कडव्या हिंदूंनी ते "पुण्यकर्म' करावेच

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
29 Nov 2008 - 9:56 pm

बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु वारंवार टीका झाल्याने प्रत्येक मुस्लिम नागरिकाला कमीपणा वाटू लागला. त्यातून आम्हालाच लक्ष्य केले जातेय, अशी त्यांची मानसिकता बनून गेली. याचा नेमका फायदा या धर्मातील मूलतत्त्ववाद्यांनी घेतला आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे प्रचंड वेगात बदलणाऱ्या परिस्थितीत चांगले काय, वाईट काय याचा विचारही करू न शकणाऱ्या कोवळ्या तरुणांच्या मनात विद्वेषाची ठिणगी टाकण्याचे काम हे मूलतत्त्ववादी करीत आहेत. मुस्लिमांवर होणाऱ्या (?) अत्याचाराच्या चित्रफिती त्यांना दाखविल्या जातात. जिहादचा "बारूद' त्यांच्या मनात ठासून भरला जातो. त्यांच्यातील विवेक मारून टाकला जातो आणि त्यातूनच सुशिक्षित म्हणा किंवा "हायटेक' दहशतवादी जन्माला घातला जातो. गेल्या काही महिन्यांतील बॉंबस्फोट पाहिले, तर वस्तुस्थिती लगेच लक्षात येईल की अनेक बॉंबस्फोटांचे मास्टरमाइंड हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय त्यांचे वार्षिक उत्पन्नही लाखो रुपये आहे. नोकरी आहे, पैसा आहे आणि ज्ञानही आहे. मग देशविघातक कारवाया करण्याची दुर्बुद्धी त्यांना का सुचते, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात येऊ शकतो. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला असेल.
मीदेखील त्याच प्रश्‍नाचे उत्तर शोधत आहे. ते शोधता शोधता मी बाबरी मशिदीपर्यंत येऊन पोचलो आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे "असं घडलं' नावाचे पुस्तक फार पूर्वी वाचले होते. त्यातील एका लेखात एका मुस्लिम गाइडची भावना त्यांनी उद्‌धृत केली होती. सय्यद नक्वी असे त्या गाईडचे नाव होते. ते म्हणाले होते की वादग्रस्त वास्तूमध्ये मुस्लिम लोक नमाज पढत नाहीत. या वास्तूवर हिंदूंनी दावा केला आहे, याला बहुसंख्य मुस्लिमांचा आक्षेप नाही. भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते.
मला वाटते प्रत्येक मुस्लिम नागरिकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असावी. असे असतानाही बाबरी पाडण्याचा अट्टहास का करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर झाले नाही, तर चालणार नाही का? बरं बांधायचेच होते, तर आतापर्यंत का बांधले गेले नाही. केवळ मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले? मंदिर तर झालेच नाही; पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

कोलबेर's picture

29 Nov 2008 - 10:42 pm | कोलबेर

अन्वय, लेख फार आवडला . बरेच मुद्दे विचार करण्या सारखे आहेत.

केवळ मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले? मंदिर तर झालेच नाही; पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.

सहमत!!!

आजानुकर्ण's picture

29 Nov 2008 - 11:38 pm | आजानुकर्ण

लेख फार आवडला. किंबहुना मुसलमान त्या जागेत नमाज वगैरे काही करत नव्हते त्यांनी शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी ही मशीद दान करून टाकली असते तरी चालले असते.

अन्वय's picture

3 Dec 2008 - 1:44 am | अन्वय

अमेरिकादी देशांत मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची तुलना भारताशी करता येणार नाही. कारण हे देश वर्चस्वासाठी हापापलेले आहे. इस्लामी राष्ट्रांतील तेलांच्या विहिरी अमेरिकेला ताब्यात घ्यायच्या आहेत. राजकीय वर्चस्वाचीही काहींना इर्षा आहे. भारताला ना कुणावर वर्चस्व गाजवायचे आहे, ना मुस्लिमांचे उच्चाटन करायचे आहे. भारताचा इस्लामलाही विरोध नाही. मग या दहशतवादी कारवाया भारतात का होतात, याचा विचार कुणी करणार आहे की नाही. बाबरीजवळ येऊन थांबयचे कारण एवढेच आहे की त्यांनतरच खऱ्या अर्थाने भारत दहशतवाद्यांच्या "लिस्ट'वर आला. त्याला कारणेही तशीच आहेत. बॉंबस्फोट घडविल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ भारतातून पसार झाली. परंतू भारतविरोधी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नव्हत्या. या कारवाया कुणामुळे शक्‍य झाल्या? स्थानिक मुस्लिमांमुळेच. भारतविरोधी कारवायांत सहभागी व्हावे, असे त्यांना का वाटले, याचाही विचार इथे प्रतिक्रिया नोंदविणाऱ्याने करावा. आता पाकिस्तानातील अतिरेकी भारतात येऊन हल्ले करीत आहेत. जे यापूर्वी कधीच भारतात आले नसतील. मग त्यांनी आपली कामगिरी "चोखपणे' कशी काय बजावली? दाऊदच्या नेटवर्कशिवाय हे शक्‍य होते काय? दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे? बाबरी प्रकरणापूर्वी देशात किती बॉंबस्फोट झाले, त्यात स्थानिक मुस्लिमांचा किती सहभाग होता, याची आकडेवारही कुणाकडे असेल, तर तीही इथे द्यावी. काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.

कलंत्री's picture

29 Nov 2008 - 10:55 pm | कलंत्री

त्या काळात एकदा एक मुस्लिम गृहस्थ ( ४५/५० वय) आणि एक हिंदु तरुण ( २० वय) यांच्यातील रेल्वेच्या प्रवासातील संवाद.

मुस्लिम : यह जो हो रहा ( रामजन्मभूमी) ठिक नही है, बेरोजगारी, गरिबीपर लढना चाहिये. बेकारमै समय और जवानोको भडकाया जा रहा है.

हिंदु : लेकिन आपके बाबर ने हमारा मंदिर क्यो तोडा?

मुस्लिम : ऐसा गलत बताया जाता है.

हिंदु : मेरेको बोलो, क्यो तोडा?

मुस्लिम : ठिक है बाबा गलतीसे तुट गया, आइंदा ऐसी गलती नही करेंगे, कान पकडता हु, आखिर रामभी हमारेही भगवान हैना...

ऋषिकेश's picture

29 Nov 2008 - 10:56 pm | ऋषिकेश

लेख आवडला

-(गोंधळलेला) ऋषिकेश

प्राजु's picture

30 Nov 2008 - 12:40 am | प्राजु

खरंच विचार करायला लावणारा लेख आहे.
"ये तो पहली झाँकी है .. काशी मथुरा बाकी है.." असे नारे त्यावेळी दिले. बाबरी मशिद पाडल्यानंतर राम मंदीर ही बांधले नाही गेले. इथेच राष्ट्रीय एकात्मतेचा धागा कमकुवत झाला.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

30 Nov 2008 - 1:40 am | एकलव्य

रामजन्मभूमीच्या आंदोलनाची गरज काय आणि त्याने काय साधले, काय गमावले हा स्वतंत्र विषय आहे. काही ओझरते मुद्दे -

सय्यद नक्वी असे त्या गाईडचे नाव होते. ते म्हणाले होते की वादग्रस्त वास्तूमध्ये मुस्लिम लोक नमाज पढत नाहीत. या वास्तूवर हिंदूंनी दावा केला आहे, याला बहुसंख्य मुस्लिमांचा आक्षेप नाही. भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते.

भाजप, विहिंप यांनी वातावरण तापविण्यापेक्षाही काँग्रेसने वातावरण गढूळ केले ही वस्तुस्थिती आहे. सोमनाथच्यावेळी आरडाओरडा झाला नाही. शहाबानोला सर्वसामान्य मुस्लिम समाजाचा पाठिंबा नव्हता तसेच बाबरीचे प्रेमही सर्वसामान्य मुस्लिम समाजाला नव्हते. स्थानिक हिंदू समाजाला मात्र राममंदिरावर भक्ति नक्कीच होती. काही धर्मांध मुल्लामौलवींना पाठिंबा देण्यासाठी म्हणून कॉग्रेसने खटले रेंगाळले आणि सारे प्रकरण राजकीय केले.

हिंदू जनसामान्यांची धार्मिक कडवेपणाला साथ कधीच नव्हती. मात्र वर्षानुवर्षे होणार्‍या अन्यायाच्या भावनेला या प्रकरणाने वाचा फुटली. एकदा तरी जागे व्हा आणि प्रतीकात्मक म्हणून एकतरी मंदिर उभारा हा विहिंपचा आग्रह अन्यथा शांतताप्रिय असणार्‍या हिंदूंना या काळात तरी प्रकर्षाने पटलेला दिसतो. हे पटलेले सारेचजण भावनेच्या भरात वाहवत गेले होते असे म्हणणे हा खुळचटपणा आहे.

बरं बांधायचेच होते, तर आतापर्यंत का बांधले गेले नाही.
टीका करणे सोपे आहे. न्याय्य (कायदेशीर/ पारंपारिक/ भावनिक) बाजू असूनही नंतरच्या निवडणुकांमध्ये राममंदिराचा मुद्दा भाजपाने मांडलेला नाही. यामध्येही निव्वळ राजकीय गणित आहे असे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे नाही. पण त्याचबरोबर झाले तितके पुरे झाले आणि धार्मिक विषयांपेक्षाही युतीचा जाहीरनामा तसेच आर्थिक विषय महत्त्वाचे आहेत हे मानून राममंदिराचा आग्रह ऐरणीवर घेतला नाही तर त्यात चुकले किंवा पराभव झाला असे बिलकुल वाटायचे कारण नाही.

- असो... प्रमोद महाजनांनी मंदिरयात्रा बाजूला ठेवली आणि "इन्डिया शायनिंग"चा रूट पकडला खरा. त्याने भाजपाची गाडी घसरली असेल पण देशाच्या दृष्टिने निवडणुकांची चर्चा मात्र योग्य त्या मार्गावर गेली असे मला वाटते.

पण का? आणि कसे
सर्वसामान्य मुसलमान अतिरेकी का बनतो आणि सर्वसामान्य घरातून कर्नल पुरोहित का शस्त्र हाती घेतो याची उत्तरे सरकारच्या बुळेपणामध्ये आणि अपयशामध्ये आहेत. सरकार हाती सापडलेल्या अतिरेक्यांना फाशी देत नाही... पुरावे असूनही प्रार्थनास्थळांमधील अथवा राजकीय पुढार्‍यांकडील शस्त्रे ताब्यात घेत नाही तर मग सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या हातात कायदा घेण्याच्या गोष्टी नक्कीच करणार. आज सगळ्यात मोठ्या चिंतेची बाब जर असेल तर ती ही जनसामान्यांची होत असलेली ठाम भावना.

