मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
8 Apr 2009 - 11:54 pm

प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती..

आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.

त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल. अजून चैत्र संपायचा आहे तोवर मिपावर चैत्रगौरींचं ह़ळदीकुंकू धुमधडाक्यात साजरे करीन म्हणतो!

अर्थात, वर उल्लेख केलेल्या भगिनींनी सहकार्य केलं तरच! आणि त्या करतील अशी खात्रीवजा अपेक्षा आहे! तात्याचा शब्द खाली पडू द्यायचा किंवा नाही हे त्यांनी ठरवायच :)

आपला,
(संस्कृतीप्रेमी) तात्या.

--

साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! :)

हे ठिकाणधोरणमांडणीसंस्कृतीवावरसमाजमौजमजा

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

9 Apr 2009 - 12:17 am | भाग्यश्री

साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! =))

चांगली आयडीआ आहे.. पण या यादीत स्वातीताईचे नाव नाही आणि माझं नाव आहे पाहून धक्का बसला! :)
सहकार्य करायला काहीच हरकत नाही माझी.. आधी स्वयपाकघराने मला सहकार्य केलं पाहीजे! :)

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 12:21 am | विसोबा खेचर

चांगली आयडीआ आहे.. पण या यादीत स्वातीताईचे नाव नाही आणि माझं नाव आहे पाहून धक्का बसला!

अरेच्च्या विसरलोच! हे प्रकटन लिहितांना हजर सभासदात जी नावे दिसली, जी चटकन आठवली तेवढी लिहिली. मुद्दाम कुणाचं नाव लिहिलं नाही असं नाही!

सहकार्य करायला काहीच हरकत नाही माझी.. आधी स्वयपाकघराने मला सहकार्य केलं पाहीजे

वाट पाहतो.. :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 12:23 am | विसोबा खेचर

आता स्वातीच्या नावाची ऍडिशन केली आहे..

आपला,
(पन्ह्यावर मनापासून प्रेम करणारा) तात्या.

शितल's picture

9 Apr 2009 - 2:25 am | शितल

>>>पन्ह्यावर मनापासून प्रेम करणारा
१०१ %सहमत..
मला ही पन्हे खुप आवडते.. तात्याने नाव काढले आता तर पिल्या शिवाय मन शांत होणार नाही. :)

रेवती's picture

9 Apr 2009 - 12:18 am | रेवती

तात्या,
रेशिपी, फोटू समदं एकदम तय्यार आहे.
आज रात्री टाकते.

रेवती

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 12:22 am | विसोबा खेचर

वाट पाहतो :)

असो, भावजींना नमस्कार! :)

तात्या.

प्राजु's picture

9 Apr 2009 - 12:32 am | प्राजु

चैत्र होईलच धडाक्यात साजरा..
नक्की.
रेवतीने काम केलंच आहे.. पुढचं हळदी कुंकू माझ्याकडून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

9 Apr 2009 - 2:26 am | शितल

पन्ह माझ्या कडुन ;)

आंब्याची डाळ माझ्याकडून. फोटो तात्यांना पाठवते!

चकली
http://chakali.blogspot.com

चित्रा's picture

9 Apr 2009 - 3:57 am | चित्रा

पन्हे, कैरीची डाळ हे तर पदार्थ यादीतून निघाले.
आता मी काय करू?

असो, भाग घेईन, रविवारी रात्रीपर्यंत पाठवते.

रेवती's picture

9 Apr 2009 - 7:10 pm | रेवती

आता मी काय करू?
हळदीकुंकवाला कलिंगड व काकडीच्या फोडीही देतात ना?
कलिंगडाचे सरबत किंवा जालावरून (साभार) फोटू असं काही करता येइल का?
काही तरी नविन सुचवायचा प्रयत्न करतीये.:)
बाकी जालिंदरजींच्या मनात असेल तेच होइल.;)

रेवती

चित्रा's picture

10 Apr 2009 - 6:15 am | चित्रा

कलिंगड व काकडीच्या फोडीही देतात ना?
कलिंगडाचे सरबत किंवा जालावरून (साभार) फोटू असं काही करता येइल का?

मी खूपशी आळशी आहे, हे इतक्या सगळ्यांना सांगण्याची गरज आहे का? !!

(हम्म, आता हे खरे नाही ते दाखवण्यासाठी तरी काही तरी करणे आले).

रेवती's picture

10 Apr 2009 - 8:43 pm | रेवती

तुला नाही ग आळशी म्हणत.
उद्या मार का खायचाय मला?;)
एक सुचवलं फक्त...

रेवती

जयवी's picture

9 Apr 2009 - 3:49 pm | जयवी

अरे वा....... मस्तच !!

