कार्तिकीला आक्षेप का?

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
9 Feb 2009 - 2:32 pm

मिपावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांना, कार्तिकी गायकवाड महाविजेती होणारच नाही. प्रथमेश किंवा आर्या या दोघांपैकी कुणीतरी एक होईल, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी वेगळाच निकाल लागल्याने या सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा. तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही. प्रथमेश आणि आर्या दोघेही समजदार आहेत. प्रथमेशची तयारी तर अफलातून आहे, हे शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या प्रत्येकलाच माहीत आहे. परंतु त्याला काही मर्यादा निश्‍चित आहेत. त्यामुळेच या दोघांपेक्षा कार्तिकी निश्‍चितच उजवी आहे. गीत, भावगीत-सुगम संगीत, उडत्या चालींवरची गाणी, रागाधारित गीते, गझल हे सर्वच गायन प्रकार तिच्या कंठातून तिच्या "वाईल्ड' (कुणीतरी तिला हिणवले आहे) स्टाईलमध्ये निघत होते आणि समजदार रसिकांच्या मनावर कोरले जात होते. तिच्या प्रत्येक गाण्याचे सादरीकरण तिच्या अंतिम फेरीतील यशाचा ट्रेलर दाखवित होते. (ऐका उघड्या पुन: जाहाल्या, जखमा उरातल्या) कार्तिकी ग्रामीण भागातील आहे, तिचे शब्दोच्चार ग्रामीण आहेत-शहरी नाहीत. म्हणून काही तिचं संगीत भ्रष्ट ठरू शकत नाही. उलटपक्षी, ग्रामीण (लोक) संगीत हेच खरे संगीत आहे. आज आपल्या ओठी असलेल्या असंख्य गाण्यांच्या चाली या लोकसंगीतावरच आधारलेल्या आहेत. याची जाण ज्यांना नाही. ते समजून घेण्याच्या ज्यांचा आवाकाच नाही, तेच कार्तिकीला "वाइल्ड' म्हणून हिणवू शकतात.

"पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

+१
पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!
at and post : janadu.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2009 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

आपले प्रकटन वाचले.
सगळ्यात आधी मी हे प्रामाणीकपणे सांगतो की माझ्या घरी दुरदर्शन शिवाय दुसरे कोणतेही चॅनेल दिसत नाही. त्यामुळे ह्या स्पर्धेविषयी आणी त्यातल्या सहभागी मुलांविषयी जास्ती कल्पना नाहि. जी काय माहिती मिळाली ती पेपर वा मिपा वाचुन.
शंका :-
आपल्या म्हणण्या प्रमाणे जर 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी' हे कळणारे लोकच संगीत समजु शकतात व कार्तिकेचे मुल्यमापुन योग्य प्रकारे करु शकतात तर मग इतर 'सामान्य आणी कमी प्रज्ञेच्या' लोकांकडुन झक मारायला एसएमएस मागवले होते का ? गायकाला सामान्य रसिकजन मोठा करतो, का हे 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी कळणारे?' ह्या प्रज्ञावान लोकांच्या बरोबरीने सामान्य रसिक सुद्धा गायकाला मोठा करतोच कि हो ! आणी जर ह्या 'प्रज्ञावान' लोकांनाच सगळे कळते व योग्य निर्णय तेच घेउ शकतात तर मग एका बंद सभागृहात बोलवा त्यांना आणी घ्या स्पर्धा, 'सामान्य' लोकांना नुसता निकाल ऐकवला तरी चालेल की.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आपल्या म्हणण्या प्रमाणे जर 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी' हे कळणारे लोकच संगीत समजु शकतात व कार्तिकेचे मुल्यमापुन योग्य प्रकारे करु शकतात तर मग इतर 'सामान्य आणी कमी प्रज्ञेच्या' लोकांकडुन झक मारायला एसएमएस मागवले होते का ?
=)) =))

गायकाला सामान्य रसिकजन मोठा करतो, का हे 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी कळणारे?' ह्या प्रज्ञावान लोकांच्या बरोबरीने सामान्य रसिक सुद्धा गायकाला मोठा करतोच कि हो ! आणी जर ह्या 'प्रज्ञावान' लोकांनाच सगळे कळते व योग्य निर्णय तेच घेउ शकतात तर मग एका बंद सभागृहात बोलवा त्यांना आणी घ्या स्पर्धा, 'सामान्य' लोकांना नुसता निकाल ऐकवला तरी चालेल की.

सहमत! शब्दशः सहमत!

मुळात बहुतेक लोकान्चा आक्षेप हा कार्तिकीला किन्वा तिच्या गाण्याला नाहीच्चे. पण आर्याला किन्वा प्रथमेश'ला डावलुन कार्तिकीला महाविजेती ठरवणे, खरोखर धाडसाचे आहे. तसे पाहायला गेले तर आर्याकडेही गाण्याच्या व्हरायटी'ज होत्या. अगदी कोणत्याही पठडीतले गाणे ती सहज सुन्दर आवाजात गाते. कार्तिकीच्या आवाजाला थोडासा वाईल्ड' नेस असल्यामुळे आणि पीढीजात अभंगांचे संस्कार असल्यामुळे ती विशिष्ट पठडीतील गाणी अत्यंत आत्मीयतेने म्हणते, याबद्दल शंकाच नाही.

पण "घागर घेऊन..", "कोम्बडी पळाली...", "खन्डेरायाच्या लग्नाला..", "लिन्गोबाचा डोन्गर..." इ. गाणी कार्तिकी जितक्या परफेक्टली म्हणते.. तितक्याच परफेक्टली ती "मी... राधिका","विसरू नको श्रीरामा मला..", "सोडा----जाउ द्या...""तुम्हावर केली मी मर्जी .." इ कोमल / अंशत: खालच्या सूरातली, लाडिक गाणी नाही गाऊ शकत!

पण आर्या मात्र "वन्दे मातरम", "सोडा--जाऊ द्या", "सांज ये गोकुळी..", "छमछम करता है ये नशीला बदन..." इ सर्व स्तरांवरील गाणी तितक्याच ताकदीने पेलते.

"कोम्बडी पळाली" हे गाणं जर आर्याने म्हटलं असतं, तर त्या गाण्यातील खड्या आवाजाबरोबरच, त्यातील माधुर्य'ही तिने नक्की टिपले असते, जे टिपण्यात कार्तिकी खरोखर थोडी कमी पडली.

