्याच्या शोधाचा मार्ग’ या प्रचाराने लोकांपुढे ठेवला होता.

त्यात रोमन कॅथॉलिक चर्चला यश आले हे दिसतेच आहे. हे प्रचाराचे यश होते. प्रचार इतिहासाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो पहिल्या महायुद्धापासून.

४.
आजवर प्रचार – प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा.
त्याला प्रचारयुद्धातील महारथी मानले जाते. पण त्यानेही त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातून पहिल्या महायुद्धातील ब्रिटिश प्रचाराची स्तुती केली आहे.

‘यासंदर्भातील (म्हणजे प्रचाराच्या) व्यावहारिक धडे घेण्याची भरपूर संधी मला मिळाली, पण दुर्दैव असे की, ते धडे आपणांस चांगल्या पद्धतीने शिकविले ते आपल्या शत्रूंनी,’ हे हिटलरचे उद्गार ब्रिटिशांचा प्रचार किती प्रभावी होता हे सांगतात.

तो प्रचार जितका थेट जर्मनीविरुद्ध होता, तितकाच तो अमेरिकेविरोधातही होता. ब्रिटिशांनी प्रचाराच्या जोरावर अमेरिकेला युद्धतटस्थता सोडण्यास भाग पाडले. त्याचबरोबर त्या प्रचाराने ‘पब्लिक है, यह सब जानती है’ हे मिथकही मोडूनतोडून टाकले.

अमेरिकी लोकांनी काय जाणावे आणि जाणू नये, हे त्या वेळी ब्रिटिशांची प्रचारयंत्रणा ठरवीत होती. प्रचाराचा छद्मव्यूह कसा रचला जातो हे पाहण्यासाठी ते समजून घेतले पाहिजे..

२०१७ साली लोकसत्ता दैनिकातील प्रचारभान सदरात श्री. रवि आमले ह्यांची 'प्रोपगंडा' वर एक अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी लेख मालिका प्रकाशित झाली होती. वरील चार परिच्छेद त्या मालिकेतील पहिला भाग "पब्लिक है, यह सब जानती है..?" मधून घेतले आहेत.
पुढे त्या मालिकेतील लेख व अधिकच्या माहितीसह त्यांचे 'प्रोपगंडा' नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दैनिकातली लेख मालिका आणि पुस्तक अशा दोन्हींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतोय. अर्थात ह्या लेखाचा उद्देश परीक्षण वा समीक्षण नसून स्वैर मांडणीद्वारे पुस्तकाचा परिचय व शिफारस आणि लेख मालिकेतील सर्व भागांच्या लोकसत्ता.कॉम वरील लिंक्स वाचायला सोयीस्कर पडतील अशा प्रकारे सूचिबद्ध करणे एवढाच मर्यादित आहे.

  • आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून?
  • कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती?
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो?
  • आपली मते खरोखरच आपली असतात का?
  • आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का?
  • सत्य मानत असतो ते सत्यच असते का?
  • की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला
  • एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे?
  • तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात?
  • या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते?
  • साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात?
  • बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात?
  • एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते?
  • कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात?
  • हे सारे करणारे असते तरी कोण?
  • अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार!
  • ही कहाणी आहे या सगळ्याची.
  • अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची.
  • आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची.
  • त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट,परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.

▲ 'प्रोपगंडा' पुस्तकाचे मलपृष्ठ.

'प्रोपगंडा' ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केलेल्या प्रश्नांची लेखकाने संदर्भ आणि रोचक उदाहरणांसहित दिलेली उत्तरे वाचताना आपल्याला गुंगून जायला होते. 'प्रोपगंडा' चे प्रकार आणि व्याप्ती समजून घेत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचे नव्याने अर्थ लागतात.

लेखक
रवि आमले

प्रकाशक
मनोविकास प्रकाशन

ISBN
978-81-943491-5-0

पुस्तकाची पाने
380

बाईंडिंग
पेपरबॅक

किंमत
४००/-

श्री. रवि आमले लिखित 'प्रोपगंडा' हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रहणीयही आहे. खाली लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या ४६ लेखांची सूची देत आहे. सगळे लेख माहितीपूर्ण आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हे लेख आधी वाचले असतील, परंतु ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांना हे सर्व लेख वाचण्याची आग्रही शिफारस करत आहे.

