अमेरिकेतील किराणा खरेदीचा अनुभव

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 9:55 pm

हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती.

राहती जागाअनुभव

मी शोधात आहे अशा कवितेच्या,

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 Sep 2017 - 2:08 pm

मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा

कविता माझीमुक्तक

शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders..

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 12:12 pm

माझे एक उत्साही क्लायंट श्री प्रतिक यांना ना एक सवय आहे..त्यांना मिळ्णाऱ्या धमाका, शुअरशॉट, मल्टीबॅगर्स.....कॅटेगरीतील 'टीप्स' लोककल्याणाच्या भावनेने 'फॉरवर्ड' करण्याची.

अर्थकारण

बाप्पाचा नैवेद्यः अ‍ॅपल पाय

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
4 Sep 2017 - 8:24 am

अ‍ॅपल पाय

बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे काय करता येईल हा नेहमीच विचार असतो. प्रसादासाठी म्हणून खूप फळे येतात, तेव्हा एकदा फ्रुट सॅलेड होतेच. तरीही बरेचदा उरलेल्या सफरचंदांचे काय करायचे हा प्रश्न असतो.असेच मनात आले की अ‍ॅपल पाय केला प्रसादाला तर काय हरकत आहे? मागच्या वर्षी नाही का बाप्पाला बर्लिनर आवडले होते, तर ह्या वर्षी अ‍ॅपल पाय खायला घालू या. तसे अ‍ॅपलपायचे खूप प्रकार आहेत पण अगदी सोपा, पटकन होणारा मार्सेलाच्या रेसिपीने केलेला हा अ‍ॅपल पाय गरम,गार,कोमट कसाही खाता येतो. वॅनिला आइसक्रिम बरोबर, व्हिप्ड् क्रिम बरोबर किवा नुसताही खायला छान लागतो.

तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 2:48 am

नमस्कार मंडळी,

मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)

काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)

प्रवासचौकशीमदत

तंत्रज्ञान आणि पेटंट चे महत्व

आपला निखिल's picture
आपला निखिल in तंत्रजगत
3 Sep 2017 - 10:25 pm

Intellectual Property Rights (IPR) अर्थात बौद्धिक संपदा, इतर सर्व संपतीं प्रमाणेच माणसाची बौद्धिक, वैचारिक क्षमता किंवा कलात्मकता हि देेखील एक प्रकारची संपत्तीच आसून प्रत्येक माणसाने आपली बुद्धिमत्ता आणि कलात्मकता वापरून तयार केलेल्या प्रत्येक कृती वर त्याचा अधिकार आहे. ह्याच भावने मधून बौद्धिक संमपदेचा अर्थात IPR चा उगम झाला. IPR मागचा प्रमुख हेतू हा प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बौद्धिक कार्यावर अधिकार मिळवून देणे आणि इतर लोकांकडून त्या कार्याचा unauthorized वापर थांबवणे हा आहे.

IPR चे बरेच प्रकार असले तरी मुखात्वे तीन प्रकार आहेत:

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
3 Sep 2017 - 8:52 pm

डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।

डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।

मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।

वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।

सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।

जिलबीफ्री स्टाइलकवितामुक्तकविडंबन