अर्थात, यात कोणत्याही लिटील चॅम्प्स्ला दोष द्यायचा नाहीये. अजुन ते लहान आहेत. झी-मराठीने, काही विशिष्ट जणांचं मन राखण्यासाठी अंतर्गत राजकारण करून एकालाच "महाविजेता" घोषित करण्यापेक्षा, नेहमीप्रमाणे त्यान्चे नियम बाजूला सारून या पाचही जणांना जर "विजयी" घोषित केले असते, तर अधिक आनन्ददायी ठरले असते.
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अंकुश चव्हाण's picture

9 Feb 2009 - 4:34 pm | अंकुश चव्हाण

पण "घागर घेऊन..", "कोम्बडी पळाली...", "खन्डेरायाच्या लग्नाला..", "लिन्गोबाचा डोन्गर..." इ. गाणी कार्तिकी जितक्या परफेक्टली म्हणते.. तितक्याच परफेक्टली ती "मी... राधिका","विसरू नको श्रीरामा मला..", "सोडा----जाउ द्या...""तुम्हावर केली मी मर्जी .." इ कोमल / अंशत: खालच्या सूरातली, लाडिक गाणी नाही गाऊ शकत!

एक लक्शात घ्या - या जगामध्ये कोणीही परफेक्ट नसतो. कार्तिकीचे वय लक्शात घेता तिने सादर केलेली "मी... राधिका","विसरू नको श्रीरामा मला..", "सोडा----जाउ द्या...""तुम्हावर केली मी मर्जी .." इ कोमल / अंशत: खालच्या सूरातली, लाडिक गाणी जरी परफेक्ट नसली तरी परफेक्शनच्या जवळची नक्कीच होती. रियाज आणि वयोमानानुसार तिच्या गाण्यामध्ये हे परफेक्शन नक्की येइल यात शन्का नाही.
दुसरी गोश्ट म्हणजे - हे पाचही जण अन क्म्पेरेबल आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना करु नका.

पंचरत्नांना भविश्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.

मृगनयनी's picture

9 Feb 2009 - 5:31 pm | मृगनयनी

एक लक्शात घ्या - या जगामध्ये कोणीही परफेक्ट नसतो. कार्तिकीचे वय लक्शात घेता तिने सादर केलेली "मी... राधिका","विसरू नको श्रीरामा मला..", "सोडा----जाउ द्या...""तुम्हावर केली मी मर्जी .." इ कोमल / अंशत: खालच्या सूरातली, लाडिक गाणी जरी परफेक्ट नसली तरी परफेक्शनच्या जवळची नक्कीच होती. रियाज आणि वयोमानानुसार तिच्या गाण्यामध्ये हे परफेक्शन नक्की येइल यात शन्का नाही.

:-? :-? :-?

एक्स क्युज मी...~~~~... मी वर मेन्शन केलेल्या या गाण्यांपैकी सर्व गाणी ही आर्या'ने म्ह्टलेली आहेत. यातील एकही गाणे कार्तिकीने म्हटलेले नाही.
अशा गाण्यांसारख्या कोमल, खालच्या स्वरातली गाणी गाण्याचा कार्तिकीने एक-दोन दा प्रयत्न केला होता, पण तिला त्यात यश आले नाही. त्यामुळे सुश्री. देवकी पंडित यांनी कार्तिकी'ला तिच्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी निवडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे
कार्तिकीची बहुतांश गाणी ही एकतर वाईल्ड व्हॉईस ची किन्वा अभन्ग रुपातली होती.

याउलट आर्या'च्या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत, सुगम संगीत, भक्तिसंगीत, चित्रपट संगीत, लावणी, बैठी लावणी, कोळीगीत, आयटम सॉन्ग, देशप्रेमावरील गाणे.. इ .इ.. सगळ्याचा समावेश होता.

"मी... राधिका","विसरू नको श्रीरामा मला..", "सोडा----जाउ द्या...""तुम्हावर केली मी मर्जी .." ही गाणी केवळ आर्यानेच म्हटली आहेत, कार्तिकीने नाही.

दुसरी गोश्ट म्हणजे - हे पाचही जण अन क्म्पेरेबल आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना करु नका.

एक्झॅटली!... त्यामुळेच या पाचही जणांना "महाविजेता" घोषित करणे, केव्हाही उचित होते.

पण कोणालातरी एकालाच करायचे, असेच जर ठरले होते, तर वैविध्यपूर्ण गाणी म्हणणार्‍या "आर्या आंबेकर" ला हा किताब मिळाला असता, तर कदाचित झी-मराठीच्या नि:पक्षपातीपणाचे दर्शन घडले असते.
:)

असो, झी - मराठीला ही अनेकांची मने सांभाळावी लागतात ना!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अंकुश चव्हाण's picture

9 Feb 2009 - 5:46 pm | अंकुश चव्हाण

चुक लक्शात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी आशा करतो की मला नेमके काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्शात आले असेल. आता - त्यामुळे सुश्री. देवकी पंडित यांनी कार्तिकी'ला तिच्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी निवडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे
कार्तिकीची बहुतांश गाणी ही एकतर वाईल्ड व्हॉईस ची किन्वा अभन्ग रुपातली होती. - ही आतली खबर आमच्याकडे नव्हती, त्यामुळे खरच पक्शपातीपणा झाला आहे याचीही आम्हास कल्पना नव्हती आणि खरच पक्शपातीपणा झाला आहे का हे तुम्ही ठामपणे सांगु शकता का? तसे असेल तर मग ही बाब निश्चितच चुकिची आहे. पण तरीही अशी शंका उरतेच - फक्त एका परिक्शाकाच्या पक्शपातीपणामुळे कार्तिकी विजयी झाली की ती खरच टेलेंटेड आहे म्हणुन झाली?

मृगनयनी's picture

9 Feb 2009 - 6:14 pm | मृगनयनी

इथे कार्तिकीला कमी लेखण्याचा प्रशन्च नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, की जितक्या व्हरायटी'ज आर्या कडे आहे, तितक्या कार्तिकी कडे नाहीयेत.
आणि ज्या व्हरायटी'ज कार्तिकीकडे आहेत, त्याचा तिने पुरेपूर वापर केलेला आहे. तिचे गाणे ताल धरून नाचायला लावते, तिच्या रफ आवाजाची ही भुरळ अनेकांना पडते.

