✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिल्पकार !

र — राघव, Wed, 06/30/2021 - 19:26
दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा.. कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला.. दर्‍याखोर्‍यातून कितीदा, देह घरंगळलेला.. किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला.. कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं.. कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं.. इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात.. अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात.. छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई! -- दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला? खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला! राघव [२०२१]

प्रतिक्रिया द्या
3821 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान सुंदर !

चौथा कोनाडा
Sun, 07/04/2021 - 21:03 नवीन
छान सुंदर ! छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई! -- दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला? खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला! हे खुप आवडले !
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौकोशेठ!

राघव
Wed, 07/07/2021 - 14:28 नवीन
धन्यवाद चौकोशेठ! साधक आणि गुरु यांच्या नात्याचा विचार करता करता या ओळी आल्या आहेत. अर्थात् सगळंच जसंच्या तसं लागू होत नाही हे खरंय. पण बरंचसं मांडता आलं यात समाधान. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मस्त

गॉडजिला
गुरुवार, 07/08/2021 - 14:29 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

व्वा छान आहे कविता!

पाषाणभेद
Sat, 07/10/2021 - 15:06 नवीन
व्वा छान आहे कविता!
  • Log in or register to post comments

सुरेख कविता..

चिगो
Fri, 07/16/2021 - 15:29 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments

छान

सस्नेह
Sun, 07/18/2021 - 18:40 नवीन
सकारात्मक शेवट आवडला
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा