भुकेले आणि माजलेले

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Jul 2017 - 12:09 pm

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

समाजलेख

पावसाळ्यातील काही छायाचित्रे....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
18 Jul 2017 - 10:36 am

भंडारदर्‍याला जाताना (मागच्या वर्षी) भयंकर पाऊस अनुभवला. एका ठिकाणी तर पुलावरून पाणी वहात असल्यामुळे थांबावे लागले व शेवटी पोलिसांच्या देखरेखीखाली पाण्यात गाडी घालावी लागली. त्याचे खालील छायाचित्र. समोर दिसतोय तो रस्ता आहे. पाण्याखाली गेलेला....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गटारीगाथा

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
17 Jul 2017 - 8:26 pm

२०११ साली लिहिलेली हा लेख येणाऱ्या गटारीच्या स्वागतासाठी पुन: पोस्ट करीत आहे.

विनोदलेखअनुभवविरंगुळा

ऐका वेड्याची कहाणी

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
17 Jul 2017 - 2:10 pm

कोतं कोतं कोतं कोतं

त्याचं मन थोडं कोतं

तिच्यासंगे राहण्यासाठी

जागोजागी पळत होत व्हतं II

त्याला काय ठाव अग्नी

त्याला नाय ठाव पाणी

सात जन्मांची ती राणी

ऐका वेड्याची कहाणी II

शाळा मॉप त्यो हुंदडला

येऊन कॉलेजात पडला

सुंदरीला पाहताक्षणी

जागच्याजागीच थांबला II

हाती धरशी पुस्तकं

धरे लेखणी उगाच

मन खोळंबले तेथेच

जागी नाही रे मस्तक II

कुणी मित्र ते दिसेना

कुठे जीव तो रमेना

राघु असाच सुकला

दिसे जागो जागी मैना II

करे पाठलाग तिचा

कविता

शब्द मौनातले

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
17 Jul 2017 - 9:06 am

मौनात काळजाला जी आर्त हाक जाई
शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई

शब्दात वार नाही, ना त्यास धार काही
का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई

शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही
शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई

जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही
एकांत शब्द काही, शोधावयास जाई

शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे
भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई
... संदीप लेले

कवितागझल

राणी पद्मावती

कल्पतरू's picture
कल्पतरू in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 11:03 pm

येत्या वर्षाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट येतोय. राणी पद्मावती नावाचा. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारतेय. आता हा चित्रपट रिलीज होणार आणि त्यामध्ये आपल्याला निर्मात्यांच्या अगम्य आणि अतर्क्य कल्पनाशक्तीचे(जसे बाजीराव मध्ये सुरवातीलाच मस्तानीची धडाकेबाज एंट्री, पिंगा गाण्यावर काशी आणि मस्तानीचा डान्स वैगरे वगैरे) दर्शन होऊन खरी राणी पद्मावती कुठेतरी हरवून जाणार.

इतिहासलेख

टाईमलाईन---- हिंदू ते निधर्मी होण्याची!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 9:10 pm

बाल्यावस्था( वय १० ते १३)------

धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस.हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता.पुढे दाढी वाढवणारे आणि टोपी घालणारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे लक्षात यायला लागले.एकदा शाळेतून घरी येताना दोन तीन नग्न लोक काही गर्दीबरोबर चालत होते .ह्या लोकांचाही वेगळा धर्म आहे ही माहीती मित्राने पुरवली.

धर्मप्रकटन