पण..पण जेव्हा एकच "विजेता" निवडणे अपेक्षित असते,या पाचही जणांतून जेव्हा एकाचीच निवड करायची असते, तेव्हा गाण्याच्या विविध अंगांचा विचार होणे अपरिहार्य ठरते. "त्यासाठी केवळ पहाडी आवाज असणे" किन्वा " झी-मराठी हे ग्रामीण भागातील लोकांनाही तितकाच स्कोप देते, हे दाखवून देणे ", हे प्रमाण ठरत नाही.

त्यामुळे सर्वार्थाने विचार करता, "आर्या आम्बेकर" हेच एकमेव नाव डोळ्यांसमोर येते.

असो,

"झी - मराठी" ही तर केवळ एक सुरुवात आहे, अजुन फार मोठा पल्ला या सर्वांनाच गाठायचा आहे.
मिपावरच्या सर्व प्रतिसादांवरुन "महाविजेती कोण व्हायला पाहिजे होतं" याबद्दलचे बहुतांश मत आता लक्षात आले असेलच.

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

yogiraj's picture

14 Feb 2009 - 10:15 pm | yogiraj

लता मंगेशकर सर्वोत्तम आहेत पण कर्नाटकि क्शिद्याला आशाताइच लागतात. हे गाण स्वता दिदिनि आशाताई कदुन म्हणुन घेत्ले आहे. प्रत्येकाचे काहि strong & weak point आसतात

पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!

कार्तिकि देवीन्चा विजय असो.......!!!!

विसोबा खेचर's picture

9 Feb 2009 - 3:32 pm | विसोबा खेचर

प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत.

आपणही आपल्या प्रज्ञेनुसार आत्ता तेच करत आहात! बाय द वे, प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार/समजेनुसारच मते नोंदवणार..!

यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा.

आपला कितपत आहे ते कळले तर बरे होईल! :)

तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही.

आपंण केलात ना? मग झालं तर! :)

"पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!

हेच बोल्तो..

आपला,
(संगीत कशाशी खातात हे न कळणारा एक सामान्य श्रोता) तात्या.

अन्वय's picture

9 Feb 2009 - 3:38 pm | अन्वय

आपला,
(संगीत कशाशी खातात हे न कळणारा एक सामान्य श्रोता) तात्या.

निदान तुम्हाला स्वत:लाच कळतंय तुम्ही काय आहात ते! देव पावला.

नितिन थत्ते's picture

9 Feb 2009 - 3:47 pm | नितिन थत्ते

लै उद्धट

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2009 - 8:45 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो चालायचेच. त्याना आवडणारी स्पर्धक निवडून आली आणि बाकीच्यांची मते वेगळी होती. अशा प्रकारचे उद्धट लेखन त्यानी आधी पण केले आहे. इथे वाचता येईल ते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मृगनयनी's picture

9 Feb 2009 - 3:48 pm | मृगनयनी

निदान तुम्हाला स्वत:लाच कळतंय तुम्ही काय आहात ते! देव पावला.

»

तात्या, तुमच्या ख.व. च्या वरती डकवलेल्या फोटो तील वाद्याचा आणि तुमच्या गाण्याचा आवाज बहुधा पोचला नसावा सर्वसामान्यांपर्यंत!
=)) =)) =)) =)) =))

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

विसोबा खेचर's picture

9 Feb 2009 - 3:50 pm | विसोबा खेचर

तात्या, तुमच्या ख.व. च्या वरती डकवलेल्या फोटो तील वाद्याचा आणि तुमच्या गाण्याचा आवाज बहुधा पोचला नसावा सर्वसामान्यांपर्यंत!

जाऊ द्या हो, हातात तानपुरा घेऊन काय, कुणालाही फोटो काढता येतो तसा मीही काढला आहे! ;)

आपला,
(संगीताचा एक ढ विद्यार्थी) तात्या.

विसोबा खेचर's picture

9 Feb 2009 - 3:48 pm | विसोबा खेचर

निदान तुम्हाला स्वत:लाच कळतंय तुम्ही काय आहात ते! देव पावला.

धन्यवाद...

आपला कितपत आहे ते कळले तर बरे होईल!

आता याचेही उत्तर मिळाले तर बरे होईल..

तात्या.

महेंद्र's picture

9 Feb 2009 - 3:48 pm | महेंद्र

एक संगित प्रेमी म्हणुन कोणिही जरी आलं तरिही मला चालेल असं मी आपल्या ब्लॉग वर आधिच लिहुन ठेवलंय..
अगदी रोहित राउत आला तरिही...
कार्तिकी तर खुप चांगलं गाते, पण प्रथमेश निश्चितच जास्त चांगला गातो.
समजा:-
जुरी कडउन ४० टक्के+ एस एम एस २५ टक्के तरिही टोटल ७५ टक्के होते.

जुरी कडुन २५ टक्के + एस एम एस ४० टक्के तरि टोटल ६५ टक्के होते..
बघा तुम्हाला कळतं का मला काय म्हणायचं आहे ते...

मैत्र's picture

9 Feb 2009 - 3:50 pm | मैत्र

सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा.
फारच विचारपूर्वक लिहिलेलं दिसतंय ....

कार्तिकी उत्तम गाते आणि तिच्या वैविध्यामुळेच ती पाचांमध्ये पोचली. आपण ते नीट मांडलं आहे. दुसरी गोष्ट की तिचे उच्चार गाताना ग्रामीण वगैरे नसतात. ती गाण्याला न्याय देऊन गाते. बोलताना ग्रामीण बाज जाणवतो.
पण तिच्या पात्रतेचा आणि लोकसंगीत हेच खरं संगीत याचा संदर्भ समजला नाही. प्रथमेश, रोहित सगळ्यांनी लोकसंगीत या प्रकाराची गाणी चांगली म्हटली आहेत. घरच्या पार्श्वभूमी मुळे कार्तिकीची तशा ढंगाची गाणी जास्त होती आणि माहीत नसलेली किंवा वडिलांनी स्वरबद्ध केलेली नवीन गाणी तिने चांगली म्हटली. जशा प्रथमेशला मर्यादा आहेत तशा तिलाही आहेत. जास्त खडा आवाज आहे म्हणून सुरेल आवाजाची भावगीत प्रकारातली गाणी ती कमी गाते. पाचही जणांची काही शक्ति स्थळं आहेत आणि काही मर्यादा आहेत. प्रत्येकजण आपल्याला जे चांगलं जमतं त्याचा जास्त उपयोग करतात. तिने लोकसंगीत गायलं आवाजाचा वापर करण्यासाठी किंवा घरातल्या आळंदीला सुयोग्य वातावरणामुळे तर ते बरोबर आणि प्रथमेश ने नाट्यसंगीत अतिशय परिणामकारकपणे आणि जबरदस्त तयारीने गायलं तर ती त्याची मर्यादा?
कार्तिकी गुणी आहेच पण तुलना करून एकाला पहिला क्रमांक द्यायचा तर तो प्रथमेश किंवा आर्याला मिळायला हवा होता. हा पुन्हा आपल्या आवडीचा भाग आहे. सूर, आवाज, तयारी या दृष्टीने प्रथमेश व आर्या जास्त योग्य होते असं अजूनही वाटतं.

