नजर..
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
-दिप्ती भगत
२५जून,२०१९
छान कविता..
मस्त.आवडली
छान लिहीलंय
प्रचेतस, श्र्वेता मनापासून
छान ! सुरेख !
@चौथा कोनाडा, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. आणि
दीप्ती सुरेख कविता
छान !