न्यू यॉर्क : १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा
===============================================================================
रडू
"आमच्या घरी ना , मला एक छोटा दादा मिळाला आहे. त्याला दोनच काम असतात. मुठ आवळून इकडेतिकडे पाहत बसण , आणि भोकाड पसरण.
आता उद्या माझा पेपर आहे आणि हा सकाळपासुन रडतोय. थांबा आजोबांनाच विचारतो तो का रडतो ते.."
"आजोबा..आजोबा.. अहो बघा ना तो कसा रडतोय सारखा. बोलून का टाकत नाही काय पाहिजे ते ?"
" अरे मानवी भाषेबद्दल पुर्ण अनभिज्ञ आहे तो. भुक लागली मग जिवाच्या आकंताने तो टाहो फोडतो. टाहो फोडला ,की आई जवळ करते हा अनुभव ते गाठीशी बांधून घेतो."
" आजोबा , मग डॅडा का कधी रडत नाही ? "
औरंगाबाद सायकल कट्टा
पुण्यातला पहिला सायकल कट्टा संपन्न होतानाच या औरंगाबाद सायकल कट्ट्याची बीजे रोवली गेली होती. मोदकरावांचा पुण्यातल्या सायकल कट्ट्याचा हा लेख तुम्ही वाचला असेलच !अर्थातच या दोन्ही कट्ट्याचे प्रणेते मोदकरावाच आहेत हे येथे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे.
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .
आम्ही , म्हणजे अस्मादिक आणि आमचं खटलं , साधारण जुलै मध्ये राजस्थान स्वारी वर गेलो होतो. संपूर्ण ट्रीप नेहमी प्रमाणे मी स्वत:च प्लान केली होती. सबब अगदी पहिल्या दिवसापासून Adventure असणार ही कल्पना होतीच. पण ते मुंबई पासूनच सुरु होईल याची तिळमात्र ही कल्पना आम्हांला नव्हती. त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली . त्यामुळे आमच्या सौ”नी सांगून सुद्धा ,”अगं विमान १२ चे आहे, आपण ११ पर्यंत पोचलो तरी चालेल !" असं म्हणून क्याब ८ ची बुक केली.
मी ..... कोण ?
मी ..... कोण ?
मी कोण तुम्ही कोण
जन्माच्या वेळीच ठरवतात
जात ,पात ,धर्म,देश
ओळख तेव्हाच सांगून टाकतात !
'मी' म्हणायच्या आधी
"तू कोण " हे शिकवून टाकतात !
आधी होते बर मी यजुर्वेदी
लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी,
कुटुंबामध्ये आमच्या
आहेत कोकणस्थही चार ,
बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार !
कॉलनीमधले मला 'मराठी'
म्हणून ओळखतात
शहरात इतर ठिकाणी फिरताना
'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ?
ब्लॅक अँड व्हाईट
चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल.
किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे.
मक्केतील उठाव २
सुगंधसय
चाहूल चाहूल,
सोनचाफा,
मंद पाऊल,
बकुळीला;
तीट काजळीला,
साजिरा प्राजक्त,
आणि वाटेवर,
आकाशमोगरा.
त्याचा निवारा,
चांदण्यात..
सुगंधसय,
पाझरे मनात-
गेली अत्तरे,
कधीची उडून..