तात्या.... सही :)

मीनल's picture

9 Apr 2009 - 4:48 pm | मीनल

इथे कैरी न वापरता पन्ह करतात. कळतही नाही की ज्युस मिक्स करून केलेल आहे.
वेलची केशर चा स्वाद, रंग अगदी सेम तू सेम.
एकदम सही लागत.
कुणाला येत का ते?
स्वाती ताई तुला येत?
मला वाटत ऍपल सॉस + लिंबू + ऑरेंज ज्युस. बट नॉट शुअर.
मीनल.

मुक्ता's picture

10 Apr 2009 - 8:40 pm | मुक्ता

ऍपल सॉस + लिंबू + ऑरेंज ज्युस ..वेलची केशर चा स्वाद, रंग अगदी सेम तू सेम....अगदी बरोबर हे मस्तच लागत.आम्ही ३०० -३५० लोकांनसाठी केल होत पण
कोणालाही ते आंब्याच नाही हे कळलं देखील नाही.

/मुक्ता

स्मिता श्रीपाद's picture

9 Apr 2009 - 5:00 pm | स्मिता श्रीपाद

मैत्रिणींनो... सख्यांनो... तायांनो....
मला एक शंका आहे....

आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.

तुमच्या सगळ्याजणींकडे चैत्रात पण वस्तु लुटतात का? (म्हणजे संक्रांतीच्या ह.कुं ला लुटतातच ...पण चैत्रात पण? )

बाकी मी पण तयात आहे फोटु पाठवायला :-)

-स्मिता

रेवती's picture

9 Apr 2009 - 7:05 pm | रेवती

तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. संक्रांतीला वस्तू लुटतात;
पण आपण संक्रांतीला नाही लुटल्या वस्तू . थोडी गंमत म्हणूनही छान वाटेल.
हे आपले पहिलेच जालीय हळदीकुंकू आहे म्हणून जरा साग्रसंगीत करायचे असा
तात्यांचा अंतस्थ हेतू असावा.;)

रेवती

विसोबा खेचर's picture

10 Apr 2009 - 12:16 am | विसोबा खेचर

हे आपले पहिलेच जालीय हळदीकुंकू आहे म्हणून जरा साग्रसंगीत करायचे असा
तात्यांचा अंतस्थ हेतू असावा

करेक्ट! :)

तात्या.

मीनल's picture

10 Apr 2009 - 6:27 am | मीनल

अय्या, हळदी कूंकू?
तुम्ही सुरू करा डाळ, पन्ह वगैरे.

मी ही तयारीलाच लागते कशी?
कुठली साडी नेसावी बर??????????
आणि दागिने ????????? :D

मीनल.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2009 - 6:32 pm | स्वाती दिनेश

हे घ्या आमचे वसंतपेय-

स्वाती

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 6:45 pm | विसोबा खेचर

आंब्याची डाळही हवी.. :)

तात्या.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2009 - 6:47 pm | स्वाती दिनेश

आंब्याची डाळ माझ्याकडून. फोटो तात्यांना पाठवते!
चकली

चकली करते आहे ना आंब्याची डाळ,:)
स्वाती

चकली's picture

9 Apr 2009 - 7:05 pm | चकली

कालच पाठवला फोटो.

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

10 Apr 2009 - 4:53 pm | विसोबा खेचर

कृपया मुखपृष्ठ पाहावे..!

'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असं काहीसं कुणीतरी म्हटलं आहे ना?! :)

असो,

आपला,
(मराठी आंतरजालावर संपादकीय, हळदीकुंकू यासारखे नवनवीन प्रयोग सर्वप्रथम करणारा) तात्या अभ्यंकर. :)

रेवती's picture

10 Apr 2009 - 8:45 pm | रेवती

मुखपृष्ठ पाहिले तात्या.
धन्यवाद!
आत्तापर्यंत ऑनलाइन हळदीकुंकू कुणी केलं नसेल.
तो मान मिपाचाच!:)

रेवती

मितभाषी's picture

18 Sep 2010 - 5:24 pm | मितभाषी

.

सुधीर काळे's picture

18 Sep 2010 - 7:33 pm | सुधीर काळे

तात्यासाहेब,
तुम्ही आता 'हळदीकुंकवा'पुरतेच डोकावताय् कीं आतापासून परत पूर्वीसारखे सक्रीय होऊन पदभार परत सांभाळणार आहात?

विसोबा खेचर's picture

18 Sep 2010 - 9:36 pm | विसोबा खेचर

काळेसाहेब,

कीं आतापासून परत पूर्वीसारखे सक्रीय होऊन पदभार परत सांभाळणार आहात?

नाही, आता पदभार सोडला कायमचा..! मिपा जन्माला घातलं, ते आपल्या पायावर चालू लागलं, मोठं झालं..समाधान वाटलं..!

आता सवडीने एखादं नवीन संस्थळ! अर्थात, सवडीनेच!

तात्या.