मला सारे काही शक्य असूनही मी काहीच करू शकत ही भावना मोठी त्रासदायक आहे.
पोलिसांना आणि लष्करी अधिकार्‍यांना आज कोठे धाड घातली पाहिजे हे माहिती आहे... पण राजकीय हितसंबंधांमुळे त्यांच्यावर वर्षानुवर्षे बंधने घातली गेली तर उद्या एनकाऊन्टर किंग्ज नक्की जन्माला येतील आणि छोट्यामोठ्या छुप्या संघटनाही उभ्या राहतील. हे अराजक टाळायचे असेल तर खंबीर राजकीय नेतृत्वाची आज कधी नव्हे तेव्हढी गरज आहे.

- (रामराम) एकलव्य

कोलबेर's picture

30 Nov 2008 - 4:36 am | कोलबेर

एकल्व्यजी विकासजींच्या प्रतिसादापेक्षा तुमचा (निदान हा) प्रतिसाद बराच संयमीत वाटला.

मात्र वर्षानुवर्षे होणार्‍या अन्यायाच्या भावनेला या प्रकरणाने वाचा फुटली.

वर्षानुवर्षे नक्की काय अन्याय होत होते? ते फक्त हिंदुंवरच होत होते का? शेकडो वर्षांपूर्वी मंदीर पाडून मशीद बांधण्याचा अन्याय झाला असेल पण म्हणून त्याला आजही वर्षानुवर्षे होणार अन्याय म्हणता येईल का?

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Nov 2008 - 7:14 am | llपुण्याचे पेशवेll

वर्षानुवर्षे नक्की काय अन्याय होत होते? ते फक्त हिंदुंवरच होत होते का? शेकडो वर्षांपूर्वी मंदीर पाडून मशीद बांधण्याचा अन्याय झाला असेल पण म्हणून त्याला आजही वर्षानुवर्षे होणार अन्याय म्हणता येईल का?

होय हिंदूंवरच होत होते. काशी, मथुरा, अयोध्या,सोमनाथ येथील मंदिरे काय हिंदूंनी स्वखुषीने मशिदी बांधायला दान केली होती का? पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदीरे पाडून झालेल्या मशिदी काय पुणेकरानी स्वत: होउन बांधून दिल्या असे वाटते का तुम्हाला? झिजीया कर हिंदूंवरच बसवला गेला होता ना?
मंदिर पाडून मशीद बांधली गेली शेकडो वर्षांपूर्वी पण फाळणी तर आत्ताची आहे ना? अजूनही अनेक गावातून गणेशविसर्जनाच्या मिरवणूकीवर होणारी दगडफेक तर आताची आहे ना?

पुण्याचे पेशवे

धम्मकलाडू's picture

1 Dec 2008 - 2:37 pm | धम्मकलाडू

रॅबल राउजिंग

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सर्व प्रथम राम-जन्म भूमी / बाबरी मशिद प्रकरणासंदर्भात जे काही झाले ते बरोबर होते अथवा चूक या संबंधी खालील लेखन हा वाद अथवा प्रतिवाद नाही हे ध्यानात ठेवावे. किंबहूना हा मुद्दा सध्याच्या प्रसंगाला कारण म्हणून दाखवणे गैरलागू आहे. माझे शब्द कडक दिसले तरी क्षमा करा ते व्यक्तीगत असण्यापेक्षा विचारसरणीच्या विरोधात आहेत.

हा सर्व लेख अतिशय सध्यस्थितीत जो काही युद्धपातळीवर दहशतवाद्यांनी हल्ला करून निरपराध माणसांना आणि अर्थकारण उध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यावर बोलायच्या ऐवजी तिरस्करणीय विषयांतर वाटले. या लेखात ना धड आत्ता चाललेल्या गोष्टीबद्द्ल चीड दिसत आहे ना धड चाड. केवळ काही करून "कडवे हिंदू" म्हणत हिंदूंना दाखवत स्वतःचे वांझोटे विचार दाखवलेत असे म्हणावेसे वाटत आहे. जी काही गेल्या ३ दिवसात हिंसा केली गेली आहे ती कुठलीतरी असंबंध कारणे देऊन मान्य करण्याचा कोडगेपणा दिसत आहे.

वरील लेखात आपण जे काही म्हणले आहे त्यातून काय म्हणायचे आहे, बाबरी मशीद पाडली नसती तर आज काय अतिरेक्यांनी हल्ला केला नसता? बाबरी मशिद पाडली कोणी? - तुमच्या भाषेत कडव्या हिंदूंनी... ती ताजचे मालक असलेल्या टाटानी पाडली का त्याला "फंडीग" केले? का ओबेरायने पाडली? का ज्यू राबायने पाडली? का १३ वर्षाच्या अमेरिकन मुलीने? मग यांना मारायचे / उध्वस्त करायचे कारण काय?

बर ही जर ऍक्शन-रीऍक्शन म्हणायचे असेल तर मग मुंबई दंगलीला, गोध्रा दंगलीला ऍक्शन-रीऍक्शन म्हणले तर चालते का? का गांधीजींनी पंच्चावन कोटी भारताशी स्वातंत्र्यानंतर लगेच लढाई करणार्‍या पाकीस्तानला देण्याचा हट्ट केला नसता तर नथुराम झाला नसता असे म्हणले तर चालेल? (परत याचा अर्थ मी त्या दंगलींचा समर्थक आहे असा घेऊ नये अथवा गांधीजींना मारणे योग्य होते असे म्हणत आहे असा घेऊ नये. मी कुठल्याही हिंसेच्या विरोधात आहे. आणि हिंसेला कशाच्या तरी नावाने गोंजारत सामान्यांना आणि देशाला वेठीस लावणाच्या तर मी पूर्ण विरोधात आहे, मग ती कोणी का केली असेना - त्याला लेबले लावायची गरज नाही).

बरं पुढे आपण म्हणता की, "..वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल." का बरं? त्यांच्याच डोक्यावर का हे ओझे? (तसे म्हणाल तर रा.स्व. संघाची पण मुस्लीम आघाडी आहे तरी). सेक्युलर संघटना इतके वर्षे झटत आहेत त्यांना का फळ येत नाही? एरवी नको इतकी बोलणारी टेस्टा सेटलवाड अजून गप्प कशी काय? तेच शबाना आझमीबद्दल आणि अनेक तथाकथीत सेक्युलर्स बद्दल...तसे म्हणायला लागले, अथवा ज्या गोष्टींना आजवर अंजारले गोंजारले त्यांनीच घात केल्यावर, कानावर हात ठेवून कडवे हिंदू, हिंदूत्ववादी वगैरे म्हणत आरडाओरडा करायला लागायचे, म्हणजे आपल्याला इतरांचे ऐकायला येत नाही आणि आपले चार शब्द इतरांना गेले तर तेव्हढेच उत्तम!

आज जी काही "वाट लागली आहे" त्याला जबाबदार कोण आहेत माहीती आहे? हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत तर ते असले तथाकथीत सेक्युलर्स ज्यांनी बुद्धिवादाच्या नावाखाली हिंदू आणि मुसलमान यांच्यात फळी तयार केली आणि जेंव्हा जेंव्हा जिथे जिथे गरज आहे तेथे स्पष्टपणे "कॉलींग स्पेड अ स्पेड" करायच्या ऐवजी पक्षपाती भुमिका घेतली ज्या हिंदूंचे जळले त्यांना कधी जवळ केले नाही आणि ज्या मुसलमानांना समाजात आणायला हवे त्यांसाठी कधी काम केले नाही. मिळवली निव्वळ प्रसिद्धी. त्याचे खापर हिंदूंवर फोडण्याची गरज नाही.... आणि तेही आत्ताच्या हल्ल्यासंदर्भात चुकीची चर्चा आणून... हा फक्त बुद्धीभेद आहे.

एकलव्य's picture

30 Nov 2008 - 1:55 am | एकलव्य

फालतू आणि दिशाभूल करणारा लेख

माझी आधीची एक प्रतिकियाही हीच होती... (पण ती प्रकाशित करेकरेपर्यंत उडाली)

विकासराव तुम्ही नेहमी अभ्यासपूर्ण लिहिता आणि तुमच्या बद्दल आदर आहे. हा प्रतिसाद तुम्हाला वैयक्तिक नसुन त्यातल्या विचारांना आहे.

आज जी काही "वाट लागली आहे" त्याला जबाबदार कोण आहेत माहीती आहे? हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत तर ते असले तथाकथीत सेक्युलर्स

ह्याहुन हास्यास्पद विधान मी वाचलेले नाही. आज ज्या अतिरेकी कारवाया होत आहेत त्याच्यामागे धर्मांध संघटना नाहीत हे म्हणणे अजीबात झेपले नाही. मग ह्या हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स शबाना आझमी सारखे सेक्युलर लोक आहेत का? डेक्कन मुजहिदीन ने स्विकारलेली जवाबदारी म्हणजे एक विनोदच की मग. बाबरी मशीद पडल्याचा थेट परिणाम म्हणून आजच्या ह्या घटना नसतील देखिल, पण भारतातील ही कायमची अस्थिरता तेव्हा पासुनच सुरू आहे. एक पडकी मशीद पडली आणि त्यानंतर सुरू झालेले स्फोट आणि दंगली ह्यामुळे देशाचे झालेले नुकसान अपरिमीत आहे.

तसेच सदर लेख हा कुठल्याही प्रकारे कालच्या अतिरेक्यांचे हल्ल्याचे समर्थन करणारा असता तर आज तो इथे राहिलाच नसता. लेखात मांडलेल्या विचारांविषयी कसलेही मुद्देसुद विवेचन न देता त्यातल्या विचारांना वांझोटे म्हणणे हे तुमच्या सारख्या दिग्गज सभासदाकडून मला तरी अपेक्षीत नव्हते.

विकास's picture

30 Nov 2008 - 5:59 am | विकास

आज जी काही "वाट लागली आहे" त्याला जबाबदार कोण आहेत माहीती आहे? हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत तर ते असले तथाकथीत सेक्युलर्स

ह्याहुन हास्यास्पद विधान मी वाचलेले नाही. आज ज्या अतिरेकी कारवाया होत आहेत त्याच्यामागे धर्मांध संघटना नाहीत हे म्हणणे अजीबात झेपले नाही.

तुमच्या सारखे अभ्यासक किमान नीट वाचून "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" एखादे वाक्य उचलून प्रतिसाद देतील हे खरेच खेदजनक वाटले.

माझे वरील वाक्य हे मूळ लेखातील, "..वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल." या वाक्यासंदर्भात होते ते माझ्या मूळ प्रतिसादात आले आहेच. या वाक्यात मुस्लिम तरूणांना वास्तवाचे भान देण्याची जबाबदारी लेखकाच्या मतातील "कडव्या हिंदूंवर" टाकली आहे. त्या संदर्भात स्वतःला सेक्युलर्स म्हणणार्‍यांवरची जबाबदारी कुठे जाते. जो नुसताच खरा हिंदूत्ववादीच नव्हे तर जो खरा मानवतावादी आणि राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) असेल त्याची ही जबाबदारी नाही का की वास्तवाचे भान करून देणे? जर हिंदूत्ववादी म्हणाले की कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि तशीच ऍक्शन घेतली पाहीजे तर घेतली जाते का? तसे म्हणणारे लगेच फॅनॅटीक हिंदू ठरवणारे आज गप्प कसे.

