Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150777
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

वर्तुळाचे क्षेत्रफळ=πxतत्रिज्या^२ १५४=२२/७ x क्ष^२ क्ष=७ मी. वर्तूळाचे परीघ=2π x त्रिज्या =४४/७ x ७ =४४ मी प्रत्येकी अर्ध्या मी.वर एक कुंडी याप्रमाणे एकूण ४४x२=८८ कुंड्या खरेदी करा!

In reply to by सत्यजित...

८७ ना? कारण शेवटची कुंडी पहिल्या कुंडीच्याच जागी येईल?

In reply to by आवडाबाई

प्रत्येक मीटरच्या सुरुवातीस एक व मध्यावर एक अश्या दोन कुंड्या येतील,शेवटची ८८ क्रमांकाची कुंडी ४४व्या मीटरच्या मध्यावर येईल.

मैत्रिणीस विकला तेंव्हा +१०० तिच्या आईकडून परत घेतला तेंव्हा नफ्याचे १०० जावून पदरचे १०० नुकसान ९०० रुपयांस विकला असता,मुद्दल ६०० व पदरमोड झालेले १०० वगळता,२०० रुपये निव्वळ नफा राहिल.

दोनही गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकींच्या दिशेने धावत आहेत तेंव्हा त्यांच्या गती अनुसार,एका तासात त्यांच्यातील अंतर ५०+४०=९०किमी कमी होईल,तर दोन तासांत १८० किमी कमी होवून गाड्या समोरासमोर असतील! कावळा ताशी १०० किमी वेगाने या दोन तासांत,अकूण २०० किमी उडाला.

In reply to by सत्यजित...

समोरासमोर यायला २ तास लागतील इथ पर्यंत पोहोचले आणि पुढे काय लॉजिक लावायचे तेच नाही समजले. MVP

श्रीधरचे वय लग्नाचे वेळी (क्ष) असेल तर राधाचे वय (३/४ क्ष) आता श्रीधरचे वय( क्ष +१२) तर राधाचे वय ५/६ (क्ष+१२) येते. राधाचे वय = ३/४ क्ष + १२ = ५/६ (क्ष+१२) ३/४ क्ष + १२ = ५/६ क्ष +(५/६x१२) १२-१० = (५/६क्ष - ३/४क्ष २ x१२ = ५/६x१२क्ष - ३/४x१२क्ष २४ = १०क्ष - ९क्ष =क्ष लग्नावेळचे श्रीधरचे वय २४ व राधाचे वय १८ (३/४) आजचे श्रीधरचे वय ३६ व राधाचे वय ३० (५/६)

In reply to by पलाश

मी अंदाजाने एक आकडा घेउन बघू म्हणून प्रयत्न करत होते आणि पहिलाच आकडा २४ धरला, तेच उत्तर निघाले :-) पण क्ष धरून नंतर करुन पाहिले, ते असेच केले.

७. न फुटलेले ग्लास क्ष व फुटलेले ग्लास य मानले तर क्ष + य = १०० क्ष = १०० - य.....(a) ३क्ष - ९य = २४० ३(१०० - य) - ९ य =२४० ३०० - ३य -९य = २४० ३०० - २४० = १२ य ६० = १२ य य = ५ व क्ष = ९५ (प्रवासात य म्हणजे ५ ग्लास फुटले असतील.) ( ९५x३) - (५x९) २८५ - ४५ = २४०

एक राजपुत्र आहे, तो खजिन्याच्या शोधात आहे. तो शोधत शोधत एका गुहेत येतो. पुढे आल्यावर दोन रस्ते फुटलेले दिसतात. प्रत्येक रस्त्यावर एक द्वारपाल उभा असतो. बाजूच्या भिंतीवर नियम कोरलेले असतात, ते असे असतात- एका रस्त्यातून पुढे गेल्यावर खजिना आहे, तर दुसऱ्या रस्त्यावर मृत्यू. ह्या दोन द्वारपाळांपैकी एक जण कायम खरं बोलतो तर एकजण कायम खोटं बोलतो. दोघांपैकी एकाला एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या एका प्रश्नाच्या उत्तरानंतर दोघे काहीही बोलणार नाहीत. राजपुत्राने कोणता प्रश्न विचारायचा ?

