अजून एक हत्या , अजून एक संधी !!
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही भारतात माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, बळी तो कान पिळी हाच कायदा आहे, कुणाच्या शेपटावर कधी पाय पडेल व आपण जीव गमावून बसू अशा समाजात व व्यवस्थेत आपण राहतो याची पुन्हा एकदा भयप्रद जाणीव करून देणारी ही अतिशय निषेधार्ह हत्या आहे.