विषेश टिप्पणी : गमतीची गोष्ट अशी आहे कि ही लेखमाला प्रसिद्ध करताना लोकसत्ताने निष्पक्षपणाचा आव आणत काँग्रेसवर थोडीफार टीका करत त्यांच्या संघ, भाजप, मोदीविरोधी अजेंड्याचा प्रचार मोठ्या चलाखीने केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही! अर्थात हा छुपा प्रचार लक्षात येण्यासाठी 'प्रोपगंडा' हि काय चीज आहे हे आपल्याला व्यवस्थित समजावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

लेख सूची (१ ते ५)+

लेख सूची (६ ते १०)+

लेख सूची (११ ते १५)+

लेख सूची (१६ ते २०)+

लेख सूची (२१ ते २५)+

लेख सूची (२६ ते ३०)+

लेख सूची (३१ ते ३५)+

लेख सूची (३६ ते ४०)+

लेख सूची (४१ ते ४६)+

--X--

function myFunction(id) {
var x = document.getElementById(id);
if (x.className.indexOf("w3-show") == -1) {
x.className += " w3-show";
x.previousElementSibling.className =
x.previousElementSibling.className.replace("w3-cyan", "w3-red");
} else {
x.className = x.className.replace(" w3-show", "");
x.previousElementSibling.className =
x.previousElementSibling.className.replace("w3-red", "w3-cyan");
}
}

मांडणीआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

9 Oct 2021 - 10:33 pm | तुषार काळभोर

जबरदस्त तयारी आणि कष्ट घेऊन तुम्ही लेख लिहिला आहे. आणि लेख अतिशय देखणा चांगलाच झाला आहे.
अभिनंदन!!

आता लेखाबद्दल.
प्रोपगंडा हा शब्द वाचल्यावाचल्या रवी आमले यांच्या लोकसत्तेतील लेखमालेची आठवण येतेच. सांप्रतकालीन या विषयावरील लेख त्या लेखमालेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण वाटेल, हे त्या लेखमलेच्या यशाचे आणि प्रभावाचे लक्षण मानावे लागेल.
एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते.

तरीसुद्धा लेखमाला (आणि पुस्तक जर त्याच लेखमालेचा संग्रह असेल तर तेही) वाचनीय आणि संग्रहणीय आहे हे नक्की.

जेपी's picture

9 Oct 2021 - 11:08 pm | जेपी

+१

टर्मीनेटर's picture

10 Oct 2021 - 3:18 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

एकेका लेखावर एकेक धागा काढून चर्चा करावी असे लेख आहेत. काही लेखांतून आडून आडून तत्कालीन (म्हणजे अर्थातच सद्य कालीन सुद्धा) सरकारकडे बोट दाखवल्याचा संशय येतो. आणि वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागते.

+१००
वाचता वाचता ही लेखमालाच प्रोपगंडा असल्याचे वाटायला लागणे हीच लेखकाला 'विषय' व्यवस्थित समजावुन देता आल्याची पोच पावती आहे 👍

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 8:01 am | प्राची अश्विनी

सहमत. पुस्तक वाचलं पाहिजे

राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा. प्रचाराचा धुरळा उडून परत खाली बसून सर्व स्वच्छ दिसेपर्यंत वेळ लागतो. आणि खरं खोटं करायची वेळ संपलेली असते.

सत्यालाही परिणाम दाखवायला वेळ लागला की ते खोटे पडते.

अपूर्व कात्रे's picture

9 Oct 2021 - 11:49 pm | अपूर्व कात्रे

लोकसत्ता मधलं रवी आमलेंचं "प्रचारभान" आवडीने वाचायचो. त्याचं पुसतां निघाल्यावर ते ही विकत घेऊन समजून घेऊन वाचलं.
सामान्य मराठी माणसाला propaganda विषय जाणून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे.
तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती).

पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.

टर्मीनेटर's picture

10 Oct 2021 - 4:51 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ कंजूस काका,
तुमच्या प्रतिसादातील शब्दा शब्दाशी सहमत आहे 👍

@ अपूर्व कात्रे,

तुमची विशेष टिप्पणी मलाही पुस्तक वाचताना जाणवली. (सादर वाचताना जाणवली नव्हती).

मला ते मालिका वाचतानाच जाणवले असल्याने कदाचीत नंतर पुस्तक वाचताना तेवढ्या प्रकर्षाने जाणवले नाही 🙂

पुस्तक वाचून त्यावर थोडाफार विचार केल्यावर डोक्यात click झालेला विचार म्हणजे रंग दे बसंती हा चित्रपटसुद्धा एक प्रकारे propagandaच आहे.

+१
अशा कितीतरी नव्या जुन्या (सर्व भाषिक) चित्रपट आणि वेब सिरिज मध्ये प्रोपगंडा दिसुन येतो. त्याबद्दलही प्रतिसादातुन मते मांड्ल्यास वाचाय्ला आवडेल 👍

#शिक्षण हाच एक Propaganda असतो
# शिक्षित लोकच propganda ला जास्त बळी पडतात.
ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो.
बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.

नूतन's picture

10 Oct 2021 - 1:06 am | नूतन

प्रचारभान हे सदर मीही आवडीने वाचले होते. त्यापैकी फेक न्यूज मागचे हात ...या लेखात त्यांनी एडवर्ड बर्नेज यांच्या propganda नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता . तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं. आता सवड काढून हे पुस्तक नक्की वाचेन.

टर्मीनेटर's picture

10 Oct 2021 - 5:46 pm | टर्मीनेटर

@ Rajesh188 & नूतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ Rajesh188,

ह्या दोन वाक्यात जवळचा संबंध वाटतो.

सहमत!

बाकी अशिक्षित लोक कोणत्या ही प्रकार च्या propganda सहज बळी पडू शकतात.

परंतु त्या विषयातील तज्ज्ञांचे मत थोडे वेगळे आहे.

@ नूतन,

तेव्हा पासून बर्नेज यांचं पुस्तक वाचायचं डोक्यात होतं. पण वाचनालयात मिळालं नव्हतं.

मला वाचनालयात मिळालं होतं, पण अनेक दिवस ठेउनही पुर्ण वाचुन झाले नव्ह्ते.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

10 Oct 2021 - 1:43 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान.
सगळे ४६ लेख वाचणार आणि त्यावर मत नोंदवणार.

टर्मीनेटर's picture

10 Oct 2021 - 5:59 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आभार.

मागे माझ्या 'मिपाकरांच्या वाचनखुणा.' ह्य धाग्यावर तुम्ही आणि गणेशा भाउंमुळे रंगत आली होती 🙂

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 8:13 am | कुमार१

खूप अभ्यास पूर्ण विवेचन
काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील
लेखाचे देखणेपण अगदी नजरेत भरणारे आहे !

अभिजीत अवलिया's picture

10 Oct 2021 - 10:24 am | अभिजीत अवलिया

सहमत. फारच उत्तम विवेचन व लेखाची मांडणी अतिशय सुंदर.

अथांग आकाश's picture

10 Oct 2021 - 11:26 am | अथांग आकाश

सहमत!

काही गोष्टीचे सावकाशीने मनन करावे लागतील

सुचीतील लेखांचे excerpt वाचुन हेच वाटले! सावकाशीने वाचवे लागणार सर्व!!

देख्णा लेख आवडला हे.वे,सां.न
0

@ कुमार१ , अभिजीत अवलिया आणि अथांग आकाश
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

तुमच्या सवडीप्रमाणे सर्व लेख सावकाश वाचा.

छान लेखन. सगळ्या दुव्यांबद्दल धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2021 - 12:33 pm | चौथा कोनाडा

सुंदर धागा, झकास रंगसंगती, देखणा ले-आऊट !
मिपा वर प्रथमच एवढा डोळ्यांना सुखवणारा धागा पाहिला.
💖
या पुढे पुस्तक परिचयासाठी सर्व लेखक मिपाकडे वळले तर नवल वाटायला नको !

लेखमाला तर सुंदर आहेच. लोसमध्ये काही वाचलेत. इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !

गॉडजिला's picture

10 Oct 2021 - 3:14 pm | गॉडजिला

माहिती आवडली...

टर्मीनेटर's picture

10 Oct 2021 - 6:12 pm | टर्मीनेटर

@ कॉमी , चौथा कोनाडा & गॉडजिला
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चौथा कोनाडा

इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !

वाचनाचा मनसोक्त आनंद घ्या 🙂

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 6:55 pm | कुमार१

याच विषयाशी संबंधित असलेल्या टर्मिनेटर यांच्याच एका जुन्या प्रतिसादाची ही आठवण :

https://www.misalpav.com/comment/1053346#comment-1053346
.

जवळपास २ वर्षांपुर्विचा प्रतिसाद आहे हा 😀 बरा शोधुन काढलात!
दुर्दैवाने एडवर्ड बर्नेज ह्यांचे ते पुस्तक वाचुन पुर्ण झालेच नाही; अर्थात नंतर रवि आमले ह्यांची वर उल्लेख केलेली मालिका आणि पुस्तक वाचनात आल्यावर मग ते वाचायची इच्छाही तशी कमीच झाली.

लेखाचे देखणेपण, तांत्रिक सफाई आणि पुस्तक परिचयाचा आटोपशीरपणा बघता नवीन लेखक आता पुस्तकपरीक्षणासाठी तुम्हालाच गाठणार बघा संजय जी :-)

प्रचेतस's picture

11 Oct 2021 - 9:56 am | प्रचेतस

जबरदस्त लेख. निर्विवादपणे देखणा.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 2:19 pm | टर्मीनेटर

@ अनिंद्य & प्रचेतस

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

सुंदर पध्दतीने नियोजनपुर्वक लिहिलेला धागा
प्रोपॅगंडामध्ये पण बहुधा असेच सुरेख नियोजन असते :)

शीर्षक वाचून मला वाटले आमच्या रावले साहेबांचा नवा धागा असेल :=) :=) :=)

माहितीपूर्ण लेखासाठी पोवथर :=)
पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ इती. रावले साहेब.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 2:36 pm | टर्मीनेटर

@ तर्कवादी & रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ तर्कवादी

तुमच्या तर्काला सलाम!
फक्त त्यात 'नियोजनपुर्वक लिहिलेला' च्या ऐवजी 'प्रेरणा घेऊन लिहिलेला ' असा प्रामाणिक बदल मी करू इच्छितो 👍

@ रंगीला रतन

शीर्षकामुळे तुमचा अपेक्षाभंग झाला त्यासाठी मी दिलगीर आहे 🙂

मलाही असंच वाटलं होतं.छान धागा! मस्त मांडणी!

