प्रश्न आयुष्याचा असतो
उत्तर असते आयुष्याचे.
आपण निव्वळ कोरे कागद
नशीब छपाईच्या कामाचे.
शब्दांना का कळतो अर्थ
लिहिणाऱ्याच्या मनातला?
अर्थ कोणता जीवनाला मग
जन्म देत असे अज्ञातातला.
मृत्यू म्हणजे शेवट कसला?
पितरांच्या शांतीत काकही फसला.
अनुभवाचे गाठोडे सोडून
वर्तमानावर भूतकाळ हसला.
विश्वाचे मुळ गूढ भयंकर
सोबत नाही एकही शंकर.
अंधाराला शोधीत भास्कर
पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4787
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकसंध कविता वाटली नाही.
कोणत्याच कडव्याचा दुसऱ्या कडव्याशी संबंध असल्याचे जाणवले नाही.
(कदाचित माझ्या भाषिक कौशल्याची मर्यादा असेल.)
पण स्वतंत्र कडव्यांत गूढ अर्थ असल्याचा भास होत होता. कदाचित त्याच गुढतेने मला संबंध जाणवला नसावा.
शुभेच्छा.
धन्यवाद
आपला मुल्यवान अभिप्राय आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
मार्मिक काव्य!
आवडले.
अनुभवाचे गाठोडे सोडून.वर्तमानावर भूतकाळ हसला
धन्यवाद
In reply to मार्मिक काव्य! by Bhakti
नाही समजले ब्वॉ. :-(
नाही समजले ब्वॉ. :-(
थोडी भूमिका उलगडून सांगाल काय?
'स्व'चे गूढ
In reply to नाही समजले ब्वॉ. :-( by राघव
स्वतःला ओळखायला निघाला की काय काय ओळखून घ्यावं या कोड्यात माणूस पडतो... असा थोडा विचार होता.
तो नेमका मांडला गेलाय की नाही कुणास ठाऊक.
छान...!
लिहिते राहा. आवडले.
-दिलीप बिरुटे