बाप

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
8 Jun 2009 - 8:20 am

"सर, तुमचे आय्.टी बद्दल काय मत आहे?" मला एक पालकांनी विचारले.
ह्यांच्या चिरंजिवाना १० वी त माझी मदत झाल्याने ९०% मार्क मिळतील अशी खात्री होती.
" अहो, रिझल्ट लागु दे मग बघु." मी
"मी त्याला आय्.टी डीप्लोमा ला वी.जे.टी.आय ला घालायचे ठरवले आहे. डीप्लोमा करेल आणि मग डीग्री ला जाईल. मग ददात नाही." पालक
" हा निर्णय घेताना तुम्ही मुलाला विचारलय का"? मी
"त्यात काय विचारायचे, बाप म्हणुन हा निर्णय मी घेतला आहे. आज जरा मंदी आहे म्हणुन आय्.टी डाउन आहे. पण येत्या सहा वर्षात परत वर येईल ह्याची खात्री आहे मला. तुम्हाला काय वाटते?
" मी नॉस्ट्रॅडेमस नाही हो. सहा वर्षानंतर आय्.टी चे काय होणार हे मला कसे माहीत असणार. आणि हे नक्की माहीत आहे त्यांचे अभिनंदन.आय .टी चे आयुष्य जगणे तुमच्या मुलाला शक्य आहे की नाही ते बघा. चार आय.टी मधील लोकांकडे बोला. मग ठरवा. त्याच्या १० वी च्या मार्काला फारसे महत्व देउ नका. दोन वर्षे जाउ द्यात. बाहेरचे जग बघु द्यात. आणि १२ वी नंतर स्वःत म्हणाला तर मग होउ द्या आय्.टी. इंजीनीयर. आणि डीप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला उत्तम मार्क मिळाले नाही तर डीग्री ची सीट मिळवण्याकरता लागणार्‍या डॉनेशन ची तयारी आहे का"? मी
"आय्.टी च्या आयुष्याला काय झालय? चांगला ढीगभर पैसा मिळतो की? १२ वीला आणि सीईटीला चांगले मार्क नाही मिळाले तर परत डोनेशन आहेच की?
"अहो, सी.ई.टी ला ५५ ते ६०% ला सुद्धा इथे ना तिथे आय .टी ईंजीनियरींग मिळुन जाते. गेला बाजार बी.एस्.सी ( आय्.टी) करुन पुढे जाता येते. खर्च कमी. आणि शेवटी पगार डीग्री पेक्षा आय्.टी स्कील ला मिळतो.. तुम्ही कुठल्या कॉलेज मधुन कीती % ला डीग्री मिळवली ह्याला नसतात. तुम्ही म्हणता तेवढ सोपे नसते आय्.टी. १२ तास खुर्ची न सोडता चिकटुन काम करायची सवय असेल तर मग हरकत नाही.
माझ्या मते ही मंडळी टॉयलेट ब्रेक सुद्धा घ्यायला सुद्धा कचरतात. आज बाप म्हणुन तुम्ही निर्णय घेतलात. उद्या डीप्लोमाची मेहनत जमली नाही तर बोल तुम्हालाच लागेल हे लक्षात घ्या. आपल्याला नेमक काय करायच आहे ह्याची प्रगल्भता यायला दोन वर्ष जाउ देत. ह्या उप्पर निर्णय तुमचा. पण एक नक्की सांगतो बाप म्हणुन निर्णय घ्यायचे दिवस संपले मग तो कीतीही बरोबर असो वा त्याच्या भविष्याची खात्री देणारा असो. तुम्ही फक्त सुचवु शकता." मी
पालकाच्या चेहेर्‍यावरचे भाव बघता माझ्या कडे बोलुन त्याच्या पदरी निराशा पडली असे वाटते. ज्याचे उत्तर आधीच ठरवले आहे ते प्रश्न मला का विचारायचे?. म्हणजे ह्यांच्या उत्तराला माझी मान्यता मीळाली की हे खुश नाहीतर " वाटले होते तेवढा हुशार नाही हो हा माणुस" म्हणायला मोकळे.
जाताजाता: मदनबाण चा फोन द्यायला पाहीजे होता या पालकांना.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Jun 2009 - 8:53 am | अवलिया

ज्याचे उत्तर आधीच ठरवले आहे ते प्रश्न मला का विचारायचे?. म्हणजे ह्यांच्या उत्तराला माझी मान्यता मीळाली की हे खुश नाहीतर " वाटले होते तेवढा हुशार नाही हो हा माणुस" म्हणायला मोकळे.

:)

असो.

जाताजाता - तुमच्याकडे येणारे ९९% पालक येड*वे असतात असे माझे तरी अनुभवांती मत झाले आहे.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

सहज's picture

8 Jun 2009 - 8:54 am | सहज

:-) छोटासाच लेख पण पालकांनी विचार करण्याजोगा.

आयटी, इंजीनीयरींग इ नेहमीच्या वाटांपेक्षा नव्या पण बर्‍याच संधी (पक्षी: पैसा) मिळवून देणार्‍या पर्यांयांची ओळख करुन द्या ना मास्तर.