बर मी म्हणालो की, "आज जी काही "वाट लागली आहे" त्याला जबाबदार कोण आहेत माहीती आहे? हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत तर ते असले तथाकथीत सेक्युलर्स" तर त्याचा अर्थ हा देशात जी दरी पडून "वाट लागली आहे" ज्या बद्दल मूळ लेख बोलत आहे त्या संदर्भात होती आणि आहे. ती वाट लागल्यानेच धर्मांध संघटना निर्माण होतात. संघटनासंदर्भात मी काहीच बोललो नव्हतो. वाक्य नीट वाचा.

तसेच सदर लेख हा कुठल्याही प्रकारे कालच्या अतिरेक्यांचे हल्ल्याचे समर्थन करणारा असता तर आज तो इथे राहिलाच नसता.

मी कुठे म्हणले आहे की हा अतिरेक्यांच्या हल्ल्याचे समर्थन करणारा लेख आहे म्हणून. परत चष्मे काढून नीट वाचा,

"हा सर्व लेख अतिशय सध्यस्थितीत जो काही युद्धपातळीवर दहशतवाद्यांनी हल्ला करून निरपराध माणसांना आणि अर्थकारण उध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यावर बोलायच्या ऐवजी तिरस्करणीय विषयांतर वाटले. या लेखात ना धड आत्ता चाललेल्या गोष्टीबद्द्ल चीड दिसत आहे ना धड चाड. केवळ काही करून "कडवे हिंदू" म्हणत हिंदूंना दाखवत स्वतःचे वांझोटे विचार दाखवलेत असे म्हणावेसे वाटत आहे. जी काही गेल्या ३ दिवसात हिंसा केली गेली आहे ती कुठलीतरी असंबंध कारणे देऊन मान्य करण्याचा कोडगेपणा दिसत आहे. "

याचा अर्थ काय तर असे झाले ते निषेधार्ह आहे पण त्याला कारण हिंदूच आहेत. त्यांच्यामुळे हे असे वागत आहेत. म्हणजे जबाबदारी हिंदूंवर टाकण्याचा फालतूपणा चालला आहे.

बाबरी मशीद पडल्याचा थेट परिणाम म्हणून आजच्या ह्या घटना नसतील देखिल, पण भारतातील ही कायमची अस्थिरता तेव्हा पासुनच सुरू आहे. एक पडकी मशीद पडली आणि त्यानंतर सुरू झालेले स्फोट आणि दंगली ह्यामुळे देशाचे झालेले नुकसान अपरिमीत आहे.

बाबरी मशीद पडल्याचा थेट परिणाम म्हणून आजच्या ह्या घटना नसतील देखिल, पण भारतातील ही कायमची अस्थिरता तेव्हा पासुनच सुरू आहे. एक पडकी मशीद पडली आणि त्यानंतर सुरू झालेले स्फोट आणि दंगली ह्यामुळे देशाचे झालेले नुकसान अपरिमीत आहे.

मी कायम म्हणत आलो आहे की कुठल्याही हिंसेचे मी समर्थन करत नाही. बाबरी मशिदीचे कारण या संदर्भात आणणे हे म्हणून विषयांतर म्हणले इतकेच. बाकी राहीली, तुम्ही म्हणत असलेली अस्थिरता...तुम्ही कधी १९४७ साली डिसप्लेस झालेल्या आणि कुटूंब उध्वस्त झालेल्या सिंध्याला भेटला आहात का? १९८८ सालापासून उध्वस्त झालेल्या काश्मिरी पंडीताला भेटला आहात का? रविंद्र म्हात्रे काय बाबरी मशिदीमुळे हुतात्म झाले? ठाण्यातील १९८३ ची दंगल? मी डोळ्याने पाहीली आहे.

प्रत्येक वेळेस "कळायला" स्वतःचे "जळायला" हवेच का?

म्हणून हा लेख फालतूच आहे.

कोलबेर's picture

30 Nov 2008 - 10:39 pm | कोलबेर

बाबरी मशीद पडायच्या आधी देखिल दंगली व्हायच्या हे मान्य. पण मशिद पडल्या नंतर होणारे हे बाँब स्फोट, अतिरेकी कारवाया ह्यांचे प्रमाण कैक पटीने जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात सातत्याने घटना पूर्वी घडायच्या नाहीत. त्यामूळे कडव्या हिंदूचा दुरान्वये का असेना आजच्या अस्थिरतेमध्ये हातभार आहे. अर्थात ह्याचा अर्थ निव्वळ तेच कारणीभूत आहेत असे नाहीत. किंवा त्यामुळे इस्लामी धर्मांधाची कृत्ये जस्टीफाय होतात असे अजीबात नाही. ह्या सगळ्यात तथाकथित कडवे हिंदू पूर्ण निष्पाप नाहित इतकेच. धर्माचे राजकारण करुन भावना भडकावुन इतर कट्टर धर्मीयांना कोलित देण्यात त्यांचा देखिल सहभाग आहे. सतत मुस्लिम धर्मांधांवर(च) टिकास्त्र सोडताना तश्या काही प्रवृत्ती आपल्या धर्मातही आहेत ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे इतकेच.

म्हणजे जबाबदारी हिंदूंवर टाकण्याचा फालतूपणा चालला आहे.

ह्या घटनांची जवाबदारी हिंदु संघटनावंर कुणीच टाकलेली नाही. पण त्यांचा ह्यामध्ये काहीच संबध नाही ते निष्पाप आहेत असे देखिल नाही इतकेच.

विकि's picture

1 Dec 2008 - 12:21 am | विकि

एखादा लेखाला फालतू म्हणणे बरोबर नाही आणी विकाससारख्या जबाबदार मिपाकराने तर मुळीच नाही.

विकास's picture

1 Dec 2008 - 3:51 am | विकास

एखादा लेखाला फालतू म्हणणे बरोबर नाही आणी विकाससारख्या जबाबदार मिपाकराने तर मुळीच नाही.

नमस्कार कॉम्रेड विकी, आपल्याला बाकी अतिरेकी हल्ल्यासंदर्भात काही नाही तरी येथे माझ्याबद्दल लिहायला म्हणून का होईना आलेले पाहून बरे वाटले. त्यातही, आपण मला जबाबदार समजलात सर्व काही मिळाल्याची तृप्त भावना झाली. किंबहूना त्याच जबाबदारीतून ह्या बुद्धीभेदी लेखाला मी "फालतू" म्हणले. तसे म्हणताना, विश्वास ठेवा पण मी १० वेळा विचार केला, कारण मला गैरशब्द वापरण्याची अजिबात सवय नाही. म्हणजे आपल्याला विचार करायला हवा, की अशा माणसास असे का लिहावेसे वाटले असावे?

बरं आपण अजूनही संपूर्ण हिंसेच्या विरोधात आहात हे मान्य करत नाही आहात? ते कधी कराल याची वाट पाहतोय. नाहीतर आता मात्र "सायलेन्स इज ऍक्सेप्टन्स" समजून आपण हिंदूत्ववादी सोडून इतर कुठलीही हिंसा (विशेष करून नक्षलवादी आणि अतिरेक्यांची सामान्यांविरुद्धची) योग्य समजता असे समजेन.

माझा अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे, कुठल्याही आणि कुणाच्याही हिंसेस विरोध आहे.

विकि's picture

2 Dec 2008 - 12:19 am | विकि

अवांतर-महत्वाचे म्हणजे कम्युनिष्ठ पक्ष नक्षल वाधांच्या विरोधात आहे आणि नक्षलवादी कम्युनिष्ठ पक्षाला नेहमिच बदनाम करत आलेले आहेत.सिंगुरचे सत्य आपणास ठाऊक असेलच .लोकसत्ताने याबाबत प्रथम पानावर बातमी दिलेली आहे.

अवांतर-महत्वाचे म्हणजे कम्युनिष्ठ पक्ष नक्षल वाधांच्या विरोधात आहे आणि नक्षलवादी कम्युनिष्ठ पक्षाला नेहमिच बदनाम करत आलेले आहेत.सिंगुरचे सत्य आपणास ठाऊक असेलच .लोकसत्ताने याबाबत प्रथम पानावर बातमी दिलेली आहे.

मी तुमच्याबद्दल विचारत आहे, कम्युनिस्टपक्षाबद्दल नाही. तसेच केवळ नक्षलवादीच नाही तर संपूर्न हिंसा अमान्य आहे का आणि त्याला आपण समान विरोध करता का हा प्रश्न आहे.

रम्या's picture

1 Dec 2008 - 1:24 pm | रम्या

>>>ह्याहुन हास्यास्पद विधान मी वाचलेले नाही. आज ज्या अतिरेकी कारवाया होत आहेत त्याच्यामागे धर्मांध संघटना नाहीत हे म्हणणे अजीबात झेपले नाही. मग ह्या हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स शबाना आझमी सारखे सेक्युलर लोक आहेत का?<<<<<

अगदी मुर्ख प्रतिसाद! एखाद दुसरं वाक्या वाचून प्रतिसाद कशाला देताय. विकाससाहेबांनी काय लिहिलेय ते पुर्ण वाचा.

आम्ही येथे पडीक असतो!

विकि's picture

1 Dec 2008 - 12:15 am | विकि

हा लेख खुप छान आहे.बाबरी मशीद हेतुपुर्वक पाडल्यापासून देशात अशा विघातक कारवाया वाढल्या हे १००टक्के सत्य आहे आणी त्याचा फटका या पुढे ही बसल्याशिवाय राहणार नाही.

धम्मकलाडू's picture

1 Dec 2008 - 2:52 pm | धम्मकलाडू

आज जी काही "वाट लागली आहे" त्याला जबाबदार कोण आहेत माहीती आहे? हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत तर ते असले तथाकथीत सेक्युलर्स ज्यांनी बुद्धिवादाच्या नावाखाली हिंदू आणि मुसलमान यांच्यात फळी तयार केली

कधी ? केव्हा ? ९२-९३ला ? ८४ला भिवंडीत? काही वर्षांपूर्वी गुजरातेत? हा प्रतिसाद म्हणजे उथळ बौद्धिक 'रॅबल राउजिंग' आहे.

मुस्लिम अतिरेक्यांपेक्षा बाबरी पाडणारे, कत्तली घडविणारे करणारे कडवे हिंदू नेतेही कमी नाहीत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्याचे सगळे काही सेफ चालले आहे असा हिंदू मध्यमवर्गही या देशद्रोह्यांची पाठराखण करताना दिसतो. दक्षिणपंथी ( उजव्या विचारसरणीचे ) विचारवंत नावाची जमात या मध्यमवर्गातूनच येते आहे. अर्थातच 'दक्षिणपंथी' आणि 'विचारवंत' हे समीकरणच हास्यास्पद आहे म्हणा.

