अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

Primary tabs

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
2 Feb 2023 - 1:43 am

अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले

– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?

सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे.
या साडेचार फुटी कुडीत अडकलेला -
अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे
मी निर्विकार चेतना आहे
मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे
मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे
मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.
मी अनंत आकाश आहे
मी देहबुद्धीच्या पार - नात्यागोत्यांच्या पार -
भौतिकतेच्या पार – मी केवळ परम चैतन्य आहे.

परम सत्याच्या शोधात निघालेला -
मी एक अविचल साधक आहे.
अंतिम ज्ञानाशी संग करायला निघालेला -
मी एक नि:संग यात्रिक आहे.
भरकटलेल्या मानवाला मार्ग दाखवणारा -
मी एक पथ - प्रदीप, एक दीपस्तंभ -
मी एक निर्भीक, निर्भीड ज्वालामुखी आहे…

– तेवढ्यात कसल्यातरी आवाजाने तंद्री तुटली.
भडक मेकप वगैरे केलेल्या दोन तीन तरुण पोरी
– माझ्याचकडे बघत खिदळत होत्या.
अहाहा … यालाच म्हणतात धुंद सोनेरी सायंकाळ.

अशा धुंद सोनेरी सायंकाळीच
– चिरंतन सत्य उमगतं.
अशा धुंद सोनेरी सायंकाळीच
– जीवात्मा आणि परमात्म्याचं मीलन होतं …
अशा धुंद सोनेरी सायंकाळीच ….

फाssड …
फाssड …

“कौन है बे तू ?
कब से देख रिया हूँ , साले कुछ भी बकेला है..
क्या नाम है बे तेरा ?

“मी … मी… सखाराम गटणे …

“शाम के टेम अंधेरे मे किधर जा रहेला है बे ? “
बेवडा है क्या ? या पागल है ?
ये आपुन का एरिया है –
आपुन का धंदे का टेम हो गया है अब -
दफा हो जा ह्यां से, नै तो इधरिच डाल देगा तेरे को. समझा क्या ?”

– धावतच सुटलो. कसाबसा घरी पोचलो.
– हॅट साला, कुणाला कसली कदरच नाही.
– शांतपणे कसला विचार करू म्हटलं, तर ते नाही… असो.

– तर अशी ही आजची धुंद सोनेरी सायंकाळ.

अदभूतआयुष्याच्या वाटेवरउकळीकविता माझीकैच्याकैकविताजिलबीभावकवितारतीबाच्या कवितालाल कानशीलकरुणसंस्कृतीनाट्यकवितामुक्तकजीवनमान

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 11:37 am | राजेंद्र मेहेंदळे

कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक.

मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर.

कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?

यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली.

बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.

तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है.
आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2023 - 12:03 pm | कर्नलतपस्वी

अशाच एका कातरवेळी
ती मी आणी तळ्याचा किनारा
निरव शांतता अन सुगंधित वारा

ओ शाब, काय लाज शोरम बिरोम
गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.

Deepak Pawar's picture

2 Feb 2023 - 3:51 pm | Deepak Pawar

छान.

विवेकपटाईत's picture

2 Feb 2023 - 5:06 pm | विवेकपटाईत

मजा आली वाचताना. सत्याची खोजचा शेवट असाच काही होतो.

कुमार१'s picture

6 Feb 2023 - 7:46 am | कुमार१

एकदम मनोरंजक !

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Feb 2023 - 10:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पण अशा चार दोन थपडा खाल्या आहेत, पण सत्य शोधायचा कंड काही शमतच नाही
पैजारबुवा,