नैतिक आणि कायदेशीर
राजकारण
व्यापार
उद्योजक
वगैरे

नैतिक पण बेकायदेशीर
मटका
गावठी दारु
हातभट्टी
वगैरे

अनैतिक पण कायदेशीर
इनसायडर ट्रेडींग
पोन्झी स्किम्स
आयपीओ
हाय फाय हास्पिटल्स
मसाज सेंटर्स
वगैरे

अनैतिक आणि बेकायदेशीर
किडनी रॅकेट्स
ह्युमन ट्रॅफिकींग
ड्रग्ज
वगैरे

अवांतर - पैसाच मिळवायचा आहे ना? मग शिकायचे कशाला? शिकलेली माणसे कामावर 'ठेवता' येतात.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

संदीप चित्रे's picture

8 Jun 2009 - 9:52 am | संदीप चित्रे

असा एक सर्वसाधारण समज आहे. अर्थात तो खरा नाहीये.... प्रोग्रॅमिंग हा आय.टी.चा महत्वाचा भाग असला तरीही.

तुम्ही योग्य सल्ला दिल्याप्रमाणे त्या मुलाचे 'शैक्षणिक' गुण फारसे महत्वाचे नाहीत. माझ्या माहितीत असे लोक आहेत जे शाळेत खूप हुषार नव्हते पण आयटीमधे चमकले आहेत.

मी जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आयटीत करायचा विचार करत होतो तेव्हा आयटीत काम करणार्‍या एका मित्राने हा सल्ला दिला होता -- "जर आपल्याला एसीत बसायला मिळेल, नीट पैसा मिळेल आणि एकंदर चकाचक वातावरणात काम करता येईल, या अपेक्षेने कंप्युटर शिकायचा विचार करत असशील तर सोडून दे ! एकदा काम करायला लागलास की कधी कधी स्वस्थपणे चहासुद्धा पीता येणार नाही !!"

त्या मुलाची आवड आणि कुवत काय आहे ते समजून घेऊन मार्ग निवडणं जास्त योग्य ! बाकी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अनंता's picture

8 Jun 2009 - 9:59 am | अनंता

बाप!!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

मराठमोळा's picture

8 Jun 2009 - 10:24 am | मराठमोळा

सर्वच ठिकाणी पालकांचे चुकते असे नाही.
कारण सर्वच मुलांना योग्य निर्णय घेता येतो असे नाही. विद्यार्थी दशेत मुलांचे विचार चंचल असतात. पुढे कुठे जायचे आणी काय करायचे हे त्यांना माहितच नसते. कॉलेजात बरेच विद्यार्थी "माझे फिल्ड" माझे करीअर, मी त्यातच पुढे जाणार" असे म्हणत असतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा मग "अरे रस्ता चुकला" असे त्यांच्या लक्षात येते आणी मग वेळ निघुन गेलेली असते.
माझ्या मते तरी पहिल्या पाच वर्षांनंतर सगळे जॉब सारखेच (कॉपी&पेस्ट, संशोधकांचे सोडले तर) शेवटी मग माणुस पैसा, स्थैर्य आणी स्टेटस या गोष्टींच्या मागे लागतो. त्यावेळी मग आपले मित्र किंवा आपल्या वयाचे लोक किती पैसा कमावतात आणी किती सुख उपभोगतात याकडे लक्ष असते आणी मग आपण सर्वांच्या पुढे जावे प्रगती करावी, मित्र, नातेवाईक यांनी कौतुक करावे, मुले चांगल्या शाळेत शिकावीत अशी ईच्छा बळावते."
आजच्या काळात समाधानी वृत्ती बाळगणारे फारच कमी आहेत. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मराठी_माणूस's picture

8 Jun 2009 - 11:46 am | मराठी_माणूस

शेवटी मग माणुस पैसा, स्थैर्य आणी स्टेटस या गोष्टींच्या मागे लागतो. त्यावेळी मग आपले मित्र किंवा आपल्या वयाचे लोक किती पैसा कमावतात आणी किती सुख उपभोगतात याकडे लक्ष असते आणी मग आपण सर्वांच्या पुढे जावे प्रगती करावी, मित्र, नातेवाईक यांनी कौतुक करावे
-----------
योग्य निरिक्षण

विशाल कुलकर्णी's picture

8 Jun 2009 - 10:25 am | विशाल कुलकर्णी

विचार करायला भाग पाडणारा लेख !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2009 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार

अजुन एक नवा अनुभव....

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

रेवती's picture

8 Jun 2009 - 8:53 pm | रेवती

पराशी सहमत.
एक नवा अनुभव आपल्यामुळे आम्हाला मिळाला.
आपले सगळे लेखन वाचत असते.
धन्यवाद!

रेवती

धनंजय's picture

8 Jun 2009 - 9:28 pm | धनंजय

विप्र पालकांशी गूढ शैलीत बोलत नाहीत तेही कळले. ह. घ्या ;-)

मंदी-तेजी दोन्ही पचवायला व्यवसायाबद्दल "हा आपला" अशी आंतरिक ओळख हवी. यात वडलांचा (आणि समुपदेशकाचा) सल्ला, आणि मुलाचा सहभाग - दोन्ही हवे.

अनुभवकथन आवडले.

टारझन's picture

9 Jun 2009 - 12:13 am | टारझन

विप्र पालकांशी गूढ शैलीत बोलत नाहीत तेही कळले.

=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
असं काय बोलताय धनंजय सर ... एका पालकांना त्यांनी चित्रकला बंद करायला लावली होती .. विसरलात काय ? =))

मास्तर चालू द्या हो :)