Skip to main content

चक्कर

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 29/04/2021 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न आयुष्याचा असतो उत्तर असते आयुष्याचे. आपण निव्वळ कोरे कागद नशीब छपाईच्या कामाचे. शब्दांना का कळतो अर्थ लिहिणाऱ्याच्या मनातला? अर्थ कोणता जीवनाला मग जन्म देत असे अज्ञातातला. मृत्यू म्हणजे शेवट कसला? पितरांच्या शांतीत काकही फसला. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला. विश्वाचे मुळ गूढ भयंकर सोबत नाही एकही शंकर. अंधाराला शोधीत भास्कर पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!
लेखनविषय:

वाचने 4767
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कोणत्याच कडव्याचा दुसऱ्या कडव्याशी संबंध असल्याचे जाणवले नाही. (कदाचित माझ्या भाषिक कौशल्याची मर्यादा असेल.) पण स्वतंत्र कडव्यांत गूढ अर्थ असल्याचा भास होत होता. कदाचित त्याच गुढतेने मला संबंध जाणवला नसावा. शुभेच्छा.

आपला मुल्यवान अभिप्राय आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

आवडले. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला.

In reply to by राघव

स्वतःला ओळखायला निघाला की काय काय ओळखून घ्यावं या कोड्यात माणूस पडतो... असा थोडा विचार होता. तो नेमका मांडला गेलाय की नाही कुणास ठाऊक.

लिहिते राहा. आवडले. -दिलीप बिरुटे