बदल

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
20 Mar 2009 - 11:39 am

रोज रोज त्याच दिशा
रोज रोज त्याच वाटा
दिशांनी पण वाटा थोड्या बदलायला हव्यात.

रोज रोज तेच गाव
रोज रोज तिच पायवाट
वाटेनेही गाव जरा विसरायला हवे.

रोज रोज त्याच व्यथा
रोज रोज त्याच कथा
कथांनीही कधी कधी व्यथांना सावरायला हव.

रोज रोज तिच छाया
रोज रोज तोच दाह
दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव.

रोज रोज तेच हसण
रोज रोज तेच रडण
रडता रडता खुदकन जरा हसायला हव.

रोज रोज तिच सकाळ
रोज रोज तिच संध्याकाळ
संध्याकाळ्नेही थोड सकाळसारख ताज व्हाव.

रोज रोज तिच घडण
रोज रोज तेच जीवन
जीवनातही कधी कधी बदल घडवायला हवा.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

बाकरवडी's picture

20 Mar 2009 - 1:53 pm | बाकरवडी

छान आहे कविता
आवडली

बाकरवडी

सुधीर कांदळकर's picture

20 Mar 2009 - 1:55 pm | सुधीर कांदळकर

आपल्याला ताजेतवानें करतो. सध्या सोप्या रीतीनें मांडलें आहे. छानच.

सुधीर कांदळकर.

दशानन's picture

20 Mar 2009 - 1:56 pm | दशानन

सुंदर !

रोज रोज तिच छाया
रोज रोज तोच दाह
दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव.

जागु's picture

20 Mar 2009 - 2:49 pm | जागु

बाकरवडी, सुधीर, राजे धन्यवाद.

सहज's picture

20 Mar 2009 - 2:55 pm | सहज

रोज रोज तिच कविता
रोज रोज तेच प्रतिसाद
प्रतिसादातही कधी कधी काव्य बसवायला हव.

थोडासा बदल चांगलाच!!

कविता आवडली बर का जागुजी :-)

सूहास's picture

20 Mar 2009 - 3:42 pm | सूहास (not verified)

ज्यात साधेपणा असावा म्हणजे समजायला अवघड जात नाही,

आपणही असेच लिहीत रहावे अशी अपेक्षा (शर्मा कि॑वा बेलवणकर नव्हे.)

रोज रोज तेच रडण
रडता रडता खुदकन जरा हसायला हव.

करणार प्रयत्न करणार

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

सँडी's picture

20 Mar 2009 - 3:45 pm | सँडी

सहज सुंदर कविता!

अवांतर : ;)
रोज रोज तीच झोप
रोज रोज तेच उठणं
उठुनही परत परत झोपायला हवं.

रोज रोज तेच काम
रोज रोज तेच ऑफीस
ऑफीसातही कधी कधी काम करायला हवं.

रोज रोज तेच प्रतिसाद
रोज रोज तेच विडंबन
प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं.

निशिगंध's picture

20 Mar 2009 - 3:49 pm | निशिगंध

रोज रोज तेच प्रतिसाद
रोज रोज तेच विडंबन
प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं.

छान प्रतिसाद

बाकी कविता मात्र मस्त आहे.

_______ निशिगंध

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:07 pm | क्रान्ति

मस्तच आहे बदल! खूप मनापासून भावला.
रोज रोज तेच काटे
रोज रोज तेच सल
काट्यांनीही कधीतरी फुलायला हव!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

20 Mar 2009 - 10:57 pm | प्राजु

बदल आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जृंभणश्वान's picture

21 Mar 2009 - 2:20 am | जृंभणश्वान

मस्त आहे कविता

अनिल हटेला's picture

21 Mar 2009 - 8:10 am | अनिल हटेला

आवडली कविता !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु's picture

21 Mar 2009 - 11:56 am | जागु

सहज, सुहास, सँडी, निशिगंध, क्रांती, प्राजु, जृंभणश्वान, अनिल तुमचे खुप खुप धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 11:02 am | विसोबा खेचर

दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव.

व्वा! सुंदर कविता...!

तात्या.

चंद्रशेखर महामुनी's picture

23 Mar 2009 - 1:41 pm | चंद्रशेखर महामुनी

मजा आली ! झकास !

विशाल कुलकर्णी's picture

23 Mar 2009 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

छान आहे, आवडेश !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)