चौथा कोनाडा's picture

11 Oct 2021 - 10:25 pm | चौथा कोनाडा

तर्कवादी, रंगीला रतन ...
😂
हा .... हा .... हा ...

चांदणे संदीप's picture

12 Oct 2021 - 12:29 pm | चांदणे संदीप

अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. दिवाळी अंकात शोभला असता.
सावकाश एकेक प्रकरण वाचून काढले पाहिजे.

सं - दी - प

अनन्त अवधुत's picture

12 Oct 2021 - 12:51 pm | अनन्त अवधुत

लेख वाचनीय तर आहेच पण देखणा सुद्धा झालाय.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 2:39 pm | टर्मीनेटर

@ चांदणे संदीप & अनन्त अवधुत

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Oct 2021 - 2:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला वाचली होती, आणि आवडलीही होती, त्याचे पुस्तक निघालेले मात्र माहित नव्हते,
सगळेच्या सगळे ४६ लेख शोधुन त्यांच्या लिंका आम्हाला एका जागी उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा वाचतो.
शेवटच्या टिप्पणीशी शब्दशः सहमत, लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 3:19 pm | टर्मीनेटर

लोकसत्ता कधीकधी बंद करावासा वाटतो, पण त्यात असे काहीतरी सापडते मग नाईलाजाने आम्ही तो सुरु ठेवतो.

+१
गिरीश कुबेर संपादक झाल्यापासून लोकसत्ताची (जी थोडी-बहोत उरली होती ती पण) विश्वासार्हता संपली असे माझे वैयक्तिक मत आहे. घरी येणारा लोकसत्ता केव्हाच बंद केलाय, आता फक्त online वाचतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Oct 2021 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार

माझा एक मित्र तर "लोककुत्ता" म्हणतो, पण रोज पेपर घेतोच
कधी कधी पेपर वाचता वाचता अतिशय संतापतो, पण पेपर घेणे सोडत नाही.
पेपर च्या बातम्यांचे फोटो काढून ते त्याच्या "परखड" मतांसह कायप्पा वर पाठवत असतो.
आम्ही मित्र त्याला किती वेळा म्हणतो की त्या पेक्षा पेपर घेणे बंद कर, पण ते मात्र तो काही ऐकत नाही.
या लेख मालेवर सुध्दा त्या मित्राने आमच्या ग्रुप वर बराच किस पाडला होता.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

13 Oct 2021 - 1:04 pm | टर्मीनेटर

असतात असे नमुने मित्र 😀
माझा पण एक मित्र गेल्या कैक वर्षांपासून दिवसा - दोन दिवसाआड एअरटेल ला नेटवर्क नसल्याचे स्क्रीनशॉट्स काढून 'डब्बा', 'भिकार', 'दळभद्री' सर्व्हिस वगैरे वगैरे विशेषणे लाऊन फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर पोस्ट टाकत असतो, पण पत्ठ्ठ्या सर्व्हिस प्रोव्हायडर मात्र बदलत नाही. डोक्याला ताप म्हणजे फेसबुकवरच्या त्या पोस्टस मध्ये टॅग करायचा... सरळ अनफ्रेंड करून टाकला मग वैतागून 😂

गामा पैलवान's picture

12 Oct 2021 - 7:42 pm | गामा पैलवान

लोकहो,

रोचक लेखाबद्दल टर्मिनेटर यांचे आभार. अतिशय परिश्रम घेऊन लेख लिहिला आहे. लोकसत्तेचे सगळे दुवे वाचून काढले पाहिजेत.

'शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ हे डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांचं म्हणणं अक्षरश: खरं आहे आज.

हेच बघा ना करोना नामे कसलासा विषाणू म्हणे प्राणघातक असून त्याची चाचणी करायला हवी. असा आज समज प्रचलित आहे. हा शुद्ध भंपक प्रचार आहे. अपप्रचार म्हणा हवं तर. करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये. तरीपण कोणी ऐकतो का? करोनावर आयव्हरमेक्टिन हे औषध उपलब्ध असतांना ते सोडून बाकी सर्व फापटपसारा मांडला जातो. अपप्रचार किती घातक असतो हे दिसून येतं.

उच्चशिक्षित डॉक्टरही यांतून सुटले नाहीत. इथे मिसळपाव वर मी करोनाच्या लशीविषयी एक लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/48431

सदर लेख हे एका पुस्तकाचा संक्षिप्त सारांश आहे. हे पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय द्यायची विनंती इथल्या एका डॉक्टरांना केली होती. त्यांना आजून वेळ मिळाला नाही असं दिसतंय. या निमित्ताने कुमार१डॉक्टर सुबोध खरे यांना विनंती करू इच्छितो. सदर पुस्तकाच्या पीडीएफ प्रतीचा दुवा इथे उपलब्ध आहे : https://archive.org/details/SuzanneHumphriesMDDissolvingIllusionsDisease...

हे पुस्तक वाचून त्यात खरंखोटं किती याची चिरफाड करावी म्हणून विनंती.

