✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 05/24/2020 - 15:45  ·  लेख
लेख
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
148937 वाचन

💬 प्रतिसाद (523)

प्रतिक्रिया

२.

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 17:56 नवीन
घटनेनुसार
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 17:58 नवीन
घटनेनुसार >> आ हा, बरोब्बर ! निम्मी लढाई जिंकली ... :)
  • Log in or register to post comments

१.

सत्यजित...
Sun, 07/05/2020 - 18:00 नवीन
भारतीयांसाठी
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 18:09 नवीन
भारतीयांसाठी बरोबर, आता तुम्ही निघायचे ! झाले सामनावीर आत्ताच :))
  • Log in or register to post comments

आता

हेमंतकुमार
Sun, 07/05/2020 - 20:47 नवीन
हे राहिले: ४. हरिहरन दणकट हिकमतीने प्रकाशराव दिल्याशिवाय. ६. सबलीकरण कलीयुगात मावळताना घरातून लुकलुकले.
  • Log in or register to post comments

४.

आवडाबाई
Mon, 07/06/2020 - 08:58 नवीन
कल्याणकारी ?
  • Log in or register to post comments

कल्याणकारी ? बरोबर छान

हेमंतकुमार
Mon, 07/06/2020 - 09:41 नवीन
कल्याणकारी ? बरोबर छान
  • Log in or register to post comments

आता

हेमंतकुमार
Mon, 07/06/2020 - 10:50 नवीन
हत्ती गेला, शेपूट (६) राहिले !
  • Log in or register to post comments

६

हेमंतकुमार
Mon, 07/06/2020 - 17:23 नवीन
चे उत्तर तासाने लिहितो .
  • Log in or register to post comments

मला हे खुप अवघड जातेय.. नेहमी

गणेशा
Mon, 07/06/2020 - 18:29 नवीन
मला हे खुप अवघड जातेय.. नेहमी प्रमाणे :-))
  • Log in or register to post comments

६ = राबवलेली.

हेमंतकुमार
Mon, 07/06/2020 - 18:36 नवीन
६ = राबवलेली. अंतिम वाक्य: ( भारतीयांसाठी घटनेनुसार लोकशाही) आणि (कल्याणकारी राज्यव्यवस्था राबवलेली ) आहे. सत्यजित सर्वोत्तम ! धन्यवाद
  • Log in or register to post comments

उफ्फ

आवडाबाई
Tue, 07/07/2020 - 14:39 नवीन
नाहीच सापडला शेवटपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

