एका लग्नाची गोष्ट..भाग २

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
11 Sep 2009 - 12:37 am

मागील भाग : एका लग्नाची गोष्ट


मी: बरं , आता काय कराचयं??

-----------------------------------------------------------------------------

सुश्या : "चल स्वर्गात जाउया."
मी: "स्वर्गात?"
सुश्या :"साल्या, ते दागिन्यांच दुकान आहे.तिथे १-२ ग्राम असे आपल्या बजेटमधे मिळणारे दागिने मिळतात. प्रिया आणी माझं भेटणं सध्या आवघड झालय. तिच्या घरी समजलं असावं. घरच्यांनी युद्धपातळीवर मुलगा बघायला सुरुवात केलीय तिच्यासाठी. म्हणून १५-२० दिवसात सगळं निस्तरायचय. माझ्या घरचे पण तयार नाही होत आहेत.

उद्या मी आणी स्टिफन आळंदी ला जाणारे, ब्राम्हण बघायला लग्नासाठी."

स्टिफन हा माझा आणी सुश्याचा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवसापासून चा मित्र . त्याचे बाबा पाद्री आहेत.बाप मुलगा दोघेही मनाने एक नंबर.जिव्हाळा तर एव्ह्डा कि आमचा पूर्ण ग्रूप त्याच्या मम्मी पप्पा ना मम्मी पप्पा म्हणायचा आणी म्हणतो पण अजून.

हा रहायचाही सुशांतच्याच जवळ. ह्याचच घर आमच्या प्लानींग चा अड्डा बनला होता.

असंच बोलत बोलत आम्ही स्वर्ग मधे पोचलो...

थोडं ईकडे तिकडे पाहून शेवटी एक २ ग्रामच मंगळसूत्र पसंत केलं. किंमत : २०००. ह्याच्यातच कानातले पण इन्क्लूड होते.

आंधळा मागतो एक आणी देव देतो दोन, याच ऊक्तीनुसार स्वर्गवाल्याकडे स्कीम चालू होते की, २००० ची खरेदी केली की ४ गोल्ड्प्लेटेड बांगड्या फुकट.
त्याही घेतल्या.

तिथून २ दुकानं सोडली की स्वर्गच दुसरं दुकान होतं , तिथून दोघांसाठी अंगठ्या घेतल्या.

दागिने तर झाले...आता कपडे

लक्ष्मी रस्त्यावर गेलो...२-४ साडीची दुकाने पाहीली.साड्या आवडल्या नाहीत.
मग एक चांगलं दुमजली साडीच दकान पाहून आत घुसलो (आता नाव आठवत नाही). सेल्समन ला सांगितलं की आम्हला सिल्कमधे आंबा कलरची साडी हवीय...१०-१५ साड्यांतून शेवटी एक चांगली साडी घेतली.

घरच्यांची परवानगी नव्हती लग्नाला तरी त्यांच्या साठी (आई, काकू, आत्या, आजी) यांच्यासाठी पण साड्या घेतल्या.

तिथेच समोर एका ज्वेलरीच्या दुकानातून प्रियासाठी जोडवी घेतली.

संध्याकाळी सगळं सामान अड्ड्यावर टाकून मी चिंचवडला परतलो.

दुसर्‍यादिवशी माझी एक नोकरीसाठी मुलाखत होती सो स्टिफन आणी सुशांत आळंदीला जाउन मंगल कार्यालय आणी पंडीत ठरवून आले.लग्नाची तारीख ठरली होती..५ ऑक्टो २००६. जो पंडीत ठरवला होता तो असलीच लग्ने लावण्यासाठी प्रसिद्ध होता. तो त्याचं कार्यालयाचं एक प्रमाणपत्र देणार होता लग्न झाल्याचं आणी लग्न रजिस्टर करायचा फॉर्मपण देणार होता.

येता येता त्यांनी सुशांतसाठी जयहिंद मधून एक जोधपूरी आणी १ फॉर्मल जोडा पण आणला होता. आता लग्नासाठी फक्त सात-आठ दिवस राहिले होते.

त्यारात्री आईला फोन करुन सांगितला सगळा सीन..विचारलं की बाई तुझा पोरगा एका पळून केलेल्या लग्नाला साक्ष राहतोय..तुला काही म्हणायचय का?

"अरे दोघं सज्ञान आहेत ना..तर तिथे कायदा पण काही बोलू शकत नाही मी काय म्हणणार??.आणी तुझे मित्र वाया गेलेले नाहीयेत हे मला माहितिय" ईती आई.

रात्री झोपचं लागेना..झोप नाही की नेहमी चा उतारा काढला...दुनियादारी वाचायला घेतली..पण पूर्ण वाचू शकलो नाही...मधेच थांबलो...विचार आला कि आपण करतोय आपल्या दोस्ताला मद्त ...त्यला नोकरीला लागून फक्त ४ महिने झालेत.... त्याचा 'मनिष भालेराव' तर नाही न होणार???

क्रमशः

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

11 Sep 2009 - 1:19 am | रेवती

प्रकरण हळूहळू धोकादायक तर होत नाहीये ना?
मग पुढे काय झालं?

रेवती

हर्षद आनंदी's picture

11 Sep 2009 - 6:18 am | हर्षद आनंदी

आत्ता खरी सुरवात होतीय.

आईचा विश्वास मात्र ग्रेट!! काहीच खळखळ नाही :)

चालु दे... कुणी धोपटला तर नाही ना?

अवलिया's picture

11 Sep 2009 - 9:45 am | अवलिया

पुढे??????

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

11 Sep 2009 - 9:49 am | दशानन

पुढं... काय रं :?

*

अशीच कोणाला तरी केली ली मदत आठवली.... :) चांगलं वाटतं यार आपल्यामुळे एक घर उभे राहिलेलं पाहून !

शैलेन्द्र's picture

11 Sep 2009 - 1:38 pm | शैलेन्द्र

लग्न जुळवणे किंवा करुन देणे ही एक नशा असते, अशाच एका प्रकरणात एका RSS प्रचारकाचा गृहस्थ झालेला मी पाहीलाय...

Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

फ्रॅक्चर बंड्या's picture

11 Sep 2009 - 10:55 am | फ्रॅक्चर बंड्या

सांगा लवकर

विशाल कुलकर्णी's picture

11 Sep 2009 - 11:47 am | विशाल कुलकर्णी

मस्त चालला आहेस ! पुढे काय....?

अवांतर : सुशिची "शुभमंगल सावधान" मिळाली तर वाच, त्यात पळुन जावुन केलेल्या लग्नाची भन्नाट कथा आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभो's picture

11 Sep 2009 - 12:51 pm | प्रभो

बघतोच रे....हुडकतो काहीकरून..सुशिची आहे म्हणजे वाचायला हवीच..

सुबक ठेंगणी's picture

11 Sep 2009 - 11:58 am | सुबक ठेंगणी

लवकर लिही रे...आत्ता काहीही अंदाज येत नाहिये...पुढचा भाग शेवटचा असावा ही इच्छा :)

मदनबाण's picture

11 Sep 2009 - 1:41 pm | मदनबाण

प्रभो मस्त लिहले आहे...भाग ३ लवकर लिहा. :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

टारझन's picture

11 Sep 2009 - 1:42 pm | टारझन

एपिसोड : २/९२९२२८२३७
पळवा की वो आता ? आणि जरा फुलवा ! तुम्ही काय डॉक्युमेंटरी लिहीत आहात का ?

-(चप्पलविर) टारझन
असो ... प्रतिक्रिया अवांतर वाटू शकते , वाचकांना विनंती आहे की त्यांनी धर्य ठेवावे आणि ऊडायच्या आत वाचावे

अनिल हटेला's picture

11 Sep 2009 - 4:20 pm | अनिल हटेला

प्रभो, एकता कपूर ला टक्कर देणार तर ,हम्म? ;-)

पू भा प्र....

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

प्रभो's picture

11 Sep 2009 - 4:36 pm | प्रभो

बैलोबा,
"नीट" वाचा म्हणजे कळेल....मि डिस्कवरी लिवलय...

तिकडे एकताबाई फक्त जाहिराती बनवतात असं आयकायला आलयं...