रोज रोज त्याच दिशा
रोज रोज त्याच वाटा
दिशांनी पण वाटा थोड्या बदलायला हव्यात.
रोज रोज तेच गाव
रोज रोज तिच पायवाट
वाटेनेही गाव जरा विसरायला हवे.
रोज रोज त्याच व्यथा
रोज रोज त्याच कथा
कथांनीही कधी कधी व्यथांना सावरायला हव.
रोज रोज तिच छाया
रोज रोज तोच दाह
दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव.
रोज रोज तेच हसण
रोज रोज तेच रडण
रडता रडता खुदकन जरा हसायला हव.
रोज रोज तिच सकाळ
रोज रोज तिच संध्याकाळ
संध्याकाळ्नेही थोड सकाळसारख ताज व्हाव.
रोज रोज तिच घडण
रोज रोज तेच जीवन
जीवनातही कधी कधी बदल घडवायला हवा.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3935
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
खरेच बदल .......
सुंदर ! रोज
धन्यवाद
आवडली
जरा कविता अश्याच हव्यात..
.
प्रतिसादातील विडंबन
मस्तच!
सहज आणि साधी..
वा
उत्तम !!
सहज, सुहास,
दाहानेही
बदल
छान