लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
26 Oct 2021 - 9:02 am

.img1 {
float: left;
width:50%;
margin-right:15px;
margin-top:32px;

}

.img2 {
float: right;
margin-left:15px;
width:50%;
margin-top:32px;
}

लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे.
साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात. किंबहुना त्या बहुसंख्यांच्या वाट्याला येत नाहीत. (ज्या थोड्या फार लोकांना त्यात यश येते त्यालाही चोरटेपणाची किनार असते). मात्र त्या संदर्भातील कल्पनाविलास हा सर्व तरुणांच्या मनात सतत चालू असतो. मग ती मानसिक भूक शमविण्यासाठी विविध प्रकारच्या लैंगिक साहित्याचा अनुभव घेतला जातो. अशा साहित्यप्रकारांत ऐकीव ज्ञान, लिखित माहिती आणि दृश्य माध्यमांचा समावेश होतो.

आज आंतरजालाच्या व्यापक उपलब्धतेमुळे लैंगिकतेसंदर्भातल्या अगणित दृश्यफिती आपल्याला सहज पाहता येतात. ते सर्व अनिर्बंध स्वरूपात उपलब्ध आहे. परंतु सुमारे ४० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा मुख्यत्वे मौखिक व लिखित प्रकारे या विषयाच्या माहितीची मर्यादित देवाणघेवाण होई. कालांतराने या परिस्थितीत बदल होत आपण आजच्या मुक्तस्त्रोत स्थितीत पोचलो आहोत. या साहित्याची गेल्या चार दशकांतील स्थित्यंतरे आणि माझे तारुण्यातील अनुभव या लेखाद्वारे सादर करीत आहे. स्वानुभव लिहीत असल्यामुळे या पुढचा पूर्ण लेख फक्त पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.

सुरुवात करतो प्राथमिक शाळेपासून. साधारण इयत्ता चौथी होईपर्यंत लैंगिक अवयवांना दिलेली बोलीभाषेतील नावे माहीत झाली. त्यावरून एकमेकांना चिडवणे इतपतच मजल पोचली होती. “मी मुलगा आहे”, ही जाणीव पक्की होण्यापलीकडे त्या वयात फारसे काही घडले नाही.

माध्यमिक शाळेतील दीर्घकाळ हा खऱ्या अर्थाने या बाबतीत जडणघडणीचा ठरतो. या शाळेत ‘असल्या’ साहित्याची प्रथम ओळख झाली ती स्वच्छतागृहांतील भिंतींवर ! इथल्या साहित्यात लेखी मजकूराबरोबर कसेबसे घाईत काढलेल्या रेखाचित्रांचाही समावेश होता. स्त्री व पुरुषांच्या जननेंद्रियांची चित्रे काढून ती एकत्र गुंफलेली दाखवणे हा इथल्या ‘लेखकांचा’ आवडता उद्योग होता. हे साहित्य प्रसवण्याची दोन ठिकाणे असतात - मूत्रालय आणि शौचालय. या दोन्ही ठिकाणच्या भिंतीवरील साहित्यामध्ये गुणात्मक फरक असतो.

त्या काळी शाळांमध्ये बेशिस्तीच्या कारणांवरून विद्यार्थ्यांना वेताच्या छड्या व अन्य मार्गांनी मार देण्याची पद्धत होती. शाळेत उशिरा येण्यापासून या छडीचा प्रसाद खावा लागे. या कामासाठी जे शिक्षक नेमलेले असत ते मारकुटे म्हणून प्रसिद्ध होत. मग काय, अशा शिक्षकांना स्वच्छतागृहातील भिंतींवर विद्यार्थी अगदी ‘मानाचे स्थान’ देत. त्यांचा उद्धार करून त्यांच्या नावे विविध लैंगिक मजकूर मोकळेपणाने लिहिलेला असे. इथल्या भिंतलेखकांमध्ये काही प्रकार होते. पेन्सिल किंवा पेनने लिहिणारे विद्यार्थी म्हणजे सामान्य किंवा नवोदित लेखक. दर्दी असणारे विद्यार्थी त्यांचा मजकूर कर्कटकने भिंतीवर कायमस्वरूपी कोरून ठेवत. तो मजकूर आपली इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत करी. शाळा सोडल्यानंतर काही वर्षांनी शाळेत जाणे झाले तेव्हा कुतूहलाने स्वच्छतागृहाला भेट दिली. नवी रंगरंगोटी झाल्याने जुने साहित्य नष्ट झालेले असले तरी या भिंती आता नव्या लेखकांच्या साहित्याने नटलेल्या होत्या ! एकंदरीत लैंगिक लेखन-वाचनाची पायाभरणी इथल्या भिंतींवर होते हे नाकारण्यात अर्थ नाही. या भिंतींच्या जोडीला वर्गातील बाक हे देखील असले साहित्य प्रसवण्याच्या दुय्यम जागा असतात. मुळात भिंतींवर वा बाकांवर काहीतरी लिहिणे हा जरी बेशिस्तीचा भाग असला, तरी त्या वयातील विद्यार्थ्यांच्या उर्मीचे ते एक प्रकटन असते असे म्हणता येईल.

त्याकाळी सरकारी पातळीवरून कुटुंबनियोजनाचा जोरदार प्रचार असे. यामध्ये दोन किंवा तीन पुरेत, लाल त्रिकोण व निरोध यांचा उल्लेख असलेल्या जाहिराती ठळकपणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असत. त्या वाचून मित्रपरिवारात निरोधचा उपयोग यावर कुतूहलयुक्त चर्चा झाल्याच्या आठवतात.
शाळा संपवून आता कॉलेजमध्ये प्रवेश केला. तेव्हा अकरावी शाळेत झाली होती व बारावीचे एकच वर्ष विज्ञान महाविद्यालयात होतो. एकंदरीत ते वर्ष घासून अभ्यासाचे वगैरे असल्याने लैंगिक साहित्याचा नवा शोध वगैरे काही लागला नाही. मित्रांच्या गप्पांतूनच जी काय माहितीची देवाण-घेवाण झाली तेवढेच.

पुढे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझे काही मित्र अन्य अभ्यासशाखांमध्ये गेले. असे वेगवेगळ्या ठिकाणी शिकणारे मित्र एकमेकांच्या वसतिगृहांना अधूनमधून भेटी देत. त्यातूनच लैंगिक कथांच्या छोट्या पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. तेव्हा ही पुस्तके शहरातील काही मोजक्या पदपथांवर मिळत. तेव्हा तरी त्यांना ‘पिवळी पुस्तके’ असे नाव काही पडलेले नव्हते. ती अगदी अन्य पुस्तकांप्रमाणेच पांढरी दिसत. या पुस्तकांकडे जाण्याण्यापूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत एक विशेष माहिती लिहितो.

या अभ्यासात कॉलेजच्या पहिल्याच वर्षी शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. एखादा मुलगा जेव्हा त्याचे पाठ्यपुस्तक विकत घेई तेव्हा त्यातील ‘ते’ प्रकरण प्रथम वाचायची त्याला जबरदस्त घाई असे. ते पुस्तक उघडल्यानंतर एक लक्षात येते ते म्हणजे, हृदय, फुप्फुसे, पचनसंस्था या क्रमाने पुढे जात ‘जननेंद्रियांची कार्ये’ हा धडा पुस्तकाच्या शेवटच्या भागात असतो. पुस्तकाची पहिली तीनचतुर्थांश पाने एका दमात उलटून टाकून विद्यार्थी या कुतूहलाच्या विषयात शिरतो. त्यातही वयात येतानाचे बाह्य शारीरिक बदल, बीजांडे, मासिक पाळी इत्यादी माहिती मागे सारून थेट संभोग या विषयावर झडप घातली जाते. एकदा का ते वर्णन वाचले, की आत्मा कसा शांत होतो. जणू काही स्वतःलाच ते सुख क्षणभर मिळाल्याचा भास होतो ! आपले अन्यत्र शिकणारे मित्र ही माहिती कुठल्यातरी चटोर पुस्तकातून वाचत असतात. तीच माहिती आपण आज अधिकृत पाठ्यपुस्तकात वाचल्याने मनात काहीशी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते.

