शिल्पकार !

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
30 Jun 2021 - 7:26 pm

दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा..
कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला..

दर्‍याखोर्‍यातून कितीदा, देह घरंगळलेला..
किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला..

कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं..
कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं..

इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात..
अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात..

छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही
घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!

--

दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला?
खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!

राघव
[२०२१]

शांतरसकविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

4 Jul 2021 - 9:03 pm | चौथा कोनाडा

छान सुंदर !

छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही
घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!

--

दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला?
खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!

हे खुप आवडले !

राघव's picture

7 Jul 2021 - 2:28 pm | राघव

धन्यवाद चौकोशेठ!

साधक आणि गुरु यांच्या नात्याचा विचार करता करता या ओळी आल्या आहेत.
अर्थात् सगळंच जसंच्या तसं लागू होत नाही हे खरंय. पण बरंचसं मांडता आलं यात समाधान. :-)

गॉडजिला's picture

8 Jul 2021 - 2:29 pm | गॉडजिला

आवडले

पाषाणभेद's picture

10 Jul 2021 - 3:06 pm | पाषाणभेद

व्वा छान आहे कविता!

चिगो's picture

16 Jul 2021 - 3:29 pm | चिगो

आवडली..

सस्नेह's picture

18 Jul 2021 - 6:40 pm | सस्नेह

सकारात्मक शेवट आवडला