प्रायश्चित--

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/09/2020 - 14:44 नवीन
प्रायश्चित – आवडाबाइंचे बरोबर उत्तर चूक म्हटल्या मूळे प्रायश्चित म्हणून नवे गणित कोडे सादर करत आहे. याचे उत्तर बरोबर का चूक ते मी देणार नाही. जो गणित सोडवेल त्यानेच ते उत्तर कसे आले ते ही लिहायचे आहे म्हणजे सोडवण्याच्या पायऱ्या लिहायच्या. ते जर उत्तर बरोबर असेल तर बाकीचे पडताळा करुन त्याला बरोबर असे म्हणू शकतात पण जर कोणाला उत्तर चुकीचे वाटले तर त्याने बरोबर उत्तर इथे लिहायचे आहे, सोडवण्याच्या पायर्‍यांसकट. म्यान ऑफ द म्याच जाहिर करायला मी इथे परत येईन. १. माझ्याकडे १२ कलिंगडे, जी सर्व एकाच मापाची-आकाराची आहेत. यातील १ कलिंगड १.५ किलो वजनाचे आहे व बाकी सगळी प्रत्येकी १ किलो वजनाची आहेत. फक्त एक वजनाचा तराजू (पण वजनाच्या मापांशिवाय) दिला असता केवळ ३ वेळा तराजू वापरुन हे जड कलिंगड कसे ओळखता येईल? हे अजून अवघड होईल जेव्हा आपल्याला वेगळे कलिंगड इतरांपेक्षा जड आहे की हलके हे माहित नसेल. त्या बद्दलही विचार करायला हरकत नाही (या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला आलेले नाही) २. एका कुटुंबात आई व मुलाच्या वयाची बेरीज बाबा व मुलीच्या वयाच्या बेरेजे इतकी आहे. आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर बाबा आई पेक्षा ५ वर्षांनी मोठे आहेत. कुटुंबातल्या सर्व सदस्यांचे एकूण वय ९६ आहे तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचे वय सांगा ३. एका आयताच्या कर्णाची लांबी ५ सेमी आहे व त्याच्या एका बाजूची लांबी ३ सेमी आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती? ४. १५४ वर्ग मीटर क्षेत्रफळ असलेल्या एका वर्तुळाकृती तलावा भोवती प्रत्येकी अर्धा मीटर अंतरावर मला काही कुंड्या ठेवायच्या आहेत तर मी एकूण किती कुंड्या विकत घेऊ? ५. एका मीटर उंची एका मिटर लांबी आणि एक मीटर रुंदी असलेल्या एका घनाचे १ सेंमी लांबी एक सेंमी रुंदी आणि १ सेंमी उंची असलेले समान तुकडे केले व हे तुकडे एकमेकांवर ठेवले तर त्यांची एकूण उंची किती भरेल? ६. मी नुकताच एका श्रीधर आणि राधाच्या लग्नाच्या १२ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेंल्या सामारंभाला गेलो होतो. त्यावेळी श्रीधर मला म्हणाला की ज्या वेळी आमचे लग्न झाले त्यावेळी राधा माझ्या तीन चतुर्थांश वयाची होती आणि आज ती माझ्या पाच षष्ठांश वयाची आहे. तर लग्नाच्या दिवशी त्या दोघांची वये काय असतील? ७. कुरियर बॉय हरीश ला १०० काचेचे ग्लास एका ठिकाणी पोचवायचे आहेत. प्रत्येक ग्लास न फोडता पोचवण्या करता त्याला ३ रुपये मिळणारा आहेत तर प्रत्येक फुटलेल्या ग्लासा करता त्याला ९ रुपये दंड भरावा लागणारा आहे. त्याने एकूण २४० रुपये मिळवले. तर त्याने प्रवासात किती ग्लास फोडले असतील? ८. सोनियाने ६०० रुपयांना एक प्रेशर कुकर विकत घेतला पण तो खराब निघाला. तिने तो तिच्या मैत्रिणीला ७०० रुपयांना विकून टाकला, पण मग तिला मैत्रिणीला फसवल्याचे वाईट वाटले म्हणून तिने तो कुकर तिच्या कडून ८०० रुपयांना विकत घेतला. मग एका जुने देऊन नवे घ्या स्कीम मध्ये तिने तो कुकर ९०० रुपयांना विकून टाकला. या व्यवहारात सोनियाला नफा झाला की तोटा? आणि किती? ९. पुणे ते मुंबई अंतर १८० किमी आहे. एक आगगाडी पुण्याहुन मुंबईला निघाली जिचा वेग ५० किमी प्रति तास आहे त्याच वेळी दुसरी आगगाडी मुंबई वरुन पुण्याला निघाली जिचा वेग ४० किमी प्रतितास इतका आहे. जेव्हा पुण्यावारुन गाडी निघाली त्याच वेळी त्या गाडीवर बसलेला एक कावळा गाडीवरुन उडाला आणि उडत उडत समोरून येणाऱ्या गाडीवर बसला व तसाच लगेच मागे फिरुन पहिल्या गाडीवर येउन बसला व लगेच मागे दुसऱ्या गाडी कडे उडाला. जो पर्यंत त्या गाड्या एकमेकासमोर येत नाहीत तो पर्यंत त्याचा हा प्रवास सुरु होता कावळ्याचा वेग जरा ताशी १०० किमी असेल तर त्या दिवशी तो कावळा किती अंतर उडाला? १०. चार या आकड्याचा सोळा वेळा वापर करून व अधिक, वजा, गुणिले किंवा भागिले ह्या पैकी कोणतीही चिन्हे कितीही वेळा वापरुन तुम्ही बनवलेल्या गणिताचे उत्तर एक हजार आले पाहिजे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

2.