वैद्यकीय अभ्यासात दुसऱ्या वर्षी न्यायवैद्यकशास्त्र हा विषय असतो. त्यात बलात्काराचा बराच शास्त्रीय उहापोह असतो. त्याची पूर्वपीठिका म्हणून कुमारी स्त्रीच्या योनीवर एक स्वतंत्र प्रकरण असते. त्यामध्ये योनीचे विविध आकार, त्यांची सचित्र माहिती, योनीपटलाचे (hymen) प्रकार आणि कौमार्य हे प्रचंड उत्सुकतेचे विषय हाताळलेले असतात. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच या दुसऱ्या वर्षाच्या विषयाची कुणकुण लागते. मग मुलांना कुठला दम धरवणार ? फावल्या वेळात ग्रंथालयात जाऊन त्या विषयाचे पुस्तक अधाशीपणे घेतले जाते. मग त्यातली वरील प्रकरणे वाचून हातावेगळी केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्षात दुसऱ्या वर्षात प्रवेश करतात तोपर्यंत ही मूलभूत माहिती त्यांच्या दृष्टीने शिळी झालेली असते.

कॉलेजच्या स्वच्छतागृहांमध्ये शाळेच्या तुलनेत भिंतसाहित्याचे प्रमाण खूप कमी झालेले दिसले. परंतु ते शून्य होत नाही. या वयातही काही जणांमध्ये तिथे लिहिण्याची उर्मी टिकून असते. आता त्या साहित्यातील अर्वाच्चपणा कमी होऊन त्याला काहीशी सौंदर्यदृष्टी येते. वर्गातील बाकांवरील लेखनात तर ती अधिक जाणवते. तिथे वाचलेले काही लैंगिक विनोद आणि मार्मिक टिपण्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. त्या वयामध्ये विद्यार्थी या विषयातील कोंडलेली वाफ अशा लिखाणातून मुक्त करीत असतात. या वर्तनावर फार शिस्तीचा बडगा दाखवून उपयोग होत नाही हे लक्षात येते.

आता परत वळतो तथाकथित पिवळ्या पुस्तकांकडे. वसतिगृहात राहिल्याने या पुस्तकांचे वाचन अगदी मनमोकळेपणाने करता आले. अशी तीन चार पुस्तके एकमेकांच्या खोल्यांमधून फिरत असत. त्यांचा नक्की खरेदीदार कोण हे कधी कळायचे नाही. ती वाचण्यात मात्र सर्वांचाच वाटा असायचा. ती सर्व इंग्लिशमध्ये होती. त्यातल्या कथा बर्‍यापैकी रंजक असत. स्त्रीदेहाची इत्थंभूत वर्णने कलात्मक असायची. एकंदरीत त्या अवयवांचा मोठ्ठा आकार हा त्या वर्णनातील ठळक भाग असायचा. त्या वाचनातून अशा ‘मोठे’पणाच्या वर्णनाची अनेक विशेषणे, तुलनात्मक शब्द व त्यांचे लाक्षणिक अर्थ ही ज्ञानप्राप्ती झाली. Voluptuous हा शब्द मी आयुष्यात प्रथम या पुस्तकांत वाचला आणि तो मेंदूत कायमचा कोरला गेला. त्याकाळी थेटरातले चित्रपट वगळता एकूणच रंजक दृश्यमाध्यमांचा तुटवडा होता. त्यातही काही प्रौढांसाठीचे इंग्लिश चित्रपट सोडले तर बाकी चित्रपट लैंगिकदृष्ट्या सामान्य प्रकारचे असायचे. त्यामुळे लैंगिक वाचन हे महत्त्वाचे मनोरंजनसाधन होते. त्यातून जर का अशा पुस्तकाचे वाचन एकांतात केले, तर त्यातून होणारे विलक्षण कल्पनारंजन हे वर्णनातीत असायचे. आजही असे रंजन मला प्रत्यक्ष दृश्य पाहण्यापेक्षा अधिक आनंद देते. लिखित माध्यमाचे हे सामर्थ्य कालातीत आहे.

आमचा एक अभियांत्रिकीचा मित्र खास ही पुस्तके वाचण्यासाठी आमच्या खोलीत आला होता. त्याने गादीवर बसून भिंतीला पाठ टेकून आणि पाय पोटाशी घेऊन असे एक पुस्तक प्रथम वाचले. वाचून उत्तेजित झाल्यावर तो आम्हाला म्हणाला, “यार, फारच भारी आहे हे. आता १० मिनिटे तरी मी उठून उभा राहू शकणार नाही !” या उद्गारातून त्या लेखनसामर्थ्याचा मुद्दा लक्षात यावा. त्या वयातील या प्रकारच्या वाचन, मनन व सामूहिक चर्चेने एका रंजक स्वप्नसृष्टीला जन्म दिला हे निःसंशय. पदवीचे शिक्षण संपल्यावर मित्रांत त्या छोट्या पुस्तकांची विभागणी झाली. प्रत्येकाने असे एकेक पुस्तक आठवण म्हणून पुढे दीर्घकाळ जपले होते.

1
वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्‍याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते.

.
2
प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते. कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती !

याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !
हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.

पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.

अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा (कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी). त्यातले X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये. अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.

आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).

अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.

कालांतराने आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली आजची प्रगती आणि परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...

असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले आहे यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित लिखित अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.
………………………………………………………………………………………………..

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

वरील प्रतिसादांमधून या साहित्याचे विविध गद्य-पद्य आविष्कार बघायला मिळाले आहेत. त्याने छान वाटले.
त्यातून या साहित्याची विपुलता लक्षात आली.
...

ब्लु रे डिस्क, व्हीआर

>>>
आता हे नवे ज्ञान मात्र जालशोध घेउन शिकले पाहिजे 😀

सुरिया's picture

27 Oct 2021 - 1:39 pm | सुरिया

बीपी साठी भक्त प्रल्हाद असे सात्विक नाव न वापरता ब्लॉक पिस्टन हा फुल फॉर्म शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे वापरला जात असे.

माझा अनुभव सांगायचं झाला तर १९९०
सालात जावे लागेल.
शिक्षण खेड्यात.
पहिल्या पासून व्यायामाची आवड .त्या मुळे वेळापत्रक बिझी.
५ वाजेपर्यंत शाळा त्या नंतर माझे काहीच मोजकेच मित्र होते त्यांच्या बरोबर संडास ल जाण्याचा कार्यक्रम अगदी लांब शेतात.
तेथून आलो की तालीम .कोण किती जोर काढत आहे ही स्पर्धा नंतर जेवण .आणि ज्या मित्राच्या घरी असू तिथे अंगणात गप्पा मारत झोपणे..
विषय पोरी चाचं गप्पा मारायला पण सेक्स पर्यंत नाही
बघितले का,बोलली का, भारी दिसते इथपर्यंत च .तर पण वर्गातील मुली चा.
वयाने जास्त असणाऱ्या वहिनी, ,शिक्षिका ह्यांच्या विषयी नाही.
त्या आदरणीय स्त्रिया .
सकाळी पाच वाजता उठून १३ km jogging.
त्या मुळे सेक्स हा विचार डोक्यात नव्हता पण स्त्री चे आकर्षण वाटायचे..
मी दहावीत असताना एक मुलगी मला खूप आवडायची पण सेक्स डॉल म्हणून नाही.
वेगळेच आकर्षण होते.
फक्त तिचे डोळे च मला दिसायचे बाकी कोणतेच अवयव दिसायचे नाहीत.
समोर आली की अंगावरील सर्व केस उभे राहायचे .
सेक्स चा पहिला अनुभव दहावी नंतर आला पण तो माझ्या पेक्षा खूप मोठ्या मुली कडून ..
सेक्स ची ईच्छा उत्पण होत होती पण काय करायचे, कसे करायचे ह्याचा अनुभव झीरो.
त्या वयाने मोठ्या असणाऱ्या मुली नीच पुढाकार घेतला आणि आयुष्यातील पहिला सेक्स अनुभव मिळाला.
पण तो यशस्वी झाला की नाही .हे नाही सांगता येणार..
खरे सेक्स लाईफ वयाच्या २१ नंतर च चालू झाले..
इथे हा प्रश्न आहे जो अनुभव आहे.
व्यायाम ,खेळाची आवड लहान पनी असेल तर सेक्स च्या अती तीव्र भावना मनात निर्माण होत नाहीत.
हा माझा स्व अनुभव आहे.निरोगी बलदंड शरीर असणाऱ्या पुरुषाच्या सेक्स भावना नियंत्रित असतात.
आणि रोगीट ,किरकोळ शरीर असणाऱ्या पुरुषाच्या सेक्स विषयी भावना तीव्र असतात.पण ते पुरुष सेक्स करण्यात सक्षम नसतात.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2021 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

उपक्रमावरील योनी मनीच्या गुजगोष्टी या वंदना खरे यांच्या नाटकावरील चर्चा आठवली

कुमार१'s picture

27 Oct 2021 - 3:44 pm | कुमार१

त्या चर्चेतील हा भाग रोचक वाटला:

"सुरवातीलाच प्रेक्षकांच्या तोंडातुन योनी शब्द उच्चारणा करण्यासाठी किती संकोच होतो हे चाचपण्यासाठी 'म्हणा योनी' असे आवाहन केल्यावर प्रेक्षकांनी ही योनी शब्द एकमुखाने उच्चारला."
.......
त्याकाळी अनेक माध्यमांतून त्या नाटकावर चर्चा
झालेल्या वाचल्या होत्या.

