जपान लाईफ(८)
मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
जपान लाईफ (४) http://misalpav.com/node/8724
जपान लाईफ (५) http://misalpav.com/node/8754
जपान लाईफ (६) http://misalpav.com/node/8787
जपान लाईफ (७) http://misalpav.com/node/8916
अशा लोकांची एक यादी करा.त्याना सांगा की तुम्ही एक नवा व्यवसाय सुरु करणार आहात तुम्हाला त्यांचा सल्ला हवा आहे....सल्ला ही अशी एकच गोश्ट आहे की लोक ती न मागताही देतात आणि कोनी मागितली तर एकदम आनन्दीत होतात.
मला लोकेशच्या फोनवरच्या सम्भाषणाची आठवण झाली.
लोकेशने मला बरोब्बर पकडले होते आणि सावज म्हणून जाळ्यात स्वतःहून चालत आलो होतो. दहा हजारापेक्षा ज्याची किम्मत एक कपर्दीकही जास्त नसेल अशी एक गादी मी एक लाखात घ्यायला निघणार होतो.
मानसशास्त्राचा एवढा चांगला उपयोग गोबेल्सनेही करून घेतला नसेल
एकदा यात अडकला की ! हो अडकला हाच शब्द योग्य आहे. उत्तम ब्रेन वॉशिंग आणिमिट्ठास बोलणॅ यावर भुलून लोक लाख लाख रुपये देतातही. आणि अडकतात. स्वतःचे अडकलेले पैसे काढण्यासाठी मित्र नातेवाईक यांचे खुशाल बळी देतात.
माझ्या पहाण्यातही जपान लाईफच्या गाद्या विकून पैसे मिळवलेले एक दोघे आहेत. त्यान मिळणारे पैसे पाहुन भारावून जाणारे मात्र बरेच आहेत. मल्टी लेवल मार्केटिंगच्या बाबतीत सुरुवातीला असे म्हंटले जाते की हा पार्ट टाईम व्ययसाय आहे यात रेसीड्यूअल इनकम मिळते.
मी काही डोक्टर्स ना या व्यवसायात आलेले पाहिले आहे. एके ठीकाणी तीन डॉक्टर्स नी तर गादी घेण्यासाठी चक्क एक पतसंस्था सुरु केली होती.
या किंवा अशा व्यवसायात आलेल्यांचे नन्तर काय होते ते आपण पुढे पाहु पण त्या अगोदर अशीच आणखी एक कंपनी पाहु.
अमेरीकन ड्रीम या संकल्पनेने एके काळी अमेरीकेत धुमाकूळ घातला होता. अजूनही ती एक स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे.
तुम्हाला एक छानशी बायको असावी .तुमच्या मुलाना चांगल्या कॉलेजात शिक्षण मिळावे. तुम्हाला रहायला एक प्रशस्त बंगला असावा . त्या सभोवती सुंदर बाग असावी. घरात एक मस्त लांबसडक गाडी असावी. आणि कोणतीही गोष्ट हवी असेल तेंव्हा उपलब्ध व्हावी . आणि त्या गोष्टीची गोडी चाखायला मनासारखा वेळही असावा हे ते अमेरीकन ड्रीम.
थोडक्यात रहने को एक घर होगा खाने को हलवा होगा. सोने को बिस्तर होगा कपडा पंखा सब होगा......... बर्रोब्बर हा त्या माय फेअर लेडी तल्या एलेझाबेथ डूलिटल चा डायलॉग.....
सर्वसामान्य माणसाचे स्वप्न...
हे तुमचे स्वप्न आहे का हा प्रश्न सामान्यतल्या सामान्य माणसाला विचारला किंवा अगदी अनील्/मुकेश ना विचारला तरी ते होच म्हणतील.
पैसे हवेत त्यांचा उपभोग घ्यायला वेळ हवा आणि आनन्दी कुटुंब हवे. हे ते ड्रीम.
हे आम्ही तुम्हाला मिळवून देण्यात मदत करु असे कोणी म्हणला तर हेमेलीनच्या पाईड पायपरसारखे त्याच्या मागोमाग सगळी जनता धाव्त सुतेल.