शा वि कु
गुरुवार, 07/09/2020 - 15:11 नवीन
मुलाचे वय 12, मुलीचे 7, आईचे 36, वडिलांचे 41. मुलाचे वय क्ष मानले. आईचे वय 3क्ष झाले. वडिलांचे वय 3क्ष +5 झाले. मुलीचे वय य मानले. महितीवरून: क्ष+3क्ष=3क्ष +5+य यावरून य=क्ष-5 मग क्ष+3क्ष+3क्ष+5+क्ष-5=96 क्ष=12.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बरोबर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:11 नवीन
असेच काढले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

१०.

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:30 नवीन
४४४+४४४+४४+४४+४+४+४+४+४+४=१००० हे trial and error वापरून काढले, १६ वेळा वापरायचे होते म्हणून बेरीजच असेल असे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

१.

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 16:29 नवीन
प्रथम ६-६ कलिंगडे दोन बाजूस यापैकी जी बाजू वजनदार असेल तीत १.५ किलोचे कलिंगड अलेल. दुसर्‍या वेळी या सहापैकी ३-३ कलिंगडे दोन बाजूस यापैकी जी बाजू वजनदार असेल तीत १.५ किलोचे कलिंगड अलेल अता तीन कलिंगडे मिळाली ज्यात एक १.५ किलोचे आहे तिसर्‍या वेळी या तीनपैकी कोणतीही दोन कलिंगडे दोन बाजूस ठेवली असता, जी बाजू वजनदार असेल त्या बाजूचे कलिंगड १.५ किलोचे असेल.दोनही बाजू समान असतील तर राहिलेले तिसरे कलिंगड १.५ किलोचे असेल!
  • Log in or register to post comments

उत्तरे न पाहता पहिले गणित

गणेशा
गुरुवार, 07/09/2020 - 18:42 नवीन
उत्तरे न पाहता पहिले गणित सोडवताना माझ्याही ह्याच steps होत्या :-)) __^__ नंतरचे नंतर पाहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

सेम

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:11 नवीन
सेम असेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

३. १२ सेमी^२

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 16:34 नवीन
कर्ण^२ =पाया^२+उंची^२ २५=क्ष^२ + ९ क्ष=४ आयताचे क्षेत्रफळ=लांबी x रुंदी =४x३ =१२ चौ.सेमी
  • Log in or register to post comments

बरोबर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:34 नवीन
असेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

४.८८

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 16:43 नवीन
वर्तुळाचे क्षेत्रफळ=πxतत्रिज्या^२ १५४=२२/७ x क्ष^२ क्ष=७ मी. वर्तूळाचे परीघ=2π x त्रिज्या =४४/७ x ७ =४४ मी प्रत्येकी अर्ध्या मी.वर एक कुंडी याप्रमाणे एकूण ४४x२=८८ कुंड्या खरेदी करा!
  • Log in or register to post comments

८७?

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:12 नवीन
८७ ना? कारण शेवटची कुंडी पहिल्या कुंडीच्याच जागी येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

नाही येणार!

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 04:18 नवीन
प्रत्येक मीटरच्या सुरुवातीस एक व मध्यावर एक अश्या दोन कुंड्या येतील,शेवटची ८८ क्रमांकाची कुंडी ४४व्या मीटरच्या मध्यावर येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

७. २०० रुपये नफा

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 17:13 नवीन
मैत्रिणीस विकला तेंव्हा +१०० तिच्या आईकडून परत घेतला तेंव्हा नफ्याचे १०० जावून पदरचे १०० नुकसान ९०० रुपयांस विकला असता,मुद्दल ६०० व पदरमोड झालेले १०० वगळता,२०० रुपये निव्वळ नफा राहिल.
  • Log in or register to post comments

उत्तर बरोबर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:18 नवीन
माझ्या स्टेप्स -६००+७००-८००+९००=२००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

८.

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 23:04 नवीन
हे आठव्या प्रश्नाचे उत्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

९.२०० किमी

सत्यजित...
गुरुवार, 07/09/2020 - 17:22 नवीन
दोनही गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकींच्या दिशेने धावत आहेत तेंव्हा त्यांच्या गती अनुसार,एका तासात त्यांच्यातील अंतर ५०+४०=९०किमी कमी होईल,तर दोन तासांत १८० किमी कमी होवून गाड्या समोरासमोर असतील! कावळा ताशी १०० किमी वेगाने या दोन तासांत,अकूण २०० किमी उडाला.
  • Log in or register to post comments

पटले

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:46 नवीन
समोरासमोर यायला २ तास लागतील इथ पर्यंत पोहोचले आणि पुढे काय लॉजिक लावायचे तेच नाही समजले. MVP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

श्रीधरचे वय लग्नाचे वेळी (क्ष

पलाश
गुरुवार, 07/09/2020 - 18:21 नवीन
श्रीधरचे वय लग्नाचे वेळी (क्ष) असेल तर राधाचे वय (३/४ क्ष) आता श्रीधरचे वय( क्ष +१२) तर राधाचे वय ५/६ (क्ष+१२) येते. राधाचे वय = ३/४ क्ष + १२ = ५/६ (क्ष+१२) ३/४ क्ष + १२ = ५/६ क्ष +(५/६x१२) १२-१० = (५/६क्ष - ३/४क्ष २ x१२ = ५/६x१२क्ष - ३/४x१२क्ष २४ = १०क्ष - ९क्ष =क्ष लग्नावेळचे श्रीधरचे वय २४ व राधाचे वय १८ (३/४) आजचे श्रीधरचे वय ३६ व राधाचे वय ३० (५/६)
  • Log in or register to post comments

बरोबर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:24 नवीन
मी अंदाजाने एक आकडा घेउन बघू म्हणून प्रयत्न करत होते आणि पहिलाच आकडा २४ धरला, तेच उत्तर निघाले :-) पण क्ष धरून नंतर करुन पाहिले, ते असेच केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

मीपण!! :)

पलाश
गुरुवार, 07/09/2020 - 21:30 नवीन
मीपण!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

७.

पलाश
गुरुवार, 07/09/2020 - 19:00 नवीन
७. न फुटलेले ग्लास क्ष व फुटलेले ग्लास य मानले तर क्ष + य = १०० क्ष = १०० - य.....(a) ३क्ष - ९य = २४० ३(१०० - य) - ९ य =२४० ३०० - ३य -९य = २४० ३०० - २४० = १२ य ६० = १२ य य = ५ व क्ष = ९५ (प्रवासात य म्हणजे ५ ग्लास फुटले असतील.) ( ९५x३) - (५x९) २८५ - ४५ = २४०
  • Log in or register to post comments

बरोबर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:25 नवीन
फक्त क्ष वापरून केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

५. १००० मीटर

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 21:42 नवीन
५. १००० मीटर
  • Log in or register to post comments

हे पण छान कोडं आहे

डॅनी ओशन
गुरुवार, 07/09/2020 - 22:18 नवीन
एक राजपुत्र आहे, तो खजिन्याच्या शोधात आहे. तो शोधत शोधत एका गुहेत येतो. पुढे आल्यावर दोन रस्ते फुटलेले दिसतात. प्रत्येक रस्त्यावर एक द्वारपाल उभा असतो. बाजूच्या भिंतीवर नियम कोरलेले असतात, ते असे असतात- एका रस्त्यातून पुढे गेल्यावर खजिना आहे, तर दुसऱ्या रस्त्यावर मृत्यू. ह्या दोन द्वारपाळांपैकी एक जण कायम खरं बोलतो तर एकजण कायम खोटं बोलतो. दोघांपैकी एकाला एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या एका प्रश्नाच्या उत्तरानंतर दोघे काहीही बोलणार नाहीत. राजपुत्राने कोणता प्रश्न विचारायचा ?
  • Log in or register to post comments

पहिल्याला विचारायचा प्रश्न

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 23:35 नवीन
पहिल्याला विचारायचा प्रश्न "मी दुसर्याला खजिन्याचा दरवाजा कोणता हे विचारले तर तो काय उत्तर देईल? " ह्याचे जे उत्तर मिळेल त्याच्या विरूद्ध रस्ता घ्यायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन

अजून एक

आवडाबाई
गुरुवार, 07/09/2020 - 23:45 नवीन
आटपाट नगरात जर ५ चे ½=३ असतील तर ह्या न्यायाने १० चे ⅓ किती असतील?
  • Log in or register to post comments

