Skip to main content

नजर..

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 24/07/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९
लेखनविषय:

वाचने 6135
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान कविता.. दोन ओळी लिहिल्या यावर.. पण येथे देत नाही..

छान ! सुरेख ! शेवटच्या ओळी तर खासच ! एक शंका: मन्या ऽ आणि -दिप्ती भगत या एकच व्यक्ति आहेत का ? की मन्या ऽ यांनी दुसर्‍या व्यक्तिची कविता इथं ढकलली आहे ?

In reply to by चौथा कोनाडा

हो. माझं च नाव दिप्ती भगत आहे. इथे वावरण्यासाठी म्हणून मन्या ऽ हा आयडी घेतला आहे.. इथे पोस्ट केलेल्या सर्व कविता/कथा ह्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत..

कविता आवडली. लिहिते राहा...!!! -दिलीप बिरुटे