बाकी, उच्चशिक्षित लोकंही प्रचारास बळी पडंत असली तरी मी मात्र तसा नाही. यापूर्वी आसाराम बापूंच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणावर अपप्रचार केला होता. तेव्हा सत्य प्रस्थापित करण्यासाठी (२०१३ साली) हा लेख लिहिला होता : https://www.misalpav.com/node/42491

यावरून प्रचारतंत्राच्या आरपार पाहता येतं , हे सिद्ध होतं.

एव्हढं सगळं वाचल्यावर मी माझीच लाल करतोय असा संशय आला तर अभिनंदन. अशासाठी की, मी माझा प्रचार करतोय याचा तुम्हांस सुगावा लागला आहे. म्हणजेच तुमची पावलं योग्य दिशेने पडताहेत. :-)

आ.न.,
-गा.पै.

रंगीला रतन's picture

13 Oct 2021 - 12:12 am | रंगीला रतन

तुमचा आसाराम बापू वाला लेख वाचला.
२५ एप्रिल २०१८ ला जोधपुर कोर्टाने त्यांना दोषी ठरवून १ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तुमचे मुद्दे जुने म्हंजे २०१३ चे असतील पण कोर्टात त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता. मग तुम्ही २७ एप्रिलला तो धागा काढण्याचे कारण नाही समजले .

गामा पैलवान's picture

13 Oct 2021 - 1:19 am | गामा पैलवान

रंगीला रतन,

अतिरिक्त नोंद ठेवण्यासाठी इथे मिपावर धागा काढला. जुना मूळ धागा माबोवर आहे.

आ.न.,
-गा.पै.

रंगीला रतन's picture

13 Oct 2021 - 10:25 am | रंगीला रतन

ह्म्म्म. character assassination चा प्रयोग आसाराम बापुसोबत केला गेला हे दिसतंय. त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि तुरुंगात गेला हे बरे पण तो निर्दोष मुक्त झाला असता तर? कल्पना करवत नाही :=)

कोरोनावर आयव्हरमेकटीन उपचार आहे असे कुठे सिद्ध झाले आहे ? कुठे चाचण्या झाल्या आहेत ? माहिती देऊन उपकृत करावे.
तोपर्यंत- Why You Should Not Use Ivermectin to Treat or Prevent COVID-19

करोनाची RTPCR चाचणी चा जनक केरी म्युलीस स्वत: म्हणतो की ही चाचणी केवळ नमुना गोळा करण्यासाठी असून रोगाची लागण शोधण्यासाठी वापरू नये.

इथे पहा.

गामा पैलवान's picture

13 Oct 2021 - 8:57 pm | गामा पैलवान

कॉमी,

लसढकलू ( vaccine pushers ) लोकांना आयव्हरमेक्टिन शत्रुवत वाटणारंच. करोनावर लसही पूर्णपणे प्रभावी नाही. दोन दोन ढोसं घेऊनही अनेकांना करोना झालाच. मग आयव्हरमेक्टिनने काय घोडं मारलंय? तसंही पाहता करोनावर दुसरा कोणताही पर्यायी उपचार नाहीये.

बाकी, तुम्ही दिलेला केरी म्युलीस वरचा लेख वरवर चाळला. लेखाचं शीर्षक दिशाभूलजनक आहे. शीर्षकात शोध म्हणजे detection हा शब्द आहे. तर, मी रोगाची लागण म्हणजे clinical infection बद्दल म्हणंत होतो. तपास रोगजंतूंचा तपास वेगळा आणि रोगाची लागण वेगळी.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

13 Oct 2021 - 9:41 pm | कॉमी

लसी मुळे रुग्णभरती दर आणि मृत्युदर निःसंशय कमी झाला आहे. बाकी आयव्हरमेकटीन काम करत असल्यास लस आणि ते असे दोन्ही वापरू, काय ? पण ते काम करते हे कशावरून ?

ज्योति अळवणी's picture

12 Oct 2021 - 9:56 pm | ज्योति अळवणी

तू विषय छानच मांडतोस. हा धागा मात्र विशेष जास्त कारण खूप अभ्यासपूर्ण आहे. वेळ घेऊन शांतपणे वाचला आत्ता.

आवडला आणि पटला एकूण विषय

टर्मीनेटर's picture

13 Oct 2021 - 12:38 pm | टर्मीनेटर

@ Bhakti, गामा पैलवान & ज्योति अळवणी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ गामा पैलवान
वरती कंजूस काकांनी म्हंटल्या प्रमाणे "प्रचार सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रांत चालू आहे." त्याला राजकीय, वैद्यकीय,धार्मिक आणि वैज्ञानिक क्षेत्रे सुद्धा अपवाद नाहीत!
माझ्या मते तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे जसे कि करोना, लसीची उपयुक्तता वगैरे बाबतची तथ्ये समोर येण्यास अजून काही वर्षे जातील, त्यावर डॉक्टर काय किंवा सामान्य लोकं काय कोणीही आजघडीला ठोस निष्कर्ष काढणे / मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. आसाराम बापूचे जे व्हायचे होते ते झालेच आहे.
हो, पण करोना पर्वात झालेला सावळा गोंधळ, पसरलेल्या / पसरवलेल्या अफवा आणि अपप्रचाराबाबत तुमच्याशी सहमत आहे.
धन्यवाद.

Rajesh188's picture

13 Oct 2021 - 1:04 pm | Rajesh188

माणूस तांत्रिक प्रगती मुळे हुशार वाटत असला तरी तो तितका हुशार नाही.
पुढचे मेंढरं ज्या रस्त्याने जाईल त्याच रस्त्याने बाकी पण जातात.
माणूस त्याच लायकीचा आहे.
स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत.
आणि अशा स्व बुध्दी असणाऱ्या लोकांना मानव रुपी मेंढर मूर्ख समजत असतात.

रंगीला रतन's picture

13 Oct 2021 - 1:11 pm | रंगीला रतन

स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत.
हे मान्य. बाकीचा मसाला उगाच टाकलाय :=)

सुरिया's picture

13 Oct 2021 - 3:40 pm | सुरिया

खरोखर नवल वाटलं. जी गोष्ट सांगून स्पष्ट होत नव्हती ती उदाहरण देऊनच स्पष्ट केलीत आपण.
पहिल्यांदा नवल वाटलं की सुरुवातीला एका स्वैर स्टेटमेंटच्या पुराव्यासाठी साठी मान्यवरांची मते ,त्यांच्या ओळखी, त्यांचे कर्तूत्व आदी पुढे करायचे. त्याला प्रतिवाद केला की पळ काढून दुसरीकडे एक धागा काढून पाठ थोपटोन घेत बसायचे. हे म्हणजे असे झाले की आपल्याला स्वयंपाकातले काही येत नसताना ते लपवण्यासाठी एकीकडून पळ काढायचा आणि नंतर दुसर्‍याने बनवलेले अन्न स्वतःच्या थाळीत निगुतीने मांडून सुगरणीचा आव आणायचा. मूळ लेखाची ओळख करुन देतो म्हणून चार ओळी लिहून एका उत्तम लेखासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. खरोखरच मांडणीचे कौतुक असेल तर अवश्य करुन घ्यावे पण मिपावरचे साक्षेपी वाचक ही जब्बरदस्त लेख, उत्तम लेखन असे प्रतिसाद देतात तेंव्हा आगामी साहित्य अकादमी पुरस्कार एखाद्या डीटीपी ऑपरेटरने मिळवल्यास गैर वाटणार नाही. परिक्षण नाही, समीक्षण नाही, ओळख नाही तर फक्त ऑनलाईन प्रसिध्द असलेल्या लेखमालेच्या लिंकाची ऑनलाईनच मांडलेली अनुक्रमणिका इतकीच कोंबडी असता मसाल्यासाठी वाहवा? खरोखरच वाहवा वाहवा. (लेखात त्या प्रामाणिक दोन ओळी असल्याबद्दल धन्यवाद पण फुल्ल कलरफुल्ल विम्याच्या जाहीरातीतल्या रिस्क फॅक्टरच्या ओळीइतक्याच लपवणेबल आहेत हे सांगणे नलगे)
अ‍ॅक्चुअली प्रपोगंडा (किंवा उच्चारी प्रॉपगंडा. लॅटीन शब्द. मूळ अर्थ Congregation for Propagating the Faith. मराठीत तो आमलेच प्रोपगंडा असा लिहित असावेत. इतके दिवस प्रपोगंडा किंवा प्रॉपगंडा असाच ऐकेलेला आहे. अर्थात धाग्याच्या शीर्षकात सुध्दा इंग्रजीतले स्पेलिंग चुकवून लेखकाला काही नवीन प्रपोगंडा तयार करायचा असल्यास कल्पना नाही.)
ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी खर्‍या खोट्या गोष्टी रेटून सांगून लोकांची मने भ्रमित करायची हा उद्देष्याने सुरु झालेली अपप्रचाराची हि मोहिम त्याचे यश पाहता राजकारणी, धर्मकारणी, व्यापारी आणि काही समाजकंटक अशा लोकांनी कधी आपलीशी केली हे लोकांना कळलेच नाही. ख्रिस्त्यापासून सुरु झालेल्या प्रपोगंडापासून कुणीच अस्पर्श राहिलेले नाही. तेंव्हा ख्रिस्ती लोकच ते करतात असे म्हणण्यातही अर्थ नाही. खरे पाहता प्रपोगंडा शब्दशः राबविला कम्युनिस्टांनी आणि हुकुमशहांनी. भारतातही सुरुवातीस बोलायला किंवा सांगायला काही नसले की मार्क्स असे म्हणतो आणि एंगल्स असे लिहितो करुन उतारेच्या उतारे तोंडावर फेकायची पध्दत होती. अशा शाब्दिक मनोर्‍याने सामन्य लोक प्रभावित होत व त्या शब्दढीगाच्या कौतुकात मूळ मुद्द्याकडे केंव्हाच दुर्लक्ष्य झालेले असे. अगदी हिच भावना माझ्या मनात ही अनुक्रमणिका बघताना आली.
असो.
सुंदर मांडणीसाठी घेतलेल्या श्रमासांठी कौतुक आणि प्रपोगंडाचा अधिक अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा.
धन्यवाद

मित्रहो's picture

13 Oct 2021 - 7:29 pm | मित्रहो

खूप देखणा लेख. मी आधी page source बघितला. पुढे कधी वापरता येईल का म्हणून.

खूप अभ्यासपूर्ण लेख आवडला. ते सदर लोकसत्तामधे आल्यामुळे वाचण्यात आले नाही. वर तुम्ही एका प्रतिसादात जे मत मांडले त्याच्याशी सहमत आहे.

किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते

या मुद्य्याशी सहमत. परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे.

हॉलिवुडच्या सिनेमांनी अमेरीकेचा प्रोपगंडा रेटण्यासाठी कशी मदत केली याविषयी मला वाटते अमोल उदगीरकर यांनी मिपावर लिहिले होते. चांगला लेख होता. मागे StratNewsGlobal या युट्युब चॅनेलवर ब्रिटिश आणि अमेरीकन मिडियाने त्यांची मिलिटरी, गुप्तहेर यंत्रणा याचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला आपण अजूनही मागे आहोत या स्वरुपाची चर्चा ऐकली होती. Spy Chronicle या पुस्तकात सुद्धा प्रोपगंडा या विषयावर चर्चा आहे.

पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.

टर्मीनेटर's picture

14 Oct 2021 - 10:36 am | टर्मीनेटर

@ सुरिया & मित्रहो
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ सुरिया
आपल्यासारख्या 'व्यासंगी' सदस्याचे मार्गदर्शन, टीका, कौतुक, सल्ले आणि शुभेच्छा ह्या माझ्यासारख्या नवोदित होतकरू लेखकासाठी फार मोलाच्या असतात. त्यासाठी आपले विशेष आभार 😋

@ मित्रहो

परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे.

बरोबर आहे! त्याबद्दलची माहिती ४६ व्या भाग 'प्रोपगंडाशी लढा!' मध्ये लेखकाने दिली आहे.

पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.

+१

अमोल उदगीरकर यांचा मिपावरील लेख वाचायला नक्की आवडेल. (सापडला नाही लिंक दिलीत तर फार बरे होईल)
धन्यवाद.

रंगीला रतन's picture

14 Oct 2021 - 11:45 am | रंगीला रतन

व्यासंगी? ख्या ख्या ख्या

Rajesh188's picture

14 Oct 2021 - 11:14 am | Rajesh188

कारण एक माणसाच वर्तन आणि समाज म्हणून एकत्र आल्यावर किंवा कोणत्या ही कारणाने एकत्र आल्यावर जो समूह निर्माण होतो त्या समहुहाचे वर्तन हे खूप विरोधी असते.
म्हणजे थोडक्यात जीवनात कधी झुरळ पण न मारणारा निष्पाप व्यक्ती जेव्हा दंगलखोर जमावाचा भाग असतो तेव्हा तो माणसं पण क्रूर पने मारतो.
हा फरक का घडतो ,ही मानसिकता का बनते हा मोठा अवघड प्रश्न आहे.
समाज ची मानसिकता,समूहाची मानसिकता ही वैयक्तिक व्यक्ती ची मानसिकता पेक्षा वेगळी असते.
समजून घ्या अर्थ नीट व्यक्त करता आले नसेल. गाभा लक्षात घ्या.
आणि propaganda ha ठराविक स्टेप नी तयार करावा लागतो.
पाहिले Target असलेल्या विशिष्ट लोकांचे रूपांतर समूहात करणे आणि त्या समूहाचे नियंत्रण करूंन त्यांना हवी ती दिशा देणे ही स्टेप महत्वाची असावी.
एकदा व्यक्ती समूहाची हिस्सा झाली की त्याचा संबंध समाजाची मानसिकता ह्या गूढ मानसिकता मध्ये होते.

Nitin Palkar's picture

19 Oct 2021 - 6:38 pm | Nitin Palkar

समूहाच्या मानसिकतेबद्दल नुकताच एक वीडेओ पाहिला .
https://www.wionews.com/videos/gravitas-passengers-looked-on-as-a-woman-...
बघा..

झुंडीचे मानसशास्त्र हे विश्वास पाटील यांचे पुस्तक वाचले की पण बऱ्याच गोष्टी समजतात.

किल्लेदार's picture

15 Oct 2021 - 8:45 pm | किल्लेदार

छान माहितीपूर्ण लेख. तुमचं प्रेझेंटेशन मला नेहमीच आवडतं.

रवी आमलेंच पुस्तक किंडल वर उपलब्ध नाही. वाचायला नक्कीच आवडेल.

स्मिता.'s picture

15 Oct 2021 - 10:20 pm | स्मिता.

एका चांगल्या विषयाची माहिती करून दिलीत. तुम्ही दिलेल्या दुव्यांमधले काही लेख वाचले. प्रत्येक लेखातूनही हळूच प्रोपगंडा केलेला स्पष्ट दिसतोय :)

अवांतरः सध्या Scandal नावाची मालिका बघतेय, ती अमेरिकेतल्या राजनितीवर आधारित आहे आणि त्यातही प्रोपगंडा करून अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या जाताना दाखवलंय.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 11:11 am | टर्मीनेटर

@ किल्लेदार & स्मिता
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Oct 2021 - 1:18 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सात भाग वाचुन झाले. कॅव्हेल आणि जेसिकाची कहाणी रोचक आहे.

Propganda आहे असतो पण मूर्ख शाहणी लोक त्यांचा बळी का होतात.
Propganda वर लेख लिहणे म्हणजे मूर्ख शाहण्या लोकांना त्यांचे गुन्हे माफ करण्याची संधी देणे असा त्याचा अर्थ आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Oct 2021 - 2:55 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तुम्हाला काय म्हणायचंच समजलं नाही.

रंगीला रतन's picture

18 Oct 2021 - 2:58 pm | रंगीला रतन

ते कोणाला च समजत नाही.
त्यांना पण :=)

Rajesh188's picture

18 Oct 2021 - 3:19 pm | Rajesh188

मी फक्त माझ्याच मेंदू वर विश्वास ठेवतो .बाकी प्रतक्ष ब्रह्मदेव आला तरी आणि त्यांनी काही सांगितले तरी मी त्या वर विश्वास ठेवणार नाही.
माझा मेंदू मला जे सांगेल तेच त्रिकाळ सत्य.

रंगीला रतन's picture

18 Oct 2021 - 3:25 pm | रंगीला रतन

जबरी. म्हणुनतर आम्ही सगळे तुम्हाला च प्रभु मानतो :=)

Rajesh188's picture

18 Oct 2021 - 3:16 pm | Rajesh188

देशात सत्तेवर येणाऱ्या देशहित विरोधी सरकार ल लोक च निवडून देणार.
त्या पक्षाची वकिली देशातील विचारवंत करणार .
पण त्या निवडून आलेल्या सरकार नी देशाची वाट लावली,लोकांना देशोधडीला लावले तर त्यांच्या पापात हे मदत करणारे सहभागी असणार नाहीत.
अशा ह्या लोकांना त्या पापा मधून मुक्त करण्यासाठी propganda ही संज्ञा विचार पूर्वक मांडली गेली आहे
.

रंगीला रतन's picture

18 Oct 2021 - 3:21 pm | रंगीला रतन

तुम्ही म्हणता म्हंजे तसेच असेल :=)

Nitin Palkar's picture

19 Oct 2021 - 6:40 pm | Nitin Palkar

अतिशय अभ्यासपूर्ण आणि महितीप्रद लेख.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

24 Oct 2021 - 11:07 am | ॲबसेंट माइंडेड ...

नो बिंदी नो बिझनेस हे प्रसिद्ध ब्लॅागर शेफाली वैद्य यांचे कॅंपेन जाहीरातींतुन हिंदु परंपरा विरोधी अजेंडा राबवणाऱ्यांच्या विरोधात उचललेले चांगले पाउल आहे. भारतीय आता प्रपोगंडा ओळखायला लागलेत तर.

मागे तनिष्कने अगोचरपणा केला होता, आता फॅब इंडिया आणि पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी केलाय!
या लोकांना हिंदू ग्राहकांनी दणका द्यायलाच हवा. #NoBindiNoBusiness या हॅशटॅगला माझे समर्थन आहे!!
0

कॉमी's picture

25 Oct 2021 - 9:53 am | कॉमी

बालिश.

अथांग आकाश's picture

25 Oct 2021 - 10:01 am | अथांग आकाश

अपेक्शित प्रतिक्रिया!
0

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

25 Oct 2021 - 10:13 am | ॲबसेंट माइंडेड ...

+१ #NoBindiNoBusiness

समाज मध्यम असू किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया चर्चेचा विषय हिंदू धर्म कसा खराब आहे हाच असतो.
देव आहे तर दाखवा?
हिंदू परंपरा कशा चुकीच्या आहेत.
असले च विषय असणार कधीच बाकी धर्मा विषयी चर्चा करणार नाहीत
कारण हिंदू कानाडोळा करतो म्हणून.
जाहिराती असतील तिथे पण हाच प्रकार ह्याला पण कारण हिंदू ची नको तेव्हढी सहनशीलता.
आक्रमक पने आपली बाजू मंडणे खरोखर गरजेचे बनले आहे.
तो स्वरा भास्कर फक्त हिंदू विषयी च बर्गळत असते बाकी कोणत्याच धर्मात तिला त्रुटी दिसत नाहीत.
हा पण अजेंडा च आहे.

अथांग आकाश's picture

25 Oct 2021 - 9:53 am | अथांग आकाश

तुमच्याशी सहमत आहे!
0
काउंटर इंटेलीजन्स असतो तसा हिंदुविरोधी प्रचाराला उघडा पाडणारा काउंटर प्रपोगंडा असायलाच पाहीजे!