चामुंडराय's picture

27 Oct 2021 - 4:58 pm | चामुंडराय

पोथी वाङ्‌मय

वरील प्रतिसादात कोणीही पोथी वाचनाच्या अनुभवाबद्दल लिहिलेले दिसत नाही.

एका मित्राच्या घरी पोथी वाचण्याचा कार्यक्रम केला होता. त्याच्या घरातील सगळे गावी गेले होते तेव्हा मित्रांपैकी कोणीतरी कुठूनतरी पोथी पैदा केली होती. तेव्हा अगदी साग्रसंगीत पोथी वाचनासारखा सेट-अप करून, दोन पाट मांडून त्यावर स्वच्छ वस्त्र घालून, दीप प्रज्वलन करून आणि रती-मदन देवतांस आवाहन करून, धोतर नेसून, शुचीर्भूतता पाळून त्या मित्राने अगदी पोथी वाचायच्या टोन, लयीमध्ये अनुनासिक स्वरात पोथी वाचन केले होते. त्या मित्राचा स्वतंत्र बंगला असल्याकारणाने शेजाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता नव्हती त्यामुळे सगळ्यांनी पोथी वाचनाला साथ देऊन नुसता हलकल्लोळ केला होता.

पोथी कुणी लिहिली होती हे आता आठवत नाही परंतु अगदी पोथीच्या फॉरमॅट मध्ये एक एक पान उचलून वाचून झाल्यावर पुढे ठेवून वाचन केले होते. पोथी आणताना देखील बासनात वगैरे गुंडाळून श्रद्धापूर्वक आणली होती.

आजकालच्या दृकश्राव्य आणि VR च्या जमान्यात असे शृंगारिक वाङ्‌मय लुप्त झाले असावे.

सर्वसाक्षी's picture

27 Oct 2021 - 5:06 pm | सर्वसाक्षी

आपण समकालीन आहोत असे वाटते

बीपी ला भक्त प्रह्लाद किंवा शामची आई म्हटले जात असे. एकदा मी आणि एक मित्र व्हिडीओ कॅसेट लायब्ररीत गेलो असता समोरच्या खणात 'थोरली जाऊ" या मराठी चित्रपटाच्या ७-८ प्रती दिसल्या. आमचे डोळे लकाकले. आम्ही सरळ विचारले , काय मग ह्या छमिया का? छमिया म्हणजे त्या काळात गाजलेली डोंबिवलीच्या एका कॉलेजातील मुला मुलींची बीपी. ते प्रकरण प्रचंड गाजलं होतं. पोलिसांनी धाडी घालून सगळ्या दुकानांमधल्या प्रती जप्त केल्या होत्य. लायब्ररीवाल्याने कपाळाला हात लावत सांगितलं की असलं काही नाही त्या खरोखरच मराठी चित्रपट थोरली जाऊ च्याच प्रती आहेत. आम्ही वैतागुन म्हटलं काय बापाला *** शिकवतो का? भिकार मराठी सिनेमा मरायला कशाला कोण बघेल? एखादी प्रत खूप झाली, इतक्या कशाला. त्यानं खरोखर आम्हाला आमच्या हाताने त्यातली कुठलीही तुम्हीच काढून द्या मी इथे लावून दाखवतो असं संगितल्यावर आमचा नाईलाज झाला
आता जाल आणि तेही अगदी हस्तसंचावर म्हणजे... पण आपल्या कॉलेज काळात चोरून लपवून काही करण्यात जी मजा होती ती वेगळीच. जशी कॉलेजच्या दिवसात एक सिगरेट चार जणांनी ओढण्यात होती किंवा लेक्चर बुडवून इंग्रजी सिनेमा पाहण्यात होती. जेव्हा मिळत नसतं तेव्ह अपूर्वाई असते.
तरुण प्राध्यापिका आली की सगळे वर्गात हजर. जर चुकून तिचा पदर ढळला किंवा ती पुढे झुकली / वाकली तर मागची मुलं पुढच्यांना बोळे फेकून माराय्ची. मग पुढुन चिठ्ठी यायची 'सूर्योदय' किंवा 'सूर्य ढगाआड '

तुमच्या लेखाने जुन्या आठवणी जग्या झाल्या

कुमार१'s picture

27 Oct 2021 - 5:30 pm | कुमार१

सर्वांच्या विविध अनुभवांमुळे रंगत वाढते आहे ! आभार .

पोथी वाचनाच्या अनुभवाबद्दल

>>
नाही, याबाबत नव्हते कधी ऐकले.

पुढुन चिठ्ठी यायची 'सूर्योदय' किंवा 'सूर्य ढगाआड '

>>

हे म्हणजे अगदी जबरीच ! भारी.

लेक्चर बुडवून इंग्रजी सिनेमा पाहण्यात

>> +१

इंग्रजी सिनेमाचा एक अनुभव पुढील प्रतिसादात...

कुमार१'s picture

27 Oct 2021 - 5:31 pm | कुमार१

साधारण ऐंशीच्या दशकात Entity हा इंग्लिश चित्रपट आला होता. तो बघण्यासाठी कॉलेज तरुणांमध्ये जबरदस्त ओढ होती. त्या चित्रपटात काही विशिष्ट डायनामिक तंत्र वापरून अर्धनग्न स्त्रीच्या शरीरावरील विशिष्ट हालचाली असे काही दाखवले होते.

आम्ही सुमारे आठ मित्रांनी मिळून ते बघण्याचा कार्यक्रम ठरवला होता- अर्थातच रात्री 9 ते 12. आमच्यातले चौघेजण त्यांच्या घरी, “आज रुग्णालयात रात्रभर ड्युटी आहे !” अशी लोणकढी थाप मारून आमच्या खोल्यांवर आले होते. चित्रपट बघायला गेलो तेव्हा एक तरूण युगुल आमच्याच रांगेत आले होते आणि त्यांनी आमच्याशी बोलून आसन क्रमांकाची अदलाबदल करून त्यांच्यासाठी कोपऱ्यातल्या दोन खुर्च्या निवडल्या होत्या. तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला,

“यांचं बराय, बघायचं पण आणि एकीकडे **** ** “. आपण आपलं फक्त पडद्याकडे बघायचंय !”

एका अंधाऱ्या कोनाड्यात बॅटरी मारल्याबद्दल सर्वात प्रथम लेखकाचे हार्दिक अभिनंदन.
आमच्या लहानपणी आम्ही पार म्हणजे संस्कारी टाईप असल्या कारणाने शिव्या, चावट विनोद, चाटाळ चित्रे इत्यादी पासून खुप लांब होतो. ठराविक पोरं त्यांच्या आतल्या वर्तुळात हैदोस, सुंदर ललनांची चित्रं इत्यादी साहित्य आदान प्रदान करत असत. पण ती सुद्धा त्यांच्या वर्तुळात आम्हाला येऊ देत नसत (चुकुन हे नेभळट फुटलं तर मार पडायची भीती म्हणा हवं तर). गावात ठराविक पोरी पाटलांच्या स्कुटर असत ते सगळ्या गावाला माहिती असे. तशा पोरी सुद्धा आमच्याशी बोलताना वागताना पार सभ्य असत. स्वतः कोणती पोरगी पटवन्याचे कसब आणि धाडस स्वभाव दारीद्र्यामुळे आमच्या अंगावर नव्हतेच. शाळेत असताना शालेय किशोर अवस्था लैंगिक शिक्षण कार्यक्रम नावाचा एक टाईमपास आयटेम चालत असे. लैंगिक अवयव, त्यांचे महत्त्व, कार्ये, स्वच्छतेची गरज असली माहिती मुले व मुली यांना वेगवेगळ्या वर्गामध्ये दिली जात असे. ते ऐकताना सुद्धा केवळ ज्ञानार्जनाच्या साठी असलं वंगाळ ऐकायला लागत आहे असा अपराधी चेहरा करून आम्ही बसत असु. पार दहावी पार झालो, शरीरात वयानुसार होणारे बदल झाले तरी आम्ही प्रॅक्टीकली माठच होतो.

अकरावी बारावी च्या दोन वर्षांमध्ये सायन्स न शाळा शिकताना सुद्धा फार काही फरक नव्हता, नाही म्हणायला वर्गात असलेली एक नाजूक अप्सरा टाईप सुबक ठेंगणी होती तिच्याकडे चोरून पहायला फार थ्रील कम भारी वाटायचं. कधी तरी धाडस करुन बोलावं अशीही इच्छा होत असे पण दम नव्हता ना. त्यात गावाकडे माझी लाईन, आमच्या गावातली पोरगी, इत्यादी राहु केतु भरमसाठ. मार खाऊन टिकून राहु असे आपण कधीच नव्हतो. त्यात अशा गोष्टी साठी मार खाल्ला तर घरचे सोलुन आंब्यावर वाळत घालतील ही भीती होतीच. त्यात होणारे शारीरिक बदल मानसिक ताण बराच घेवडा लसुण होता.

बारावी पास होईतोवर आमचं ज्ञान काही अभ्यासक्रमाच्या गुळगुळीत शब्दांच्या पलीकडले गेलं नाही.

बारावी उत्तीर्ण झालो कि भरतीच्या लाटेत आम्ही सुद्धा विंजनेर व्हायला दोन जिल्हे पड्याल गेलो आणि जाताना संस्कारांचा सदरा गावाच्या वेशीवर लपवून गेलो.

कॉलेज ला गेल्यावर पहिलं टास्क होतं बाळु चं बाळ्या व्हायचं. आयुष्यात पहिल्यांदा घाण शिवी तिथंच दिली. पहिल्यांदा बीपी सुद्धा तिथंच पाहिली ( ओकारी येते राव पहिल्यांदा पाहताना). चाटाळ चित्रपट, मचाक, अंतरवासना, यांची पारायणे च्या पारायणे पार पाडली. गावाकडे परत जाताना दर सुट्टीत मात्र वेशीवर ठेवलेला संस्कारांचा सदरा न चुकता परत घालावा लागे.
होस्टेल, अमेरीकन पाय इत्यादी चित्रपट सुद्धा फेमस होते. एवढेच काय कालीगंगा आणि पोलिस टाईम्स सारखे पेपर सुद्धा कंटेंट प्रोवायडर होते. होस्टेलमध्ये काही दाते विविध देशांतील नरनारींचित्रपटांचे संग्रह ठेवत असत. पी एल सोडून सगळ्या काळात त्यांना पहिला मान असे. काही पोरांचे लॅपटॉप तर आठवडाभर बारी बारी फिरत असत. माझा एक पेन ड्राईव्ह काही नतद्रषटांनी अशाच कामाला वाहिला होता. किती वेळा शोधून फॉरमॅट मारुन ठेवला तरी चोरून परत त्याला तेच काम पार पाडायला लावत असत.

नंतर आलेल्या जीओ नेट नं दुनिया नाही पण दुसरं काही मुठीत आणायची सवय देशाला लावली.

अती केलं की माती होते, म्हणून मग मोदींना पुढे येऊन परत पोर्न बंद करावं लागलं.

बेकार तरुण's picture

27 Oct 2021 - 5:50 pm | बेकार तरुण

लेख आवडला...
आमच्या शाळेत २ - ३ पुढारलेली मुलं (यांना पोचलेले असं म्हणायची तेव्हा पद्धत होती) "हैदोस" "रात्रीची मुंबई" वगैरे साहित्य पुरवठा करत... पूर्ण वर्ग त्यावर अवलंबुन होता... आमची तर तेव्हा ऐपतही नव्हती हैदोस विकत घ्यायची, त्यामुळे देबोनेर वगैरे तर सोडाच... ११ वीला असताना एन एम कुलकर्णी सर काहीतरी मोठा कार्यक्रम करत, टिळक स्मारक वगैरे तत्सम ठिकाणी.... तेथे एका पंटरकडे "फँटसी" नावाचे मासिक पाहिलेले.. त्याची किंमत १०० रुपडे होती... गरम होण्याऐवजी आम्ही लोक गार झालेलो पूर्ण... १० रू चे हैदोस न परवडणारी जनता होतो आम्ही....
काही लोकांच्या घरी वयात आल्यावर प्रॉपर "शतायुषी" वगैरे मासिक वाचायला देउन शिक्षण मिळे... आम्हाला असे काही नव्हते... आम्ही हैदोसवरच अवलंबुन :)

३क्ष कॅसेट आमच्या वेळी लायब्ररीत ३० रू ला भाड्याने मिळे... ओळखीचा असेल लायब्ररीवाला तर २०... किमान १० अन कमाल १५- २० लोक १.५० - २ रुपडे प्रत्येकी जमा करुन ती भाड्याने आणत असु :) आता आठवले तरी जाम मजा वाटते.....
३क्ष बघताना लाईट जाणे अन त्यामुळे ज्याच्या घरी आहोत त्याचे घरचे यायची वेळ होत आली तर लाईट न येणे हा प्रसंग एकदा अनुभवला होता... मग स्क्रु ड्रायव्हर
न सापडल्याने त्या ऐवजी चमच्याने व्ही सी आर खोला वगैरे प्रकार उरलेल्या उत्साही वीरांनी पार पाडलेले (लाईट गेल्यावर अर्धी अधिक जनता विविध कारणे सांगुन आपापल्या घरी निघुन गेलेली)
एकुण खूप विचित्र वय अन परिस्थीती होती...

कॉमी's picture

27 Oct 2021 - 6:11 pm | कॉमी

झॅक स्नायडर चा ३०० म्हणून एक प्रसिद्ध सिनेमा आहे. तसाच ब्रॅड पिटचा ट्रॉय. माझ्याकडे ग्रीक कथांवर आधारित सिनेमांची एक डब डीव्हीडी होती. पण माझे व्हर्जन खास होते- ड्युअल ऑडिओ.

त्यात दोन्ही सिनेमातली काही खास दृश्ये होती, जी मित्रवर्गाच्या केवळ हिंदी व्हर्जन मधून कट होती. कोणाच्या तरी घरी एकत्र जमून सर्वांनी त्या सीन्सचा आस्वाद घेतला होता.

सर्वजण भरभरून लिहीत आहेत ते पाहून आनंद वाटला.

१. त्यात अशा गोष्टी साठी मार खाल्ला तर घरचे सोलुन आंब्यावर वाळत घालतील ही भीती होतीच >>>

हा वाक्प्रचार आहे का ? खूप आवडला !
एक पेन ड्राईव्ह काही नतद्रषटांनी अशाच कामाला वाहिला होता
.>>> भारीच ..
........
२.

"फँटसी" नावाचे मासिक पाहिलेले.. त्याची किंमत १०० रुपडे होती... गरम होण्याऐवजी आम्ही लोक गार झालेलो पूर्ण...

>>>>> खरंय, तुम्ही आणि आम्ही एकाच बोटीतली प्रवासी होतो तेव्हा !
........
३. झॅक स्नायडर चा ३०० म्हणून एक प्रसिद्ध सिनेमा आहे.
>>>> उत्सुकता वाटली बघायची...
>>>

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2021 - 6:43 pm | सुधीर कांदळकर

डेबोनेर वरून बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. शाळेत बहुतेक मुले माझ्यापेक्षा आकाराने आणि वयाने मोठी होती. खास विषय असेल तर मला गोड बोलून तू लहान आहेस वगैरे सांगून हाकलून देत.

शालान्त वर्ष ११वी होते तेव्हा. तेव्हा मात्र संतकाव्याच्या अश्लील विडंबनाचे पेव फुटले होते. स्वच्छतागृहात छंदोबद्ध काव्ये सुंदर अक्षरात लिहिलेली असत. रचनाकारांच्या प्रतिभेला दाद दिली पाहिजे. स्वल्पविराम एक दंड आणि पूर्णविराम दोन दंड. आता भीमसेनांनी गायलेली भजने ऐकतांना कधीतरी ते आठवते आणि हहपुवा होते.

कॉलेजच्या दिवसांत मात्र डेबोनेरचा प्रत्येक अंक कोणीतरी आणत असे. आणि त्या बहुतेकातले सेन्टर स्प्रेड पाहिल्याचे आठवते.

त्या काळात 'खास' वांग्मयाची नवीकोरी पुस्तके पिवळ्या जिलेटीन कागदात पॅक केलेली असत. उदा. कोकशास्त्र. हे बहुधा हिंदीत होते. पण मोठया मुलांनी कधी मला दिले नाही.

काही वर्षांपूर्वी बहुधा ७०च्या दशकात एका सुप्रसिद्ध दिवाळी अंकात लैंगिक समस्यांच्या विषयावर एक सुरेख पण गंभीर एकांकिका आली होती. संवादातले सूचक शब्द आणि संयत भाषा असल्याने कुठेही अश्लीलतेचा स्पर्शही नव्हता. मला विषयही कळला नव्हता. पण एकांकिका लैंगिक समस्येवर आहे हे समजावून सांगितल्यावर समजला.