यापेक्षा यातून काय साध्य झालं तर मराठी गाणी पुनरुज्जिवित झाली. लहान मुलांना मराठी गाणी पण छान असतात आणि त्याला तेवढी प्रसिद्धि आहे हे समजलं. अनेक जुन्या गाण्यांना उजाळा मिळाला आणि चांगल्या नव्या गाण्यांना संधी व व्यासपीठ.
अतुअल परचुरे यांनी जरा बोअर मारलं तरी मांडलेलं सत्यच होतं की जर तुम्ही बाहेर पडून सामान्य लोकांशी बोललात तर त्यांना या मुलांनी जो आनंद दिला तो जाणवेल आणि तोच महत्त्वाचा.
खरा गायक / विजेता कोण आहे ते येणारा काळ सांगेलच.

अन्वय's picture

9 Feb 2009 - 4:21 pm | अन्वय

यातून काय साध्य झालं तर मराठी गाणी पुनरुज्जिवित झाली.

आपण म्हणता हेच खरं आहे. परंतु टीकाकारांना हे समजायला हवे होते. आपल्या मनातील एखाद्या गायकाला महाविजेतेपद मिळाले नाही म्हणून इतका का पोटशूळ उठावा. तोही लहानग्यांच्या बाबतीत? महाविजेता कुणीही झाले, तरी
या चिमुरड्याच्या रुपाने मराठी संगीताला संजीवनी मिळेल, दिग्गज गायकांची-संगीतकारांची जागा हे पाचजण भरून काढतील, असा आशावाद प्रत्येकजण का बाळगत नाही. आपल्या आवडत्याला नाकारले म्हणून दुसऱ्या स्पर्धकावर टीका, हे नुसतेच वय वाढल्याचे लक्षण आहे.

मैत्र's picture

9 Feb 2009 - 4:40 pm | मैत्र

तुम्ही वर लिहिलेली वाक्यं अस्थानी आहेत असं मला वाटतं. कोणीही दुसर्‍या स्पर्धकावर टीका केली नाही. रोहित अनेकांना आवडत नाही म्हणून हे नुसतेच वय वाढल्याचे लक्षण आहे असं नाही.
निदान तुम्हाला स्वत:लाच कळतंय तुम्ही काय आहात ते! देव पावला.
अशा स्वरुपाची विधानं किंवा वर मी बोल्ड मध्ये दाखवलेली विधानं हे नुसतं वय वाढल्याचं लक्षण असू शकतं.
पोटशूळ हा कार्तिकी बद्दल नाही तर झी /पल्लवी चे पडद्यामागचे राजकारण याबद्दल आहे.

टीकाकार फारसे दिसले नाहीत. प्रथमेश किंवा आर्याला मिळायला हवं होतं हा सूर होता त्यात कार्तिकी चांगली नाही वगैरे कुठे वाटलं नाही. तिला प्रथम क्रमांक मिळालेला अनेकांना पटला नाही याचा तुम्हाला राग आलेला दिसतो आहे आणि तो वरच्या लेखात जी संदर्भाशिवाय विधानं आहेत त्यातून जाणवतो आहे. ज्या संयमाने आणि नेमकेपणाने तुम्ही ही प्रतिक्रिया लिहिली तो लेखात दिसत नाही.

असो. या वादात आता अर्थ नाही कारण विजेता जाहीर झालेला आहे. यातून जे चांगलं घडलं ते राहील. एस एम एस चे खेळ पुढे जास्त जोमाने वाढतील. नवीन उत्तमोत्तम मराठी गाणी आणि गायक निर्माण होतील अशी आशा. सा रे गा मा तून खूप चांगले गायक गाऊन गेले. अनेकांचं पुढे विशेष काही घडलं नाही. कालच अनघा ढोमसे हिचा सकाळ मध्ये लेख आला होता. आजवर इतक्या स्पर्धांमधून फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोशाल यांनीच पुढे आपला ठसा उमटवला. कार्तिकी आणि इतर सर्व गुणी गायकांनी काही चांगलं करिअर करावं अशी आशा मग ते मराठी हिंदी चित्रपट असो वा आर्या / प्रथमेश सारखं शास्त्रीय / नाट्यगीत असो किंवा कार्तिकी प्रमाणे लोकसंगीत असो.

अन्वय's picture

9 Feb 2009 - 4:53 pm | अन्वय

तुम्ही वर लिहिलेली वाक्यं अस्थानी आहेत असं मला वाटतं. कोणीही दुसर्‍या स्पर्धकावर टीका केली नाही. रोहित अनेकांना आवडत नाही म्हणून हे नुसतेच वय वाढल्याचे लक्षण आहे असं नाही.
निदान तुम्हाला स्वत:लाच कळतंय तुम्ही काय आहात ते! देव पावला.
अशा स्वरुपाची विधानं किंवा वर मी बोल्ड मध्ये दाखवलेली विधानं हे नुसतं वय वाढल्याचं लक्षण असू शकतं.
पोटशूळ हा कार्तिकी बद्दल नाही तर झी /पल्लवी चे पडद्यामागचे राजकारण याबद्दल आहे.

टीकाकार फारसे दिसले नाहीत. प्रथमेश किंवा आर्याला मिळायला हवं होतं हा सूर होता त्यात कार्तिकी चांगली नाही वगैरे कुठे वाटलं नाही. तिला प्रथम क्रमांक मिळालेला अनेकांना पटला नाही याचा तुम्हाला राग आलेला दिसतो आहे आणि तो वरच्या लेखात जी संदर्भाशिवाय विधानं आहेत त्यातून जाणवतो आहे. ज्या संयमाने आणि नेमकेपणाने तुम्ही ही प्रतिक्रिया लिहिली तो लेखात दिसत नाही.

