नजर..

Primary tabs

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
24 Jul 2020 - 5:31 pm

नजर..

बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ

तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी

उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.

पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!

-दिप्ती भगत
२५जून,२०१९

पाऊसमुक्त कविताकवितामुक्तकदृष्टीकोनवयपाऊस

प्रतिक्रिया

गणेशा's picture

24 Jul 2020 - 6:29 pm | गणेशा

छान कविता..

दोन ओळी लिहिल्या यावर.. पण येथे देत नाही..

प्रचेतस's picture

24 Jul 2020 - 6:46 pm | प्रचेतस

मस्त.आवडली

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 8:05 pm | श्वेता२४

आवडली कविता

प्रचेतस, श्र्वेता मनापासून धन्यवाद..:-) :-)

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2020 - 6:28 pm | चौथा कोनाडा

छान ! सुरेख !
शेवटच्या ओळी तर खासच !

एक शंका:
मन्या ऽ आणि -दिप्ती भगत या एकच व्यक्ति आहेत का ?
की मन्या ऽ यांनी दुसर्‍या व्यक्तिची कविता इथं ढकलली आहे ?

हो. माझं च नाव दिप्ती भगत आहे.
इथे वावरण्यासाठी म्हणून मन्या ऽ हा आयडी घेतला आहे.. इथे पोस्ट केलेल्या सर्व कविता/कथा ह्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत..

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Aug 2020 - 11:26 am | बिपीन सुरेश सांगळे

दीप्ती

सुरेख कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2020 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली. लिहिते राहा...!!!

-दिलीप बिरुटे