चेंडूफळीच्या गोष्टी !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
3 Jan 2017 - 5:55 pm

"२००३ वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना. भारत वि ऑस्ट्रेलिया! भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. तेवढ्यात ऑस्ट्रलियन ओपनर्स ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन मैदानात येत आहेत. भारतीय कप्तान सौरव गांगुली संघासोबत चर्चा करतोय. आज एक नवीन बॉलर भारतातर्फे पदार्पण करतोय. गांगुलीने त्याच्या हातात नवीन चेंडू सोपवला. कोण हा नवीन बॉलर? ह्याचे नावही फारसे ऐकलेले नाही. अजून कॅमेरा त्याच्यावर गेला नाहीये. दुरून तो रन-अप घेताना दिसतोय. हळूहळू कॅमेरा त्याच्या जवळ जातोय. अरे देवा !! भारताचा नवीन बॉलर !!!!................मी !! ?????"

क्रीडालेख

सुखाच्या शोधात...

उपेक्षित's picture
उपेक्षित in जे न देखे रवी...
3 Jan 2017 - 3:40 pm

सुखाच्या शोधात...

चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,

नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,

स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी

उपेक्षित....

कविता

मकरंद बोरीकर

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
3 Jan 2017 - 1:48 pm

आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती.

रेखाटनअनुभव

Naate (इडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
3 Jan 2017 - 12:19 pm

आपली पेर्नाही

आमच्या शेजारच्यांकडं की नाय , दोन कुत्रे आहेत. हिरव्या डोळ्यांची सतत भुंकणारी ती अअल्सेशियन हरी आणि कायम कान पाडून बसलेला लांबुडक्या दु:खी चेहर्याचा नार्सिसस उर्फ नार्या. ही त्यांची कविता.

हरिच आणि नाऱ्याच
नात जगावेगळ असत
जवळ असले तरीही
मिलन नाशिबि नसत

हरिची लहर, सतत
त्याला असते भुंकत
तरीही प्रेम करतो नार्या
बिन प्रश्न विचारत

vidambanविडंबन

पक्षांच्या, कीटकांच्या विश्वात रमताना

केळकर गुरुजी's picture
केळकर गुरुजी in मिपा कलादालन
2 Jan 2017 - 9:13 pm

नमस्कार,

सर्व्हर क्रॅशमुळे आगोदर पोस्ट केलेला याच शीर्षकाचा धागा गेला. आणि अजून इथे टंकन करण्यासाठी मदत लागते आहे तरी सांभाळून घ्याल अशी आशा आहे. मागचीचच प्रस्तावना पुन्हा न करता पक्षांच्या, कीटकांच्या काही व्हिडियोज चे दुवे इथे देत आहे. आनंद घ्यावा. आपल्या सूचना, सल्ले यांचं स्वागतच आहे. या निमित्ताने माझ्याप्रमाणेच पक्षांच्या छायाचित्रणात रस असलेले अनेक दोस्त मिळतील असा विश्वास वाटतो.

यांची मराठी नावं, संज्ञा मला देता आलेल्या नाहीत, तरी आपण त्याबद्दलची माहिती इथे द्यावी अशी विनंती आहे.

कर्वेनगरात

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 4:02 pm

जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.

राहती जागाअनुभव