जपान लाईफ (४)
मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
त्या पासबुकातल्या नोन्दी पाहून डोळे विस्फारले........एकेक नोन्दी काही किमान सत्तावीस हजाराच्या.......एकून शिल्लक काही लाखात....... हा इतका किरकोळ दिसणारा इसम असला लक्षाधीश.....
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?
साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक? माझ्या कानात हे वाक्य मी त्या एका क्षणात कित्येक वेळा ऐकले ......कानात शब्द घुमत होते.....
मी माझ्याही नकळत हो म्हणालो. माझा आवाज मलाच अनोळखी वाटत होता.
त्या नन्तर त्याने एक कोरा कागद काढला. आणि मला समजाऊन सांगु लागला. त्याच्या सांगण्यानुसार मला ती गादी सॉरी स्लीपिंग सिस्टीम खरेदी करायची. बदल्यात मला त्याअ स्लीपिंग सिस्टीमची डीलरशिप मिळणार. मी काही करायचे नाही फक्त लोकाना सेमिनार ला घेऊन यायचे. माझ्या ओळखी मुळे एक स्लीपिंग सिस्टीमची विक्री झाली की मला काही टक्के कमिशनचे मिळणार होते असे करून मी एकूण चार पाच स्लीपिंग सिस्टीम विकल्यागेल्या तर मला माझ्या गुंतवणूकीतून मोकळे होता येणार होते स्लीपिंग सिस्टीम जवळ जवळ फुकटात पडणार होती. त्या पुढचे महत्वाचे म्हणजे मी ज्याना स्लीपिंग सिस्टीमची विकु शकलो त्यानी जर स्लीपिंग सिस्टीमची विक्री केली तर त्यावरही मला काही कमिशन मिळणार होते. रेसीड्यूल इनकम प्लॅन चे हे फायदे होते. बजाज टाटा यांच्या सारखेच माझ्यासाठी ही लोक काम करणार होते.
कित्ती सोप्पे आहे हे...शिवाय माझ्या मुळे लोकाना त्यांचे आरोग्य राखता येणार होते .
माझ्यासारख्या शंकासूराने लगेच पुढचा प्रश्न विचारलाच.
पण हे पहिले पाच लोक मिळवायचे कसे?
ते सोपे आहे. घरातली टेलेफोनची डायरी घेऊन बसा. तुमचे नातेवाईक , मित्र ,ओळखीचे या सर्वांची नावे काढा. यातले कोण घेतील कोणाला परवडेल याचा विचार करु नका.फक्त लिस्ट तयार करा.
मी मनातल्या मनात संभाव्य ग्राहक म्हणून मेहुणा , साडू ,चुलत भाऊ अशी लिस्ट करायला लागलो.
तो पुढे बोलतच राहिला. तुम्हाला असे वाटतय का की चार्/पाच लोक तुम्ही जमवु शकणार नाही म्हणून्....तसे असेल तर माणूस म्हणून जगणे सोडून द्या.
म्हणजे मी नाही समजलो
अहो माणूस मेल्यावर त्याला खांदा द्यायला चार आणि पुढे मडके धरायला एक असे पाच लोक लागतात. एखाद्याला इतकेहे जमवता येत नसेल तर तो माणूस कसला म्हणायचा.
मला हे वाक्य फार बोचले. अर्थात तो जे बोलला त्यात चूक ते काहीच नव्हते.
तो जे काही म्हणत होता ते सगळे बहुतेक माझेच विचार होते.
त्या सगळ्या वातावरणात मी भारावल्या सारखा झालो होतो. ती स्लीपिंग सिस्टीम घ्यायची आणी श्रीमन्त व्हायचे. नुसते जगण्याची तयारी करत मरायचे नाही तर खरोखर आनन्दात जगायचे.
आपण लोकाना मदत करतोय. हे एक पुण्यकर्मच आहे..........
.....
त्या सगळ्यात लोकेशने मला त्याला काहितरी सल्ला हवा होता म्हणून येथे आणले होते हे मी विसरुनच गेलो. उलट लोकेश ने मला एक संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी त्याचे मनोमन आभारच मानत होतो.
त्या भारावल्या अवस्थेत मी बाहेर आलो. जाताना देवीच्या देवळात जाऊन आलो देवीने कोल्हापूरला बोलावून एक उत्तम मार्ग दाखवला हीच भावना मनात होती.
परत जाताना गाडीत आणखी दोघेजण आले. ते माझ्या ओळखीचेच होते. वाटेत आम्ही कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतो. मध्येच चहासाठी थांबलो. सर्वानी एकमेकाकडे पाहिले आणि हसलो. वातावरणातील ताण थोडासा निवळला असावा. स्लीपिंग सिस्टीमची चर्चा सुरु झाली त्याचे गुण किती चांगले आहेत हे बोलणे सुरु असतानाच पैसे आणि रीटर्नस चा विषय निघाला. नोकरी नसल्याने अमेय हा तसा बेकार अर्थात मोकळा होता. त्याने वडीलांच्या प्रॉव्हिडन्ट मधून पैसे काढायचे ठरवले होते. राजन शेठ सी सी मधून पैसे उचलणार होते. गरज पडली तर काहितरी तारण ठेऊन ब्यान्केतून कर्ज काढणार होता. माझी पैशाची काहीच तयारी नव्हती. तरी पण कुठून तरी करून पैसे मिळतील हा आशावाद होता.
पुढच्या प्रवासात लोकांची यादी कशी तयार करायची याचीच चर्चा झाली. प्रत्येकजण स्वप्नाळू बनला होता. आम्ही रीतसर प्लॅन तयार केला.
आता या वर्षाच्या अखेरीस आम्ही प्रत्येकजण किमान दशलक्षाधीश होणार होतो.
आणि कोणाला तरी मनापासून हसत विचारणार होतो. "साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?"
आमच्या नकळत ;मानसशास्त्राचा पुरेपूर अभ्यास करून आम्हाला कशा पद्धतीने अडकवण्यात येत होते त्याचा आम्हाला गंधही नव्हता.
"बकरा किश्तो पें " हे आमच्या नव्या अवस्थेचे नाव होते. असे बरेच बकरे किश्तोमे हलाल होण्यासाठी रांकेत उभे होते
(क्रमशः )
वर्गीकरण
नेहमीप्रमाणे मस्त भाग..
उत्तम मालिका....
एक
पुढील
मस्तच....
>>अहो माणूस
खरे आहे हे.
अॅम वे वाले असेच पीडतात