प्रकाशन व्यवसाय - व्यवसायातील तंत्र आणि मंत्र (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!
पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे. या तंत्राने पुस्तक निर्मितीला अनेक मर्यादा येत.चित्रशाळा प्रेस ,निर्णयसागर प्रेस तसेच राजा रवीवर्मांची मळवली येथील प्रेस ही काही उदाहरणे आहेत.