हेरॉल्ड रॉबिन्सच्या दोन कादंबर्‍यातले काही खास परिच्छेद मला एका रसिक मित्राने वाचायला दिले होते.

असो विशेष विषयावरचा विशेष लेख आवडला. धन्यवाद.

चांगला विषय... कधी काळी पॉर्न कॅटेगरीची लिस्टच मी इथे दिल्याचे स्मरते ! :))) ही लिस्ट आता किती मोठी झाली असेल याचा अंदाज नाही ! पण त्यात भर पडत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
इथे या विषयावर काही धागे येउन गेलेले आहेत.
उदा. पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
याच बरोबर मला माझाच प्रतिसाद देखील आठवला.

जाता जाता :- पाखरांच्या विश्वात पारध्यांना प्रवेश नसतो... पण पारध्यांच्या विश्वात पाखरं मुक्त संचार करु शकतात... पारधी जरा उशीरा शाहणे होतात तर पाखरं आधी शहाणी होतात. पाखरांच्या शरीरात बायोक्लॉक असतं, यामुळे पाखरांचे वर्तन हे सातत्याने बदलत जाणारे प्रतीत होते. पण ही भानगड पारध्यां मध्ये नसते. :) पारधी या विषयात मुक्तपणे आणि उघड व्यक्त होतात तर पाखरं क्वचितच काही तरी लिहतील ते ही मोजुन मापुन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere naina sawan bhado... :- Mehbooba

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 8:04 am | कुमार१

१.

शाळेत बहुतेक मुले माझ्यापेक्षा आकाराने आणि वयाने मोठी होती. खास विषय असेल तर मला गोड बोलून तू लहान आहेस वगैरे सांगून हाकलून देत.

>>>
बरोबर. शाळेतल्या प्रत्येक वर्गात स्वतःला बाप समजणारी अशी काही मुले असतातच.
त्यांच्या दृष्टीने अन्य मुले म्हणजे अद्याप 'अंड्यात असलेली' अशी असतात.
...............
२.

पारधी या विषयात मुक्तपणे आणि उघड व्यक्त होतात तर पाखरं क्वचितच काही तरी लिहतील ते ही मोजुन मापुन.

>>>
अगदी ! उपमा सुंदर. आवडलीच.

जेम्स वांड's picture

28 Oct 2021 - 9:10 am | जेम्स वांड

वगैरे विषय निघाला की ९०च्या दशकात जन्मलेल्या पोरांची काही श्रद्धास्थाने असत
1. बे वॉच - पॅमेला अँडरसन - स्टार वर्ल्ड
2. व्हीआयपी - पॅमेला अगेन - ए एक्स एन
3. आकापुलको हिट्स - ए एक्स एन
4. मेकिंग ऑफ द पिरॅली कॅलेंडर - एफटीव्ही
5. तोकड्या कपड्यात पायची घडी घालून इन्ट्रोगेशन मध्ये बसलेली शेरॉन स्टोन असलेला Basic Instinct
6. सिल्क स्टॉकिंग्ज - ए एक्स एन (खास सेक्स क्राईम सीन इन्वेस्टीगेशन स्पेशल)

कुमार१'s picture

29 Oct 2021 - 9:49 am | कुमार१

1970 ते 80 च्या दशकात मराठी चित्रपट तर सोवळेच होते.
हिंदीमध्ये धीट दृश्ये देणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे झीनत, बिंदू आणि हेलन.

आमच्या शालेय काळात झीनतच्या एका चित्रपटाची जाहिरात भारी केली होती. त्यात झीनत म्हणते,

या चित्रपटात मी नायकाबरोबर अशी काही मोकळी दृश्ये दिलेली आहेत की त्यामुळे माझ्या घरचे हा चित्रपट बघूच शकणार नाहीत !”

त्या काळी अशी जाहिरात देखील चित्रपटास गर्दी खेचण्यास उपयुक्त ठरत होती.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2021 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

आता एक कठीण प्रश्न विचारतो. अश्लील वाङ्मय, लैंगिक वाङ्मय व शृंगारिक वाङ्मय यात फरक कसा कराल? मार्क=100 सोडवण्याचा कालावधी-आयुष्यभर

चौकस२१२'s picture

28 Oct 2021 - 10:20 am | चौकस२१२

हाय काय आणि नाय काय त्यात
वाय झेड मधील "प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा " पासून सुरु करा आणि संपवा इथपर्यंत
"मिठू मिठू पोपट" हा किंवा "रिक्षावाला " आणि मग "शिट्टी वाजली"

जेम्स वांड's picture

28 Oct 2021 - 10:30 am | जेम्स वांड

१. अश्लील वाङ्मय - स्त्री पुरुष संभोगाची वर्णने ग्राम्य अन नकारात्मक छटा असणारे शब्द वापरून केलेले क्रियापदात्मक चित्रण. अश्लील लेखनात फक्त कामभावना केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती असणाऱ्या सामाजिक समजुती (बहुतकरून कुतूहल अज्ञानोद्भव) वापरून केलेले लेखन असते.

२. लैंगिक वाङ्मय - ह्यात बहुतेक वैद्यकीय अँगल जोडला जातो, गृहशोभिकेतले स्त्री रोग परामर्ष, मिरर मधले डॉक्टर महेंद्र वत्स ह्यांचे सेक्सपर्ट सदर, निरामय कामजीवन हे पुस्तक असे असावे, थोडक्यात काय तर कामभावना काय असते तिचे मानसशास्त्रीय शारीरिक ऍस्पेक्ट त्यातून उदभवणारे आरोग्यप्रश्न आणि संभोगाचा शास्त्रोक्त धांडोळा हे लैंगिक साहित्य असावे (र धो कर्वे ह्यावर एक उत्तम मासिक काढत तत्कालीन काळी नाव विसरलो)

शृंगारिक वाङ्मय - स्त्री पुरुष किंवा समलैंगिक संबंध ह्यांच्या अवतीभोवती गुंफलेले लेखन, ह्यात कथावस्तू किंवा प्लॉट मुळात वेगळे असू शकतात पण त्यातील रोचकता वाढविण्यास लैंगिक रेफरन्स घेतलेले असू शकतात, गंमत म्हणजे कुमारसंभव हे कालिदास लिखित महाकाव्य ह्या शृंगाररसाचा पुरेपूर वापर करते, शृंगार हा थेट संभोगकेंद्री नसला तरी संभोग पूरक बाह्य/वैचारिक/भावनिक सौंदर्य इत्यादींचा परामर्ष घेणारा लेखनप्रकार असावा असे वाटते

ह्याशिवाय संभोग (अश्लील) अन शृंगार (सौंदर्यरस) ह्यांची सरमिसळ असणाऱ्या साहित्याचा एक प्रकार म्हणजे चावट उर्फ रिबाल्ड लिटरेचर पण असतो हे इथे जोडायचा मोह टाळल्या जात नाही, दिवाळी अंक आवाज, आनंदध्वज द्वादशी इत्यादी साहित्य त्यात मोडावे.

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 10:48 am | कुमार१

विश्लेषण आवडले
सहमत आहे

मित्रहो's picture

28 Oct 2021 - 12:01 pm | मित्रहो

सहमत आहे
मला वाटते शृंगारीक साहित्यात सुद्धा संभोग हाच केंद्रस्थानी असतो फक्त खूप झूम आऊट केलेला असतो तर त्याउलट अश्लील मधे तो झूम इन असतो. मुख्य फरक तुम्ही सांगितल्या प्रमामे भाषा हाच आहे.

टर्मीनेटर's picture

28 Oct 2021 - 2:40 pm | टर्मीनेटर

परफेक्ट मिमांसा....

सर टोबी's picture

28 Oct 2021 - 11:45 am | सर टोबी

एका व्यक्तिमत्त्व सुधारणा करणाऱ्या कार्यक्रमात भाग घेतला होता. वस्थुस्थिती आणि तिची बातमी ही कल्पना समजाऊन सांगताना संचलन करणाऱ्या गृहस्थाने शरीर संबंधाचे उदाहरण घेतले. तो म्हणाला की प्रत्यक्षात ही क्रिया म्हणजे किती सरळ आहे परंतु आपण त्यावर कल्पनेचे इमले रचतो, भावनांचा कल्लोळ निर्माण करतो, साहित्य निर्माण करतो. तर यातल्या साहित्याची सामाजिक संकेतानुसार किती उघडपणे चर्चा करता येईल यानुसार जी उतरंड असेल तीच आपण म्हणता त्या सहित्याना लावता येईल. असे करताना शब्दकोषकार किंवा साहित्य परीषद यांचा शब्द प्रमाण मानावा लागेल.