शेवटी काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष नालायक आहेत. सारख्याच प्रमाणात. सत्तेसाठी वखवखलेले. एकीकडे काँग्रेसने सेक्युलरिझम या शब्दाला सोयीसाठी वापरून अगदी गुळगुळीत करून टाकले आहे. इतके की कुणी हा शब्द उच्चारला की शिसारी यावी. बिचार्‍या भाजपाचे दुर्दैव की आपले असंख्य मुखवटे इच्छा असूनही काढता येत नाहीत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्या आधि काश्मिर आहे...

विकि's picture

1 Dec 2008 - 12:30 am | विकि

सुरूवातीला काश्मिर पुरता असणारा दहशतवाद(खलिस्तानवाधांनाही पकडा)केवळ हेतुपुर्वक बाबरी मशीद पाडल्यामुळेच भारतात फोफावला.काय गरज होती बाबरी पाडायची.बाबरी पाडल्यावर इथे मुंबईत ज्या दंगली घडल्या त्यात कोणाचे शिरकाण झाले.धार्मिकतेचे राजकारण करून वर येणार्‍या पक्षांना सामान्य माणसाशी काही देणे घेणे नसते त्यांचे अंतिम ध्येय् सत्तेपर्यंत पोहोचणे असते कळले का?

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Dec 2008 - 7:02 am | llपुण्याचे पेशवेll

मग १९९२ च्या आगोदर ज्या दंगली घडत होत्या त्या कशामुळे बरे? तेव्हा कुठे बाबरी मशिद पाडली होती?
धार्मिकतेचे राजकारण 'सेक्युलर' या गोंडस नावाखाली करणार्‍याना सामान्य लोकांशी फार घेणे देणे असते का? असेल कदाचित म्हणूनच आबा पाटिल म्हणत होते 'मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा घटना होतात'.
पुण्याचे पेशवे

अभिजीत's picture

30 Nov 2008 - 8:34 am | अभिजीत

सध्याच्या दहशतवादी हल्ल्यांचा बाबरी मशीद, हिंदु-मुस्लिम वाद याच्याशी जोडणे योग्य नाही. तसेच, सध्याच्या परिस्थितीत राम मंदीरासंबंधीच्या राजकारणाचा विचार करणे हे भलतेच विषयांतर आहे.

वर विकास म्हणतात त्याप्रमाणे हे स्युडो सेक्युलर विचार आहेत.

असे आणि अशा पठडीतले विचार वरवर दाखवून किंवा त्याला वरवर विरोध करुन आपल्याकडे राजकारण केले जाते आणि त्याचाच वापर सत्तेवर मिळवण्यासाठी केला जातो.

- अभिजीत

ऋषिकेश's picture

30 Nov 2008 - 9:54 am | ऋषिकेश

हे स्युडो सेक्युलर विचार आहेत.

काँग्रेस जसे मुसलमानांना चुचकारते तसे शेवटी मंदीर न बांधून भाजपने हिंदुंना फक्त चुचकारलेच की नाहि?.. हा ही स्युडो सेक्युलर पक्षच!

बाकी

सध्याच्या दहशतवादी हल्ल्यांचा बाबरी मशीद, हिंदु-मुस्लिम वाद याच्याशी जोडणे योग्य नाही.

सहमत! मात्र तसा थेट संबंध लेखात जोडला गेलेला दिसला नाहि. असो.

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विकास's picture

30 Nov 2008 - 10:42 am | विकास

सहमत! मात्र तसा थेट संबंध लेखात जोडला गेलेला दिसला नाहि. असो.

लेखातील खालील वाक्यापेक्षा अधिक थेट संबंध काय हवा आहे. तसा तो संपूर्ण लेखभरच आहे.

कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे

काँग्रेस जसे मुसलमानांना चुचकारते तसे शेवटी मंदीर न बांधून भाजपने हिंदुंना फक्त चुचकारलेच की नाहि?.. हा ही स्युडो सेक्युलर पक्षच!

हो आहेना! पण त्या सर्व चर्चेचा संबंध मुंबईतील अतिरेकी हल्ल्याशी काय ते समजले नाही. म्हणूनच त्यात बळी गेलेल्यांची आणि त्या हल्ल्याला परतवताना धारातिर्थी पडणार्‍यांची कृर थट्टा केली आहे असे वाटले.

तशी अजून एक थट्टा साक्षात आबा पाटलांनी केली (या अर्थाचे): "असे लहानसहान प्रसंग घडतातच. ते ५००० लोकांना मारायला आले, पण १६० वगैरेच मेले"!

अभिजीत's picture

30 Nov 2008 - 11:05 am | अभिजीत

अवांतर -
>>हा ही स्युडो सेक्युलर पक्षच!
राष्ट्रिय पक्ष म्हणून भाजप चे दिवसेंदिवस "काँग्रेसीकरण" आणि त्या अर्थाने स्युडो सेक्युलर बनणे ही एक राजकीय अपरिहार्यता आहे असे मला वाटते. आणि हे केवळ मंदीर बांधले नाही म्हणून नाही. एन डी ए ची स्थापना झाल्यावर कट्टर धार्मिक मुद्दे बाजुला ठेवावे लागतील ही गरज भाजप ने स्विकारली. ही राजकीय तडजोड पक्षात गोंधळ माजवत आहे. (उदा. जीना प्रकरण, राम सेतु प्रकरण वगैरे). तरीही एन डी ए चे विरोधक भाजप ला कट्टर धार्मिक पक्ष (राष्ट्रभाषेत - सांप्रदायिक ताकतें) म्हणूनच ओळखतील कारण त्याच्याशिवाय सध्या भारतीय राजकारणात तिसरी कोणतीही जागा नाही.

>> मात्र तसा थेट संबंध लेखात जोडला गेलेला दिसला नाहि. असो.
- थेट नाहीच. लेखाचं 'टायमिंग' एकदम 'टिपीकल' आहे म्हणून ...

- अभिजीत

बबलु's picture

30 Nov 2008 - 9:35 am | बबलु

अन्वय... या तुमच्या तथाकथित (किंचीत मुस्लीमधारिण्या मतांच्या लोकांमुळे) आज आपण कमकुवत आहोत हो.
आपल्यातच एकी नाही हे दुर्दैव. मग शेजार्‍यांचं फावणारच.
असच चालत आलंय अकबर आला तेव्हापासून (इतिहासाची पुनरवृत्ती होतेय).

"Survival Of The Fittest" हा उत्क्रांती चा नियम आहे. आपण यांच्या विरुध्द जिंकायचं असेल तर "Fittest" असणं गरजेचं नाही काय ??

....बबलु

एकलव्य's picture

30 Nov 2008 - 9:40 am | एकलव्य

सकाळी तळापर्यंत लेख वाचला नव्हता... आत्ता परत पाहिल्यावर गरळ लक्षात आली.

कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
हिंदुत्ववाद्यांमुळे कालचे (आणि इतरही) कांड घडले ह्या दुष्ट तर्काचा तीव्र निषेध.

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 8:41 pm | लिखाळ

>> हिंदुत्ववाद्यांमुळे कालचे (आणि इतरही) कांड घडले ह्या दुष्ट तर्काचा तीव्र निषेध. <<
एकलव्याशी सहमत.

लेखातली मते पटली नाहीत. अशी विचारसरणी आपल्या समाजातले चैतन्य नाहिसे करते असे मला वाटते.
एखादा समुदाय जन्मभूमीच्या भल्याआधी त्यांच्या वैश्विक समुहाची चिंता करत असेल तर असे प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य आहे. आणि खिलाफत चळवळी सारख्या वेळी समाजातले थोर आणि द्रष्टे लोक काय भूमिका घेतात ते समाजाच्या विचारधारेची दिशा ठरवणारे असते असे माझे मत आहे.
-- लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

30 Nov 2008 - 10:20 am | मुक्तसुनीत

काही प्रश्न :
बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु वारंवार टीका झाल्याने प्रत्येक मुस्लिम नागरिकाला कमीपणा वाटू लागला. त्यातून आम्हालाच लक्ष्य केले जातेय, अशी त्यांची मानसिकता बनून गेली. याचा नेमका फायदा या धर्मातील मूलतत्त्ववाद्यांनी घेतला आहे.

वरील विवेचनाचा मथितार्थ असा की

१. मुस्लिमांनी केलेल्या देशविघातक कारवाया , त्यामागील निरक्षरता , गरीबी हे मुद्दे लेखक मान्य करतो. (या कारवायातून किती लोक मेले , किती मालमत्तेचे नुकसान झाले याचा उल्लेख लेखक करत नाही. )
२. पण याबाबत वारंवार टीका झाल्याने जी मुस्लिम नागरिकांची प्रतिक्रिया घडली त्याचा हा परिपाक होय असे लेखकाचे म्हणणे. आपण एखाद्या मुलाचे उदाहरण घेऊ. तो वर्गात दांडगाई करतो , दुसर्‍या मुलांना सतत चावतो म्हणून त्याला वारंवार शिक्षा होते.आणि वारंवार शिक्षा केल्यामुळे तो अजून हिंस्त्र बनतो. आता यात शिक्षा करणार्‍याचा दोष नक्की काय ? ( बहुदा पुरेशी शिक्षा होत नाही हा असावा ! )

मीदेखील त्याच प्रश्‍नाचे उत्तर शोधत आहे. ते शोधता शोधता मी बाबरी मशिदीपर्यंत येऊन पोचलो आहे.
....
....

बाबरी मशिदीपर्यंतच का थांबायचे ? आणखी मागे का नाही जायचे ? का एखादी भूमिका आधीच ठरवून घ्यायची आणि सोयीस्कर टप्पे आणि सोयिस्कर मुद्दे तेव्हढे उचलायचे ?


भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते.

भाजप आणि इतरांनी आपली पोळी धर्माच्या भावना पेटवून तापवली हा मुद्दा एकदम मान्य. मात्र त्यांनी "शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते." .... हा हाहा. हा एक भीषण विनोद म्हणायला हरकत नाही. शांततेने मुद्दे हाताळून जर कुणाला असे साध्य करता आले असते तर .... लई भारी मुद्दा !

मला वाटते प्रत्येक मुस्लिम नागरिकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असावी. असे असतानाही बाबरी पाडण्याचा अट्टहास का करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर झाले नाही, तर चालणार नाही का? बरं बांधायचेच होते, तर आतापर्यंत का बांधले गेले नाही. केवळ मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले? मंदिर तर झालेच नाही; पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. .

भाजप आणि इतर हिंदू मूलतत्त्ववादी या सार्‍यांचा चुकीचा प्रवास , भडकावलेल्या भावना इ. इ. मला मान्य आहेच. पण ... "सारा देश भोगत असलेल्या परिणामांची" जबाबदारी एकट्या त्यांच्यावर टाकून वर परत "वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे" हे तर्कदुष्ट आहे :

१. दोष एकट्या भाजप आणि इतर हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांचा नाही. मुस्लिम मूलतत्त्ववादी विचारांचा तितकाच - किंवा कितीतरी जास्तच आहे. कारण शेवटी लखो लोकांचे प्राण , अब्जावधींची नासधूस , देशद्रोह ही पापे त्यांच्याच नावावर जमा आहेत.

२. हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना जागृत करायचे ? कुणी ? अशोक सिंघलनी ? बजरंग दलाने ? स्वयंसेवक संघाने ? आणि तुमही महणता त्याप्रमाणे जे उच्चविद्याविभूषित , लाखो रुपये कमावणरे लोक मुल्लामौलवींना ऐकून असली घृणास्पद कृत्ये करतात , ते हिंदू संघटनांचे ऐकणार ! काय राव .... सकाळी सकाळीच ? :-)

पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे

वरील वाक्यातील विसंगतींचा इतर मान्यवरांनी समाचार घेतलेला आहेच. मी त्यांच्याशी सहमत आहे इतके म्हणतो.

भास्कर केन्डे's picture

1 Dec 2008 - 9:21 am | भास्कर केन्डे

एकलव्य, विकास व मुक्तसुनितांनी समाचर घेतला आहेच. त्यांच्याशी सहमत.

आणखी एक विनोद सदर लेखकाने केला आहे. तो असा.

मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले?

भाऊसाहेब, एकात्मतेची वीण म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? आक्रमणे सहन करत राहणे? देवळांचा विध्वंस करणार्‍यांनी आपल्या बायका पोरींना पळवून नेले तरी ब्र न काढणे? धर्मांतरे करवून एका नंतर एक भूभाग या देशापासून वेगळे करण्याच्या डावांबद्दल काहीही न बोलणे? असंबद्ध खिलाफत चळवळीत हिंदूंनी मुसलमानांसोबर मुर्खासारखे लढणे??

मुसलमान आक्रमक भारतात घुसल्यापासून ते थेट मराठेशाहीपर्यंत मुसलमान कधी "रिसिव्हिंग यंड" होते का? मराठे शाहीच्या थोडक्या व मर्यादित सत्तेचा अपवाद वगळता केवळ हिंदूच हल्ले सोसत आला आहे,देवळे पडत आली गेली/जात आहेत, धर्मांतरे झाली/होत आहेत. पाकिस्तानच्या नावावर तोडल्या गेलेल्या भूभागांत हे तर प्रचंड मोठ्या प्रमाणात चालत आले आहे. हजार वर्षांच्या हिंदू-मुस्लीम संबंधात केवळ संघर्षच आहे व तो ही हिंदूंनी मार खाण्याचा. ऐक्याचे उदाहरण म्हणून मागितले की यांच्या सारखी सुडोसेक्युलर लोक उदाहरणे तरी फेकतात कोणती तर लाखोंचे धर्मांतर करवून आणनारा, हजारो हिंदू स्त्रियांना जनानखाण्यात कैद करणारा अकबर, एकेका दिवसात शेकडो साधू-संताचे शिरकाण करणारा टिपू, मुघलांच्या दरबारात बेशरमेने हुजरा करणारे राजे वा खिलाफत चळवळीत खांद्याला खांदा लावून लढणारे हिंदू-मुसलमान!!! या व्यतिरिक्त तुमच्या त्या तथाकथित ऐक्याचे उदाहरण देता का एखादे?

हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकात्मतेची वीण, असले वाक्यप्रचार हा ही एक विनोद नाही का?

आपला,
(डोळस) भास्कर
आम्ही येथे वसतो.

खरा डॉन's picture

1 Dec 2008 - 9:51 am | खरा डॉन

अगदी योग्य बोललात केंडेसाहेब. ह्या मुसलमानांना गुजरातमध्ये एकदा ठोकून काढले तसे महाराष्ट्रातही ठोकायची वेळ आली आहे. एकदा तशी जरब बसवली की बघुया एकजण तर मदत करतोय का ह्या झुरळांना ते. खरंच महाराष्ट्राला आज कडवा हिंदू नेताच हवा आहे.

-खरा डॉन

भास्कर केन्डे's picture

2 Dec 2008 - 2:04 am | भास्कर केन्डे

ह्या मुसलमानांना गुजरातमध्ये एकदा ठोकून काढले तसे महाराष्ट्रातही ठोकायची वेळ आली आहे.
आणी तुमची बदली काश्मिर वा पुर्वांचलात करायची वेळ आली आहे ;)
म्हणजे तुमचे डोळे उघडतील :)

भास्कर केन्डे's picture

2 Dec 2008 - 3:15 am | भास्कर केन्डे

डॉनबा,

कृपया डोळे उघडे ठेऊन वाचा. मी वा मी ज्यांच्याशी सहमत आहे असे म्हणालो त्यांनीही अजिबात कोणालाही ठोकून काढायची भाषा केलेली नाही. उगीच विपर्यास करुन विसंगत विधाने करुन इतरांसह स्वतःची सुद्धा दिशाभूल का करुन घेताय?

काय राव ... सकाळी सकाळीच?? ;)
त्या ऐवजी दूध प्या अन तेही पचायला भारी वाटले तर जरा मठ्ठा वा लस्सी प्या ;)

तथाकथीत "वीण" बाबरी प्रकरणाने विस्कटीत झाली अशा चुकीच्या विधानांतील असत्य मी उदाहरणे देऊन सिद्ध केले. अर्थात तुम्ही सुद्धा अजानतेपणे त्यात भरच टाकलीत हा ही भाग निराळा. असो.

उठसुठ गुजरात आठवणार्‍या भारतीयांची कीव करावी वाटते. मग गुजरात पर्यंतच का थांबायचे? काश्मिरात झालेले हिंदूंचे पद्धतशीर निर्मुलन (इथनिक क्लिन्सिंग), केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांनी मागच्या ६० वर्षात पुर्वांचलाची पूर्णपणे बदललेली डेमोग्राफी वा ८४ मधील काँग्रेसी गुंडांनी केलेले निरपराध शिखांचे शिरकान यांचाही उहापोह करा ना.

विषयांतर - जर ती तथाकथित वीण खरीच विनली गेली तर माझ्यासह सर्वच भारतीयांना आनंदाचे भरते येईल. हिंदूंनी शेकडो वर्षांच्या तथाकथित सहजीवनात नेहमीच मैत्रीचा हात समोर केलेला आहे. त्याला योग्य प्रतिसाद देण्याऐवजी आपल्या भूमातेचे खंडण करण्याचे कुटील डाव करण्यात मुस्लीम शक्तींनी धन्यता मानली आहे हे सत्य आहे. त्यांनी सुद्धा समोर येऊन तमाम हिंदूंना विश्वास देण्याची गरज आहे. कारण मैत्रीची टाळी सुद्धा एका हाताने वाजत नाही. तुमच्यासारखे शेकडो लोक त्यांच्यावर विश्वास ठेऊन पाकिस्तानात राहिले. काय आले आहे त्यांच्या नशिबी... मारुन मुटकून धर्मांतर अथवा मारुन मुटकून देशांतरच ना?

धम्मकलाडू's picture

2 Dec 2008 - 10:48 am | धम्मकलाडू

उठसुठ गुजरात आठवणार्‍या भारतीयांची कीव करावी वाटते. मग गुजरात पर्यंतच का थांबायचे? काश्मिरात झालेले हिंदूंचे पद्धतशीर निर्मुलन (इथनिक क्लिन्सिंग), केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांनी मागच्या ६० वर्षात पुर्वांचलाची पूर्णपणे बदललेली डेमोग्राफी वा ८४ मधील काँग्रेसी गुंडांनी केलेले निरपराध शिखांचे शिरकान यांचाही उहापोह करा ना.

नका थांबू. कीव करत राहा. पुढील किवेसाठी शुभेच्छा! मुस्लिम दहशतवाद का वाढला या प्रश्नाचे उत्तर गुजरातेत आहे, अयोध्येत आहे, ९२च्या दंगलीत आहे. काश्मीर, शिख दंगली यात भाजपाचे आणि संघपरिवाराचे राजकारण आहे आणि अस्तित्व अवलंबून आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भास्कर केन्डे's picture

2 Dec 2008 - 10:51 am | भास्कर केन्डे

तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? ;)

...केंडेकाका असं चिडायचं...ना......ही . लागलं का?.... एक दीर्घ श्वास पाहू आणि नंतरच कीव करा बरं! ;):) पाञ्चजन्य सोडून इतर साहित्यही वाचत जा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रदीप's picture

2 Dec 2008 - 8:30 pm | प्रदीप

काश्मीर, शिख दंगली यात भाजपाचे आणि संघपरिवाराचे राजकारण आहे आणि अस्तित्व अवलंबून आहे.

हे कळले नाही, जरा खुलासा कराल का?

चर्चा प्रस्तावाच्या लेखकाने भारतीय मुस्लिम हिंदूंच्या काही कृतिंमुळे कसे अस्वस्थ झाले आहेत (व त्यामुळे त्यांच्यातील मूलतत्ववादींच्या विखारी प्रचाराला ते कसे आपसूक बळी पडत आहेत) -[ज्यामुळे ते दंगली, घातपाती कारवाया करण्यास उद्युक्त होत आहेत] इत्यादी प्रतिपादन केले आहे. ह्यातील कारणमीमांसा बरोबर आहे की चूक ह्याचा इतरांनी परामर्ष घेतलेला आहे.

ह्या चर्चेसाठी थोडावेळ आपण, लेखकाने विशद केलेली कारणमीमांसा अचूक आहे असे धरून चालू. पण इतरस्त्र मी विचारणा केली होती, ती मुस्लिमांच्या इतर देशांतील अशाच वर्तणूकीविषयी. चेचेन्या, चीनमधील शिन्यांग, फिलीपीन्समधील मिंदानाओतील मोरोंची फुटिरवादी चळवळ, थायलंडच्या दक्षिणेतील तशीच चळवळ, इंग्लंडमधील गेल्या काही वर्षांतील दंगेधोपे ह्या सर्वांमागे मुस्लिम समाजावर तेथील इतरेजनांनी, जसा 'भारतात हिंदूंनी त्यांच्यावर अन्याय केला आहे', तसाच अन्याय केला आहे, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. पराकोटिची आक्रमक वृत्ति व तडजोड करण्याची तयारी नाही, ही ह्या समाजाची दुर्दैवी वैशिष्ठ्ये आहेत. इतिहासात अनेक वेळा एका समाजाने दुसर्‍या समाजावर अपरिमीत अत्याचार केले आहेत. पण सर्वसाधारणपणे समाज प्रगतिकारक असतात, पुढे जावयाची मानसिकता त्यांच्यात असते. नाहीतर आजमितीला चिनी व कोरियन -जपान्यांविरूद्ध, जपानी अमेरिकेविरूद्ध, ज्यू जर्मनांविरूद्ध, ऑस्ट्रेलियातील ऍबोरिजिन्स नंतर आलेल्या गोर्‍यांविरूद्ध, अमेरिकेतील मूळचे नागरिक त्यांच्या उरावर बसणार्‍या आक्रमकांविरूद्ध लढतच राहिले असते. पण तसे झालेले नाही. अन्याय झाल्याच्या, अत्याचार झाल्याच्या खुणा जरूर आहेत, त्या भरून जाण्यास कमीअधिक अवधी लागेल, पण तरीही समांतर राहून, पुढे पहात कालक्रमणा करण्याची प्रगल्भता ह्या सर्वांनी दाखवली. दुर्दैवाने सर्वसाधारण मुस्लिमांची मानसिकता तशी नाही. ह्याला सन्मानपूर्वक अपवाद तुर्कस्तानातील मुस्लिमांचा. तिथे त्यांनी परंपरेचे जोखड झुगारून दिले, आधुनिक विचारसरणीचा अंगिकार केला.

आणि भारतीय हिंदू/हान चिनी/फिलिपीन्समधील ख्रिश्चन्स/ रशियातील कम्युनिस्ट/इंग्लंडातील आधुनिक विचारसरणीचे लोक वगैरे जाउ द्यात. मुस्लिम देशातच शिया/ सुन्नी दंगली होतात, अहमदियांवर अत्याचार होतात, त्याला तर कुणी त्यांच्या समाजाच्या बाहेरील घटक जबाबदार नाहीत ना?

तुर्कस्तानात त्यांना एक जबरदस्त नेतृत्व लाभले. आताही भारतीय मुस्लिमांना जरूर आहे ती तश्या नेतृत्वाची. हे नेतृत्व सकारात्मक हवे, नुसते आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या खपल्या काढत बसणारे नको, ते अत्यंत दूरदर्शी व खंबीर हवे, ज्यायोगे त्याच्या पश्चातही त्याने/ तिने घातलेल्या घडीची चाके उलटी फिरवणे सहज शक्य नसावे. आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्यातूनच यावयास हवे. कुठल्याही समाज/ देशाचे सकस नेतृत्व हे त्यातून पैदा झालेले पाहिजे, बाहेरून ते इंप्लांट करता येत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2008 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

चला तथाकथीत सर्व धर्म समभावचे रक्षक धावुन यायला सुरुवात झाली ! आता पुन्हा एकदा हिंदुंना शांतता आणी सलोखा राखण्यासाठी आवाहन करणार्‍यांचा महापुर येइल ! जेंव्हा नालायक यवनी अतिरेकी स्फोट करत असतात तेंव्हा हि माणसे कुठे असतात काय महित ? माझी खरच नम्र विनंती आहे कि हे असे आवहन एकदा कुठल्याही मशिदी बाहेर उभे राहुन आपल्या (?) मुस्लिम बांधवांना करुन दाखवा ! आले लगेच दाखवत हिंदुच्या चुका. तुमच्या सारख्या माणसांमुळेच आज धर्माची खरी नाचक्की झाली आहे, तुमच्या या नालायक आवाहनांमुळे हिंदु धर्म हा एक फार संतापी आणी सतत हल्ला करण्यास सज्ज असणारा आहे अशी प्रतिमा तयार होत आहे. अरे हो पाडली मशीद ! आमच्याच जमिनीवर होती ना ? तालिबान अख्खे रणगाडे घालत होता बुध्द मुर्तिंवर तेव्हा किती मुल्ला मौलवी धावले निषेध करायला ? मुंबईत झालेला हल्ला मुस्लिम युवकांनी केला आहे हे कळाल्यावर किती मुल्ला मौलवी आले निषेध करायला ? बंद करा हा तुमचा सर्वधर्म समभाव ! काय मिळाचे आहे त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यापासुन ? उलट काश्मिर आणी बरेच काहि गमावुनच बसलो आहोत आपण ! आता तरी शहाणे व्हा आणी हिंदुना षंढ बनवणे थांबवा.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

30 Nov 2008 - 11:41 am | विनायक प्रभू

मनमोहन देसाई अमर रहे.

अनामिका's picture

30 Nov 2008 - 12:05 pm | अनामिका

भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते.
या विधानासारखे विनोदी विधान आजताजायत माझ्या वाचनात आले नाहि.
हिच शांतता जर महाराजांनी अंगिकारली असती तर आज निधर्मीवाद्यांचा भारत्(आमचा हिंदुस्थानच)
जगाच्या नकाशावरील एकमेव असा सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला इस्लामी देश म्हणुन ओळखला गेला असता.
हिंदुनी ते पुण्यकर्म करायची काय गरज? सगळच हिंदुनी करायच मग निधर्मीवाद्यांच या देशात काही कामच उरत नाही.
आज इतका मोठा अतिरेकी हल्ला देशावर झालेला असताना एक तरी मुस्लिम संघटना पुढे आली आणि याचा निषेध त्यांनी केला असे अंधुकसे देखिल आठवत नाही .अबु आजमी ने जायचा प्रयत्न केला ताज मधे पण त्याला हाकलुन दिला एनेसजी ने =))
"अनामिका :( "

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2008 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

++अबु आजमी ने जायचा प्रयत्न केला ताज मधे पण त्याला हाकलुन दिला एनेसजी ने
= त्याला घरातुन हि हाकलुन दिले आहे म्हणतात. नालयक माणसाला खरे तर 'जगाबाहेर' हाकलले पाहिजे ! आणी "कडव्या हिंदूंनी ते पुण्यकर्म करावेच" =))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

30 Nov 2008 - 2:29 pm | विनायक पाचलग

मी सम्पुर्ण लेख आणि त्यवरच्या सर्व प्रतिक्रिया वाचल्या .बाबरी मशीद प्रकर्णावेळी माझा जन्मही झालेला नह्वता.त्यमुळे त्यासन्बन्धी बोलण्याचा मला अधिकार नाही.पण मी मुळ लेखान्बद्दल एक गोश्ट बोलु इच्चितो .सदर लेखकाने ज्ञानेश महाराव यान्चा सन्दर्भ घेतला आहे .तर त्यन्च्याबाबतीत थोडेसे.-मी एक पत्रकार म्हणुन त्यान्चा आदर करतो .पण एक् व्यक्ती म्हणून अजीबात नाही.त्यान्ची ७ पुस्तके काही दिवसान्पुर्वी माझ्या वाचनात आली .त्या सर्व पुस्तकातील कोण्त्याही घटनेचा सम्बन्ध त्यानी हिन्दुन्शी आणि विशेश्तह ब्राम्हणन्शी लावला होता.जवळ्जवळ ८० % वेळा मला ते अवास्तव वाटले.त्यावर आलेली उत्तरे मी वाचली ती समर्पक होती .पण त्यानी आप्ला पवित्रा बदललेला नाही.२ महिन्यापुर्वी मी सहजच चित्रलेखा घेतला .मला स्वतह्ला तो आवडला नाहीच पण त्यामध्ये सरळ्सरळ हिन्दुना नावे ठेवणारी लेखमाला चालु होती आणि त्यादिवशीचा विशय आणि हिन्दु यान्चा तर बाडरायण समन्ध जोडला होता नन्तर्च्या दोन आअठवद्यात हाच अनुभव आला.परवा माझ्या वाच्नात आले की त्यानी हिन्दु दहशत्वादी या नावाने शन्कराचार्यान्वर अन्क काढला म्हणे आता याला काय म्हणायचे.शन्कराचर्यन्विशयी उहापोह करणारा एक सुन्दर लेख लोकप्रभात आला होता .मी सापडल्यास लिन्क देइन पण याला काय म्हणायचे .ते म्हणतात की हिन्दु आत्याचार करतात पण सतत एकाच समाजाबद्दल विद्वेश पसरवणे ही गुन्हेगारी नाही आणि हो जे घडले ते राजकारण्यन्मुळे काय सगळे कट्टर हिन्दु काय गेले न्हवते तिकडे आणि हो १९९० आधी जे माफिया ,गुन्डम्हणजे एक प्रकारचे दहशत्वादी होते ते काय हिन्दु होते काय ? माझे असे प्रामाणीक म्हणने आहे की या काळात क्रुपा करुन जातीवरुन कोणी जावु नये.तुम्ही याला पळपुतेपणा म्हणा हवे तर पण राजकारणी आप्ल्या या भावनेचा त्यन्च्या स्वार्थासठी फायदा करुन घेतील आणि अराजक माजेल आणि ते थाम्बवण्यासथी निदान आपण्तरी जातीवर लिखाण करणे मला सध्य स्थीतीत उचीत वातत नाही .आणि हो मी कोण्त्याही पक्श,सन्घाचा कर्यक्रर्ता नाही .सदर प्रतिक्रिया ही कोण्त्याही वैयक्तीक हेव्यादव्याशिवाय दीली असुन तीच्यावर चर्चा व्हवी आणि ती उद्बोधक व्हवी हीच अपेक्शा ठेवतो..
आपला,
(धर्म्निरपेक्श्)कोल्हापुरी दादा

ऋषिकेश's picture

30 Nov 2008 - 2:39 pm | ऋषिकेश

मी एक पत्रकार म्हणुन त्यान्चा आदर करतो .पण एक् व्यक्ती म्हणून अजीबात नाही

ज्ञानेश महाराव यांच्या विचारांचा मलाहि कोणत्याहि दृष्टीने आदर नाहि.. समाजात केवळ दुहि शोधणारे/माजवू पाहणारे (कोणी भाव देत नाहि ते सोडा) लिखाण वाटते.. चित्रलेखा वाचायचो.. याच कारणाने ३-४ वर्षांपूर्वीच बंद केले

-(गोंधळलेला) ऋषिकेश

धम्मकलाडू's picture

1 Dec 2008 - 2:15 pm | धम्मकलाडू

बाबरी मशिदीच्या प्रकरणानंतर पाकिस्तानाधार्जिण्या, पाकिस्तानसमर्थित अतिरेक संघटनांना स्थानिक मुस्लिमांतून रंगरूट आणि पाठिंबा मिळवण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झाले. गुजरातमधल्या सरकारसमर्थित कत्तलींनंतर तर बघायलाच नको.
हे सांगायला कुणी 'महाराव' नको.

पण हिंदू संघटना 'डिनायल मोड'मध्येच आहेत. नेहमीच असतात. का?

देशाबाहेरची परिस्थिती आटोक्यात आणणे आपल्या हातात नाही. अगदी अमेरिकेलाही ते शक्य झालेले नाही. पण आपण सर्व मिळून देशाच्या आतली परिस्थितीवर आटोक्यात आणू शकतो. थंड डोक्याने मुस्लिम दहशतवादाचा मुकाबला करताना तेवढ्याच थंडपणे या हिंदू अतिरेक्यांना, अतिरेकी विचारसरणीला हद्दपार किंवा मार्जनलाइज करण्याची गरज आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ना लेखणी ना वाणी... इस्लामला एकच उत्तर.. "महाराजांची भवानी" !!!!

जीएस's picture

1 Dec 2008 - 3:47 pm | जीएस

एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनने जातांना एक तरूणी बांद्रा स्टेशन गेले की अत्तराची कुपी काढुन नाकाला लावत असते, आणि मग लगेच खाडीचा तो वास गाडीत येत असतो, एक नवीनच आलेली बाई असे तीन चार दिवस बघते, आणि तिच्यावर चिडून म्हणते अरे तू काय ती बाटली काढतेस रोज ? त्यामुळे सगळ्या ट्रेनमध्ये घाण वास पसरतोय...

आंतरराष्ट्रीय जिहादी दहशतवाद हा काय प्रश्न आहे हे समजून न घेता लिहू लागले की अशीच विचित्र कारणमीमांसा मांडली जाउ शकते...

बाकी ज्ञानेश महाराव यांचा उल्लेख वा संदर्भ 'मराठी शिवराळ लेखन कोष' , 'विद्वेष साहित्य संमेलन' वा तत्सम ठिकाणी शोभून दिसेल. वैचारिकतेचा दावा करणार्‍या लेखनात नाही असे सुचवावेसे वाटते.

विकास's picture

1 Dec 2008 - 7:26 pm | विकास

"कडवे हिंदू" म्हणणे शुध्द नालायकपणा - हा प्रतिसाद आणि त्यावरील आहे म्हणून टारझन यांचा प्रतिसाद मी अप्रकाशीत केला आहे.

वास्तवीक कुठल्याच धर्मावरून आणि धर्मियांचे नाव घेऊन वाईट लिहू नये हा खरा "सर्वधर्मसमभाव" या मूळ लेखातच नाही. एका धर्मातील स्वतःला न पटणार्‍या वृत्तींना कडवे म्हणले तर त्याची तशीच इतर धर्मियांना विशेष करून आत्ताच्या घडीला ज्या धर्मातील अतिरेकी जबाबदार आहेत त्यांना उद्देशून लिहीताना रीऍक्शन आली तर त्या प्रतिक्रीयेबद्दल आश्चर्य वाटायला नको.

पण तरी देखील काही मर्यादा म्हणून केवळ "मुस्लीमांना" मुस्लीम म्हणून नावे ठेवणारी प्रतिक्रीया अप्रकाशीत करत आहे. दहशतवादाला धर्म नसतो म्हणताना हिंदू हिंदू म्हणत नावे ठेवणारे या चर्चेस जरी ठेवले तरी एक संपादक म्हणून हा प्रश्न इतर संपादकांना आणि वाचकांना विचारत आहे की असे लेखन तरी येउन द्यावे काय?

विकास's picture

2 Dec 2008 - 10:02 am | विकास

मग, सत्य ऐकायची तयारी नसल्यास, आम्ही काय करावे अथवा काय करु नये, हे सांगायला तुमची गरज नाही.........ऊंटावरून शेळ्या हाकण्याचा ऊद्योग करू नये.

नाईलाजाने अजून एक उंटावरून शेळी हाकत आपला गैरशब्द असलेला प्रतिसाद परत अप्रकाशीत करत आहे.

आपला

बुळ्या संपादक

हर्षद आनंदी's picture

2 Dec 2008 - 12:10 pm | हर्षद आनंदी

अपेक्षा पुर्ण करीत रहा ..मी सत्य तेच लिहीणार... सत्याला परप्रकाशाची गरज नसते.....
...वेळे अभावी इतकेच !! परत भेटुच

वरील प्रतिसाद संपादीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2008 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं तर अशा चर्चेत चर्चेच्या निमित्ताने धर्मांना वगळता येणार नाही . धर्म आला तरी सौम्य चिकित्सा व्हावी, वाद होऊ नये. चर्चेच्या निमित्ताने सौम्यपणा अपेक्षीत होता/असतो. तेव्हा काही प्रतिसादांना जाऊ द्या ! राहू द्या ! करता-करता दुर्दैवाने काही सदस्य अतिशय आक्रास्तळपणे लिहितात, गैरफायदा घेतात. तेव्हा आपण दोन-तीन प्रतिसाद संपादित केले ते योग्यच केले. प्रतिसादांची भाषा पाहता, सदरील प्रतिसाद आम्ही संपादित न करता थेट उडवलेच असते.

आत्ता पर्यत सत्य लेखनाचे अनेक प्रकारे धिंदवडे काढ्ण्यात आले आहेत. दुसरी अपेक्षाच नव्हती.

'कडवे हिंदू, हिंदूंमधील जहाल गट, धर्मांध हिंदू' असे वाचले की, तळपायाची आग मस्तकाला जाते
एवढे अत्याचार सहन करून, हिंदू अशी नामर्दपणाची भाषा करताना पाहून चीड येते.

शिवरायांनी भवानी गाजविण्या ऐवजी तुणतुणे घेऊन प्रबोधन केले असते तर हा विषय ३५० वर्षांपुर्वीच संपला असता. मग ते कडवे हिंदू का?

शांततेच्या उपायांनी, शिक्षणाने जर मने बदलली असती, तर लादेन निर्माण झाला असता का? तो स्वतः उच्च शिक्षित आहे. [पाकीस्तानात, पश्चिम सरहद्दीवर]
शिक्षणाची आस्था ह्यांना असती, तर तक्षशिला जाळून मानवतेला अज्ञानाच्या खाईत लोटण्याचा पराक्रम ह्यांनी केलाच नसता

सांगायचे फक्त एवढेच होते, आपण हिंदूत्वाच्या रक्षणासाठी काय केले पाहीजे हे जाणून न घेता दुसर्‍याला शहाणपणा शिकवू नका.
जे काही हिंदू जागृत होवून काही कार्य करीत आहेत, त्यांना भले मदत करू नका,
पण त्यांचा असा उल्लेख करून त्यांचे मनोबल खच्ची करू नका, ते हिंदू समाजासाठीच लढ्त आहेत, स्वार्थासाठी नाहीत. त्यांच्या कार्याचे महत्व समजुन घ्या.

महेश हतोळकर's picture

1 Dec 2008 - 4:39 pm | महेश हतोळकर

पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.

या दोन विधानातला विरोधाभास नाही कळला. मुस्लिम मूलतत्ववादी संधीचीच वाट पहात होते. त्यानी ही नाही तर आजून दुसरी कोणती तरी संधी नक्कीच उचलली असती. मग काय तुम्ही "ती दुसरी संधी" देणार्‍यांना झोडपणार होतात काय?

महेश हतोळकर

अन्वय's picture

1 Dec 2008 - 5:04 pm | अन्वय

प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!
सर्वधर्मसमभाव चिरायू होवो!!

विसुनाना's picture

1 Dec 2008 - 5:17 pm | विसुनाना

चिरायु होवो होय? मला वाटले "अमर रहे" म्हणताय.

अन्वय's picture

1 Dec 2008 - 5:28 pm | अन्वय

संघवाले आहात वाटतं. कारण त्यांच्याकडे सर्जनशीलताच नसते. कायम विध्वंसाचे डोहाळे लागलेले असतात त्यांना. ढळढळीत लिहिलेला चिरायू शब्द तुम्हाला अमर रहे वाटला म्हणजे आपणही त्याच प्रकारचे दिसताहात.
-- अपशब्द संपादित

विसुनाना's picture

1 Dec 2008 - 5:39 pm | विसुनाना

हीन शब्द उच्चारून आपण स्वतःची जीभ विटाळून घेत आहात. मला त्याचे वाईट वाटले.
मी तुमच्या म्हणण्याला विरोध करण्यासाठी तसे म्हटले होते असे तुम्हाला वाटले यावरून जे समजायचे ते समजले.
कोणत्याही विधानाचा केवळ एकांगी विचार करू नये.
इत्यलम!

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 8:52 pm | लिखाळ

मी पाहिलेले संघवाले असे नाहीत.
-- लिखाळ.

अन्वय's picture

1 Dec 2008 - 5:42 pm | अन्वय

राग आल्यास क्षमस्व. पण संघाबद्दल माझ्या भावना खूपच तीव्र आहेत.
आपल्याला वाईट वाटले. पुन्हा क्षमस्व!

विकास's picture

2 Dec 2008 - 9:16 pm | विकास

पण संघाबद्दल माझ्या भावना खूपच तीव्र आहेत.

भावना तिव्र होण्यासाठी काहीतरी व्यक्तीगत अनुभव पाठीशी असला पाहीजे असे मी गृहीत धरतो. सांगोवांगी गोष्टीनेच जर भावना तिव्र झाल्या असतील तर तो पण अतिरेकच.

तेंव्हा नक्की आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नक्की काय अनुभव आला आहे हे समजून घेयला आवडेल.

वेताळ's picture

1 Dec 2008 - 6:38 pm | वेताळ

मी संघाचा कार्यकर्ता नाही किंवा भाजपाशी संलग्न कोणत्याही राजकिय पक्षाशी. पण तुला तुझा तोल संभाळता येत नाही असे खेदाने म्हनावे लागते.तुझा वरील लेख वाचल्यावर मला त्यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नव्हती पण आता असे वाटते आहे कि लिहावेच लागेल.
वरील लेखा प्रमाणे भारतात खुपच समंजस,कृपाळु,भारतीय घटनेवर विश्वास ठेवणारा,सर्वधर्मसमभाव मानणारा,एक ही मदरसा नसणारा मुस्लिम समाज १९९३ पुर्वी रहात होता.परंतु काही लोकानी बाबरी मश्चिद नावाची पवित्र वास्तु पाडली व त्यामुळे मुस्लिमसमाज बिथरला. वा काय सुंदर विष्लेशन आहे.त्यानंतर भारतात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या.परंतु त्या आधी भारतात १९४७ पासुन हिंदु-मुस्लिम दंगली होत होत्या ,त्याला जबाबदार कोण? फक्त हिंदुच का?
१९४७ च्या दंगलीस काही लोक त्यावेळच्या हिंदु-मुस्लिम आर्थिक दरीस जबाबदार धरतात,पण का? मुस्लिम समाजास मुख्यप्रवाहात येण्यास कोणाचा विरोध आहे?परंतु ते स्वःताच मुख्यप्रवाहात येण्यास तयार नाहीत.त्याचा अजुनही भारतीय घटनेवर विश्वास नाही आहे.ते अजुनही आपल्या मुलांना मदरश्या शिकवण्यास पाठवतात.मग त्याच्यातील आर्थिक विषमता कशी दुर होणार?तुम्ही सर्व बाबतीत एकांगी विचार करत आहात. १९९३ हे एक निमित्त आहे. खर तर पाकिस्तान त्यापुर्वी झालेल्या सर्व आमनेसामने युध्दात पराभुत झालेला आहे. सरळ लढाईत आपला टिकाव लागत नाही म्हणुन ते इथल्या धर्मांध मुस्लिमाना हाताशी धरुन हे सगळे खेळ खेळत आहेत व आपल्या इथले मुस्लिम त्याला बळी पडत आहेत.
हिंदुना त्याची विचारसरणी बदलावी लागेल असे काय तुम्ही अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल ही मला काहीच कळाले नाही. संघवाल्याच्या देश निष्ठेबाबत तुम्हाला शंका घेण्याचा काही एक अधिकार नाही. हिंदु कधीपासुन हिंसक झाले आहेत?आपण आपला लेख परत एकदा वाचावा मग तुमच्या लक्षात येईल तुम्ही काय लिहले आहे.
वेताळ

प्रदीप's picture

1 Dec 2008 - 7:41 pm | प्रदीप

अन्यत्र अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची तेथील सरकारांच्या विरोधात, भारतात चालतात तशीच (बहुतेक फुटिरवादी) आंदोलने चालू आहेत. (उदा. चीनमधील विघुर प्रांत, थायलंडातील दक्षिण प्रांत, फिलीपाईन्समधील काही प्रांत, युरोपातील स्पेन इ. देश, चेचेन्या व आजूबाजूचे देश) त्यांच्याविषयी आपले काय मत आहे? तिथे त्यांच्यावर अन्याय करण्यास हिंदू नाहीत, ह्यासंदर्भात हे विचारत आहे.