असं का?.... बरं हं!

अविनाशकुलकर्णी's picture

9 Feb 2009 - 5:55 pm | अविनाशकुलकर्णी

मला असे वाटते कि जनतेचा क्षोभ व राग लक्षात घेवुन परत महा अंतिम फेरी जाहिर करावि..व परत एसेमेस मागवुन निर्णय द्यावा...व असे करावे किंवा नाहि या साठि एसेमेस द्वारे जनतेचे मत जाणुन घेवुन परत महा अंतिम फेरि घ्यावि कि नाहि ते ठरवावे.....

आपला अभिजित's picture

9 Feb 2009 - 7:14 pm | आपला अभिजित

मला असे वाटते कि जनतेचा क्षोभ व राग लक्षात घेवुन परत महा अंतिम फेरी जाहिर करावि..

मज्जा! म्हणजे पुन्हा एसएमएस चा तमाशा, निवेदकांचा भोचकपणा, झी ची मनमानी, भावनांचा महापूर!!!

लगे रहो!!!

अन्वय's picture

9 Feb 2009 - 7:22 pm | अन्वय

पुन्हा कार्तिकीकडे विजेतेपद येणार... अनेकांची पोटे पुन्हा दुखणार... पोटशूळ उठणार... झी, पल्लवीच्या आडून तिच्यावर टीका होणार... पुन्हा तिला कुणीतरी वाइल्ड म्हणणार आणि आम्ही पुन्हा त्याला ठोकणार... वाऽऽ वाऽऽ

होऊन जाऊदे... परत

विसोबा खेचर's picture

9 Feb 2009 - 9:23 pm | विसोबा खेचर

अनेकांची पोटे पुन्हा दुखणार... पोटशूळ उठणार...

कुणाचीही पोटे दुखलेली नाहीयेत. कार्तिकी अर्थातच गुणी आहे. इथे फक्त काही लोकांनी आर्या आंबेकरकरता/प्रथमेशकरता त्यांची व्यक्तिगत पसंती कळवली आहे. पोटे वगैरे दुखण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?

असो..

तात्या.

घाटावरचे भट's picture

10 Feb 2009 - 3:22 am | घाटावरचे भट

सा शिकण्यात समदं आयुक्ष जाईल.....आन मंग जर सा येउसपतुर असलं कायबाय लिवायचं नाय म्हन्जी झाली का बोंब... काय बी बोल्ता राव तात्या तुमी बी... ;)

छोटा डॉन's picture

9 Feb 2009 - 7:20 pm | छोटा डॉन

अरे व्वा, कार्तिकी जिंकली का ?
झक्कास, कार्तिकीचे अभिनम्दन व तिला पुढील वाचालीस शुभेच्छा.
इतर "कपॅबल स्पर्धकांचे" अभिनंदन व त्यांनाही शुभेच्छा ...!

बाकीचे "योग्य /अयोग्य" चालु द्यात, तिकडे निकाल घोषीत होऊन २४ तास होत आले आहेत. आता "मेगाबाईटच्या मेगाबाईट" वाद घालुन "शुन्य" उपयोग आहे. काही शिकायचेच असेल तर " ह्यापुढे कसल्याही मोहाला बळी पडुन अथवा भावनेच्या भारात समस करणार नाही" अशी शप्पथ घ्या.

------
( अभिजीत सावंतच्या इंडीयन आयडॉल्सला ढीगने समस केलेला, ह्यावेळी फुकट व चिक्कुपणे समस न करता सारेगमपा एंजॉय केलेला व सध्या एम टीव्ही रोडीज ६.० मनापासुन पाहणारा ) छोटा डॉन

सर्वसाक्षी's picture

9 Feb 2009 - 9:06 pm | सर्वसाक्षी

आपण म्हणता तसा बहुतेकांचा संगीताशी संबंध शाब्दिक असावा (म्हणजे कसा कोण जाणे). बहुतेकांना चाली कुठुन आल्या त्याचेही ज्ञान नाही. अगदी मान्य, निर्विवादपणे मान्य. माझे स्वतःचे म्हणाल तर मला संगीतातली काडीमात्र समज नाही.

तरीही, कृपया लक्षात घ्या की कुठलीही कला रुजते, जगते आणि वाढते ती कला आणि कलावंत यांच्यावर प्रेम करणार्‍या असंख्य रसिकांमुळे, केवळ संगीतातील प्रगाढ ज्ञान असणार्‍या मुठभर विद्वानांमुळे नाही.

सुंदर शिल्प पाहिल्यावर अहाहा असे उद्गार काढायला जेजे च्या पदवीचे बंधन नसते.

प्रदर्शनात ठेवलेली उत्तम प्रकाशचित्रे विकत घेणारे लोक कक्षात अस॑ताना व मी चित्र विकत घेणार नाही हे माहित असताना देखिल तासभर मोडुन मला कलात्मक प्रकाशचित्रे आवर्जुन दाखवितांना व एखदे चित्र विशेष आवडले असे सांगताच ते साकारणार्‍या विद्यार्थिनींची ओळख करुन देत 'यांना तुझे प्रकाशचित्र आवडले आहे' असे त्या कलाकाराला सांगताना प्रा. मिस्त्री वा त्यांचे विद्यार्थी यापैकी कुणीही 'तुम्ही प्रकाशचित्रणाचे शिक्षण कुठे घेतले आहे (घेतेले अस्लेच तर..)' असा प्रश्न मला विचारल्याचे आठवत नाही; उलट त्या मोठ्या कलाकारांना आपले चित्र आवडले आहे असे म्हणणार्‍याचे आभार मानण्यात कमीपणा वाटला नाही.

ज्यांना आपली कला फक्त त्या विषयातील पंडीतांनीच पारखावी असे वाटते त्यांनी जाहिर प्रदर्शन करु नये आणि केल्यास पाहणारे / ऐकणारे सगळेच त्या विषयातील ज्ञानी असतील अशी अपेक्षा धरु नये वा त्यांचा उद्धार करु नये.

अनामिक's picture

9 Feb 2009 - 9:31 pm | अनामिक

टिव्ही वरच्या स्पर्धांचा निकाल हा एस्.एम.एस. पद्धतीनेच जाहीर होतो हे माहित असतानाही अशी चर्चा करणेच पटत नाही. अंतीम फेरीत गेलेले पाचही जण छानच गात होते. वय, रियाझ आणि आकलन शक्तीमुळे कुणी थोडे पुढे तर कुणी थोडे मागे एवढेच (मला संगीतातलं ज्ञान नाही पण सगळी मुलं अगदी भन्नाट गायची असंच वाटायंच). शहरी भागातून (पुणे-मुंबई) जरी आर्या किंवा प्रथमेशला पसंती असली तरी किती शहरी भागातल्या लोकांनी एस्.एम.एस. केले हा प्रश्न आहेच. शिवाय आपल्या छोट्या गावातली मुलगी/मुलगा जिंकतोय म्हंटल्यावर गावाकडील लोकांनीही भरभरुन एस्.एम.एस. पाठवले असतील (शहरी भागतल्या लोकांएवढी एस्.एम.एस. न पाठवण्याची जागरूकता अजून गावागावात नसेल कदाचित).

खरं तर कुणीही जिंकले तरी सर्वांना त्याचे कौतुकच वाटायला हवे होते. ते वाटत असेलही, पण दुसरे स्पर्धक न जिंकल्याणे लोकांना जे वाईट वाटतेय त्यावरुन कार्तिकीबद्दल तुम्हाला असलेलं कौतुक कमीच असं म्हणायला हरकत नसावी. आम्हाला ते टिव्हीच्या पडद्यामागे चालणारं राजकारण माहित नाही, पण कार्तिकी जिंकल्याचं खुप कौतुक आहे. एका छोट्या गावतुन आलेल्या या मुलीला पुढील संधी सहज उपलब्ध होण्यास हे विजेतेपद नक्कीच उपयोगी पडेल असे वाटते. तेव्हा कार्तिकीचे विषेश अभिनंदन आणि बाकी स्पर्धकांना अनेक शुभेच्छा!!

अनामिक

टारझन's picture

9 Feb 2009 - 11:19 pm | टारझन

च्यायला पब्लिक कडे एसेमेस पाठवायला ही वेळ आहे , असले छपराड धागे काढायला ही आणि पाणभर उतारे लिहायला ही .... छान आहे ... हा रेसेशन चा परीणाम म्हणावा काय ?

नयने .. बोटं दुखली का गं तुझी ? ;)

- खवाट

टिउ's picture

9 Feb 2009 - 11:45 pm | टिउ

काही उपयोग आहे का इथे पानं भरभरुन लिहिलं तरी? काय निकाल लागायचा तो लागुन गेला...सगळा एसएमएसचा खेळ आहे. तुम्हाला प्रथमेश आणि आर्या जास्त आवडायचे तर तुम्ही पाठवले का एसएमएस त्यांच्यासाठी? नाही ना? मग जे जिंकले त्यांचं अभिनंदन करावं आणि सोडुन द्यावं...

उगीच आपलं कशावरुनही वाद घालुन सर्व्हरची बँडविड्थ वाया घालवण्यात काय अर्थ आहे?

भडकमकर मास्तर's picture

10 Feb 2009 - 1:56 pm | भडकमकर मास्तर

सगळा एसएमएसचा खेळ आहे. तुम्हाला प्रथमेश आणि आर्या जास्त आवडायचे तर तुम्ही पाठवले का एसएमएस त्यांच्यासाठी? नाही ना? मग जे जिंकले त्यांचं अभिनंदन करावं आणि सोडुन द्यावं...

नंबर वन..
सहमत ...!!!
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Feb 2009 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला संगीतामधलं काहीही समजत नाही आणि मी एकदा किंवा दोनदाच ही स्पर्धा पाहिली असेल. अजूनही मला कार्तिकीने म्हटलेलं 'मन सुद्ध तुझं' गाणं आठवतंय आणि तेव्हाच इतरांनी म्हटलेली गाणीही. मलातर सगळेच प्रज्ञावंत वाटले. पण एक गोष्ट समजली नाही ती अशी:

तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही.
स्वर फेकायचाही आणि तो घट्ट पकडून ठेवायचाही हे एकाच वेळेला कसं काय ब्वॉ जमतं?
जाणकारांनी उजेड पाडावा.

(हिमेसभाईची फ्यान) अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2009 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
तसेच हे उजेड पाडणारे जाणकार 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी' ह्याची अक्कल असणारे प्रज्ञावंत असावेत हि अपेक्षा ! एस एम एस वगैरे करणार्‍या सामान्य लोकांनी आपले मत देउ नये.
जे एस एम एस करतात ते सामान्य लोक असतात आणी ज्यांना 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी' कळण्याची अक्कल असते, ते रसीक असतात !

स्वर सम्राज्ञां उशा उत्थप , इला अरुण यांचा वातानुकुलीत यंत्र असलेला
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अन्वय's picture

10 Feb 2009 - 2:50 pm | अन्वय

जाणकारांनी उजेड पाडावा.

आपली बुद्धी किती चालते, हे समजले हं....
सरकारी "गाढवां'नी सुरात-तालात ओरडण्याच्या फंदात पडू नये. कल्ला का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Feb 2009 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्चा, मी तर माहिती द्याल का असं जाणकारांना म्हटलं होतं, चिडता का उगाच तुम्ही? आता बुद्धी असेल तर ती चालणारच ना ... म्हणून आपलं जे काही नाही समजलं ते विचारलं. नसेल सांगायचं किंवा माहित नसेल नका सांगू! उगाच माझ्या नसलेल्या बुद्धीवर आणि असलेल्या नोकरीवर, म्हणजे मर्मावर बोट का ठेवता?

गाढवांचा व्यक्तीगत अपमान केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

घाबरू नका, मी काही गाणं म्हणून दाखवत नाही आहे इथे!

(हिमेसभाईची फ्यान) अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नितिन थत्ते's picture

10 Feb 2009 - 2:58 pm | नितिन थत्ते

कार्तिकी सगळ्यात जास्त चांगली वाटली.

पण अन्वयचा प्रतिसाद लई वंगाळ

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2009 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

पण काही म्हणा, आमच्या मते अखील जगतात जर कोणी महागायक होउन गेला असेल तर तो म्हणजे आमच्या ज्ञानोबा माउलींचा रेडा !
आहाहा काय तो 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी.'
रेडा ग्रामीण भागातील आहे, त्याचे शब्दोच्चार ग्रामीण आहेत-शहरी नाहीत. म्हणून काही त्याच संगीत भ्रष्ट ठरू शकत नाही. उलटपक्षी, ग्रामीण (लोक) संगीत हेच खरे संगीत आहे. आज आपल्या ओठी असलेल्या असंख्य गाण्यांच्या चाली या लोकसंगीतावरच आधारलेल्या आहेत. याची जाण ज्यांना नाही. ते समजून घेण्याच्या ज्यांचा आवाकाच नाही, तेच आमच्या या महागायकाला "रेडा' म्हणून हिणवू शकतात.

ह भ प रेडेकरबुवा पैठणवाले.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

10 Feb 2009 - 3:32 pm | नितिन थत्ते

रेडा पैठणचा की आळंदीचा?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2009 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार

>>रेडा पैठणचा की आळंदीचा?
== आम्ही फक्त प्रज्ञावंतांच्या प्रश्नांना उत्तरे देतो.
ज्यांना 'आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी' ह्यातली काही जाण आहे त्यांनीच आमच्याशी काथ्याकुट करावा !

हुकुमावरुन
ह भ प रेडेकरबुवा पैठणवाले.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

10 Feb 2009 - 9:44 pm | नितिन थत्ते

चुकलो साहेब.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सोज्वळ's picture

10 Feb 2009 - 8:09 pm | सोज्वळ

अच्छा.........

- सोज्वळ

अवलिया's picture

11 Feb 2009 - 12:01 pm | अवलिया

ही कोणत्या स्पर्धेबद्दल चर्चा चालु आहे ?

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

पण नाना माझे म्हणणे आहे की खरा महागायक आमच्या ज्ञानोबा माउलींचा रेडा आहे ! तुमचे मत काय ?

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अवलिया's picture

11 Feb 2009 - 12:12 pm | अवलिया

हाय हाय हाय
माझ्या पुर्वजन्माबद्दल तु बोललास... किती किती बरे वाटले म्हणुन सांगु....
अरे काय सुरात गायचो मी... च्यामारी तेव्हा झी मराठी नव्हते रे... नाही तर लय मजा केली असती

अरे ते लोक पैसे कमवुन घेतात आणि आपण एकमेकांच्या उरावर बसतोय इथे..
अरे पहिल्या स्पर्धेतला कोण त्याचे नाव पण आता विसरुन गेलो...
अरे बघा स्पर्धा ऽ.ऽऽ विसरुन जा..
जे खरे असेल, अस्सल असेल ते टिकेल आणि येईल पुढे... त्याला गरज नाही अशा स्पर्धेची असो.
हे आमचे पुरातन विचार... जावु द्या.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

11 Feb 2009 - 12:36 pm | नितिन थत्ते

अरे ते लोक पैसे कमवुन घेतात आणि आपण एकमेकांच्या उरावर बसतोय इथे..
अरे पहिल्या स्पर्धेतला कोण त्याचे नाव पण आता विसरुन गेलो...
=D> =D>
एकदम खरं बोललास नाना.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

नितिन थत्ते's picture

11 Feb 2009 - 12:37 pm | नितिन थत्ते

अरे ते लोक पैसे कमवुन घेतात आणि आपण एकमेकांच्या उरावर बसतोय इथे..
अरे पहिल्या स्पर्धेतला कोण त्याचे नाव पण आता विसरुन गेलो...
=D> =D>
एकदम खरं बोललास नाना.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

अवलिया's picture

11 Feb 2009 - 12:12 pm | अवलिया

हाय हाय हाय
माझ्या पुर्वजन्माबद्दल तु बोललास... किती किती बरे वाटले म्हणुन सांगु....
अरे काय सुरात गायचो मी... च्यामारी तेव्हा झी मराठी नव्हते रे... नाही तर लय मजा केली असती

अरे ते लोक पैसे कमवुन घेतात आणि आपण एकमेकांच्या उरावर बसतोय इथे..
अरे पहिल्या स्पर्धेतला कोण त्याचे नाव पण आता विसरुन गेलो...
अरे बघा स्पर्धा ऽ.ऽऽ विसरुन जा..
जे खरे असेल, अस्सल असेल ते टिकेल आणि येईल पुढे... त्याला गरज नाही अशा स्पर्धेची असो.
हे आमचे पुरातन विचार... जावु द्या.

--अवलिया

बाकी सर्वच पोर छान गायली. एकच नंबर द्यायचा होता म्हणुन तो कार्तिकीला दिला असावा. आर्या,प्रथमेश,मुग्धा व रोहित देखिल खुप छान गाणी गात होती.सर्व मराठी माणसांचे विचार कधीच जुळले नाहीत हे परत ह्या धाग्यावरुन सिध्द झालेले आहे. आर्या व कार्तिकी दोघीही उत्तम गात होत्या. परंतु कार्तिकी वयाने आर्या पेक्षा लहान असावी म्हणुन तिला पहिला क्रमांक दिला असावा. स्वप्निल बांदोडकर व बेला देखिल त्याच्या वेळच्या स्पर्धेत नंबर दोन आले होते. पण आज ते खुप यशस्वी आहेत.आर्या नक्कीच मोठी गायिका होईल. सर्व स्पर्धकाना शुभेच्छा.
वेताळ

ए. प्रशांत's picture

11 Feb 2009 - 3:26 pm | ए. प्रशांत

"एस एम एस" आपण पाठवितो म्हणुन आपले खिसे खालीकण्यासाठी मागवतात.

कार्तिकी गायकवाड विजेती झाली कारण कुणाही एकालाच विजेता घोषीत करणे आवश्यक होते. शेवटच्या महासोहळ्यातील परफार्मस पाहिले तर कार्तिकीची काही अंशी उजवी ठरते. आणि स्पर्धकांचा अंतिम निकालावर आक्षेप नसतांना लोकांनी कशाला बोंब मारावी कळत नाही. राहिली कॉल बॅक एपिसोडची गोष्ट तर तिथे शमिकाला बोलवायला हवे होते, होऊ शकते शमिका व नेहा काही व्ययक्तीक कारणांमुळे येऊ शकली नसेल, त्यामुळे आरोप करण्या अगोदर ह्या दोघिंना विचारले असते तर बरे झाले असते. कॉल बॅक एपिसोडच्या वेळी अवंती पटेल ही स्पर्धेतच होती. मी माझ्या मायवेबदुनिया (a-prshant.mywebdunia.com) ह्या अड्रेसवर पाचही अंतिम स्पर्धकांचे फोटो त्यांच्या गीण्याच्या पार्श्वभूमिवर लावले होते (आहेत) त्यामध्ये सगळ्यात जास्त मुग्धा व कार्तिकी ह्या दोघिंचे फोटो पाहीले गेलेत त्यानंतर आर्या, रोहीत, शमिका, प्रथमेश, शाल्मिकी ह्याप्रकारे क्रम लागतो. तसे पाहिलेत तर सर्वच विजेता आहेत हे फक्त जनताच नाही तर अतिंम विजेती कार्तिकी गायकवाड सुद्धा म्हणाली. विनाकारण अशी चर्चा करून त्यांच्यात उत्पन्न झालेली आपुकीच्या भावनेत कशाला विष घालवू इच्छिता. ही चर्चा इथेच संपवाल तर बरे.