कानडाऊ योगेशु's picture

28 Oct 2021 - 11:11 am | कानडाऊ योगेशु

शाळेत सातवी आठवीनंतर पौगुंडावस्था चालु झाल्यानंतर प्रत्येक विधान उगाच अश्लील करुन एक्झॅगरेट करायची प्रत्येकाला खोड लागते. तेव्हाच गणितातले काळ काम वेगाची गणिते पाठ्यपुस्तकात असत. तेव्हा अमुक माणसे वा अमुक महिला एतक्या वेळात एतके काम करतात अश्या टाईपची वाक्यरचना आली कि वर्गात खसखस पिकत असे.बहुदा शिक्षकही ह्या अवस्थेतुन गेले असल्यामुळे एकतर दुर्लक्ष करत वा गाढवांनो गणिते सोडवा म्हणुन कुणाच्या तरी पाठीत धपाटा घालत.
नववी का दहावीला शंकर पाटलांचा वाळवण नावाचा धडा होता त्यात एक वाक्य होते उकाड्याचे वर्णन करतानाचे."अंगाची काहीली इतकी वाढली होती कि कुठेतरी घालुन घ्यावेसे वाटत होते". हे वाक्य हमखास खसखस पिकवणारेअसे किंवा हास्य कंट्रोल न करु शकणार्या कुणा विद्यार्थ्यांच्या तोंडातुन फिस्सकन हसु आणणारे होते.दुसर्या तुकडीतल्या मित्रांशी चर्चा करताना धडा शिकवायला चालु झाला का? सरांनी काय केले हे वाचताना अशी पृच्छा हि होत असे.आमच्या वर्गातल्या शिक्षकांनी ते वाक्यच धडा शिकवताना गाळले होते.

फॉस्फरस सेसक्वीसल्फाईड हे केमिस्ट्रीतले एक उदाहरण.

(Phosphorus sesquisulfide P4S3)

कॉमी's picture

28 Oct 2021 - 11:48 am | कॉमी

1.Sec C
2. फायलम प्रोटोझोआ

तुषार काळभोर's picture

28 Oct 2021 - 5:08 pm | तुषार काळभोर

One upon Cos C = 1/COS C

जेम्स वांड's picture

29 Oct 2021 - 8:41 am | जेम्स वांड

बायोलॉजी मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने खर्च वाचवायला एकच "जेंडर न्यूट्रल" डायग्राम काढून त्यातच ओव्हरीज अन टेस्टीकल प्लेसमेंट दाखवले होते, आमच्यातल्या एका भोळसट गोळ्याने मॅडमना "मॅडम एकातच दोन्ही कसे हो ?" असे विचारून "हाय मैं शरम से लाल हुई" करून टाकले होते.

टर्मीनेटर's picture

28 Oct 2021 - 12:07 pm | टर्मीनेटर

लैंगिक/समलैंगिक संबंधांबद्दलच्या मौलिक ज्ञानात भर पडण्यास चावट/अश्लील विनोदांचाही वाटा मोठा असतो.
Witty Jokes हा विनोदाचा लोकप्रिय प्रकार आहे. त्यात अश्लील शब्द न वापरतां देखील चावट विनोदनिर्मीती केली जाते. असे जोक्स समाजमाध्यमांवर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करतानाही संकोच वाटत नाही. अशाप्रकारचे जोक्स ह्या प्रगल्भ धाग्यावर प्रतिसादांतून शेअर करायला हरकत नसावी ह्या समजुतीतुन उदाहरणासाठी एक जुना जोक खाली देत आहे, आपल्यापैकी अनेकांना तो आधी माहितीही असेल.

4 friends meet 30 years after school. One goes to the toilet,

while the other 3 start to talk about how successful their sons became.
.
No 1 says his son studied economics, became a banker and is so rich he gave his best friend a Ferrari.
.
No 2 said his son became a pilot, started his own airline, became so rich he gave his best friend a jet.
.
No 3 said his son became an engineer, started his own development company, became so rich he build his best friend a castle.
.
.
No 4 came back from toilet and asks what the buzz is about.
.
.
They told him they were talking about how successful their sons became and ask him about his son.
.
He said his son is gay and is a stripper at a gay bar.
.
Other 3 said he must be very disappointed with his son for not becoming successful.

and said them,

he is doing good. Last week was his birthday and he got a Ferrari, a jet and a castle from 3 of his boyfriends 😀

अनेकांच्या सहभागाने छान चर्चा होत आहे.
......
आता या संदर्भातील माझे काही वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव २-३ टप्प्यांत लिहितो.
१.
हा प्रसंग आहे आम्ही पहिल्या वर्षात शिकत असतानाचा. आमच्या प्राध्यापिकांनी मासिक पाळी वगैरेचे शास्त्रीय व्याख्यान संपवले आणि कुणाला काही प्रश्न आहेत का ते विचारले.
एका मुलग्याने हात वर करून एक महत्वाचा प्रश्न विचारला,

“मासिक पाळी चालू असताना संभोग केला तर शास्त्रीय दृष्ट्या काही अडचण असते का ?”

आमच्या बाईंनी मार्मिक उत्तर दिले,
“त्या काळात संभोग करायला अडचण काहीच नसते. परंतु कुठल्या पुरुषाला आपल्या ‘अंगावर’ ते रक्त घ्यायला आवडेल ते सांगा बरं !”

सुंदर शंकानिरसन. कायम लक्षात राहिले.

Rajesh188's picture

28 Oct 2021 - 1:04 pm | Rajesh188

ह्या विषयात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे healthy सेक्स भावना, परफॉर्मन्स,.
ह्या साठी कोणते साहित्य उपलब्ध आहे.
सेक्स भावना उत्तेजीत करणारी पुस्तक,व्हिडिओ च खूप आहेत.
पण योग्य मार्गदर्शन करणारे साहित्य दुर्मिळ आहे.
१) सेक्स चा विचार २४ तास डोक्यात असणे.
२) ज्या बघेल त्या स्त्री कडे सेक्स च्या भावनेने बघणे.
३) सेक्स करण्याची योग्य पद्धत माहीत नसणे.
Forplay,आणि पुढे.
४) लिंगाचे आकार आणि त्या बद्द्ल असलेले गैर समज.
५) उत्तम दर्जा चा संभोग कधी शक्य होतो ह्याची माहीत.
६) संभोगाचे सर्वोच क्षण चा अनुभव खूप कमी लोक अनुभवतात.
स्त्री ची योनी संभोग च्या सर्वोच्च क्षणी आकुंचन ,प्रसारण पावते आणि त्याची स्पष्ट जाणीव तिच्या पार्टनर ला होते.
हाच तो सर्वोच्च क्षण..
तो खूप कमी लोकांना अनुभव याला मिळतो.
ह्या वर तुमचे मत द्यावे.

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 1:45 pm | कुमार१

संभोगाचे सर्वोच क्षण चा अनुभव खूप कमी लोक अनुभवतात.

>>>
इथे प्रश्न पुरुषाचा नसून स्त्रीचा आहे.
स्त्रीच्या 'कळसबिंदू' बाबत समाजात भरपूर अज्ञान आहे.
त्यादृष्टीने विविध पातळ्यांवर समुपदेशन चालू असते.

पूर्वी लस्ट स्टोरीज या नेट्फ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील एका भागात हा विषय फार छान हाताळला आहे.
बघितला नसल्यास जरूर बघावा.

ह्या अज्ञाना चा फायदा घेवून काही लोक गैर समज पसरवत असतात.
आणि त्या मधून विकृत सेक्स भावना असणारे पुरुष निर्माण होतात..
१) स्त्री ला त्रास झाला पाहिजे चालता आले नाही नाही पाहिजे.
२), त्या साठी घर्षण होणारे कंडोम निर्माण करणे(डॉट वाले) रिंग लिंगावर लावणे.
३) कमी वेळ टिकणारा तीव्र जोश दाखवने ..
असले विकृत प्रयोग पुरुष करतात
त्या मुळे स्त्री ला सुख तर मिळत नाही पण सेक्स विषयी तिरस्कार निर्माण होतो.

Rajesh188's picture

28 Oct 2021 - 1:26 pm | Rajesh188

विकृत भावना कोणत्या हा खरे तर खूप महत्वाचा विषय आहे.
पण ह्या वर ना कोणते साहित्य आहे,व्हिडिओ आहेत.
ना शरिरशास्त्र मध्ये ते शिकवले जाते.
लैंगिक शिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे.
पण कोणत्या लैंगिक भावना ह्या विकृत आहेत .
कोणत्या पद्धती ह्या विकृत आहेत.
आणि अशी विकृत माणसं कोणत्या मानसिक रोगांनी ग्रस्त आहेत.
ह्या विषयावर सविस्तर शास्त्रीय माहिती मुलांना देणे आवश्यक आहे.