अन्वय आपले इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे असे खेदाने नमुद करावे वाटते. आपण विश्लेषन करत आहात पण फक्त बाबरी पर्यंत येउन थांबलात. जरा मागे ही चला मग बघू.

कडवे हिंदू म्हणजे कोण हो? जे १०-१२ लाख लोक दोन्ही वेळेस मिळून तिथे आले ते का? त्यातले अर्ध तर म्हातारे आणि बायकाच होत्या.

आपण नक्कीच प्रश्नाचा मूळा कडे जायचा प्रयत्न करत आहात ह्या बद्दल तूमचे अभिनंदन पण मी आधी लिहील्याप्रमाने तूम्ही इतिहास अजुन वाचला नाहीत. प्लिज जरा मागे जा आणि मग बघा. आधीच् निष्कर्ष काढून मग थातूरमातूर लिखान करायचे व मुद्दा पटवून सांगायाचा असे तूमचे लिखान वाटले.

कोणालाही दोष देन अतिशय सोपे असते. वर आपण वांझोट्या कुळाचे संघवाले असेही म्हणालात. आपल्या अज्ञानास काय म्हनावे. आणि अमेरिकेत, स्पेन मध्ये, युरोप मध्ये किती बाबर्‍या पडल्या ह्याचीही जरा आकडेवारी द्याल का? का तिकडेही कडवे हिंदू आहे. ग्लोबल प्रश्नाचे उत्तर तुम्ही हिंदूच्या माथी लावून टाकता? काय म्हणावे ह्याला. हिंदू द्वेष, दुट्टप्पी पना की जी लोक अर्धवट ज्ञानाची असतात त्यांचात मिळवलेली प्रसिध्दी?

सर्वधर्मसमभाव ह्या शब्दाची गल्लत तूम्ही करुन घेतली. त्या शब्दाचा अर्थ म्हनजे सर्वांना समान वागनूक. ती आत्ता आहे का? कुठल्या धर्माचा व्होट बँकेवर नेहमी लक्ष ठेवले जाते हे आपल्य सर्वव्यापी ज्ञानातून सुटलेले दिसत आहे.

मुस्लिम : ठिक है बाबा गलतीसे तुट गया, आइंदा ऐसी गलती नही करेंगे, कान पकडता हु, आखिर रामभी हमारेही भगवान हैना... >>
कलंत्री साहेब, मग आधीच का दिली नाही त्या 'कडव्या हिंदूंना'? मग गलती होगै तो बॉम्ब स्फोट क्यूं किये जा रहे हो हे पण तूमच्या "त्या" मित्राला जरुर विचारा व इथे लिहा.

आपलाच सर्वांना सारखे वागविनारा,
केदार

धम्मकलाडू's picture

2 Dec 2008 - 12:24 pm | धम्मकलाडू

आणि अमेरिकेत, स्पेन मध्ये, युरोप मध्ये किती बाबर्‍या पडल्या ह्याचीही जरा आकडेवारी द्याल का?

स्पेनमध्ये ग्रनाडात एकेकाळी अरबांचे, मूर अरबांचे राज्य होते. तिथल्या अनेक मशिदींचे आता चर्चमध्ये रूपांतर करण्या आले आहे. युरोपमध्ये तुर्कांचा भलाबुरा प्रभाव आर्मीनिया, रुमेनिया, सायप्रस, ग्रीस सारख्या अनेक देशांत होता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

LALIT JAGTAP's picture

2 Dec 2008 - 7:15 am | LALIT JAGTAP

I agree with the main article and discussion around it.

Here are few of my thoughts.

1) We as indians need to avoid one more riots in Mumbai or any other part of INDIA. If riots happen now than terrorist won and INDIA lost.
2) We should use our non violence to take us thru this dark time.
3) Understand these are extra ordinary times. The prosperity and security of the world is threatened.
4) Possibly unknown and bigger elements are in play currently in SOUTH ASIA.
5) Make INDIA more stronger and secure. Prosperity can not come without proper Security.
6) Reduce hatred in hearts and/or minds of all other indians specially non-hindus.
7) History is useful but to fix our weakness and not to create more hatred.
8) If we avoid riots we will be able to save a lot many poor and innocent people lives.
9) Understand we all are blessed to chat using internet. Major part of indian society still has to do any type of work anywhere to earn food.
10) Lastly non violence does not mean that we should not protect our land. And attack other country if need be, but let leaders decide best course of action.
11) I sincerely wish we should not start one more war like one started by Bush. Or not start one more riot like last one in Gujrat Godhra.

- Lalit Jagtap

एकलव्य's picture

2 Dec 2008 - 8:28 am | एकलव्य

Dear Lalit,
No one wants riots... but that doesn't mean one should always threaten about possible riots to bury the justice. That cannot go on forever.

It’s the ultimate responsibility of the political leadership to deliver the justice irrespective of whether popular vote will take it to the streets or not.

May sanity be with you all,
eकलव्य

JAGOMOHANPYARE's picture

2 Dec 2008 - 9:04 pm | JAGOMOHANPYARE

हिन्दुनी बाबरी मशीद पाडली म्हणून मुसल्मान चिडले असे म्हणजे म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा !..... बाबरी मशीद पाडली मान्य आहे. मग अमेरिकेत वर्ल्ड सेंटर पाडले हा कशाचा राग म्हणायचा ? का वर्ल्ड सेंटरच्याखालीही एखादी मशीद होती व ती पाडून तिथे ट्रेड सेंटर झाले होते असा काही इतिहास आहे ?

मुक्तसुनीत's picture

2 Dec 2008 - 9:17 pm | मुक्तसुनीत

दहशतवाद हा जर का एका विशिष्ट धर्मातील लोकांवर केलेल्या अन्यायाचा बदला आहे असे म्हणायचे असेल तर शतकानुशतके झालेल्या अन्यायांमुळे समस्त हिंदू जमात दहशतवादी बनली असती. काशी, मथुरा, सोमनाथादि मंदिरे , जिझिया कर , शतकानुशतकांचा सुलतानांचा इतिहास , पाकिस्तानात फाळणीच्या वेळी घडलेले प्रकार आणि फाळणीनंतरचे आय एस आय ने केलेली घृणास्पद कृत्ये आपल्याला या संदर्भात वगळता येणार नाहीत.

थोडक्यात , दहशतवादाची मीमांसा करताना "अमुक घटनांचा सूड" हे कारण पुरेसे नाही. हा "एक-दिशा मार्ग" नाही. दोन्ही बाजूंनी हे प्रकार घडलेत. दहशतवाद कुणी माजवला ते बोला. इतिहासाची थडगी उकरली तर दोन्हीकडची मढी बाहेर येतील.

अन्वय's picture

3 Dec 2008 - 1:42 am | अन्वय

अमेरिकादी देशांत मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची तुलना भारताशी करता येणार नाही. कारण हे देश वर्चस्वासाठी हापापलेले आहे. इस्लामी राष्ट्रांतील तेलांच्या विहिरी अमेरिकेला ताब्यात घ्यायच्या आहेत. राजकीय वर्चस्वाचीही काहींना इर्षा आहे. भारताला ना कुणावर वर्चस्व गाजवायचे आहे, ना मुस्लिमांचे उच्चाटन करायचे आहे. भारताचा इस्लामलाही विरोध नाही. मग या दहशतवादी कारवाया भारतात का होतात, याचा विचार कुणी करणार आहे की नाही. बाबरीजवळ येऊन थांबयचे कारण एवढेच आहे की त्यांनतरच खऱ्या अर्थाने भारत दहशतवाद्यांच्या "लिस्ट'वर आला. त्याला कारणेही तशीच आहेत. बॉंबस्फोट घडविल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ भारतातून पसार झाली. परंतू भारतविरोधी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नव्हत्या. या कारवाया कुणामुळे शक्‍य झाल्या? स्थानिक मुस्लिमांमुळेच. भारतविरोधी कारवायांत सहभागी व्हावे, असे त्यांना का वाटले, याचाही विचार इथे प्रतिक्रिया नोंदविणाऱ्याने करावा. आता पाकिस्तानातील अतिरेकी भारतात येऊन हल्ले करीत आहेत. जे यापूर्वी कधीच भारतात आले नसतील. मग त्यांनी आपली कामगिरी "चोखपणे' कशी काय बजावली? दाऊदच्या नेटवर्कशिवाय हे शक्‍य होते काय? दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे? बाबरी प्रकरणापूर्वी देशात किती बॉंबस्फोट झाले, त्यात स्थानिक मुस्लिमांचा किती सहभाग होता, याची आकडेवारही कुणाकडे असेल, तर तीही इथे द्यावी. काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.

पक्या's picture

3 Dec 2008 - 8:34 am | पक्या

अतिशय फालतू लेख.

>>बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.
विनोदी वाटतयं हे वाक्य. बाबरी मशिद पाडली नसती तर काय अतिरेकी निर्माण च झाले नसते असे तुम्हाला म्हणायचे काय?
त्या आधीहि हिंदू मुस्लिम दंगे होत होते. पाकिस्तान ने भारताबरोबर युध्द हि केले होते. शिवाय अधूनमधून भारताविरुध्द त्यांच्या
कारवाया चालूच होत्या. काश्मिर प्रश्न ही धगधगत होता आणि अजूनही तो सुटलेला नाही.

>>दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे?
अहो इच्छा वगैरे झाली ते ठिक आहे पण मग त्याने का नाही सबुरीने घेतले. बाबरी मशिद पाडली म्हणुन बॉबस्फोट करून निरपराध माणसे मारण्याऐवजी त्याने शांतपणे झाल्या घटनेचा निषेध करायचा होता की.

>>त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
सध्या देशात जे चालू आहे त्याला इतरही अनेक कारणे आहेत. निव्वळ बाबरी प्रकरणामुळे हे घडत आहे हे साफ चुकीचे आहे.
लेखातील वरील वाक्याचा त्रिवार निषेध !!!

मुक्तसुनित , विकास यांचे काही विचार पटण्यासारखे आहेत.