झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
22 Jan 2017 - 5:10 pm

नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची.

वाङ्मयअर्थकारणशिक्षणमाध्यमवेध

धनंजय महाराज मोरे -व्यक्ति परिचय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
22 Jan 2017 - 1:55 pm

विकिपीडियाचे नवीन माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत ग्रामीण क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते.

असाच एक स्वतः बद्दलचा लेख नवे मराठी विकिपीडियन धनंजय महाराज मोरे यांनी स्वतः बद्दल लिहिला. ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.

संस्कृतीधर्म

स्वरचित महाभारत : भाग शेवटचा

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
22 Jan 2017 - 12:01 pm

शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला.

मुक्तकप्रकटन

विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
22 Jan 2017 - 8:54 am

*/

नमस्कार.
आपल्या मिपाच्या 'गोष्ट तशी छोटी'साठी सतीश राजवाडे यांची मुलाखत तुम्हा सर्वांपुढे ठेवताना मला खूप आनंद होतो आहे.

आई

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
21 Jan 2017 - 11:33 pm

जेव्हा ती सोबत असते
तिची किम्मत नसते
तिच्या instructions..
कामं सांगणे अगदी नको वाटते

'किती ग तेच तेच सांगशील?
आता मी मोठी झाले... थोडं थांबशील?'
शिकणार आहे ग घरातली कामं
थोड मला भटकू तर दे...
तुझं ऐकतेच आहे;
पण हव तस जगु तर दे...

ए मैत्रिणीचा वाढ दिवस आहे
गिफ्ट काय देऊ?
तू किती ग ओल्ड फॅशन्ड
मी थोडा शॉर्ट ड्रेस घेऊ?
ए बाबांना पटवशिल?
हो म्हणायला सांगशील?
रात्रि थोssडा उशीर होईल...
तू सांभाळून घेशील?

भावकविताकविता

(१) अकाउंट्स कसे लिहावेत ( सुरुवात आणि तयारी )

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
21 Jan 2017 - 9:56 pm

अकाउंट्स ( सुरुवात आणि तयारी )

विषय सूची
१ ) गाभा
२ ) ओळख
३ ) पद्धत
४ ) साधन सामग्री
५ ) काही प्रश्न

६ ) अधिक वाचनासाठी लिंक्स

तीन सेकंदाचा जीव

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
21 Jan 2017 - 7:44 pm

बुधवार ची संध्याकाळ हि काही प्यायला बसण्याची वेळ नव्हे . शनिवार रविवार समजू शकतो . पण बुधवार ? एक तर दुसरे दिवशी ऑफिस ला जायचं असतं. त्यामुळे मनसोक्त पिता येत नाही . तीर्थ घेतल्या सारखं सालं एक एक घोट घेऊन गप्प बसावं लागतं . घरी जायला जास्ती वेळ करून उपयोग नाही . किंवा मग काही बाही कारण सांगावं लागतं घरी . म्हणजे . कैच्याकाय कारणं सांगणे हे नवीन नाही माझ्यासाठी . मी कुठे मोठा राजा हरिश्चंद्र लागून गेलोय ! तो पण माणूस मूर्ख होता च्यायला . पण म्हणून .. बुधवार संध्याकाळ ?

कथालेख

किस्सा झाला ना राव!

नाटक्या's picture
नाटक्या in लेखमाला
21 Jan 2017 - 10:50 am

*/

नमस्कार मंडळी,
रंगकर्मी म्हणून रंगमंचावर काम करता असताना बऱ्याच वेळेला काहीतरी गफलत होते आणि त्यामुळे नाट्यगृह हसण्यात बुडून जाते, पण नटांसाठी नामुश्कीची वेळ ओढवते. पुलंच्या भाषेत "प्रेमपत्र कितीही गोड, 'गो'च्या पुढे शंभर नवग्रह काढून लिहिलेलं असलं तरी त्याचं जाहीर वाचन नेहमीच हशा पिकवतं". असेच काही किस्से.... स्वतः अनुभवलेले, पाहिलेले आणि काही दिग्गजांकडून ऐकलेलेदेखील.

विंगेत गलबला - निपुण अविनाश धर्माधिकारी काऊच वर येतायेत!!! -

महासंग्राम's picture
महासंग्राम in लेखमाला
21 Jan 2017 - 10:48 am

*/

पहिल्यांदा पिरा ने जेव्हा निपुणची मुलाखत घ्यायची आहे असं सांगितलं तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलाखत घेता येईल याचा आनंद होता. टेन्शन याच्यासाठी की या आधी मास कॉम करताना प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या, पण अशी व्हिडिओ मुलाखत घेण्याचा काहीच अनुभव नव्हता.

शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला, (त्याच्या आधीचे किस्से म्हणजे एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत ते परत कधीतरी ). मुलाखतीची तयारी करताना निपुण बद्दल भरपूर वाचल्या गेलं, कास्टिंग काऊचचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहिले. त्यामुळे मुलाखतीसाठी भरपूर मदतच झाली.