ह्या वर कोणी तरी लिहणे खूप गरजेचे आहे.
पूर्वीचा काळ बंधनात होता.
मुल आणि मुली बंधनात होत्या त्या मुळे विकृत प्रचाराचा परिणाम त्यांच्या वर झाला नाही.
असता काळ बदलला आहे वातावरण मोकळे आहे.
आता सशक्त सेक्स भावना आणि विकृत सेक्स भावना ह्यांची जाणीव मुल आणि मुली ह्यांना होणे गरजेचे आहे..
सेक्स ॲक्ट म्हणजे लैंगिक शिक्षण नाही .
त्याचा विरोध च केला पाहिजे.

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 5:34 pm | कुमार१

हा परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातील आहे.
एकदा नपुसकत्व यावर चर्चासत्र चालू होते. व्यासपीठावर आम्ही तीन डॉक्टर होतो. समोर विद्यार्थी.

दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने उठून विचारले,
"सर, आपण जे इम्पोटन्स म्हणतो, ते म्हणजे... अं अं... लघवीच्या संदर्भात असते की सेक्सच्या ?"
त्याने हे अगदी निरागसपणे विचारले.
त्यावर कुठले आश्चर्य न दाखवता मी त्याला व्यवस्थित उत्तर दिले.

सांगायचा मुद्दा असा, की वैद्यकीय विद्यार्थ्यांनासुद्धा काही मूलभूत गोष्टींची नीट माहिती झालेली नसते.
त्याने त्याच्या शोक्षणाच्या योग्य वर्षात विचारले हे चांगलेच केले.

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 5:35 pm | कुमार१

शोक्षणाच्या >>> शिक्षणाच्या असे वाचावे

कॉमी's picture

28 Oct 2021 - 6:51 pm | कॉमी

Let's talk sexuality या साईटवर faq चांगले मांडले आहेत.

कुमार१'s picture

28 Oct 2021 - 7:10 pm | कुमार१

होय, चांगला उपक्रम आहे.

कुमार१'s picture

29 Oct 2021 - 4:21 pm | कुमार१

धाग्याच्या विषयावर छान चर्चा झाली आहे. त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार !

इथे अनेकांनी सविस्तर मनमोकळे प्रतिसाद लिहिले. त्यातून संबंधितांना ‘मोकळे’ झाल्याची सुखद भावना जाणवली. आडपडदा न ठेवता सर्वांनी आपापल्या शालेय जीवनापासूनच्या सुखद व चावट आठवणी लिहिल्या. त्यातून स्मरणरंजन झाले. या चर्चेत 25 ते 70 या व्यापक वयोगटांतील सभासद सहभागी झाले ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यातील प्रत्येकाला हा विषय ‘आपला’ वाटल्याचे दिसून आले. काहींनी या विषयाला दिलेल्या ‘गावकुसाबाहेरील विषय’ किंवा ‘अंधार्‍या कोपर्‍यात मारलेली बॅटरी’ या उपमा सुरेख होत्या.

या चर्चाकाळात आपल्यातील काहींना ‘अजून यौवनात मी’ अशी भावना झाली असावी तर अन्य काहींना आपण किमान दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटले असावे ! 😀
त्यादृष्टीने हा धागा सुफळ संपूर्ण झाला असे म्हणतो. अशा सुंदर चर्चा हे आपल्या संस्थळाचेच यश आहे.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2021 - 5:05 pm | चौथा कोनाडा

कुमारएक साहेब,
आपल्या या महत्वाच्या धाग्याने प्रतिसादांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला त्याबद्दल आपलेही हार्दिक अभिनंदन ! !
📜

धर्मराजमुटके's picture

29 Oct 2021 - 11:02 pm | धर्मराजमुटके

खरे तर चार दिवसांनी या धाग्यावर प्रतिसाद देणे म्हणजे खूपच उशीर असावा. असो.
लैंगिक वाङ्मय हा माझ्या "कामा"चाच एक भाग होता. त्या काळी मी हार्डवेअर इंजिअरचे काम करत असे. त्यामुळे कोठेही गेलो की कंप्युटर फॉर्मट करायचा असला की महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्यावाच लागे. त्यात १०० पैकी ९० संगणकांमधे "कामाचा" असे. कोणाच्या संगणकात किती फाईल्स सापडायच्या यावरुन त्याचा "कामसू"पणा ठरवावा लागेल. अशा फाईल्स खालीलप्रकारे जतन केल्या जात.

१. फाईलचे / फोल्डर चे नाव वरुन किर्तन असेल तर त्यातील मजकूर तमाशाचा असायचा.
२. फाईल / फोल्डर लपवून ठेवणे इ.
चलचित्र येण्याअगोदर उच्च दर्जाची छायाचित्रे मिळत असे. ती बहुतेकांच्या संगणकात आढळायची.
डॉस बेस विंडोज मधे (विंडोज ३.०) मधे देखील अशी छायाचित्रे पाहता यायची हे कदाचित बरेच जणांना माहित नसेल. किंबहूना डॉस बेस्ड विंडोज किती जणांनी पाहिले असेल माहीत नाही.

असा महत्वाचा डेटा साठवून ठेवायला त्या काळी घरोघरी संगणक असले तरी बॅकअप हार्ड डिस्कची सोय घरोघरी नव्हती. अशावेळी आम्ही क्लायंटचा महत्वाचा डेटा आमच्या जवळ असलेल्या हार्डडिस्क मधे साठवत असू. त्यामुळे अशा साहित्याचा भरपूर साठा झाला मात्र कालांतराने तो ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. मी त्यावेळी एका भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीला देखील सेवा देत असे. तिथे एक जुना निवृत्त झालेला सर्वर आम्ही आम्हाला सर्वरवर काम करायचे आहे असे सांगून मागून घेतला. त्या काळात देखील त्यावर भरपूर माहिती साठवण्याइतकी क्षमता होती. मग मी रितसर त्यावर दोन भाग केले. त्यातील एका भागावर कंपनीला लागणारी सगळी सॉफ्टवेअर्स ठेवली तर दुसरर्‍या भागात छायाचित्रे / चलचित्रे साठवली होती. ह्या निवृत्त सर्वर ने आपले काम जवळ जवळ तीन - चार वर्षे सुखाने बजावले.
वाङ्मय एक "क्ष" असलेले असेल तर ते "सॉफ्टवेअर" "क्षक्ष" असेल तर हार्डवेअर आणि "क्षक्षक्ष" असेल तर "ऑपरेटींग सिस्टिम" नावाने त्याची विभागणी करुन अगदी कॉर्पोरेट कल्चर ला शोभेल अशा प्रकारे साठवणूक केली होती. शिवाय सर्वर ला पासर्वड, फायलींचे एक्टेंशन बदलून ते .Exe / .xls / .doc करणे आणि गरज पडेल तेव्हा त्या मुळ रुपात आणणे अशा सर्व प्रकारे सर्वर चे "हार्डनिंग" देखील केले होते.
मात्र या सगळ्या माहितीचा स्वतःसाठी जास्त उपयोग करता आला नाही. माझा भर प्रामुख्याने डेटा कलेक्शन वर असे व कार्यालयात ह्या माहितीसाठी भरपूर ग्राहक इच्छूक असत त्यांना सेवा देऊन थोडे फार पुण्य कमविता येत असे.

एक किस्सा अजून ध्यानात आहे. मी विक्रोळीत एका मोठ्या साहेबांच्या घरी संगणक दुरुस्तीसाठी गेलो होतो. दुपारची वेळ असल्याने साहेब ऑफीसात आणि घरी बाईसाहेब होत्या. मी संगणक दुरुस्ती करता करता त्यातील कलेक्शनवर एक नजर मारुन घेतली. बाईसाहेब मात्र संगणक नादुरुस्त असल्यामुळे साहेबांचे काम रखडते वगैरे सांगत होत्या. दुरुस्ती झाल्यावर निघताना बाई म्हणाल्या की सीडी ड्राईव्ह पण काम करत नाहिये. तो पण चेक करुन घे. दुर्दैवाने त्यांनी मला एक सीडी चालवून पाहण्यास सांगीतले त्यात .dat एक्स्टेंशन आणि त्या फाईलची साईज बघताच मला आत काय आहे याचा लगेच अंदाज आला. मी म्हणालो की मॅडम सीडी ड्राईव्ह व्यवस्थित चालू आहे चेक करण्याची आवश्यकता नाही पण बाईंना बहुतेक ती एक सबब वाटली असावी. मी ३-४ वेळा सांगूनही ऐकेना त्यामुळे त्या स्वतःच ती सीडी चेक करायला गेल्या व त्यानंतर पडद्यावरची जे दिसले ते पाहून मला तोंड फिरवावे लागले. बाईनी खटपट करुन सीडी बंद केली आणि मला जायला सांगीतले. मी देखील काहीच न पाहिल्यासारखे केले आणि चालू पडलो पण संध्याकाळी साहेबाचे काय झाले असेल असा विचार केला की बरेच दिवस मौज वाटायची. थोडक्यात माल कसा लपवावा ह्याचे नीट शिक्षण नसल्यामुळे बरेच चोर पकडले जायचे.

पण वयोपरत्वे माणसात बदल होतात. ज्या गोष्टीत तरुणपणी रस वाटतो त्यात प्रौढ वयात रस वाटेलच असे नाही. एकेकाळी गरम दृष्य पाहण्यासाठी दोन-अडीच तासांचे बकवास चित्रपट पाहिले जात. तोच प्रवास आज "मनी हाईस्ट" सारख्या मालिका बघताना उफराटा होतो. आता अशी दृष्य आली की मी हॅ, त्यात काय एव्हढे असे म्हणून तेवढा भाग टाळून पुढे जातो आणि वेळ वाचवतो.

आज सगळे ऑनलाईन मिळत असताना देखील काही महाभाग घरच्या संगणकात असे वाङ्मय साठवून ठेवतात. तोच संगणक घरातील लहान मुले वापरतात. अचानक अशा प्रकारचे काही त्यांच्यासमोर आल्यावर त्यांच्या मनावर काय परीणाम होत असतील याचा विचार प्रत्येक वाङ्मयप्रिय पालकाने करावा आणि आवश्यक खबरदारी घ्यावी आणि संगणक वैद्याकडे जाण्याअगोदर माझा प्रतिसाद आठवावा ही विनंती..

कुमार१'s picture

30 Oct 2021 - 9:21 am | कुमार१

१. चौ को
धन्यवाद. प्रतिसाद सजवायची चित्रकला तुमच्याकडून शिकली पाहिजे !
...
२. ध मु,
हा विषयच चिरकालीन चिरतरुण असा आहे. त्यामुळे चार दिवस म्हणजे अजिबात उशीर झालेला नाही. अगदी 40 दिवसांनी देखील प्रतिसाद द्यायला हरकत नसावी !

वाङ्मय एक "क्ष" असलेले असेल तर ते "सॉफ्टवेअर" "क्षक्ष" असेल तर हार्डवेअर आणि "क्षक्षक्ष" असेल तर "ऑपरेटींग सिस्टिम" नावाने त्याची विभागणी करुन अगदी कॉर्पोरेट कल्चर ला शोभेल अशा प्रकारे साठवणूक केली होती.

>>>
हे मात्र जबरदस्त ! तुमच्या कला अभियांत्रिकीला दाद द्यायला पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2021 - 1:09 pm | चौथा कोनाडा

१. चौ को
धन्यवाद. प्रतिसाद सजवायची चित्रकला तुमच्याकडून शिकली पाहिजे

!
कुमारएक,
अ‍ॅक्च्युअली क्रेडिट गोज टू एक्सपर्ट टर्मीनेटर साहेब. त्यांनी स्मायली / Emoji चा धागा काढल्यामुळे याचा परिचय झाला आणि सवयही (व्यसन ?) लागली

स्मायली / Emoji

आता चित्रं टाकताना फेसबुक किंवा कायप्पावर असल्याचा फील येतो !
😊

कुमार१'s picture

31 Oct 2021 - 1:18 pm | कुमार१

क्रेडिट गोज टू एक्सपर्ट टर्मीनेटर साहेब.

>>>
प्रश्नच नाही !
मी पण त्यांच्याच शाळेत शिकतो. पण मी अजून बालवाडीत आहे; तुम्ही कॉलेजला गेला आहात हा फरक 😀 😉

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा
कुमार१'s picture

9 Nov 2021 - 5:55 pm | कुमार१

लेखाच्या विषयासंदर्भातील एक चांगला लेख लोकसत्तामध्ये आलेला आहे:

बोलायलाच हवं!
(https://www.loksatta.com/chaturang/we-must-speak-5598/)

त्यातले हे महत्त्वाचे:

अगदी लहान वयापासून शरीराचे वेगवेगळे भाग शिकविताना शिश्न (पेनिस) आणि योनी (व्हजायना) अशी स्पष्ट आणि नेमकी नावं शिकवणं आवश्यक आहे.

कुमार१'s picture

25 Nov 2021 - 1:09 pm | कुमार१

या विषयाशी संबंधित एक पुस्तक ग्रंथाली तर्फे प्रकाशित झाले आहे : ‘पॉर्न’ खेळ’ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह’
त्याचा परिचय इथे आहे

नीलकंठ देशमुख's picture

31 Dec 2021 - 3:51 pm | नीलकंठ देशमुख

महत्वाचा " विषय" !लेखा वरच्या प्रतिक्रिया पाहूनच 'विषया 'विषयी आपली सार्वत्रिक आवड कुठे. लिहीलय मस्तच. प्रत्येकाला आपापलं काही तरी खाजगी आठवलेलं दिसत॔य .जोपर्यंत मनुष्य जात आहे तोपर्यंत हा विषय ही आहे...

नीलकंठ देशमुख's picture

31 Dec 2021 - 3:52 pm | नीलकंठ देशमुख

वरील प्रतिसादात कुठे ऐवजी कळते असे वाचावे

कुमार१'s picture

27 Feb 2022 - 4:44 pm | कुमार१

" समलैंगिकता हा एक आजार आहे" असे विधान मनोविकार तज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी केले आहे. भारतीय मनोविकार तज्ञांच्या संघटनेने या डॉक्टरांविरुद्ध चौकशी समिती नेमलेली आहे.

निनाद's picture

28 Feb 2022 - 8:52 am | निनाद

thelogicalindian ही बुरख्या आड लपवलेली आम आदमी पक्षाची बटीक साईट आहे!

द लॉजिकल इंडियन फॅक्ट चेकर्स वगैरे लेबलं लावली तटस्थतेच्या नावाखाली आप चा अजेंडा चालवला जातो.
व्यवस्थित लिहिलेल्या सामाजिक समस्या, पर्यावरणीय समस्या आणि इतर ऑफबीट विषयांवर केंद्रित असलेल्या अनेक लेखांमध्ये अचानक त्यांचा डावा अजेंडा समोर येऊन जातो. फार चतुराईने केले लिखाण असते. त्यांच्या डाव्या लिबरल इकोसिस्टिमवर आघात होईल असे कधीच काही वाईट लिहिले जात नाही हे डोळे उघडून पाहिले तर लक्षात येते. तटस्थतेच्या आडून आपला अजेंडा पुढे ढकलतात अशा अनेक चोरट्या वेब पोर्टल्स पैकी हे पण एक!

कुमार१'s picture

28 Feb 2022 - 9:24 am | कुमार१

माहितीसाठी धन्यवाद !

कुमार१'s picture

7 Apr 2022 - 10:28 am | कुमार१

या धाग्याच्या विषयाशी संबंधित एका नवीन पुस्तकाचा परिचय येथे आहे:

‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ - पंकज भोसले
त्यातील हा निवडक भाग

पंकजच्या कथेतील म्हातारा सांगतो, ‘बायांचं नागडेपण आता इतकं पाहिलंय की, सालं हिंदी सिनेमातील कपडे घातलेल्या हिरॉईनीच चड्डीला जास्ती त्रास देतात. तरी मी रात्री झोप येईस्तोवर एक-दोन नवे बीपी पाहातोच. यातली गंमत सांगू? पूर्वी मला हे नागडेपण स्ट्रॉन्ग करायचं, आता ते तितकसं महत्त्वाचं राहिलेलं नसल्यानं पूर्ण कपड्यातलं कुठलंही मादक शरीर मला पाहायला चालतं. मला पॉर्न पाहिल्याचं समाधान आता तंग कपडे घालणाऱ्या बायकाही देऊ शकतात. म्हणजे माझी किती मजा आहे बघ. सारं जगच माझ्यासाठी पॉर्न बनलंय’. हा म्हातारा जणू या पिढीचा प्रतिनिधी आहे.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2022 - 5:37 pm | चौथा कोनाडा

संदर्भासाठी धन्यवाद, कुमार१ !
पुर्ण लेख वाचला, रोचक आहे !
या पुस्तकाबद्दल उत्सुकता चाळवलीय.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेलं मुखपृष्ठ आवडलं, अतिशय समर्पक आहे !