मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
16 Jan 2026 - 5:29 pm

**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती**

---
कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये. मग झटपट कामाला सुरुवात केली.

---

आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत दुर्लक्षित पण भविष्यातील दृष्टीने महत्त्वाची पाककृती —
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा**.

ही रेसिपी केवळ चव नव्हे तर *interplanetary sustainability* यावर आधारित आहे.

### प्रस्तावना

मानवजातीने चंद्रावर पाउल टाकले.
मंगळावर नजर ठेवली.
आणि मग… मुरांब्याचा विचार का केला नाही, हा प्रश्न उभा राहतो.

---

### आवश्यक साहित्य

* मंगळ ग्रहावरील मुरूम (coarse rocky soil, particle size अंदाजे 2–5 mm)
* लाल रंगाच्या स्थानिक मंगळीय मुंग्या (Anta Martiana – *hypothetical species*)
* साखर (पृथ्वीवरील, शक्यतो सेंद्रिय)
* लिंबाचा रस (acidic medium for preservation)

**टीप:**
मंगळावर पाणी दुर्मिळ असल्यामुळे *water management is critical*.

---

### वैज्ञानिक पार्श्वभूमी (महत्त्वाचे)

Mars soil मध्ये Iron Oxide मोठ्या प्रमाणावर असते, म्हणून तो लाल दिसतो.
Iron हा मानवाच्या हिमोग्लोबिनसाठी आवश्यक घटक आहे.
म्हणून मुरूम = पोषण.

> Ants contain formic acid which can influence स्वाद आणि shelf life.

वरील माहितीचा मुरांब्याशी थेट संबंध नाही, पण जाणून घ्यायला हवी.

---

### कृती

1. प्रथम मुरूम चाळून घ्यावा.
2. मुंग्यांना सौम्य उन्हात वाळवावे (solar radiation ~590 W/m²).
3. दोन्ही एकत्र करून मंद आचेवर ठेवावे.

इथे थोडा संयम आवश्यक आहे.

आणि इथेच मला स्वतःला प्रश्न पडतो —
**आपण नेमकं काय करत आहोत?**

---

खरं सांगायचं तर मुरांबा म्हणजे आठवणी.
आजीची स्वयंपाकघरातली बरणी. माजघर..
आणि इथे आपण मंगळ, मुंग्या, मुरूम…. काल किती वेगाने sarakto.

पण आठवणीत न रमता पुढे वाढूया.

---

### पोषणमूल्ये (Approximate)

* Protein: High (मुंग्यांमुळे)
* Minerals: Very High (मुरूममुळे)
* Emotion: Confusing
* चव: *Acquired taste*

---

### निष्कर्ष

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा हा

* परंपरा
* विज्ञान
* आणि थोडंसं धाडस

यांचा संगम आहे.
----

आणि मी एकदम स्वप्नातून या जगात परत आले.
---

**DISCLAIMER:**
हा लेख केवळ विनोदी व कल्पनाविलासासाठी आहे.
कृपया हे घरी, शेजारी, गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा सौरमालेत कुठेही करून पाहू नये.

---

पुढील लेखात आपण पाहणार आहोत*

* *शुक्रावरील शेवाळाची उसळ*

पाकक्रियागोडाचे पदार्थडावी बाजूपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थऔषधोपचारभूगोलवाईनविज्ञानसुकेप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Jan 2026 - 5:36 pm | कंजूस

डोकेबाज पाककला.
शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे -

यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं|
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति||

तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

टर्मीनेटर's picture

16 Jan 2026 - 5:53 pm | टर्मीनेटर

पुढील लेखात आपण पाहणार आहोत*

* *शुक्रावरील शेवाळाची उसळ*

त्यानंतर 'नेपच्यून वरील नेच्याची आंबट चुका घालून पातळ भाजी' येऊद्यात 😀

हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते.
"गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

संपादकांना विनंती आहे,
हा लेख लवकरात लवकर पाककृती विभागात हलवावा.अशी बहुमूल्य पाकृ शोधायला सोपे होईल.

नको. लोक खरोखर बनवून खातील. नेम नाही काही.

;-)

Bhakti's picture

16 Jan 2026 - 6:45 pm | Bhakti

;-)

विंजिनेर's picture

17 Jan 2026 - 5:14 am | विंजिनेर

भटकंती विभाग जास्त सयुक्तिक राहिल - आगामी पदार्थांची यादी बघता...