एक कंपनी आहे अगदी शुद्ध अमेरीकन. अॅम वे. त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत साबण टुथपेस्ट आणि तत्सम वस्तु. एखाद्या ठीकाणी प्रवासात तुमची एखाद्या हसर्या आनन्दी व्यक्तीशी ओळख होते. तो/ती तुमचे नाव लिहुन ठेवते साधारण चार दिवसानी त्या व्यक्तीचा फोन येतो. काय कसे आहात तुम्ही त्या दिवशी भेटलात वेळ छान गेला तुमच्या सारखी व्यक्ती भेटून खूप बरे वाटले/ कोणी आजारी असल्याचे त्या जुन्या संभाषणाच्या वेळेस उल्लेखले असेल तर अजारी माणसाची तब्येत कशी आहे याची हमखास चौकशी होते.
तुम्हाला बरे वाटते. त्या माणसाने आपल्याला आवर्जून फोन केला किती चांगला माणुस आहे असे तुमचे मत बनते.
दुसर्या दिवशीही त्याच माणसाचा फोन येतो. ती व्यक्ती आणि तिची पत्नी तुम्ही रहता त्याच भागात येणार असतात किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ आहे का अशे विचारणा होते. तुम्ही अगोदरच त्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे प्रभावीत झालेले असता. नाही म्हणणे एकदम तोडून टाकणे जमत नाही तुम्ही कहितरी सबब सांगता. वेळ मिळेल की नाही सांगता. तुमची सबब नोंदवुन घेतली जाते.
किंवा तो माणूस आणि त्याच्या मित्रांचे एक छोटेसे गेट टुगेदर आहे त्यात तुम्हाला बोलावले जाते. तुम्ही एकदम खुश होता. नेवे वातावरण नव्या ओळखी व्हाव्यात म्हणून गेटटुगेदर केले आहे .
तुम्हाला कसे यायला जमेल असे विचारले जाते. ठीकाण जर दूर असेल तर ती व्यक्ती आणि त्याची बायको आम्ही तुम्हा नवरा बायको दोघानाही पिक अप करु . त्या निमित्ताने वहिनींची माझ्या बायकोशी ओळख होईल. तुमच्या पेक्षाही तुमच्या पत्नीला या न पाहिलेल्या व्यक्तीबद्दल एकदम फॅमिली फ्रेन्ड सारखे घट्ट ऋणानुबंध वाटायला लागतात.
असे भक्कम जाळे विणून ठेवले जाते . हे जाळे कस विणायचे हे ठरवून दिले त्या इसमाचे नाव "बील ब्रीट्स " ब्रीट्स सिस्टीम बद्दल आपन पुढे बोलुच.
आपण त्या गेटटुगेदरमिटींगला जातो. एका वेगळ्याच दुनियेत आपण पाऊल ठेवतो. ही दुनिया असते
'व्हेअर द माईड इज विदाऊट फीअर अॅन्ड द हेड इस हेल्ड हाय" या रविंद्रनाथांच्या कवितेत वर्णिल्या सारखी.
जाळ्यात आपले पाऊल पडलेले असते.
( क्रमशः)
वर्गीकरण
९....१०.....११......
In reply to ९....१०.....११...... by निखिलराव
नुस्तेच
In reply to नुस्तेच by अवलिया
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by कपिल काळे
+२
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
+३ असेच
In reply to +३ असेच by दशानन
+४
In reply to नुस्तेच by अवलिया
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by कानडाऊ योगेशु
हा हा हा मी
In reply to ९....१०.....११...... by निखिलराव
८१..१००...१२१
९....१०.....११.....
In reply to ९....१०.....११..... by विजुभाऊ
आज मला पण
In reply to ९....१०.....११..... by विजुभाऊ
ओ
विजुभाऊ! ४
In reply to विजुभाऊ! ४ by कानडाऊ योगेशु
हा हा हा
In reply to हा हा हा by योगी९००
MLM
In reply to MLM by शिशिर
आवक्यात
माझ्या
In reply to माझ्या by विजुभाऊ
हाच तर
हाऽऽऽ! मस्त ताणून द्यावीशी वाटते आहे!
In reply to हाऽऽऽ! मस्त ताणून द्यावीशी वाटते आहे! by चतुरंग
हाऽऽऽ!
गीताच
पुढचे भाग?
In reply to पुढचे भाग? by पुष्कर
मलाही सापडले नाही. लिहीले
नेमका हाच प्रश्न विचारायचाय..
मागचे भाग नाहित?
In reply to मागचे भाग नाहित? by पंतश्री
अनुक्रमणीकेत जाऊन उघडा.