In reply to by डॅनी ओशन

पहिल्याला विचारायचा प्रश्न "मी दुसर्याला खजिन्याचा दरवाजा कोणता हे विचारले तर तो काय उत्तर देईल? " ह्याचे जे उत्तर मिळेल त्याच्या विरूद्ध रस्ता घ्यायचा.

घनाचे घनफळ =बाजू^३ १ मी.= १००सेमी मोठ्या घचेघ = १०००००० क्युसेमी लहान घचेघ = १ क्युसेमी म्हणजे एकूण १०००००० लहान आकाराचे घन तयार होतील. प्रत्येकाची उंची १ सेमी असल्याने,एकावर एक ठेवले असता, एकूण उंची = १०००००० सेमी = १०००० मीटर = १० किमी

कोडं बनवायला जेवढा वेळ लागला नाही त्याच्या एक तृतिअंश वेळात सोडवले पण? पण मजा आली खेळताना.. सगळी उत्तरे बरोबर आहेत. म्यान ऑफ द म्याच परत एकदा "सत्यजित" Man of the Match

वरील गणिते छान झाली. त्यातून खेळाडूंचा मेंदू शिणला असेल ! तर चला आता पुन्हा एकदा चित्रपटांच्या विश्वात. या नव्या खेळात तुम्हाला सहा मराठी चित्रपटांची नावे ओळखायची आहेत. त्यासाठी दोन प्रकारची माहिती दिली आहे : १. चित्रपटाच्या नावांची अक्षरसंख्या अशी आहे: २ चित्रपट तीन अक्षरी, २ चित्रपट सहा अक्षरी, १ पाच अक्षरी आणि उरलेला आठ अक्षरी. २. वरील सहा चित्रपटांत मिळून भूमिका केलेल्या कलाकारांची नावे एकत्र मिसळून पुढे दिली आहेत : आनंद इंगळे, श्रेयस तळपदे, मोहन जोशी, संदीप कुलकर्णी, संजय मोने, जयवंत वाडकर, वंदना गुप्ते, पल्लवी पाटील, कादंबरी कदम, मधुरा वेलणकर, अश्विनी भावे आणि पद्मिनी कोल्हापुरे. ३. आता तुम्ही असे करायचंय : वरील कलाकारांच्या यादीतून एक अभिनेता आणि एक अभिनेत्री अशी एकाच चित्रपटात काम केलेली जोडी निवडायची. मग त्या जोडीची सांगड योग्य त्या अक्षर संख्येशी घालून चित्रपट ओळखायचा. ४.उत्तरांना क्रमांक नाही. ‘कलाकार जोडी आणि चित्रपट’ असे एकत्र लिहा. ५. एक जोडी वापरून ते उत्तर बरोबर ठरले की ती जोडी पुन्हा वापरू नका.

चूक, कारण "व्हाट्सअप लग्न" हेअक्षरी आहे !

प्रवास, मातीच्या चुली >> बरोबर ! ... तुमची निघायची वेळ झाली, चला ! छान

आता पहिले निम्मे तर सुटलंय, पुढचं निम्मे सोपे जायला हवे :))

आता घेऊया ‘पर्यावरण’ हा विषय. खाली सहा निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा. असे विषयाशी संबंधित सहा शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल : (१ २ ३ ) असल्याने ( ४ ५ ६ ). ............................... १. सुपरिचित कापाकापीतून निरंतर चिकटवले. ( ५ अक्षरी शब्द ) २. दर्जाहीन शस्त्रोपवित उगवलेले.( ४) ३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६) ४. वजनदार दर्यावर्दीने म्हणावयाचा अपहरण (६) ५. उमजतोय कलकलाट भुसभुशीत (४) ६. हसलाकाळ ढालगज सडेतोड. (४) .

४.पर्यावरणाचा ५.समतोल >>> एक्दम बरोबर ! ढासळला >> शेवटचे अक्षर वेगळे. शेवटी वाक्य करताना सुधारता येईल.

उर्जास्त्रोत, पारंपरिक, ढासळतो. >>> सर्व बरोबर !

हे राहिले: ३. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६)

३ = कोळसाधारित. पूर्ण वाक्य: पारंपरिक उर्जास्तोत कोळसाधारित असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो.

हरकत नाही; तुम्ही नेहमीप्रमाणे बाजी मारलीत ! छान

नवा खेळ पूर्ण नव्या ढंगात ! विषय: समाज. खाली दिलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे: १. शब्दाची अक्षरसंख्या आणि २. त्या शब्दातील मूळ अक्षरांची संख्या (म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर, रफार,इ. असलेली सर्व अक्षरे सोडून). (उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल). सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. ............................................................................ प्रश्न: १. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक समस्या कोणती ? ( 6, 2) २. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, 3) ३. समस्या १ वरील महत्त्वाचा उपाय कोणता ? ( 9,6 ) ४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या (आजार) ? ( 4,2 ) ५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5,1 ) . ६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सदोदित काय सहन करावे लागते ? (5, 4). ७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, 4 ). ८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, 4). ……………………………………………………………………….. येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर ....

(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ असा असेल). हे जरा अजुन समजाउन सांगाल का ? ६ समजले , २ समजले नाही

‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २ म्हणजे : या शब्दातील एकून अक्षरे ६, त्यातील मूळ अक्षरे फक्त २ - स , न. ....... म्हणून जलप्रदूषण चूक. कारण ते ६, ४ आहे !

वायूप्रदूषण नाही. हे पण चूक. विषय : समाज , हे लक्षात घ्या. पर्यावरणातली समस्या झाली. प्रश्नात विचारलेली समस्या प्रचंड मूलभूत आहे तुम्ही आम्ही आपण सगळे देखील त्या समस्येत अंतर्भूत आहोत !! गेली कित्येक वर्षे आपण येता जाता त्या समस्येचा उल्लेख करतो आणि त्यामुळे “आपले सगळे असं” असे म्हणत असतो. इतकी ती मूलभूत आहे. १ चे उत्तरा वरच खेळाचा पुढचा सगळा डोलारा उभा आहे. म्हणून ते माझ्या मनातलेच येण्यासाठी मी तुम्हाला अजून सुद्धा मदत करेन.

१ ची समस्या आपली आणि चीनची पण आहे. त्यांच्या राजकीय व्यवस्थेमुळे चीन त्याच्यावर कायद्याने पण नियंत्रण आणू पाहते. पण आपण खरी लोकशाही पडलो. त्यामुळे आपण त्या समस्येकडे हताशपणे बघत बसतो.... आता सोप्पे ? :))

आता बघूया ३. उडी मारून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नका. ३ हे काय आहे ते तसं सोपे आहे. त्यासाठी एक वापरून वापरून गुळगुळीत झालेला सरकारी शब्द तुमच्या मनात आला असेलच. पण, त्याऐवजी कोडयासाठी एक खास लांब शब्द वापरला आहे. त्यासाठी तुम्हाला जरा ताण द्यावा लागेल !

कायद्याकडे नका जाऊ, समाजशास्त्र आणि वैद्यकाच्या दृष्टीने शब्द बघा

Demography हा संपूर्ण कोड्याचा विषय आहे .

म मा नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणायला थेट उपाय कोणता? असा विचार करा. त्यासाठी लोकसंख्याशास्त्रातील शब्द हवा.

१९७५च्या आणीबाणीत सक्तीने उपद्व्याप केल्याने ‘तो’ ६ अक्षरी शब्द बदनाम झाला. पुढे त्याला पर्यायी शब्द सरकारने काढला. आपल्याला ९ अक्षरी हवा आहे !