५.१० किमी

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 04:06 नवीन
घनाचे घनफळ =बाजू^३ १ मी.= १००सेमी मोठ्या घचेघ = १०००००० क्युसेमी लहान घचेघ = १ क्युसेमी म्हणजे एकूण १०००००० लहान आकाराचे घन तयार होतील. प्रत्येकाची उंची १ सेमी असल्याने,एकावर एक ठेवले असता, एकूण उंची = १०००००० सेमी = १०००० मीटर = १० किमी
  • Log in or register to post comments

सर्वजण

हेमंतकुमार
Fri, 07/10/2020 - 09:31 नवीन
छान खेळलेत. मजा आली.
  • Log in or register to post comments

अरे काय हे...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/10/2020 - 10:34 नवीन
कोडं बनवायला जेवढा वेळ लागला नाही त्याच्या एक तृतिअंश वेळात सोडवले पण? पण मजा आली खेळताना.. सगळी उत्तरे बरोबर आहेत. म्यान ऑफ द म्याच परत एकदा "सत्यजित" Image removed.
  • Log in or register to post comments

वा, मस्त !

हेमंतकुमार
Fri, 07/10/2020 - 10:37 नवीन
वरील गणिते छान झाली. त्यातून खेळाडूंचा मेंदू शिणला असेल ! तर चला आता पुन्हा एकदा चित्रपटांच्या विश्वात. या नव्या खेळात तुम्हाला सहा मराठी चित्रपटांची नावे ओळखायची आहेत. त्यासाठी दोन प्रकारची माहिती दिली आहे : १. चित्रपटाच्या नावांची अक्षरसंख्या अशी आहे: २ चित्रपट तीन अक्षरी, २ चित्रपट सहा अक्षरी, १ पाच अक्षरी आणि उरलेला आठ अक्षरी. २. वरील सहा चित्रपटांत मिळून भूमिका केलेल्या कलाकारांची नावे एकत्र मिसळून पुढे दिली आहेत : आनंद इंगळे, श्रेयस तळपदे, मोहन जोशी, संदीप कुलकर्णी, संजय मोने, जयवंत वाडकर, वंदना गुप्ते, पल्लवी पाटील, कादंबरी कदम, मधुरा वेलणकर, अश्विनी भावे आणि पद्मिनी कोल्हापुरे. ३. आता तुम्ही असे करायचंय : वरील कलाकारांच्या यादीतून एक अभिनेता आणि एक अभिनेत्री अशी एकाच चित्रपटात काम केलेली जोडी निवडायची. मग त्या जोडीची सांगड योग्य त्या अक्षर संख्येशी घालून चित्रपट ओळखायचा. ४.उत्तरांना क्रमांक नाही. ‘कलाकार जोडी आणि चित्रपट’ असे एकत्र लिहा. ५. एक जोडी वापरून ते उत्तर बरोबर ठरले की ती जोडी पुन्हा वापरू नका.
  • Log in or register to post comments

मधुरा-मोहन

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 12:15 नवीन
सरीवर सर
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Fri, 07/10/2020 - 12:19 नवीन
सरीवर सर >> सरी. बरोबर. छान सुरवात!
  • Log in or register to post comments

आनंद-वंदना

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 14:50 नवीन
वाॅट्सअप लग्न
  • Log in or register to post comments

पद्मिनी-श्रेयस

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 14:56 नवीन
प्रवास
  • Log in or register to post comments

बोनस!

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 15:00 नवीन
संजय-मधुरा-वंदना मातीच्या चुली
  • Log in or register to post comments

-१

हेमंतकुमार
Fri, 07/10/2020 - 15:00 नवीन
चूक, कारण "व्हाट्सअप लग्न" हे ७ अक्षरी आहे !
  • Log in or register to post comments

+११

हेमंतकुमार
Fri, 07/10/2020 - 15:03 नवीन
प्रवास, मातीच्या चुली >> बरोबर ! ... तुमची निघायची वेळ झाली, चला ! छान
  • Log in or register to post comments

पल्लवी-संजय

सत्यजित...
Fri, 07/10/2020 - 15:04 नवीन
क्लासमेट्स
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा