भावकविता

मौनात दडले क्रौर्य

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
11 Feb 2015 - 8:06 pm

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

---- शब्दमेघ

भावकविताकविता

नेहेमीची गोष्ट

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
7 Feb 2015 - 9:32 am

'Don't take me for granted';
तिने दम दिला
'अग? पण मी कुठे?'
त्याने केविलवाणा प्रयत्न केला

'माहिती आहे मला तुझा स्वभाव...
मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव;
एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..'
चिडून गेली ती आत तणतणत!

कस सांगू हिला.. surprise आहे!
तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे!
एक गजरा... एक नाटक... नंतर long walk चा plan आहे...
तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे...

भावकविताकविता

आई ....

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
5 Feb 2015 - 4:04 pm

तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||

ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||

धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||

छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||

-- शब्दमेघ

भावकविताकविता

स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 4:05 pm

प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता ||धृ||

हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
आणि वेगळेपणाची
मग लक्षणेही आली
गर्दीत पुरुषांच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच भूक आता

कळपात श्वापदांच्या
गत होई जी हरणाची
होते तशी अवस्था
अन भीती ही मरणाची
एकही भला चेहरा
ना वाटतो आधार
सर्वांसमक्ष येथे
घडतोही अत्याचार
सगळा समाज वाटे
झालाय मूक आता

भावकविताकरुणकवितासमाज

हृदयाचा फोन

महेश अशोक खरे's picture
महेश अशोक खरे in जे न देखे रवी...
27 Jan 2015 - 1:55 pm

व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
म्हणून एक प्रयत्न केला.

मूळ मजकूर

भावकविताकविता

अर्घ्य

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Jan 2015 - 1:48 pm

झळ उन्हाची येते लेवून
गतकाळातील 'आठवकळा'
ते दिवस नेटके होते
अन रात्री उलगडलेल्या...

मी तुला, तू मजला ...
हलकेच पुन्हा आठवतो
विस्मृतीच्या क्षणांसाठी
कण कण साठवतो ....

हळुवार पुन्हा मी हसतो
त्या हसण्यावर ती रुसते
बट केसांची नकळत,
त्या गालावर रस्ता चुकते

तो थेंब चिंब ओलेता ...
हलकेच चुकार ओघळतो
मी शुष्क कोरडासा,
तो मला भिजवूनी जातो

प्राजक्त कधी परसातला
खांद्यावर ठेवतो डोके
दरवळताना जाई-जूई,
हळुच घेती व्याकुळ झोके

भावकविताकविता