मला माझ्या वेबदुनियावरील वरील प्रति‍क्रियेवर 'पियुष' ह्या व्यक्तीने विचारले होते...

प्रशांतजी कार्तिकी इतरांपेक्षा उजवी ठरते, या विधानाला तुम्ही काही आधार देऊ शकता काय? म्हणजे सांगितीकदृष्ट्या तिच्या आवाजात नेमके इतरांपेक्षा वेगळे काय आहे नि प्रथमेश व आर्यात काय नाही यावर आपल्याला चर्चा करता येईल नाही का? (माझे वैयक्तिक मत सगळ्यांना विजेते घोषित करणे हे आहे. कार्तिकीला अजिबात विरोध नाही.)

ह्याला दिलेली मी प्रतिक्रिया..

मला कार्तिकी, आर्या, प्रथमेश, मुग्धा, रोहित ह्यांच्या पैकी कुणी एक उजवे वा डावे (कमी वा जास्त) आहेत हे सांगायचे नव्हते. मला सर्वच स्पर्धक सरसच होते हे मान्य आहे व वेबदुनियावरील "या सुरोनों चंद्र व्हा" (शिर्षकात घोळ असू शकतो) ह्या लेखावरील टिपणीत सर्वप्रथम मीच म्हणटले होते की सर्वांनाच तसेच शाल्मिकी व शमिकाला सुद्धा ह्यांच्या सोबत विजयी करावे. परंतु स्पर्धत झी मराठीने कार्तिकीला विजयी घोषित केले ती त्यांच्या स्पर्धची कुणी एकच विजेता ठरवीण्याची गरज असू शकते. आणि झाले ते झाले त्यावर विणाकारण वाद घालण्यात काय अर्थ..
ते पाचही जणांना कसलीच तक्रार नाही तर आपणच कुणा एकासाठी भांडण्यात काय अर्थ.. कार्तिकीनेही म्हणटले की मी विजेती घोषीत झाल्यामुळे मी खुप मोठी झाले नाही तर आम्ही पाचही जण विजयी झालोत आणि रोहीत ने सुद्धा खिलाडूवृत्तीने शेवटी "कार्तिकीदेवींचा विजयी असो.." अशी घोषणा केलीच की. मुग्धाने तर चक्क कार्तिकीला मिठीच मारली होती. त्याच्यात जी आत्मीयतेची भावना तयार झाली आहे, ती आपल्या सारखांच्या वादावादीमुळे नष्ट होऊ नये ही अपेक्षा...

वेबदुनियावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भडकमकर मास्तर's picture

11 Feb 2009 - 5:10 pm | भडकमकर मास्तर

तसेच शाल्मिकी व शमिकाला सुद्धा ह्यांच्या सोबत विजयी करावे

हा शाल्मिकी कोण बोआ? वाल्मिकीचा नातेवाईक की काय?

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2009 - 9:03 pm | llपुण्याचे पेशवेll

हाहाहाहाहा... :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

"फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते", तुम्ही सर्व ठिकाणी हेच सांगता काय? आणि तुम्ही बाजीरावांचे कोणत्या नातवंडात मोडता ते सांगाल तर बरे होईल.
इथे टाईमपास करण्यापेक्षा तुमचे राज्य सांभाळा की? नाहीतर मराठी साम्राज्य डुबेल हो!

मराठी माणसाची हिच कर्मदळीद्री वृत्तीच मारक ठरतेय्.......होईनात का कार्तिकी विजयी काय फरक पडतो ?त्या पंचरत्नापैकी इतरांना कार्तिकीच्या विजयाने वाईट वाटले नाहि .त्या मुलांना त्या निकालात काही वावगे वाटले नाही आणि तुम्ही सगळे स्वतःला वयाने मोठे म्हणवणारे कशाला आरडाओरडा करताय?त्या पाचांपैकी कुणिही विजेता होण्याच्याच योग्यतेचाच होता...............अनुकुल परिस्थितीतुन संगीताचे शिक्षण घेऊन स्पर्धा जिंकणे काही कठीण नाही ...........त्या चिमुरडीने प्रतिकुल परिस्थितीतुन स्वतःचा सांगीतिक प्रवास केला..............ज्ञानेश्वर माउलीच्या कृपेने व रसिकांच्या आशिर्वादाने ती जिंकली तर तुम्हांला का मिरच्या झोंबतायत्?.........इतक्या सुंदर झालेल्या स्पर्धेमधे ब्राम्हण ,बहुजन वाद आणुन सगळे आपला कंडु शमवुन घेत आहेत्............सगळ्याच ठिकाणी हा वाद आणुन आजतागायत राजकारण्यांनी या महाराष्ट्राची माती केलीच आहे आता निदान त्या इश्वरी संगीत विद्येला तरी या चिखलात लोळवु नका व निदान असे करणार्‍यांच्या प्रयत्नाला हातभार लावु नका.............तुम्हां आंम्हा सगळ्यांपेक्षा त्या रोहीत राउत कडे जास्त समज आहे असे वाटतय निदान मला तरी .................महाअंतीम फेरी दरम्यान प्रत्येक वेळी त्यांने रसिकांना एसेमेस साठी आवाहन करताना सगळ्या पंचरत्नांसाठी मते मागितली त्या निरागस मुलाला जिंकण्याचा स्वार्थ शिवला नाही ............ निकाल जाहिर झाल्यानंतर इतर चौघांच्या चेहर्‍यावर कार्तिकीबद्दल कौतुकच दिसुन आले...........ज्या विश्वासाने व निरागसतेने त्या मुलांनी एकमेकांच्या आनंदात आनंद मिळवला तो विश्वास स्वतःला मराठी म्हणवणारा माणुस का दाखवु शकत नाही हे त्याचे तोच जाणो.........
"पंचरत्नांची चहाती"
"अनामिका"