चक्कर

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
29 Apr 2021 - 2:23 pm

प्रश्न आयुष्याचा असतो
उत्तर असते आयुष्याचे.
आपण निव्वळ कोरे कागद
नशीब छपाईच्या कामाचे.

शब्दांना का कळतो अर्थ
लिहिणाऱ्याच्या मनातला?
अर्थ कोणता जीवनाला मग
जन्म देत असे अज्ञातातला.

मृत्यू म्हणजे शेवट कसला?
पितरांच्या शांतीत काकही फसला.
अनुभवाचे गाठोडे सोडून
वर्तमानावर भूतकाळ हसला.

विश्वाचे मुळ गूढ भयंकर
सोबत नाही एकही शंकर.
अंधाराला शोधीत भास्कर
पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!

आयुष्यदृष्टीकोनमुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

30 Apr 2021 - 10:04 pm | तुषार काळभोर

कोणत्याच कडव्याचा दुसऱ्या कडव्याशी संबंध असल्याचे जाणवले नाही.
(कदाचित माझ्या भाषिक कौशल्याची मर्यादा असेल.)
पण स्वतंत्र कडव्यांत गूढ अर्थ असल्याचा भास होत होता. कदाचित त्याच गुढतेने मला संबंध जाणवला नसावा.

शुभेच्छा.

अनुस्वार's picture

30 Apr 2021 - 11:42 pm | अनुस्वार

आपला मुल्यवान अभिप्राय आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

Bhakti's picture

3 May 2021 - 10:14 am | Bhakti

आवडले.
अनुभवाचे गाठोडे सोडून
वर्तमानावर भूतकाळ हसला
.

अनुस्वार's picture

3 May 2021 - 5:05 pm | अनुस्वार
राघव's picture

3 May 2021 - 11:49 am | राघव

नाही समजले ब्वॉ. :-(
थोडी भूमिका उलगडून सांगाल काय?

अनुस्वार's picture

3 May 2021 - 5:03 pm | अनुस्वार

स्वतःला ओळखायला निघाला की काय काय ओळखून घ्यावं या कोड्यात माणूस पडतो... असा थोडा विचार होता.
तो नेमका मांडला गेलाय की नाही कुणास ठाऊक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा. आवडले.

-दिलीप बिरुटे